Skip to main content

गुन्हा

लेखक चाणक्य यांनी मंगळवार, 08/10/2013 या दिवशी प्रकाशित केले.
चल एक गुन्हा, दोघे मिळून करूया आणि मग परत, आपापलं जगूया पाऊस पडला नाही तरी आपण मात्र भिजूया पावसात कोरडे राहण्यापेक्षा नभालाच फितवूया .....चल एक गुन्हा, दोघे मिळून करूया परीघ आहे तुलाही परीघ आहे मलाही परीघातच राहून आपापल्या त्रिज्या थोड्या वाढवूया .....चल एक गुन्हा दोघे मिळून करूया किंवा शहारलेल्या चांदण्यात कधी नुसते बोलत राहूया खूप वेळ......रात्रभर.... नुसते बोलतंच राहूया .....चल एक 'सभ्य' गुन्हा, दोघे मिळून करूया आणि नाहीच जमलं काही तर नजरेनेच सांगूया अनाहूत या 'वाटण्याचा' सोहळा साजरा करूया .....चल एक गुन्हा, आवर्जून करूया आणि मग परत आपापलं जगूया
लेखनविषय:

वाचने 2545
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

परीघ आहे तुलाही परीघ आहे मलाही परीघातच राहून आपापल्या त्रिज्या थोड्या वाढवूया अंहं!

In reply to by तिमा

तिमा! व्यास आला म्हणजे महाभारत आलं. मग या कवितेच महाकाव्य होणे आलं.

पुन्हा पुन्हा करावा असा गुन्हा..

शहारलेल्या चांदण्यात कधी नुसते बोलत राहूया खूप वेळ......रात्रभर.... नुसते बोलतंच राहूया
व्वाह यासारखे दुसरे सुख कुठले? चाण्क्य.. सुंदर रचना, पुन्हा पुन्हा वाचावी अशी झालीये...