Skip to main content

खेळ दोन ओळींचा - १

लेखक राघव यांनी गुरुवार, 18/09/2008 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ नेहमीचाच.. एक ओळ मला सुचली ती अशी - स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! ..... पुढची ओळ काय होऊ शकेल ते आपल्याला सुचतंय तसं प्रतिसादात लिहायचं. हि कविता नाही. त्यामुळे फक्त दोनच ओळी असणारेत. अट एकच, वर लिहिलेल्या पहिल्या ओळीशी निगडीत अशीच दुसरी ओळ असायला हवी! बघुयात कुणाचे कसे कसे डोके चालते ते ;) मुमुक्षु

वाचने 11071
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! तरण्या मुलींवर मरू लागली सगळीच तरूण मुलं!

In reply to by प्रभाकर पेठकर

स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! हो का? तरण्यामुलांच्या खांद्यावरनं नेम साधु लागले काका :-D

In reply to by सहज

अरे असे नाही.... स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! काकांच्या मनात अजून तारुण्याची 'खुळं'

स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! वेचायला येइनात, वेन्धळी सारी मुल !!!

स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! कावळी जोपासते कोकीळेची पिलं स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! मुमुक्षुने केलं चावटांना रान खुलं

In reply to by अरुण मनोहर

स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! मुमुक्षुने केलं चावटांना रान खुलं =)) जबरा! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! ....... च्या घरची पेटवते चुल!!! हा हा हा उखाणा पण चालेल ना....

स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! अरे बापरे असं झालं तर मग जाईला पन येतील मोगर्‍याची फुलं! =)) वृषाली

स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! मिपावर चालतात भलतीच की ही खुळं!! प्लीज प्लीज प्लीज हलके घ्या!! माफी !!

हा हा हा... चांगलं चाललेलंय... स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं, (भलतेच काय) आमच्या मते बुवा सगळी वेडी मुलं!! कृपया सगळे हलकेच घ्या हं :)

आणखी एक.. स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! :O निर्माल्य असं कुणी फेकलं जरा पाहुया बरं!! :W मुमुक्षु

स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! Surprise जरा पाहुया बरं!! निर्माल्य कुणी फेकलं? Waiting

स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! माणिकताईन्ची गाणी गाते राणी बागुलं !!!

http://vipravani.wordpress.com/ स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं कुठे आहेत सांगा घेउ तुमची चरण धूल वि.प्र.

स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदीची फुलं 'तिचं' सुरु शॉपिंग अन 'त्याच्या'कडे मुलं! ;) चतुरंग

स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदीची फुलं वड्याचं तेल वांग्यावर का वं ओतलं?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदीची फुलं तेल कसलं ओतता, जिवावर बेतलं! :S चतुरंग

In reply to by चतुरंग

स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदीची फुलं ते खनिज तेलच लोकांच्या जिवावर बेतलं!

स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! दिसं सांगे रातीला, मला चांदण्याची भुल |

In reply to by मनीषा

स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! L. H. C. देई जगबुडीची हूल |

स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं फुलांच्या जोडीन फुलपाखरु डुलं

In reply to by दत्ता काळे

स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं फुलांच्या जोडीन फुलपाखरु डुलं हे मला सर्वात आवडलं मीनल.

स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! जास्वंदाच्या झाडावर मग काय नाय उरलं!

स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! मग जास्वंदाचं झाड दारी का लावलं?

स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! मंगळ - शनी युतीमुळेच असं झालं

स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! त्यामुळेच स्वस्तिकाचं "झाड" असतं हे कळलं!

स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! कुणीतरी सांगा म्हणजे नकी काय झालं?

स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! खर खर सान्गा कधी कलम केल.

एका उखाण्याचा प्रयत्न करतो..! स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! आणि वसंतरावांना आहेत बिनलग्नाची मुलं! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

उखाणा मस्त आहे. पण जरा इकडचा शब्द तिकडे झाला आहे, असा माझा अंदाज. आणि वसंतरावांना आहेत बिनलग्नाची मुलं! बिनलग्नाची (लग्न न झालेली, केलेली) मुलं अनेकांना असतात. मलातरी असे वाटते की वाक्य असावे, 'आणि बिनलग्नाच्या वसंतरावांना आहेत चार - चार मुलं.'

In reply to by प्रभाकर पेठकर

'आणि बिनलग्नाच्या वसंतरावांना आहेत चार - चार मुलं.' येस्स! वरील ओळ अधिक चपखल आहे! :) (बिनलग्नाचा) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

असेच म्हणतो. तुम्ही दोघंही महान आहात! दंडवत!! :D

एकेक भलतेच उखाणे तयार होताहेत.. माझाही हा प्रयत्न.. स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदीची फुलं रंग गेला उडून असं झाड घुमू लागलं.. स्वस्तीकाच्या झाडावर जास्वंदीची फुलं भुंगा होता त्यावर अन आता झाला गुलं.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! अन क्रिकेटच मैदान फुटबॉलसाठी खुलं!

वाह! काय चाललीयेत डोकी.. झक्कास! सगळेच एक से बढकर एक आहेत!! अर्थात् काही रचनांत थोडी गफलत झालीये. वरच्या ओळीला निगडीत अशीच दुसरी ओळ अपेक्षीत होती. पण काही हरकत नाही. मस्त आहेत सगळ्यांच्या कल्पना. शुभेच्छा! (हसरा)मुमुक्षु

पण जास्वंदीवरून एका कवितेच्या ओळी आठवल्या, बहुतेक बोरकरांच्या आहेत, जास्वंदीच्या पाच फुलातून मरण एकदा मला म्हणाले पहा कसे मी या झाडातून भरले कोमल रसार्द्र पेले येशुच्या मज स्मरल्या जखमा....... तसं पाह्यलं तर कालपासून स्वस्तीकाच्या झाडाकडे बघायची भिती वाटतेय. न्युजमध्ये आतंकवाद्यांनी मारलेल्या माणसांची प्रेतं दाखवतात तेव्हा ती पांढरी चादर आणि त्यावर लाल जास्वंदीची फुलं असल्यासारखं दिसतं. कोणाला काय आठवेल काय सांगता येत नाही. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! लोक आहे मरत पण ग्रुहमन्त्री आरशासमोर डुलं !

स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! *****च्या खांद्यावर *****ची मुलं!....

स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! रमली किल्वरच्या मांडीवर इस्पिकची मुलं

स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! समोर पोरी दिसताच पोरान्चे भान डळमळ स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! पोरीन्च्या भोवती पिन्गा घालती मुलं..... स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! कुत्र चाले पुढ,पण मान्जर पायाशी घुटमळ.. "राजे!"