जी २ असा प्यादं पुढे घेऊन उंट कर्णात घ्यायची तयारी आनंदची. घोडा सी ६. मॅग्नुस लगोलग खेळला. वेळ घालवत नाहीये. कॅसल करेल असे वाटले होते.
मॅग्नुस दरवेळी आनंदला निर्णय घ्यायला भाग पाडतोय. आणि त्यानुसार खेळी करतोय.
आनंद जीई४ खेळलाय!
मॅग्नुस बराच वेळ घेतो़य. कॅसल केलाय. छोटा कॅसल. तो आधी लांबवायला बघत होता पण शेवटी आनंदने त्याला निर्णय घ्यायला भाग पाडले असे दिसते. अपेक्षेप्रमाणे आनंदचा पांढरा उंट कर्णात येऊन बसला जी २!
आनंदने राजाच्या बाजूने दुय्यम कर्णाला मोकळा केलाय. मॅग्नसचा काळा उंट आधीच पडलेला असल्याने त्याला वजीरानेच हल्ला करता येईल. हा काहीसा सापळा लावलाय का आनंदने?
आणि बी ४ खेळला मॅग्नुस.वजिराच्या बाजूला काउंटर प्ले जनरेट करायचा प्रयत्न आहे.
आनंद राजाच्या बाजूला मेटिंग नेट लावतोय. त्याला ते यशस्वी करायलाच हवे, नाहीतर वजिराच्या बाजूची प्यादी रोखणे अवघड होऊन बसेल!
आनंदकडून एफ प्यादे पुढे जाण्याचीच अपेक्षा आहे. ई, एफ आणि जी प्याद्यांच्या रोलर्कोस्टर पुढे काळ्याला चिरडून टाकणे हेच गरजेचे आहे. या महत्त्वाच्या क्षणी वजिराच्या बाजूला आनंदने त्याचे मोहोरे वळवू नयेत.
ए-४ कसे काय चालेल हे पाहणे आवडेल मला. यामुळे मॅग्नसच्या घोड्याला बी पट्टीत येण्यापासून रोखता येईल आणि त्याचे ए पट्टीतले प्यादेही निष्प्रभ होईल. आणि मॅग्नसचे बी प्यादे सरळ पुढे जाऊन हत्तीला त्रास देईल तरी हत्ती बी-२ मधे येऊन त्याला रोखता येईल. उलट त्या प्याद्याने आनंदचे सी प्यादे मारले तरी आनंदला लगेच काही करण्याची आवश्यकता नाही कारण तिथे वजीर नि हत्ती दोघेही त्याची पुढची पट्टी रोखून बसले आहेत.
घोड्याची बी-५ ही जागाच नेमकी ते प्यादे अडवून धरत होते. डी-५ वर आधीच मॅग्नसचे प्यादे असल्याने तो घोडा सी पट्टीतच अडकून पडला असता. एनिवे. शेवटी आनंदने तिकडचा सगळा हल्लाच मोडून काढला. आता मॅग्नसला फक्त बी प्यादयावर अवलंबून रहावे लागणार आहे.
वजिराच्या बाजूला त्याचा रेटा चालू ठेवणार का?
त्याची राजाची बाजू अगदी नाजूक झाली आहे. एफ प्यादे सहाव्या घरात आले तर अवघड आहे.
कदाचित तो सी३ वरचे प्यादे घेऊन घोडा बी ४ मधे आणून ते प्यादे पुढे रेटेल! म्हणजे आनंदला काहीवेळ तरी वजिराच्या बाजूला लक्ष देणे भाग पडावे.
घड्याळात चांगलाच मागे पडलाय २७ मिनिटे कमी आहेत आनंदपेक्षा! हे क्रिटिकल ठरु शकते कारण डाव ओपन पोझीशन नाहीये. काँप्लिकेटेड असल्याने प्रत्येक मूवला मॅग्नुसला विचार करणे भागच आहे.
मॅग्नसकाका लैच टाईम घालवताहेत. आता अठरा खेळ्यांना सुमारे ३५ मिनिटे आहेत. कदाचित पुढच्या चार-पाच खेळ्या महत्त्वाच्या असाव्यात. त्यांत त्याला सुटकेचा मार्ग सापडला तरच... म्हणून बहुधा तो चार-पाच खे़ळ्या अतिशय काळजीपूर्वक करेल असेल दिसते.
मॅग्नुस खेळलाच ती खेळी! तसा सोडणार नाहीच तो. आता आनंदची पुढची खेळी काय?
पुढे वजीर ए५ मधे आणून प्यादे रेटायचे आणि आनंदचा हत्ती मागेच अडकवून ठेवायचा अशी अटकळ आहे.
त्याला काहीही करुन आनंदचा वजीर एफ ४ आणि नंतर एच ४ असा जाऊ देणे परवडणारे नाही!
आता अचूक कॅलक्यूलेशन्स महत्त्वाची.
खेळून मॅग्नसने आपला घोडा निष्प्रभ झाल्याचे मान्यच केले आहे असे दिसते. जर बी आणि सी प्याद्यांची मारामारी झाली असती तर त्याला पुढे घुसायला संधी होती. आनंदने एफ पट्टीतील प्यादे आधी दामटल्याने त्याचे बी प्यादे घेणार नाही हे निश्चित झाल्याने मॅग्नसने ती आशा सोडून देऊन प्याद्याच्या प्रमोशनवर लक्ष केंद्रित केलेले दिसते. लवकरच त्याचा वजीर बी०६ मधे येऊन त्या प्याद्याला पाठिंबा देईल असा अंदाज आहे. याच वेळी तो आनंदच्या पुढे सरकू पाहणार्या प्याद्यांवर लक्ष ठेवून शकेल.
पण ए-५ हा दुसरा पर्यायही तितकाच त्रासाचा कारण मग उजव्या कोपर्यातील घडामोडींपासून वजीर किमान एक खेळी मागे पडतोय. ते अधिक धोकादायक ठरेल मॅग्नसला. कारण घोडा तसाही खेळाबाहेर आहे त्याचा. एका उंटाच्या बळावर राजाची बाजू सांभाळणे फारच तापदायक होते मग.
तुमच्या भावना समजु शकतो...पण उंट मधे घातला असता तरी जिंकण वाटते तेवढ सोप नाही आनंद साठी..
हा व्हीडीओ बघा , उंट खेळ्ल्यावर सुद्धा भरपुर व्हेरीएशन्स आहे..
http://www.youtube.com/watch?v=JotVgV-XeaQ
मला चेसमधले शष्प कळत नाही. पण लोकांचे प्रतिसाद बघुन वाटतयं
पांड्या, पांड्या, लेका ग्रँडमास्टर का नाही झालास. (पांड्या, पांड्या, लेका बालिष्टर का नाही झालास च्या चालीवर वाचावे)
असो. क्रिकेटमधे आम्हीपण फक्त तोंड्पाटीलकीच करतो म्हणा :)
गेले ९ डाव तुम्हा सर्वांच समालोचन वाचत होतो, चेस मधी खूप काळात नाही त्यामुळे वाचनमात्र सहभाग होता.
पण आज तुम्हा सर्वांप्रमाणे वाटत होते ( पट पाहून तर खात्रीच होती) कि विश्या जिंकेल :)
जिंकायला ६.५ / १२ पॉईट्स पाहिजेत .... आणि चेस मेंदुचा खेळ आहे ना ... कधी कोणाला नॉव्हेल्ती सुचेल सांगता येणार नाही ... पुढचे तीन्ही डाव आनंद जिंकायची शक्यता १२.५ % आहेच ना !!
दहाव्या डावाचा धागा न काढल्याबद्दल मनापासून माफी मागतो. :(
परंतु सामन्यातली आनंदची ऑलमोस्ट हरायला आलेली स्थिती आणि झोपेची कमतरता या दोन्ही गोष्टींनी माझ्या निश्चयावर शेवटी मात केली आणि मी उठू शकलोच नाही. असो, डाव बरोबरीत सुटला आणि मॅग्नुस निर्विवाद नवा विजेता म्हणून घोषितही झाला. त्याचे मनःपूर्वक अभिनंदन.
९ नोवेंबरपासूनचे आधीचे नऊही डाव तुम्ही मिपाकरांनी भरघोस प्रतिसाद देऊन माझ्या चालत्या समालोचनाला जो काही हातभार लावलेला आहे त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे! अन्यथा रात्री १.२० ला गजर लावून उठणे त्यापुढे दीड वाजल्यापासून ५.३० - ६.३० पर्यंत समालोचन करणे आणि पुढे ऑफिसला जाणे ही कसरत मला शक्य झाली असती असे वाटत नाही. परंतु तुमचा उत्साहच एवढा दांडगा होता आणि खेळातला रस अगदी भरभरुन दिसत होता त्यामुळे मी हे करु शकलो. सर्व सहभागी मेंबरांचे अनेक आभार. असाच लोभ असू द्या.
(कृतज्ञ) रंगा
धन्यवाद रंगाशेठ.
समालोचनामुळे जबरदस्त मजा आली.
तुमच्याबरोबरच रमताराम, गिरीजा, अग्निकोल्हा इत्यादींनी अगदी उत्साहाने सहभाग घेतला त्यांचेही मनःपूर्वक धन्यवाद.
आनंद नेमका कुठे कमी पडला ह्याचे विश्लेषण करणारा एखादा धागा अवश्य येउ द्यात.
या संपूर्ण वर्ल्ड चँपियनशिपचे इतके सुंदर आणि माहितीपूर्ण विश्लेषण करणार्या या धाग्यावरील सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. काही कारणाने एखादा डाव बघता येणार नसेल तर मी केवळ मिसळपाववरील चर्चांवर अवलंबून असायचे. बुद्धिबळातील थरार कोणत्याही शारीरिक खेळापेक्षा कमी नाही याचा अनुभव घेता आला. :)
धन्यवाद.
डी ४ आनंदने
In reply to डी ४ आनंदने by चतुरंग
आधी धागा उघडला आता म्याच ओपन करतो
वाटच पाहत होतो धाग्याची.. दोन
फिंगर्स क्रॉस्सड
चारातले दोन जिंकून + २ ड्रॉ
आनंदने आक्रमक चाली सुरु केल्या आहेत.
घोडा ई २ मधे आणलाय
मॅग्नस एवढा काय विचार करतोय?
माताय!
दहाव्या खेळीला
राजाच्या
पहिल्यांदाच मॅग्नुस
आज
पुन्हा घोडा नी उंटाचं
Live chess broadcast powered
Live chess broadcast powered by ChessBomb and Chessdom
आज काहितरी जबरदस्त बघायला
उत्तम!
मॅग्नुसचा प्लॅन हत्ती ए६ मधून
मॅग्नुसचा प्लॅन हत्ती ए६ मधून
एक्सचेंज नंतर पुढे काही
शक्यता अनेक आहेत. पण हे
आता मॅग्नुस
In reply to आता मॅग्नुस by चतुरंग
+१ असेच वाट्टेय
In reply to +१ असेच वाट्टेय by ऋषिकेश
नाही
पोझीशन काँप्लिकेटेड
घोडा सी७
एफ४ आनंद
आता
हम्म
In reply to हम्म by रमताराम
नाही
In reply to नाही by चतुरंग
नोप
ए स्तंभातली प्यादी
वॉव
मॅग्नुस बी ३ असे प्यादे खेळून
मॅग्नुस
हे कारलं झोपलं का काय?
वॉव
बी३!!
आता आनंद बहुतेक
बी-३
In reply to बी-३ by रमताराम
हं!
In reply to बी-३ by रमताराम
मॅग्नुसचा
In reply to मॅग्नुसचा by चतुरंग
करेक्ट
आनंदसाठी
साहेबांना
काय चाल्लाय?
In reply to काय चाल्लाय? by चतुरंग
बाबाजी
In reply to बाबाजी by रमताराम
हो ना राव
आज आनंदने डेरिंग ची गोळी खाल्ली होती....
In reply to आज आनंदने डेरिंग ची गोळी खाल्ली होती.... by अग्निकोल्हा
येस यू कॅन
In reply to येस यू कॅन by रमताराम
मोडी
वॉव!!
एफ ६
पाहतोय
घोडा मागे यायला सुरुवात झाली
आता जी ६ असेच खेळावे लागणार मॅग्नुसला!
आता वजीर एच ४ आला
हा सुध्दा डाव बरोबरीतच सुटणार
आनंद जिंकला
In reply to आनंद जिंकला by अग्निकोल्हा
मला पाहिजे
In reply to मला पाहिजे by रमताराम
त्याच्यात अजुन तितकेच बग्स आहेत
कमॉन विशी!!
यावेळेसही ड्रॉ होणार. दुसरा
डेडली!
व्हॉट्ट्ट्ट्ट?
आनंदची कमजोर चाल
आनंदने डाव घालवला राव!!!!
म्याग्णस भाऊ कार्लसन नवीन
गेली
॑अर्रे उंट का नाही घातला
In reply to ॑अर्रे उंट का नाही घातला by मृत्युन्जय
करेक्ट
In reply to ॑अर्रे उंट का नाही घातला by मृत्युन्जय
तुमच्या भावना समजु शकतो...पण
In reply to तुमच्या भावना समजु शकतो...पण by नि३
आनंदला चेकमेटची घाई नडली होती
In reply to तुमच्या भावना समजु शकतो...पण by नि३
अवघडच होतं तरीही.
मला चेसमधले शष्प कळत नाही. पण
गेले ९ डाव
:(
In reply to :( by मी-सौरभ
होणार ना
In reply to होणार ना by प्रसाद गोडबोले
सॉरी सॉरी
We need to understand change
दहाव्या सामन्याचा धागा कुठय ?
दहाव्या सामन्याचा धागा कुठय ?
In reply to दहाव्या सामन्याचा धागा कुठय ? by अविनाश पांढरकर
आठवण करुन दिल्याबद्दल आभार
नमस्कार लोक्स!
In reply to नमस्कार लोक्स! by चतुरंग
धन्यवाद रंगाशेठ.
In reply to धन्यवाद रंगाशेठ. by प्रचेतस
दुधाची तहान ताकावर!
या संपूर्ण वर्ल्ड चँपियनशिपचे
समालोचनामुळे जबरदस्त मजा आली.
आता
मुन्गुस कोणति चाल असते?