मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खेळ दोन ओळींचा - १

राघव · · जे न देखे रवी...
खेळ नेहमीचाच.. एक ओळ मला सुचली ती अशी - स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! ..... पुढची ओळ काय होऊ शकेल ते आपल्याला सुचतंय तसं प्रतिसादात लिहायचं. हि कविता नाही. त्यामुळे फक्त दोनच ओळी असणारेत. अट एकच, वर लिहिलेल्या पहिल्या ओळीशी निगडीत अशीच दुसरी ओळ असायला हवी! बघुयात कुणाचे कसे कसे डोके चालते ते ;) मुमुक्षु

वाचने 11069 वाचनखूण प्रतिक्रिया 43

In reply to by प्रभाकर पेठकर

सहज 18/09/2008 - 14:31
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! हो का? तरण्यामुलांच्या खांद्यावरनं नेम साधु लागले काका :-D

अरुण मनोहर 18/09/2008 - 14:33
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! कावळी जोपासते कोकीळेची पिलं स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! मुमुक्षुने केलं चावटांना रान खुलं

In reply to by अरुण मनोहर

जैनाचं कार्ट 18/09/2008 - 14:36
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! मुमुक्षुने केलं चावटांना रान खुलं =)) जबरा! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

वृषाली 18/09/2008 - 15:04
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! अरे बापरे असं झालं तर मग जाईला पन येतील मोगर्‍याची फुलं! =)) वृषाली

यशोधरा 18/09/2008 - 15:11
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! मिपावर चालतात भलतीच की ही खुळं!! प्लीज प्लीज प्लीज हलके घ्या!! माफी !!

राघव 18/09/2008 - 15:25
हा हा हा... चांगलं चाललेलंय... स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं, (भलतेच काय) आमच्या मते बुवा सगळी वेडी मुलं!! कृपया सगळे हलकेच घ्या हं :)

राघव 18/09/2008 - 15:37
आणखी एक.. स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! :O निर्माल्य असं कुणी फेकलं जरा पाहुया बरं!! :W मुमुक्षु

http://vipravani.wordpress.com/ स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं कुठे आहेत सांगा घेउ तुमची चरण धूल वि.प्र.

मनीषा 18/09/2008 - 19:38
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! दिसं सांगे रातीला, मला चांदण्याची भुल |

In reply to by दत्ता काळे

मीनल 18/09/2008 - 20:15
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं फुलांच्या जोडीन फुलपाखरु डुलं हे मला सर्वात आवडलं मीनल.

अनामिक 18/09/2008 - 20:10
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! जास्वंदाच्या झाडावर मग काय नाय उरलं!

अनामिक 18/09/2008 - 21:01
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! कुणीतरी सांगा म्हणजे नकी काय झालं?

विसोबा खेचर 18/09/2008 - 22:59
एका उखाण्याचा प्रयत्न करतो..! स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! आणि वसंतरावांना आहेत बिनलग्नाची मुलं! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

उखाणा मस्त आहे. पण जरा इकडचा शब्द तिकडे झाला आहे, असा माझा अंदाज. आणि वसंतरावांना आहेत बिनलग्नाची मुलं! बिनलग्नाची (लग्न न झालेली, केलेली) मुलं अनेकांना असतात. मलातरी असे वाटते की वाक्य असावे, 'आणि बिनलग्नाच्या वसंतरावांना आहेत चार - चार मुलं.'

In reply to by प्रभाकर पेठकर

विसोबा खेचर 18/09/2008 - 23:14
'आणि बिनलग्नाच्या वसंतरावांना आहेत चार - चार मुलं.' येस्स! वरील ओळ अधिक चपखल आहे! :) (बिनलग्नाचा) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

राघव 19/09/2008 - 11:13
असेच म्हणतो. तुम्ही दोघंही महान आहात! दंडवत!! :D

प्राजु 18/09/2008 - 23:12
एकेक भलतेच उखाणे तयार होताहेत.. माझाही हा प्रयत्न.. स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदीची फुलं रंग गेला उडून असं झाड घुमू लागलं.. स्वस्तीकाच्या झाडावर जास्वंदीची फुलं भुंगा होता त्यावर अन आता झाला गुलं.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

राघव 19/09/2008 - 10:58
वाह! काय चाललीयेत डोकी.. झक्कास! सगळेच एक से बढकर एक आहेत!! अर्थात् काही रचनांत थोडी गफलत झालीये. वरच्या ओळीला निगडीत अशीच दुसरी ओळ अपेक्षीत होती. पण काही हरकत नाही. मस्त आहेत सगळ्यांच्या कल्पना. शुभेच्छा! (हसरा)मुमुक्षु

रामदास 19/09/2008 - 11:47
पण जास्वंदीवरून एका कवितेच्या ओळी आठवल्या, बहुतेक बोरकरांच्या आहेत, जास्वंदीच्या पाच फुलातून मरण एकदा मला म्हणाले पहा कसे मी या झाडातून भरले कोमल रसार्द्र पेले येशुच्या मज स्मरल्या जखमा....... तसं पाह्यलं तर कालपासून स्वस्तीकाच्या झाडाकडे बघायची भिती वाटतेय. न्युजमध्ये आतंकवाद्यांनी मारलेल्या माणसांची प्रेतं दाखवतात तेव्हा ती पांढरी चादर आणि त्यावर लाल जास्वंदीची फुलं असल्यासारखं दिसतं. कोणाला काय आठवेल काय सांगता येत नाही. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

योगी९०० 19/09/2008 - 12:16
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! लोक आहे मरत पण ग्रुहमन्त्री आरशासमोर डुलं !

डावखुरा 18/03/2010 - 18:51
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! समोर पोरी दिसताच पोरान्चे भान डळमळ स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! पोरीन्च्या भोवती पिन्गा घालती मुलं..... स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! कुत्र चाले पुढ,पण मान्जर पायाशी घुटमळ.. "राजे!"