टकाटक
परारथना झाली की हजरी घेतेत गुर्जी.
घरी बसलेल्यांना पकडून आणाया पोरास्नी पळवत्यात.
कंदी कामं असत्यात. तळ्यावरनं पाणी आणा; अंगण झाडा; फळा काळा करा.
गमभन लिऊन झालं की पाडे.
लंबरपरमानं येकेकाला हुबा करतेत.
तेनं वरडायचं, “येक रे ..” की आमी “येकाचा”. धापत्तुर.
मंग “येकावर येक अकरा”. पन्नासपत्तुर.
गुर्जी येकदम बायेर. च्या प्यायाला, तमाकू खायाला.
रोजला तेच.
म्या पेंगाया लाग्ली.
मंगली वराडली, “आन्जे, पाडे म्हन, नायतर गुर्जीस्नी नाव सांगते बग”.
शिवाजीम्हाराज समजतेय सोताला.
मंगली वराडली, “साहा रे”
म्या हळूच “आटाचा” बोल्ली.
कुणाला कायबी नाय समजलं.
मंगली, “येकावर चार”
म्या, “पंचेईस”
समद्यांच्यात कायबी म्हन्लं तर चालतंय – फकस्त हळू म्हनायचं.
म्या जागीच झाली.
टकाटक.
*शतशब्दकथा*
वाचने
12592
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
:)
शतशब्दकथा बास जाली की ताई !
In reply to शतशब्दकथा बास जाली की ताई ! by धर्मराजमुटके
(No subject)
समद्यांच्यात कायबी म्हन्लं तर चालतंय
In reply to समद्यांच्यात कायबी म्हन्लं तर चालतंय by मुक्त विहारि
शाळा ते कामगार सभा कुठेही हा
शाळा ते कामगार सभा कुठेही हा फंडा वापरा...हं! हे नव्हतं लक्षात आलं माझ्या कधी :-)लेखन आवडले.
:)
अप्रतिम लेखन ताई......
त्याच अस हाय बगा, ह्या आंजीन
In reply to त्याच अस हाय बगा, ह्या आंजीन by स्पंदना
अपर्णाताई, बघते तुमचं काम
समद्यांच्यात कायबी म्हन्लं तर
****
हे हे हे! मस्तच
In reply to हे हे हे! मस्तच by चतुरंग
+१
मस्त ! (टकाटक)
टकाटक हा शब्द थोडासा वेगळा
In reply to टकाटक हा शब्द थोडासा वेगळा by क्रेझी
'टकाटक' या शब्दाचा प्रचलित
आन्जी
आभार
हाहा!
In reply to हाहा! by पैसा
आज "टकाटक" शब्द प्रत्यक्ष
In reply to आज "टकाटक" शब्द प्रत्यक्ष by आतिवास
आयटम टकाटक दिसायला भारी..पोरगी लाल दुपट्टेवाली
In reply to आयटम टकाटक दिसायला भारी..पोरगी लाल दुपट्टेवाली by किसन शिंदे
आणखी..
In reply to आणखी.. by गवि
पुढच्या मुंबई भेटीत "तवा
In reply to आज "टकाटक" शब्द प्रत्यक्ष by आतिवास
दत्तगुरु आज असते तर त्यांचे
आवडली कथा.
टकाटक आहे कथा आणि लिहण्याची