सुसला / Susalaa
नव्याने कळलेला पदार्थ, सुसला :)
परवा माझ्या मोठ्या काकूने घरी बनवलेल ताजं मेतकूट दिलं. वास्तविक मला मेतकूट ह्या प्रकाराबद्दल फारसं प्रेम नाही. म्हणून मी सहज म्हणाले कि अगं जास्त देऊ नकोस. ती पट्कन म्हणाली कि सुसला करुन बघ. मला हे नावच नविन होतं. माझ्या चेहर्यावरचं प्रश्नचिन्ह बघून तिने लगेच recipe सांगितली. कर्नाटक side ला बनणारा हा पदार्थ. साधी सोप्पी recipe with मेतकूट touch ताबडतोब बनवून चाखला आणि माझ्या आवडत्या पदार्थ यादीत भर पडली :)
कदाचित ब-याच जणांना माहित असलेला आणि कदाचित ब-याच जणांना माहित नसलेला सुसला इथे share करत आहे. नक्की करून बघा. हो पण त्यासाठी काकूने बनवलेलं चविष्ट मेतकूट हवंच हवं :)
साहित्यः
५ वाट्या भडंग चुरमुरे
२ कांदे
फोडणीसाठी मोहरी, हिंग, हळद, कढिपत्ता, हिरव्या मिरच्या
मीठ, साखर चवीनुसार
४ tp sp मेटकूट
कृती:
१. आपण पोहे करतो तशीच हि कृती आहे. कढई मध्ये तेल गरम करावे. त्यात मोहरी, हिंग, हळद, कढिपत्ता, मिरची अशी सुरेख फोडणी करावी.
२. फोडणी मध्ये चिरलेला कांदा घालावा. किंचित मीठ व साखर घालून झाकण ठेवून वाफ काढावी.
३. एका चाळणी मध्ये चुरमुरे धुवुन घ्यावेत व पाणी निथळू द्यावे. कांदा शिजला कि त्यात हे चुरमुरे घालावे. चविनुसार मीठ, साखर घालून चांगले ढवळावे. झाकण ठेवून एक वाफ काढावी.
४. आता त्यात मेतकूट घालावे. ते छान एकत्र करुन परत झाकण ठेवावे व परत एक वाफ काढावी.
बास.. गरमागरम सुसला ताव मारण्यासाठी तय्यार आहे :)
वाचने
17297
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
वा वा... मस्तच..!!
माझी आई हेच मेतकुट न टाकता "सुशीला" म्हणुन करते!!
अवांतरः- काय पण नाव असतात पदर्थांची... सुशीला, मणिकपैंजण (फोडणीची पोळी!) आणि अजुन काय काय..
In reply to वा वा... मस्तच..!! by पिलीयन रायडर
मणिकपैंजण (फोडणीची पोळी!)वा..वा माझी श्रीरामपुरची मावशी वापरायची हा शब्द. लहानपणी तिच्याकडे गेलो असताना सकाळी भूक लागली म्हणून विचारावं 'काय करते आहेस खायला?' की कधी कधी कानावर यायचं 'माणिकपैंजण'. आम्हाला कळायचं नाही हा काय प्रकार आहे. ताटलीत वाढून आला की कळायचं 'अरे! हा तर पोळीचा कुस्करा'. तो तर आवडीचा त्यामुळे माणिकपैंजण शब्द मनावर कोरला गेला.
In reply to वा वा... मस्तच..!! by पिलीयन रायडर
आमच्याकडे फोडणीची पोळी = शाही तुकडा! ;)
पहिल्यांदाच असा पदार्थ पाहिला.
नावही प्रथमच ऐकतोय.
थोडक्यात कांदा पोह्यां सारखच. फक्त पोह्यां ऐवजी कुरमुरे वापरलेत शिवाय सोबतीला मेतकुटाचा तडका.
की न धुता वापरून जास्त चांगले वाटेल? खरच पहिल्यांदा पाहिला हा पदार्थ!
In reply to चुरमुरे मऊ नाही पडत? by अनन्न्या
हेच विचारणार होते, चुरमुरे मऊ नाही पडत का?
माझी मामी सोलापुर साईडची आहे, ती थोड्याशा भाजलेल्या पातळ पोह्यात, कांदा, टोमॅटो, तिखट, मीठ, लिंबू आणि असे मुख्य म्हणजे हे मेतकुट घालायची, खूप छान लागते ते. आणि कधी कंटाळा आला असताना असे खाल्ले बरोबर एखादं पुस्तक आणि बाहेर पाऊस असला की कंटाळाही पळून जातो :)
In reply to चुरमुरे मऊ नाही पडत? by अनन्न्या
अनन्न्या चुरमुरे पोह्यांसारखे खूप धुवायचे नाहीत.
मेतकूट घालून वाफ काढल्यामुळे चुरमुरे न धुता वापरले तरी मऊ होतील.
In reply to चुरमुरे मऊ नाही पडत? by अनन्न्या
अग छान मऊ होतात..
चुर्मुरे पाण्यातुन काढले की ओलसर होतात आणि मग फोडणी मध्ये छान मऊ..
आणि हे सगळं फार मस्त लागतं!!
छानच पदार्थ आहे. वेगळा आहे.
आमच्या सातार्याकडे असल्याच भारी नावाचा एक पदार्थ आहे.
त्याचे नाव " म्हाद्या"
कांदा आनि शेंगदाण्याची भाजी असते.
भरपूर कांदा घालून केलेली शेम्गदाण्याची भाजी किंवा भरपूर शेंगदाणे घालून केलेली काम्द्याची भाजी.
रेशीपी टाकतो कधितरी.
In reply to म्हाद्या by विजुभाऊ
आमच्या तासगावच्या आजीने केली होती, मी लग्नानंतर पहिल्यांदाच गेले होते आणि परतीच्या वाटेवर आजीने भाकरी आणि मह्द्या दिला होता बनवुन.
टक्कू.. टक्कू कसा बनवतात
In reply to टक्कू by देवांग
अमित टक्कू ची पाककृती माझ्या ब्लोग वर मिळेल. त्याचा दुवा हा इथे:
http://takkuuu.blogspot.in/2013/04/blog-post.html
धन्यवाद
आम्ही ह्याला सुशीला म्हणतो :)
In reply to छान पदार्थ by सानिकास्वप्निल
मीपण हा पदार्थ फार वर्षांपूर्वी सुशीला याच नावानी चाखलाय. छान लागतो. :)
In reply to छान पदार्थ by सानिकास्वप्निल
असेच म्हणते.. आमच्या सोलापुरात याला सुशीला असेच म्हणतात पण त्यात मेतकुट घालत नाहित
छान पोह्यासारखी फोड्णी देवुन, वरिल साहित्य+दाळे+शेन्गा+कढीपत्ता+कोथिम्बिर हे देखिल त्यात टाकतात आणि वरती लिम्बु पिळून वाढ्तात.
In reply to असेच म्हणते.. आमच्या by स्मिता चौगुले
+१
कर्नाटक सीमेकडच्या गावात कॅन्टीनमध्ये नाश्त्याला हा विकत पण मिळतो.
वरुन दही घालून देतात. फक्त सकाळी लौकर मिळतो. दिवसभर नाही.
एकदम नविन पदार्थ! रविवारच्या सकाळी घरी नाश्ता म्हणून बनवून पाहायला हरकत नाही.
हो मी पण सुशिला म्हणुनच ऐकलाय हा पदार्थ!
पण माझ्या घरात चिरमुरे हे कुरकुरीतच असायला हवेत असा नियम आहे.
तरीही पोहे या पद्धतिने केले तर चालतील का?
In reply to हो मी पण सुशिला म्हणुनच ऐकलाय by साऊ
साऊ पोहे पण चांगले लागतील. सखीने वर सांगितल्याप्रमाणे हि करुन बघता येतील.
मस्तच.
उत्तर कर्नाटकच्या काही मानबिंदू डिशेस आहेत त्यातलीच हीपण एक! लय खंग्री असतो तेच्यायला, आता घरला जाऊन फर्माईश करावी लागणार असं दिस्तंय :)
पाकृ चांगली आहे.. मी पण हे नाव कधी नाही ऐकले.
In reply to पाकृ चांगली आहे.. मी पण हे by Mrunalini
थन्य्कु तक्खु, सुस्ला आवदली. :)
थय्क्नु मनपाअसुन.
In reply to थन्य्कु तक्खु, सुस्ला आवदली. by बालगंधर्व
"सुसलाया दाही बश्या" मध्ये फिट्ट बसेल बघा हा परतिसद ;)
आमच्यासाठी तर येकदम नवीन पदार्थ हाय...
आणी कसा विचाराल???..तर..आय हाय!..आय हाय!..आय हाय!
हे आम्या बनवलेली 'सुशीला'!! ;)


In reply to हे आम्या बनवलेली 'सुशीला'!! by किसन शिंदे
शिंदे सर,
फोटो दिसत नाय.
In reply to शिंदे सर, फोटो दिसत नाय. by त्रिवेणी
@शिंदे सर,>>> 

अरे व्वा! मस्तच :)
.जेव्ह दिवाळीत किवा लग्न कर्यत उरलेला चिवडा किंवा एरवी हि मऊ पडलेल्या चिवड्याचा सद उपयोग आम्हि हा सुशिला करयला करतो :)
सुशिला काय, म्हाद्या काय, मणिकपैंजण काय ऐकावे ते नवलच...
हटके पाकक्रुती. मेतकुट भात आवडत नाही अजिबात पण सुशिला खाल्ली पाहीजे एकदा ;)
मेतकुट भात आवडत नाही अजिबात....मला भयंकर आवडतो. वाफाळणारा आंबेमोहोर भात, घरचं साजुक तुप, किंचीत मीठ आणि खमंग मेतकुट. स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच असावा. ह्या सुसला, सुशीला जे असेल ते बनवून पाहण्यासाठी आजच खमंग मेतकुट बनविले आहे. आता लवकरच सुसला बनविण्यात येईल. बाकी वरचेवर तुप,मीठ, भात, मेतकुट, घरगुती लोणचे हा बेत॑ होईलच.
लय भारी
भारीच.... पहिल्यांदा ऐकलं ह्या पदार्थाबद्दल. नक्की करून बघण्यात येईल :) :)
मेत्कुत कसे बनवतात्?कोनि सान्गेल का
वेगळाच पदार्थ...करून वघणार.
व्वा!! झकास... आता सुसला करायलाच हवे.... सोपी आणि परिपूर्ण रेसिपी आहे
वा वा... मस्तच..!!