मिपा रांगोळी स्पर्धा २०१३
मंडळी,
दिवाळी आणि रांगोळीचं अगदी जीवाभावाचं नातं आहे. लहानपणी रांगोळ्या काढण्यापासूनच सार्वजनिक चित्रकलेला सुरुवात होते. रोजच्या रोज तुळशीपाशी एखादं स्वस्तिक, दाराच्या उंबरठ्यावर गोपद्म, लक्ष्मीची पाऊले असे आईने काढताना आपण बघत आलोय तरी खरी गंमत दिवाळीला असते. त्यावेळी आपल्या चित्रकारीत खरेखुरे रंग भरता येतात. लहानपणी पोपट, मांजर, फुले काढण्यापासून सुरुवात होते. मोठे झाल्यावर ठिपक्यांची रांगोळी जमवण्यासाठी धडपड असते. समांतर ठिपके कोणत्याही फूटपट्टीशिवाय काढण्याचं कसब अंगी हवं, नाहीतर ठिपक्यांचे कागद ती सोय करतात. मग रांगोळीची रेघ नाजूक हवी, रंगसंगती उठावदार हवी असे सल्ले मिळतात.
आता तर संस्कारभारतीच्या रांगोळ्यांमुळे अगदी अंगणभर चितारता येतील असे नमूने व उत्तम रंगसंगती ठिकठिकाणी दिसून येते. रांगोळी रेखताना अगदी मान पाठ एक झाली तरी त्या नक्षीकडे येणारे जाणारे जेंव्हा क्षणभर थांबून बघतात तेंव्हा त्या कष्टांचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. अशाचप्रकारच्या रांगोळीसाठी ही स्पर्धा! मिपाकरांच्याही घरात छुपे कलाकार असतील. स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपण किंवा आपल्या नजिकच्या नातेवाईकांनी काढलेल्या रांगोळीचे छायाचित्र मिपावर या धाग्याच्या प्रतिक्रियांमधे चिकटवावे. कलाकाराचे नाव द्यावे. स्पर्धेतील रांगोळ्या या शेजार्यांनी काढलेल्या नकोत. रांगोळीत तेवणार्या पणत्या असल्या तरी एकंदर फक्त 'रांगोळीची शोभा' हा मुद्दा प्रामुख्याने लक्षात घेतला जावा. कलाकुसर, रंगसंगती याला गुण आहेत.
आपण रांगोळ्यांचे फोटो १० नोव्हेंबरपर्यंत चढवू शकता. सगळे मिपाकर सदस्यच परिक्षक आहेत. त्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत आपापल्या पसंतीच्या तीन रांगोळ्यांस क्रम द्यावा. याठिकाणी आपल्या स्पर्धकांशी असलेल्या मैत्रीपेक्षा कलेला न्याय देणे अपेक्षित आहे. सर्व मते मोजून संपादक मंडळ २० नोव्हेंबरपर्यंत निकाल जाहीर करेल. पहिल्या ३ विजेत्यास्/विजेतीस आंतरजालीय प्रशस्तिपत्रक देण्यात येईल.
वाचने
280506
वाचनखूण
प्रतिक्रिया
146
हेल्प हेल्प हेल्प !!!!
In reply to हेल्प हेल्प हेल्प !!!! by पियुशा
पिकासावर टाक किन्वा लिन्क दे.
ओक फाइन जमले एकदाचे फोटो
ही अजुन एक गेल्या वर्षी शॉप
In reply to ही अजुन एक गेल्या वर्षी शॉप by पियुशा
अफाट...!
In reply to ही अजुन एक गेल्या वर्षी शॉप by पियुशा
वा! अ फा ट!
कसली कलाकार आहेस ग. वरची
In reply to कसली कलाकार आहेस ग. वरची by त्रिवेणी
धन्स हो
परीक्षकांची परीक्षा
एक से बढकर एक आहेत सगळ्या रांगोळ्या...
या माझ्या रांगोळ्या
In reply to या माझ्या रांगोळ्या by राजमुद्रा२१
अप्रतिम
In reply to अप्रतिम by सायली
राजमुद्रा रांगोळ्या खुप
In reply to राजमुद्रा रांगोळ्या खुप by पियुशा
धन्यवाद पियुशा,
In reply to अप्रतिम by सायली
धन्यवाद सायली
In reply to या माझ्या रांगोळ्या by राजमुद्रा२१
आ:हा: उल्हासनिय :
मस्त रांगोळ्या! मिपाचे
मस्त
सगळ्या रांगोळ्या
केवळ अप्रतिम.
सर्व सदस्यांना विनंती करण्यात
In reply to सर्व सदस्यांना विनंती करण्यात by रेवती
पहिला नंबर - सायली http:/
In reply to पहिला नंबर - सायली http:/ by अत्रुप्त आत्मा
एक विनंती- राजमुद्रा यांच्या
नम्बर
१. हेमांगीके (कोलम
मत देताना एकदम अवघडल्यासारखं
स्पर्धेची मुदत संपली तरी
In reply to स्पर्धेची मुदत संपली तरी by आनन्दिता
दोन्ही मस्त आहेत!
In reply to स्पर्धेची मुदत संपली तरी by आनन्दिता
मस्त आहेत रांगोळ्या!
माझी पसंती
(No subject)
In reply to (No subject) by अनिल तापकीर
हा धागा मी उशिरा पहिला गावाला
In reply to (No subject) by अनिल तापकीर
सुरेख रांगोळी !
In reply to (No subject) by अनिल तापकीर
___/\___ साष्टांग नमस्कार.
मस्त आहे रांगोळी !
सुरेख
सदस्यहो, रांगोळ्यांना क्रमांक
१) केदार मिसळपाव
मला आवडलेल्या
ह्य वर्शात तरी निकाल लावा
सर्वांना धन्यवाद!
In reply to सर्वांना धन्यवाद! by संपादक मंडळ
धन्यवाद
अरे वा !!! माझा दुसरा नं ?
केदार मिसळपाव, पियुशा,
सर्व विजेत्यांचे हार्दिक
माझ्याकडूनही...
अभिनंदन!!
अरे वा,
विजेत्यांचे अभिनंदन,
मस्त
In reply to मस्त by जेनी...
धन्यवाद पूजा
ए पु... पिश्वी नाय हो बै
सगळ्या रांगोळ्या अप्रतिम.
अभिनंदन करणार्या सर्व मिपा करांना
माफ करा. थोड्या उशीराने लिहितेय.
अभिनंदन