नमस्कार
ही माझी मिपावर नवीन सुरुवात अहे. चू. भू. सांभाळून घ्यावी.
काही दिवसांपूर्वीचा "आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?" या विषयाचा धागा आणि प्रतिक्रिया पहिल्या. मिपावर या विषयाचे बरेच जाणकार आहेत हे पाहून आनंद झाला. म्हणूनच या ज्ञानाचा फायदा मला आणि सर्वाना व्हावा म्हणून हा काकू.
माझ्या घरी सर्वांना (मी,बहिण, भाऊ,आई ) संप्रेरक असंतुलनाचा (hormonal imbalance)त्रास आहे असे आढळून आले आहे. याची लक्षणे आम्हा भावंडांमध्ये खूपच समान आहेत जसे कि चेहऱ्यावर पुरळ येणे,केस गळणे,केस अकाली पांढरे होणे,जाडी वाढणे,वारंवार तोंड येणे, चिडचिड होणे, कोणत्याही कामात उत्साह नसणे. सर्वाना या सगळ्याचा कमी जास्त त्रास होतो.
विशेषतः बहिण (वय २६ ) आणि भाऊ (वय २८) यांच्या चेहर्य्वर वयात आल्यापासून आतापर्यंत पुरळ येतात तेही खूप जास्त प्रमाणात. यासाठी त्वचा तज्ञाचा सल्ला घेतला असता त्यांनी सांगितले कि हे संप्रेरक असंतुलन (hormonal imbalance ) मुळे होत आहे आणि यासाठी कोणतेही खास उपचार नाहीत. पुरळ सुकण्यासाठी मलम दिले होते. २-३ महिने नियमीत वापराने पुरळ गेले परंतू १) त्या मलमाचे दुष्परिणाम दिसून येऊ लागले जसे कि डोळ्यांची आग होणे २) हे मलम कायमस्वरूपी काम करणारे नाही जोपर्यंत वापरत आहात तोपर्यंत परिणाम,वापरणे बंद केले असता दुप्पट जोमाने पुरळाची उत्पत्ती सुरु.
दुष्परिणाम दिसू लागल्याने मलम वापरणे बंद केले आहे. आंतरजालावर उपाय शोधले असता पूरक आहार आणि घरगुती उपाय या बद्दल वाचायला मिळाले. त्यानुसार घरगुती उपचार सुरु आहेत जसे कि तेलकट, आंबट , उष्णता वाढवणारे पदार्थ आहारातून पूर्णपणे वर्ज्य केले आहेत, फळे, पाणी, हिरव्या पालेभाजा यांचा आहारात मुबलक वापर इ. परंतु म्हणावासा परिणाम दिसून आलेला नाही. (गेल्या ३ महिन्यापासून हे उपचार सुरु आहेत)
मातोश्रींना दम्यासारखा त्रास आहे. (हा त्रास संप्रेरक असंतुलनाशी निगडीत नाही. ) हवामानातील बदल अजिबात सोसत नाही. जेवणातही दही,ताक ,लिंबू, कैरी (आंबट पदार्थ ), फ्रीजमधील थंड पदार्थ, काकडी,मुळा (थंड पदार्थ), अति तेलकट (मसाल्याचे , तळलेले , काजू,बदाम, अक्रोड) असे पदार्थ एकदम वर्ज्य आहेत . गेली ४० पेक्षा जास्त वर्षांपासून ती यातील कोणत्याही पदार्थाचा यथोचित आस्वाद घेऊ शकली नाही. फक्त भात,भाकरी,वरण, रोजच्या भाज्या याव्यतिरिक्त कशाचाही आनंद घेऊ शकली नाही. ज्या ज्या वेळी वरील कोणताही पदार्थ (अगदी थोड्या प्रमाणात) आहारात आला असता ८-१० दिवसांच्या आजाराची निश्चिंती. उन्हाळ्यातही माठाचे एक ग्लास पाणी वा काकडीची एक फोड सुद्धा दगा देते.
"आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?" या दुव्यामध्ये नाडी परीक्षक वैद्यन्बद्दल वाचायला मिळाले.आयुर्वेदामध्ये प्रत्येक आजारावर उपचार आहेत आणि निरोगी जीवन जगण्यासाठी आयुर्वेदाचा खूप चांगला उपयोग होतो असे आंतरजालावर वाचण्यात आले. आमच्या नातेवाईकांपैकी एकजणाने कमरेच्या दुखण्यासाठी अशाच एका नाडी परीक्षक वैदयांकडून (मु. पो. हैद्राबाद) उपचार घेणे सुरु केले आहे. त्यांचा अनुभव खूप चांगला आहे. आम्हाला हैद्राबादला जाणे शक्य नाही. पुण्यात वा आसपास कोणी निष्णात वैद्य असल्यास पत्त्यासकट माहिती द्यावी. सोबत स्वताला आलेले अनुभव दिल्यास विशेष आभारी. पुण्यातील प्रसिध्द "बालाजी तांबे" यांचे उपचार कोणी घेतले असल्यास (त्यांचे उपचार कितपत परिणाम कारक आहेत याबद्दल) मार्गदर्शन करावे.
(काही चुकीचे लिहिले असल्यास दयाळू मिपाकर क्षमा करतील आणि पामराला समजून घेतील अशी आशा आहे . जाहीररीत्या लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे.)
वाचने
47112
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपावर स्वागत.
खेडूत यांनी पुणेकरांकडून जी
In reply to मिपावर स्वागत. by खेडूत
कौतुक
In reply to खेडूत यांनी पुणेकरांकडून जी by नर्मदेतला गोटा
सगळे उपाय करून झालेले आहेत
In reply to कौतुक by परिकथेतील राजकुमार
धन्यवाद !
In reply to कौतुक by परिकथेतील राजकुमार
परा
तांबे नकोत
+१
In reply to तांबे नकोत by मैत्र
+१.
In reply to तांबे नकोत by मैत्र
पेरूगेट भावेस्कूलच्या समोर
जमदग्नी मास्तर राजवैद्य आहेत.....
आणखी एक नाव वैद्य स.प्र.सरदेशमुख..
पत्ता मिळेल का दवाखान्याचा ?
In reply to आणखी एक नाव वैद्य स.प्र.सरदेशमुख.. by बाबा पाटील
आपल्यासाठी होमिओपॅथीचा देखील
हेच म्हणतो
In reply to आपल्यासाठी होमिओपॅथीचा देखील by श्रीगुरुजी
होमिओपथीसारखी "अॅट बेस्ट
In reply to हेच म्हणतो by चौकटराजा
>>> मी आरोग्यतज्ञ मुळीच नाही,
In reply to होमिओपथीसारखी "अॅट बेस्ट by गवि
स्वतःचे अनुभव शेअर
In reply to >>> मी आरोग्यतज्ञ मुळीच नाही, by श्रीगुरुजी
>>> लहान मुलांबाबत किंवा अगदी
In reply to स्वतःचे अनुभव शेअर by गवि
एक अनुभव.
In reply to स्वतःचे अनुभव शेअर by गवि
डेंग्यु ऑटोइम्युन डिसिज..
In reply to एक अनुभव. by श्रीगुरुजी
खरं आहे. डेंग्यू झालेले रूग्ण
In reply to डेंग्यु ऑटोइम्युन डिसिज.. by बाबा पाटील
श्री गुरुजी उगाच पराचा कावळा करु नका .
In reply to खरं आहे. डेंग्यू झालेले रूग्ण by श्रीगुरुजी
विषाणूमुळे होणारा आजार
In reply to खरं आहे. डेंग्यू झालेले रूग्ण by श्रीगुरुजी
>>> याचे कारण जसे नाकातून
In reply to विषाणूमुळे होणारा आजार by सुबोध खरे
बाकीच्या रोगांचं माहित नाही,
In reply to >>> याचे कारण जसे नाकातून by श्रीगुरुजी
गविंनी या विषयावर अभ्यास करून
In reply to बाकीच्या रोगांचं माहित नाही, by ३_१४ विक्षिप्त अदिती
+११११११११११.
In reply to गविंनी या विषयावर अभ्यास करून by अनुप ढेरे
डेंग्यू झाल्यावर उपचार घेणे
In reply to >>> याचे कारण जसे नाकातून by श्रीगुरुजी
होमिओपॅथीमध्ये काही ठराविक
In reply to डेंग्यू झाल्यावर उपचार घेणे by सुबोध खरे
अॅलोपॅथीवाले बहुतेक जणं
In reply to होमिओपॅथीमध्ये काही ठराविक by श्रीगुरुजी
मी पुर्वीच म्हटल होत.
In reply to अॅलोपॅथीवाले बहुतेक जणं by प्रभाकर पेठकर
'प्लासिबो इफेक्टने माझे ६०
In reply to अॅलोपॅथीवाले बहुतेक जणं by प्रभाकर पेठकर
नक्की किती??
In reply to एक अनुभव. by श्रीगुरुजी
तीन लाख ते साडेचार लाख
In reply to नक्की किती?? by प्रभाकर पेठकर
ठाण्यामध्ये आयुर्वेदिक वैद्य कोणी आहेत का?
अन्नाचे पाचन झाल्यावर उरलेले
डॉ. दिवेकर
ताबे कडून एकदा शतावरी क्ल्प
वैद्य धोपेश्वरकर चिंचवड.
दररोज ४-५ किमी धावलात तर
उगाच अँजेलिना ताईंनी डबल
In reply to दररोज ४-५ किमी धावलात तर by अप्पा जोगळेकर
पुण्यातले सगळेच वैद्य निष्णात
पुण्यातले सगळेच निष्णात असतात
In reply to पुण्यातले सगळेच वैद्य निष्णात by टवाळ कार्टा
रुपाली होतेल च्या बोळात भोळे
डॉ. कोल्हटकर
… ठाण्यामध्ये आयुर्वेदिक
डॉ. थत्ते, कॅसल मिल जवळ.
In reply to … ठाण्यामध्ये आयुर्वेदिक by अव्यक्त
माझा एलोपथिक (एक नव्हे , अनेक
पुण्यातलं माहीती नाही पण
कळवते व्य.नि. मधून.
चिमण्या गणपतीशेजारी
किडनी स्टोन साठी कुणी चांगला
आगाऊ सल्ला
तुम्ही उत्तर अन्य कोणालातरी
In reply to आगाऊ सल्ला by सुबोध खरे
एक तर तुम्ही क्षमा मागायचा
In reply to आगाऊ सल्ला by सुबोध खरे
सुबोध सर्, आयुर्वेदाने मुत्राश्मरी पडतात...
In reply to आगाऊ सल्ला by सुबोध खरे
३mm
In reply to सुबोध सर्, आयुर्वेदाने मुत्राश्मरी पडतात... by बाबा पाटील
वर लिहिले आहेच
In reply to ३mm by प्रभाकर पेठकर
माझा अनुभव.
In reply to वर लिहिले आहेच by सुबोध खरे
डॉक्टर बाबा साहेब,
In reply to सुबोध सर्, आयुर्वेदाने मुत्राश्मरी पडतात... by बाबा पाटील
४-५ मिमी साठी औषधे द्यायची गरजच नसते हो.
In reply to डॉक्टर बाबा साहेब, by सुबोध खरे
मी प्रथम पासुन एकच गोष्ट
In reply to ४-५ मिमी साठी औषधे द्यायची गरजच नसते हो. by बाबा पाटील
+१
In reply to मी प्रथम पासुन एकच गोष्ट by अनुप ढेरे
मुतखडा निवारणासाठी
In reply to ४-५ मिमी साठी औषधे द्यायची गरजच नसते हो. by बाबा पाटील
मझि माहिति
२.५ mm च्या किडनी स्टोनवरील
निष्णात वैद्य
वैद्य खासगीवाले, बाजीराव रोड
तारीख तपासावी.
In reply to वैद्य खासगीवाले, बाजीराव रोड by चिनार
लिहू देत. कोणालातरी उपयोग
In reply to तारीख तपासावी. by जालिम लोशन