कट्-वडा!





तर उकडलेल्या बटाट्याचे बारिक तुकडे करुन त्यात एका कढईत कांद्याची जीर,मोहरी,हिंग,कडीपत्ता,मिरच्या घालुन केलेली फोडणी मिसळा. चवीप्रमाणे मिठ घाला. आता या मिश्रणाचे दोन भाग करुन एका भागात आल्याची तर दुसर्या भागात लसणीची पेस्ट मिसळा. एकाचवेळी दोन वेगवेगळ्या चवीचे वडे खायला मिळतील. ते ही अॅज अ सरप्राइज! तर आता या मिश्रणाचे लिंबाएव्हढे अथवा त्यापेक्षा मोठे गोळे बनवुन घ्या.
आवरणाच्या साहित्यात पाणी मिसळुन भजीच्या पिठासारखे घट्टसर भिजवा. वडे तळायला ठेवलेल्या तेलातले थोडे तेल यावर मोहन म्हणुन घाला. अन घ्या तळुन वडे!
आता बनवुया कट!!
मी या कटासाठी सगळ आंतरजाल पालथ घातल! सगळ्या रेसीपी ट्राय केल्या. चकली ताईची केली, स्वाती ताईची केली, पेठकर काकांच्या खरडवहीचे उंबरे झिजवले, पण उंहुं! नो रिझल्टस! माझ्या कटाच्या चवीला चटावलेल्या जिभेला काही ती जी कोल्हापुरी विशिष्ट चव असते, ती काही मिळेना. उगा कट म्हणुन हौस भागवायची अस चालु होतं. अन मग एक दिवस अतृप्त आत्म्यान करंssट-मिसळ(४४० व्होल्ट) टाकली, अन त्यात कटाचा उल्लेख करताना, त्यात बटाटाभाजी मिसळतात असा दणका मारला. हान तेच्या मारी! अहो काय शॉट लागला ते वाचुन म्हणता? लागलीच त्याप्रकारे कट बनवुन पाह्यला अन काय सांगु राव? चक्क गारद!
तर कट साहित्य-
१ वाटी कांदा पेस्ट,१ वाटी टोमॅटो पेस्ट,१ वाटी ओल खोबर,१ वाटी पापडी अथवा गाठी (हो फरसाणतली)चा चुरा, एक वाटी बटाटा भाजी (चुरुन घ्या),१ तमालपत्र,४ लवंगा,१" दालचिन,१ १/२ टीस्पुन लसूण पेस्ट, मिठ, आमच तिखट, अन कोकम.
थोड्याश्या तेलात तमालपत्र,लवंगा,दालचिनी पर्तुन घ्या त्यावर कांदा पेस्ट घालुन कच्चा वास जाईपर्यंत परता, आता त्यात ओल खोबर घालुन परता.मग टोमॅटो पेस्ट घालुन साधारण शिजवुन घ्या.
हे सगळ मिक्सरवर फिरवुन छान बारिकस वाटुन घ्या. त्यातच बटाट्याची भाजी अन पापडी अथवा गाठीचा चुरा मिसळा.
आता जरा जास्त तेल घ्या एका पातेल्यात. तेल तापल की गॅस बंद करा, वरचा एक्झॉस्ट लावा, दारे खिडक्या उघडा अन तेल किंचीत तापमानाला उतरल की त्यात आमच कोल्हापुरी तिखट घाला. जळु देउ नका! भरभर पळीने हलवत रहा. आता त्यात वरील पेस्ट घालुन पुन्हा गॅस सुरु करा. पाहिजे तेव्हढ पाणी, मिठ अन कोकम घाला. चांगल उकळा.
सुटलं का पाणी तोंडाला?
कट-वडा साहित्य-
वरचे दोन वडे, बारिक चिरलेला कांदा, कोथींबीर, टोमॅटो (ऑप्शनल) फरसाण, लिंबु. अन पाव. बाजुला कटाची वाटी. अन भरपुर पाणी. नाक डोळे पुसायला एक हातरुमाल.
आता वडे बाऊलमध्ये असे निट ठेवा, त्यांच्याकडे एकदा डोळेभरुन पहा. हात मागे! अस हावरटासारख नुसता वडाउचलुन तोंडात नाही टाकायचा! आता त्यावर मस्त फरसाण घाला. मग चांगला दोन पळ्या कट घाला. कांदा-कोथींबीरीची पखरण करा. पाहीजे असेल तर टोमॅटो पसरा. जर्र्र्रा लिंबु पिळा. अन बसा डाव्या हाताला पाव घेउन. आता काय विचारताय? हाणा !!
__/\__
अपर्णा
In reply to मस्त by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to मस्त by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to खरच? माझ्या मते आमच्या by स्पंदना
In reply to बाकी कुठे काहीसं साम्य असलेला by गवि
In reply to बाकी कुठे काहीसं साम्य असलेला by गवि
In reply to खरच? माझ्या मते आमच्या by स्पंदना

In reply to मस्त by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
चिकन्/मटणाचा शिळा रस्सा देतो असा संशय आहेअशी मिसळ कुठे देतात याच्या शोधात आहे
In reply to चिकन्/मटणाचा शिळा रस्सा देतो by मालोजीराव
In reply to मीही!!! गेलाबाजार फिश by बॅटमॅन
In reply to फिशकरी मिसळीत /कट म्हणून बरी by गवि
In reply to फिशकरी मिसळीत /कट म्हणून बरी by गवि
In reply to मात्र फिशकरीत आप्पे आणि मटण by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to फिशकरी आणि मटणकरी हे दोन्ही by गवि
In reply to आप्पमची आठवण करून दिलीत, आता by बॅटमॅन
आप्पम म्हणजे जाड जाळीदार घावनाचा अवतार.

In reply to आप्पम हा आप्प्यांचा प्रकार by गवि
In reply to अजून एक शंका. घावन म्हंजे by बॅटमॅन
In reply to घावन निराळे आणि नीरदोसा by सूड
In reply to नारळाच्या दुधात? घरी मातु by बॅटमॅन
In reply to एकच. by प्रभाकर पेठकर
In reply to घावन निराळे आणि नीरदोसा by सूड
In reply to फिशकरी आणि मटणकरी हे दोन्ही by गवि
In reply to खरतर अप्पम बरोबर जी मटण रस्सा by स्पंदना
In reply to खरतर अप्पम बरोबर जी मटण रस्सा by स्पंदना
In reply to खरतर अप्पम बरोबर जी मटण रस्सा by स्पंदना
In reply to मीही!!! गेलाबाजार फिश by बॅटमॅन
चिकन्/मटणाचा शिळा रस्सा देतो असा संशय आहे
अशी मिसळ कुठे देतात याच्या शोधात आहे
मीही!!! गेलाबाजार फिश करीसुद्धा चालेल असे वाटते.
ठिकाण सापडले..!!!
कर्वे रोड - यात्री हॉटेलजवळ चिकन मिसळ मिळाली. चिकन खीमा + फरसाण + रस्सा असा प्रकार होता. आवडला.

In reply to पाकृ आणि लिखाणासाठी __/\__ __ by डॉ सुहास म्हात्रे
In reply to पाकृ आणि लिखाणासाठी __/\__ __ by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मृणालिनी, अमोल, सविता, कोमल, by स्पंदना
In reply to ऑ !!! आमचं एक्क्यावरून राजावर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आयो! आवं लय माणसांची नाव by स्पंदना
In reply to अगगगगगगग! by पैसा
......................In reply to अगगगगगगग! by पैसा
In reply to अगगगगगगग! by पैसा
In reply to हायला ! by सस्नेह
मी
अ मर आहे...च्च! =))In reply to _/\_ by गणपा
In reply to व्वा काय कटकट..... by प्रभाकर पेठकर
In reply to व्वा काय कटकट..... by प्रभाकर पेठकर
In reply to काका by त्रिवेणी
In reply to कालरात्री सोडा घालून पांढरे by प्रभाकर पेठकर
In reply to सोडा का घालायचा? by स्पंदना
सोडा का घालायचा?गरज नाही. वाटाणे नीट शिजणार नाहीत ह्या अनाठायी भिती पोटी सोडा घातला होता. पण अनुभवातून शहाणपण आले आहे. असो. तुमच्या कोल्हापुरातला हाच झणझणीत कट-वडा आमच्या मुंबईत माझ्या लहानपणी (साठच्या दशकात) मिळायचा. अनेकदा खाल्ला आहे. सध्याची परिस्थिती माहीत नाही.
In reply to ख प लो ! ! by निमिष ध.
In reply to कट by मीनल
In reply to कट by मीनल
In reply to अपर्णाताई, मला दत्तक घे ना by कवितानागेश
In reply to मी तर वार लावुन जेवणार. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to ओ नका ओ या पुण्या मुंबई by काळा पहाड
बादवे, कटवडा हा ब्रेडबरोबर (तोही लादीपावाला कापून बनवलेल्या) खायचा विषय आहे, पावाबरोबर नव्हे. निषेध!तो सकाळी सकाळी भाजलेला जरा वाकडा तिकडा पण भारी मउ लुसलुशीत पाव म्हणजे काय सांगु? तो कापायला त्या बेकरीवाल्याची पातळ सुरी. आहाहा! अगदी साताला ब्रेड भाजल्याचा वास दरवळायच, बरोबर बिस्किट (आता कुकीज). चवी हरवल्या राव!
In reply to अगदी! अगदी!! by स्पंदना
In reply to अगदी! पाव म्हणजे तोच. खेमराज by शिवोऽहम्
In reply to जगात भारी कोल्हापुरी by कुसुमावती
अनेगाबीम्हणजे काय?
In reply to म्हणजे? by प्रभाकर पेठकर
सकाळी सकाळी का अत्याचार करता