आनंद - कार्लसन - डाव २
लेखनप्रकार
माफ करा मंडळी, यायला उशीर झाला. आज झोपेनं दगा दिला आणि वाजलेल्या गजरावर मात केली!
असो डावाकडे वळतो.
बाप रे यावेळी डावाने केवळ १५ मिनिटात भन्नाट प्रगती केली आहे. कार्लसनने भलतीच तयारी केली आहे, त्याच्या घड्याळात १४ खेळ्यांसाठी केवळ ६ मिनिटे झाली आहेत!
वाचने
12740
वाचनखूण
प्रतिक्रिया
54
आनंदच्या वजीराच्या मार्याच्या दिशेनेच कॅसल करून मॅग्नसने सॉल्लिड च्यालेंज दिलंय. घे लेका, कर हल्ला.
अपोजिट साईड कॅसल्स. धुवांधार गेमची नांदी.
पंधरावी खेळी. पहिली अनपेक्षित खेळी आनंदची. राजा बी पट्टीत नेऊन सुरक्षित करणे किंवा वजीर एफ पट्टी आणून राजाच्या बाजूच्या हल्ल्याची तयारी करण्याऐवजी पुन्हा एकवाद घोड्यावर अधिक भर दिलाय
कार्लसनने सी ६ ने प्रत्त्युत्तर दिले, डी४-डी५
दोघांनी किल्लेकोट विरुद्ध बाजूला केलाय म्हणजे धमाल आहे!
मधेच स्क्रीन गायबतोय!!
In reply to माताय आज विडिओ दगा देतोय राव! :( by चतुरंग
पहिल्या भागात आणखी एक दुवा दिला होता काल, (ग्रीक की गीकसिस्ट्म्सचा) तिथे चेक करा. पण बहुधा इथलाच फीड जातोय सगळीकडे, तेव्हा फरक पडेल असं वाटत नाही. चेस्डॉमवर पट ऑन ठेवा. तिथे विडिओ नाही.
In reply to माझाही by रमताराम
डोळ्यासमोरु गायबत नाहीये
रमताराम! मी पण आत्ताच आलो... कोण सरस आहे, सद्द्या? काहि कळत नाहि आहे. बोर्ड कडे बघुन.
डाव सोपा करुन लांबलचक डावाचं दळण लावायलो बघतोय कार्लसन!
प्रश्नच आहे! कारण दोघेही झपाट्याने खेळताहेत. कार्लसनला वजिरावजिरी करायची आहे असे दिसते.
बोर्ड पाहताना (http://chessbomb.com वर पाहतेय) दोघांची हानी सारखीच दिसते आहे (दोन घोडे, एकेक उंट, प्यादी जवळ्जवळ सारखीच) मला तरी. त्यामुळे इथली चर्चा वाचत बोर्ड पाहतेय आता.
वजीर जी ४ खेळेल असे वाटते. ए २ च्या प्याद्यावर हल्ला आहे कार्लसनचा, ते कसे वाचवणार?
बरं म्हणजे डाव झकासपैकी लांबणार असे दिसते
आनंदने वजीर घेतला कार्ल्सन चा. स्वतःचा वजीर धोक्यात घालून. बहुदा ए २ वाचवण्यासाठीच
बरेच पीसेस आताच ट्रेड झाले आहेत. सब एन्ड गेम का मजा होगा आज.
ऊप्स. वजीरही ट्रेड झाले. आनंद बहुधा पुढपर्यंत पोचलेल्या प्याद्यांना पुश करून एन्डगेम अॅडवांटेज घेऊ इच्छितोय बहुधा.
खेळ्यात ड्रॉ?!
लै बोर होईल राव तसं झालं तर! कार्लसन फायटर आहे खेळत राहतो पण या सामन्यात माहीत नाही काय करेल?
आनंडने जागा व्यापायला सुरुवात केली. त्याची वजिराच्या बाजूची प्यादे भिंत सगळी काळ्या घरात खडी आहे त्यामुळे त्याचा काळा उंट त्याबाजूने बाहेर पडू शकत नाही.तसेच काळ्याच्या काळ्या उंटाला तिकडून यायला देखील प्रतिबंध करेल
In reply to एच ५ by चतुरंग
जर कार्लसनच्या उंटाला उडवू शकला आनंद तर कनेक्टेड प्याद्यांचा चांगला फायदा उठवता येईल. पण कार्लसन उंटाला मागेच ठेवून प्यादी विकसित करू लागलाय.
In reply to जर कार्लसनच्या उंटाला उडवू by रमताराम
प्यादी रेटून जागा व्यापायची आणि मोहोरी मागून आणायची. त्यामुळे होते काय की तो मोहोरी दोन्ही बाजूला कमिट करण्याची शक्यता शेवटपर्यंत ठेवतो!
वजिराच्या बाजूने रोलरकोस्टर सुरु केला!
पुढची खेळी ए५, नंतर बी ४
आनंद ए ३ करुन त्याला ब्रेक लावतोय का बी ४ खेळून?
बी४ ची शक्यता फार कमी आहे कारण पोझिशन एकदमच ओपन होईल
ए ५
आनंद त्याच्या प्याद्यांना येऊ देतोय. राज बी १ मधे घेणार काय?
गेलाय! मला बोरिस गेल्फंड बरोबरच्या आठव्या डावाची आठवण होतेय
हत्ती एफ १, हत्ती सी १
तुमची लाडकी तानिया येतेय. :)
In reply to घ्या रंगाकाका by रमताराम
परस्परंच आमची लाडकी होय? बळंच!
ड्रॉ झाला राव! श्या कुछ जम्या नहीं राव
एवढ्या जोरदार चढाईनंतर ड्रॉ.
डोळे लावून बसलो होतो. झोपेचं खोबरं उगीच केलं असं वाटतंय....
काल १७ खेळ्या, आज पंचवीस, या गतीने चौथ्या डावात चाळीस खेळ्या पार होणार
फारच सावधपणे खेळला. तो कबूल करतोय की आजच्या डावात कार्लसनची तयारी जास्त दिसत होती. काल त्याचे जे झाले तेच आज आनंदचे झाले.
तसे दोघांचे ताकद आजमावण्यात दोन डाव खर्ची झालेत. परंतु मला असे वाटते की ज्या पातळीला हे दोघे खेळत आहेत त्या पातळीला हे थोडे अपेक्षितच आहे असे वाटते. कारण एकदम रिस्क दोघेही घेणार नाहीत.
हा प्रकार लैच हास्यास्पद आहे. लोक कैच्याकै प्रश्न विचारताय्त. तिथे काही खेळाडूंना का प्रवेश देत नाहीत, जरा काही नेमके प्रश्न विचारले तर काही उजेड पडेल त्यांच्या खेळावर, मानसिकतेवर. हे ठोंबे पत्रकार येडे आहेत.
In reply to प्रेस कॉन्फरन्स by रमताराम
लोकं काहीही प्रश्न विचारताहेत. "तुमची पुढच्या डावातली स्ट्रॅटेजी काय आहे?" हा प्रश्न काल एका कांद्याने विचारला. आनंद हसून म्हणाला "सीरीअसली? आर यू आस्किंग मी स्ट्रॅटेजी इन प्रेस कॉन्फरन्स?" कास्पारोव असता तर शिव्या घातल्या असत्यान!!
तिसरा सामना मंगळवारी दुपारी सुरु होणार. बिचार्या सेकंड्सना पुरेशी झोप दोन दिवसात मिळाली नाहीये. काल दीड तासातच दोघे गेले आज दोन तासात. त्यांचीही झोप जरा पूर्ण होईल आज! ;)
In reply to उद्या विश्रांतीचा दिवस! by चतुरंग
करेक्टे. मधला एक दिवस सुटी असते ती खरं म्हणजे त्यांच्यासाठी.
In reply to हा हा हा by रमताराम
आम्ही पण आता कल्टी मारतो आमचा रविवार सुरु आहे, त्यामुळे जरा झोप पूर्ण करतो.
कारोकान !!
सो अनएक्स्पेक्टेड ! !
वेगवेगळ्या बाजुचे कॅसलीन पाहुन मलाही वाटले होते की हा डाव निकाली निघेल !
पण असो ...
आता उद्याच्या डावाची उत्सुकता !!
In reply to अप्रतिम by प्रसाद गोडबोले
कार्लसन कोणते ओपनिंग करेल याचा भरवसा नसतो आणि ही अनिश्चितताच त्याचं एक महत्त्वाचं अस्त्र आहे.
जबरदस्त समालोचन.
In reply to धन्यवाद by प्रचेतस
सहमत
In reply to वल्ली ह्यांच्या मताशी by मुक्त विहारि
+१ चतुरंग, रमताराम आणि गिरिजा - पुढच्या डावांचेही समालोचन चालू ठेवणे.
In reply to +१ चतुरंग, रमताराम आणि गिरिजा by आदूबाळ
+१
अर्रर्र, मिस केलं राव मी हे सर्व. :(
मंगळवारी किती वाजता होईन म्याच सुरु. (भाप्रवे)
-दिलीप बिरुटे
In reply to रंगाशेठ लै भारी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दुपारी ३ वाजता (भाप्रवे) सुरु होत आहेत. दर दोन डावांनंतर १ दिवस विश्रांतीचा आहे.
विजेता ही स्पर्धा केवळ एका सामन्याने जिंकणार असे वाटते. विशी जोपर्यंत पराभूत होत नाही आक्रमक खेळ स्वत: करणार नाही.
मिपाकरांच्या समालोचनाने अजुन मजा येतेय
..
वरती लेखात टाकला आहे. तिथेच खेळून बघता येईल.
तू नळीवरती या डावाचे अतिशय प्रभावी विश्लेषण आलेले आहे.
https://www.youtube.com/watch?v=494p9B0UzkY&feature=player_embedded
नोटेशन बद्दल दिलीत तर बरे होईल
In reply to थोडी माहिती by सुहासदवन
http://en.wikipedia.org/wiki/Algebraic_notation_%28chess%29
ही नोटेशन शिकायला खूपच सोप्पी आहे . गणितात कार्टेशियन कॉर्डीनेट सिस्टीम असते तसेच ! फक्त क्ष अक्षावर ए बी सी ...एच अशी नावे आहेत अन य अक्षावर १ २...८ अशी !!
राजा K
प्रधान Q
उंट B
घोडा N
हत्ती R
प्यादे ( चिन्ह/नाव नाही)
थोडक्यात Nf3 = घोडा एफ ३ ह्या घरात
Nbd2 = बी कॉलम्न मधील घोडा डी २ ह्या घरात
cXd4 = सी कॉलम्न मधील प्याद्याने डी ४ चे प्यादे मारले
सोप्पे आहे !!
( जुनी नोटेशन पध्दत लईच कॉम्प्लिकेटेड होती , मी १९९८ पासुन खेळतोय तरीही अजुनही मला समजत नाही व्यवस्थित )
In reply to हे पहा by प्रसाद गोडबोले
मी लिहीत असतानाच तुम्हीही लिहीत होतात वाटते! धन्यवाद!! :)
In reply to थोडी माहिती by सुहासदवन
वरचा पट बघा. खालच्या डाव्या कोपर्यात १ आणि a असे लिहिले आहे तिथून स्तंभात ८ पर्यंत आकडे आहेत आणि ओळीत h पर्यंत अक्षरे आहेत. K=King=राजा, Q=Queen=राणी (वजीर), R=Rook (हत्ती), B=Bishop (उंट), N=kNight (घोडा), p=Pawn (प्यादे) अशा अक्षरांनी प्रत्येक मोहोरे संबोधले जाते.
c4 = c स्तंभातले प्यादे चौथ्या घरात, Nb4 = घोडा बी ४ मधे असे.
वरचा डाव एकेक खेळी करुन बघा आणि अक्षरे+अंक ताडून बघा लक्षात येईल.
मध्यंतरी फिडेची संपूर्ण नियमावली मराठीत भाषांतरित केली होती, इथे मिपावरच तो छोटा प्रकल्प पार पाडला.
त्याचा दुवा देतो सापडवून.
http://www.misalpav.com/node/13213
बुध्दीबळ नियमांचे भाषांतर केले आहे.
धाग्यातच शेवटी शेवटी माझ्या प्रतिक्रियेत गुगलडॉक्सवरती चढवलेल्या पुस्तिकेचा दुवा आहे.
https://docs.google.com/file/d/0BzP_LmTBZG0MNzBlY2E0NGItMGVkNi00YzJiLWE4NDEtMDFlODQyZTk3MmY3/edit?hl=en
In reply to हा धागा बघा. by चतुरंग
हे भारी काम केले आहाए चतुरंगराव !
फेसबुक वर हा दुवा शेयर करीत आहे . बुधिबळ शिकु इच्छिणार्यांना फारच उपयुक्त आहे !! प्रिंट काढुन डिस्ट्रिब्युट करायला काही कंडीशन्स असल्यास कळवा .
मॅग्नस च्यालेंज देतोय