गुन्हा
लेखनविषय:
चल एक गुन्हा, दोघे मिळून करूया
आणि मग परत, आपापलं जगूया
पाऊस पडला नाही तरी
आपण मात्र भिजूया
पावसात कोरडे राहण्यापेक्षा
नभालाच फितवूया
.....चल एक गुन्हा, दोघे मिळून करूया
परीघ आहे तुलाही
परीघ आहे मलाही
परीघातच राहून आपापल्या
त्रिज्या थोड्या वाढवूया
.....चल एक गुन्हा दोघे मिळून करूया
किंवा शहारलेल्या चांदण्यात कधी
नुसते बोलत राहूया
खूप वेळ......रात्रभर....
नुसते बोलतंच राहूया
.....चल एक 'सभ्य' गुन्हा, दोघे मिळून करूया
आणि नाहीच जमलं काही
तर नजरेनेच सांगूया
अनाहूत या 'वाटण्याचा'
सोहळा साजरा करूया
.....चल एक गुन्हा, आवर्जून करूया
आणि मग परत आपापलं जगूया
वाचने
2544
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
क्या बात है। व्वाह!
@चाणक्य>>>तुंम्हाला विडंबन
In reply to @चाणक्य>>>तुंम्हाला विडंबन by अत्रुप्त आत्मा
हा हा हा
In reply to हा हा हा by चाणक्य
@नम्रता पाहून डोळे पाणावले हो
In reply to @नम्रता पाहून डोळे पाणावले हो by अत्रुप्त आत्मा
व्वा गुरुजी!
In reply to @नम्रता पाहून डोळे पाणावले हो by अत्रुप्त आत्मा
व्वाह..
In reply to @चाणक्य>>>तुंम्हाला विडंबन by अत्रुप्त आत्मा
दोन ओळींचेच
In reply to दोन ओळींचेच by तिमा
तिमा!
मस्त !
छान
व्वाह
सुंदर रचना. आवडली.
हौ रोमांटीक....!