मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुसला / Susalaa

टक्कू · · पाककृती
नव्याने कळलेला पदार्थ, सुसला :) परवा माझ्या मोठ्या काकूने घरी बनवलेल ताजं मेतकूट दिलं. वास्तविक मला मेतकूट ह्या प्रकाराबद्दल फारसं प्रेम नाही. म्हणून मी सहज म्हणाले कि अगं जास्त देऊ नकोस. ती पट्कन म्हणाली कि सुसला करुन बघ. मला हे नावच नविन होतं. माझ्या चेहर्‍यावरचं प्रश्नचिन्ह बघून तिने लगेच recipe सांगितली. कर्नाटक side ला बनणारा हा पदार्थ. साधी सोप्पी recipe with मेतकूट touch ताबडतोब बनवून चाखला आणि माझ्या आवडत्या पदार्थ यादीत भर पडली :) कदाचित ब-याच जणांना माहित असलेला आणि कदाचित ब-याच जणांना माहित नसलेला सुसला इथे share करत आहे. नक्की करून बघा. हो पण त्यासाठी काकूने बनवलेलं चविष्ट मेतकूट हवंच हवं :) साहित्यः ५ वाट्या भडंग चुरमुरे २ कांदे फोडणीसाठी मोहरी, हिंग, हळद, कढिपत्ता, हिरव्या मिरच्या मीठ, साखर चवीनुसार ४ tp sp मेटकूट कृती: १. आपण पोहे करतो तशीच हि कृती आहे. कढई मध्ये तेल गरम करावे. त्यात मोहरी, हिंग, हळद, कढिपत्ता, मिरची अशी सुरेख फोडणी करावी. २. फोडणी मध्ये चिरलेला कांदा घालावा. किंचित मीठ व साखर घालून झाकण ठेवून वाफ काढावी. ३. एका चाळणी मध्ये चुरमुरे धुवुन घ्यावेत व पाणी निथळू द्यावे. कांदा शिजला कि त्यात हे चुरमुरे घालावे. चविनुसार मीठ, साखर घालून चांगले ढवळावे. झाकण ठेवून एक वाफ काढावी. ४. आता त्यात मेतकूट घालावे. ते छान एकत्र करुन परत झाकण ठेवावे व परत एक वाफ काढावी. बास.. गरमागरम सुसला ताव मारण्यासाठी तय्यार आहे :) 1 2 3 4 5 6 7 8 9

वाचन 17297 प्रतिक्रिया 0