मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

( चला नांगरूया शेत सारे )

मोदक · · जे न देखे रवी...
आमचे लाडके लोककवी हभप श्री धनाजीराव यांच्या काव्यजीवनातील चरणकमलांचे तंतोतंत अनुकरण करण्याच्या आमच्या छोट्या प्रयत्नांचे हे पुढचे पाऊल. चल परत नव्याने सुरू करू सारे या काव्यातून पेरणीचा मनोदय व्यक्त करणार्‍या धनाजीरावांनी नांगरणीवर काहीच भाष्य केले नसल्याने धनाजीरावांच्या गोधडीला ठिगळ लावण्याचा हा प्रयत्न गोड मानून घ्यावा.. *************************************************** बाई पाटाला आलंय पाणी वाफ्यात कुदळ मारुन घे वरच्या अंगाची दोन मोठी ढेकळं माझ्या मोंगरानं* फोडून घे कामाला लाग बिगी बिगी वरची ढेकळं अजून जरा फुटू दे खालच्या पाटाचं स्वच्छ पाणी तुझ्या शेतात खळाळत सुटू दे माझ्या मोठया फाळानं शेत तुझं बाई खोलवर नांगरुन घे बाई पाटाला आलंय पाणी वाफ्यात कुदळ मारुन घे खुरपी, विळा, टिकाव, खोरं झेपंल ते हत्यार हातात घे मोठ्या फाळानं नांगरणी केली तरी अजून कामाला दम र्‍हावू दे येवढं कष्ट केल्यापरी घामाचं पीक उभे र्‍हाऊ दे बाई पाटाला आलंय पाणी वाफ्यात कुदळ मारुन घे बाई पाटाला आलंय पाणी वाफ्यात कुदळ मारुन घे वरच्या अंगाची दोन मोठी ढेकळं माझ्या मोंगरानं फोडून घे. *************************************************** *मोंगर - लोखंडी घणाच्या आकाराचे लाकडी औजार जे शेतकरी ढेकळं फोडण्यासाठी वापरतात. ***************************************************

वाचने 12080 वाचनखूण प्रतिक्रिया 39

खुरपी, विळा, टिकाव, खोरं झेपंल ते हत्यार हातात घे मोठ्या फाळानं नांगरणी केली तरी अजून कामाला दम र्‍हावू दे येवढं कष्ट केल्यापरी घामाचं पीक उभे र्‍हाऊ दे बाई पाटाला आलंय पाणी वाफ्यात कुदळ मारुन घे
लयीच भारीये...

बॅटमॅन 15/10/2013 - 16:00
येवढं कष्ट केल्यापरी घामाचं पीक उभे र्‍हाऊ दे बाई पाटाला आलंय पाणी वाफ्यात कुदळ मारुन घे बाई पाटाला आलंय पाणी वाफ्यात कुदळ मारुन घे वरच्या अंगाची दोन मोठी ढेकळं माझ्या मोंगरानं फोडून घे.
कष्ट, घाम, अन ढेकूळविच्छेदन करण्यासाठीचे लाङ्गल याञ्चे वर्णन अतिशयच आवडले. क्षेत्र-शस्त्रादि वर्णनाने अनादि ऐक्य सांगण्याच्या लेखकाच्या खुबीला सलाम. शिवाय कोडाईकनालला जाऊन भूछत्रांची शेती केल्या गेली पाहिजे असा उद्योजकतेला पूरक सल्ला दिल्याबद्दलही आभार. या सल्ल्यामागे दूर((हनी)चन्द्र)दृष्टी दिसून येते. गरम पाण्याचे कुण्ड बहुतेक कोडाईकनालच्या थंड हवेत काकडून झाल्यावर स्नान करण्यासाठी असावे.

पैसा 15/10/2013 - 16:07
काव्यरस: gulub kavita shradhdhanjali अभय-काव्य कोडाईकनाल गरम पाण्याचे कुंड बालसाहित्य भूछत्री वाङ्मयशेती भयानक लेखनविषय:: बालगीतविडंबनव्युत्पत्तीसमाजजीवनमानतंत्रक्रीडाशिक्षणमौजमजा
ब्वॉर्र ब्वॉर्र. धन्याच्या कवितेवरचा प्रतिसाद दिला आहे असे समजून घ्यावे.

चौकटराजा 15/10/2013 - 16:10
भूमीहीन शेतकर्‍यासाठी एक भूमिहीन- चाळीशीतला युवक जमीन सुरक्षा बील ( प्रत्येकासाठी जमीन ) आणणार आहे. मग नांगरटीच्या, शेतीच्या, मशागतीच्या, वावराच्या, ढे़कळांच्या कविता पोत्यानी करा लेको !

सौंदाळा 15/10/2013 - 16:13
वाह मोदकशेठ पण चांगलेच तयारीचे दिसतायत्...(विडंबनात)

In reply to by पिलीयन रायडर

प्यारे१ 15/10/2013 - 16:22
हत्ती आहे तो....! (खुलासा : येथे फक्त दाखवण्याचे नि खाण्याचे वेगळे दात म्हणायचं आहे. हा वेगळेपणा फक्त मा. श्री. मोदकराव ह्यांच्या बहुआयामी प्रतिभेचे दर्शन घडावे ह्याच निर्मळ हेतूनं दाखवण्याचा प्रयत्न आहे. गैरसमज नसावा. धन्यवाद.) तद्वत बिचकू नये. :)

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 15/10/2013 - 16:43
बॅट्या, बॅट्या लेका बालिस्टर का नाही झालास? बाकी, लग्न कर लेका! थोड्या दिवसांनी कुणी पूर्वेला पश्चिम म्हणायलं तरी आक्षेप घ्यायल यायचा नाहीस.! (धागाच धुमाकूळ वाला आहे ना. करा राडा) ;)

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 15/10/2013 - 17:30
बॅट्या, बॅट्या लेका बालिस्टर का नाही झालास?
इंजिनिअर झालो म्हणून.
बाकी, लग्न कर लेका! थोड्या दिवसांनी कुणी पूर्वेला पश्चिम म्हणायलं तरी आक्षेप घ्यायल यायचा नाहीस.!
आमच्या लग्नाची काळजी केल्याबद्दल धन्यवाद. बाकी तुम्ही आक्षेप घेणारे नसला म्हणून जनरलायझेशन करू नका बरे ;)

In reply to by पिलीयन रायडर

प्यारे१ 15/10/2013 - 17:17
मोदकाच्या आवरणात केशरी, हिरवा, पिवळा असे खाण्याचे रंग घालून वेगवेगळे रंग दिसू शकायला हरकत नाही! उकड काढतानाच असं करावं लागत असेल ना पण पिलियन रायडर? - निरागस प्यारे

In reply to by प्यारे१

हो..तसं करायला विशेष कष्ट पण पडणार नाहीत.. पण मोदकाच्या बाह्य आवरणाचा रंग धुतल्या तांदुळासारखा पांढरा शुभ्र.. आणि आतल्या बाजुने मात्र असा "नवरंगी" असेल तर?? कष्टाच काम हो.. रच्याकने.. मोदकाला जोडीला करंजी आणायची वेळ झाली आहे का? म्हणजे मोदक आपोआप आतुन बाहेरुन शुभ्र होईल?? रादर त्याची हिंमतच होणार नाही असे रंग उधळायची..

In reply to by पिलीयन रायडर

प्यारे१ 15/10/2013 - 17:34
आपली दृष्टी अत्यंत पवित्र आहे एवढंच नमूद करु इच्छितो....! :) बाकी गोड (वाटणार्‍या) मोदकाबरोबर 'तिखट रस्साभाजी' चांगली रुजू व्हावी. ;) हलकं घे हो मोदक. नाहीतर कधी कुठे झणका देशील सांगता यायचं नाही. -गोडाला भिऊन असलेला प्यारे ;)

In reply to by मोदक

आम्ही कुठं काय केलं? तुच नांगरणी आणि पेरणी आणि काय वाट्टेल ते करतोयस.. हे बघ आम्हाला काही बोलायचं नाई.. मी (गंगासे भी) पवित्र आणि प्यारे (नुसताच) निरागस आहे..

In reply to by प्यारे१

धन्या 15/10/2013 - 19:06
>> सर्टीफाईड निरागस प्यारे सर्टीफिकेट कुठून मिळालंय (किंवा मिळवलंय) यावरही बरंच काही असतं बरं. ;)

In reply to by पिलीयन रायडर

चौकटराजा 15/10/2013 - 17:09
या वाक्याचा अर्थच मुळी काय ..... ? बूटस दाउ टू ? सारखा ? प्रामाणिक पणे आपल्या प्रतिभेचे ( अलौकिक) सादरीकरण केलेले दिसतेय मला तरी बुवा !

इस्त्रिला गुलाम म्हणून राबवण्याच्या मानसिकतेचे उत्तम उदाहरण म्हणजे ह्या काव्यातिल ओळी (हुकुम्स) होय! ह्या पुर्शी आळ्शी पनाचा जाहिर निषेध!

मी-सौरभ 15/10/2013 - 18:19
आमच्यासारख्या शेतीचा गंध नसलेल्या सात बारा धारकांसाठी माहितीपुर्ण काव्य आहे हे...

वाह व्वा मादकराव....आपल ते हे...मोदकराव! ;-) या काव्या वर बेहद्द खुष होउन १ कवीयत्रि भूछत्री बाजुला करून म्हणते, या मोदकाच्या आत किती सारण दडलय?, उघडुन मी पाहू का? सहज "खुलत" नसेल मोदक तर, त्याला तुपाचं बोट लाऊ का? ;-)