कट्-वडा!
काय! काय!! काय!!
म्हणायच तरी काय म्हणते मी!
ऊठ सुट मिसळ! मिसळ!! अन मिसळ!!
नाही म्हणजे आम्ही ऐकायच तरी किती म्हणते मी? अगदी एका आयडीचे नावसुद्धा मिसळ्पाव असाव? कोण मिसळ्प्रेमी ! कोण उठुन नुसते मिसळीचे फोटो टाकून शंभरी गाठतो? ऑ? काय आहे काय? अहो या मिसळीलाच झणका देणारा आणखी एक भन्नाट प्रकार आहे याची कुणाला जाणीवही नसावी? अगदी उड्या मारुन मारुन जाऊन मिसळी खाता तेथे काळ्या फळ्यावर खडुने लिहीलेले हे नाव तुम्हा कुणाला दिसु नये? उगा नव नव्या चवी चाखणार्यांना हा ही पदार्थ चाखुन पहायची उर्मी येउ नये?
आता म्हणाल अपर्णाबाय एव्हढा का उमाळा फुटलाय या पदार्थाचा? का? का फुटु नये? अहो कॉलेजच्या रम्य भासणार्या दिवसात अस्मादिकांनी तरंगायची स्वप्न पाहीली ती याच कट-वड्याच्या बाऊलात! नाका तोंडातून निघणार्या वाफा सांभाळत कपाळीचा घाम पुसला तो याच्याच सहवासाने! पर्स उलटी पालटी करुन खरच आत पुरेसे पैसे नाहीत याची निराश मनाने चाचपणी केली ती याच्याच चवीला आसुसून! अन अश्या तारुण्याच्या आठवणीत राजासारखा घर करुन बसलेला कट-वडा बाहेरच्या कातिल दुनियेच्या खिजगणतीतही असु नये? इतका अन्याय?
ते काही नाही! आज मी चमचा अन बाऊल परजुन हा अन्याय दुर करणाच. आमच्या कट-वड्याच नाव या पाककलाक्षेत्री झळकावणारच!
बर! आणी लागतय तरी अस काय जगावेगळ या कट-वड्यासाठी म्हणते मी! आपलाच कट, अन आपलाच वडा! हाय काय त्यात म्हणते मी? पण हा कट अन वड्याचा प्रीती संगम मात्र अगदी नरसोबावाडीच्या संगमा एव्हढ पुण्य देउन जातो.
तर मंडळी या पदार्थाला लागणारे सामान!
जेव्हढे पाहिजे तेव्हढे वडे, अन उपसेल तेव्हढा कट! वर पसरायला फरसाण,कोथींबीर,कांदा, थोडस ओल खोबर अन लिंबाची फोड!
नाऽऽही? टप्प्या ट्प्प्याने पाहिजे म्हणता? घेवा देवा. देतु!
तर वड्याचे सामान-
उकडलेले बटाटे, चिरलेला कांदा, मिरची, कडीपत्ता, हळद, कोथींबीर. थोडी आले पेस्ट, अन थोडी लसूण पेस्ट.
फोडणीसाठी- तेल, हिंग, जीरे, मोहरी.
आवरणासाठी- बेसन,हिंग,जीरे,आमच कोल्हापुरी तिखट, मिठ, थोडी कोथींबीर, कडीपत्ता, (हे दोन्ही अगदी बारिक कापुन) चमचाभर मोहन.
तळायला तेल.





तर उकडलेल्या बटाट्याचे बारिक तुकडे करुन त्यात एका कढईत कांद्याची जीर,मोहरी,हिंग,कडीपत्ता,मिरच्या घालुन केलेली फोडणी मिसळा. चवीप्रमाणे मिठ घाला. आता या मिश्रणाचे दोन भाग करुन एका भागात आल्याची तर दुसर्या भागात लसणीची पेस्ट मिसळा. एकाचवेळी दोन वेगवेगळ्या चवीचे वडे खायला मिळतील. ते ही अॅज अ सरप्राइज! तर आता या मिश्रणाचे लिंबाएव्हढे अथवा त्यापेक्षा मोठे गोळे बनवुन घ्या.
आवरणाच्या साहित्यात पाणी मिसळुन भजीच्या पिठासारखे घट्टसर भिजवा. वडे तळायला ठेवलेल्या तेलातले थोडे तेल यावर मोहन म्हणुन घाला. अन घ्या तळुन वडे!
आता बनवुया कट!!
मी या कटासाठी सगळ आंतरजाल पालथ घातल! सगळ्या रेसीपी ट्राय केल्या. चकली ताईची केली, स्वाती ताईची केली, पेठकर काकांच्या खरडवहीचे उंबरे झिजवले, पण उंहुं! नो रिझल्टस! माझ्या कटाच्या चवीला चटावलेल्या जिभेला काही ती जी कोल्हापुरी विशिष्ट चव असते, ती काही मिळेना. उगा कट म्हणुन हौस भागवायची अस चालु होतं. अन मग एक दिवस अतृप्त आत्म्यान करंssट-मिसळ(४४० व्होल्ट) टाकली, अन त्यात कटाचा उल्लेख करताना, त्यात बटाटाभाजी मिसळतात असा दणका मारला. हान तेच्या मारी! अहो काय शॉट लागला ते वाचुन म्हणता? लागलीच त्याप्रकारे कट बनवुन पाह्यला अन काय सांगु राव? चक्क गारद!
तर कट साहित्य-
१ वाटी कांदा पेस्ट,१ वाटी टोमॅटो पेस्ट,१ वाटी ओल खोबर,१ वाटी पापडी अथवा गाठी (हो फरसाणतली)चा चुरा, एक वाटी बटाटा भाजी (चुरुन घ्या),१ तमालपत्र,४ लवंगा,१" दालचिन,१ १/२ टीस्पुन लसूण पेस्ट, मिठ, आमच तिखट, अन कोकम.
थोड्याश्या तेलात तमालपत्र,लवंगा,दालचिनी पर्तुन घ्या त्यावर कांदा पेस्ट घालुन कच्चा वास जाईपर्यंत परता, आता त्यात ओल खोबर घालुन परता.मग टोमॅटो पेस्ट घालुन साधारण शिजवुन घ्या.
हे सगळ मिक्सरवर फिरवुन छान बारिकस वाटुन घ्या. त्यातच बटाट्याची भाजी अन पापडी अथवा गाठीचा चुरा मिसळा.
आता जरा जास्त तेल घ्या एका पातेल्यात. तेल तापल की गॅस बंद करा, वरचा एक्झॉस्ट लावा, दारे खिडक्या उघडा अन तेल किंचीत तापमानाला उतरल की त्यात आमच कोल्हापुरी तिखट घाला. जळु देउ नका! भरभर पळीने हलवत रहा. आता त्यात वरील पेस्ट घालुन पुन्हा गॅस सुरु करा. पाहिजे तेव्हढ पाणी, मिठ अन कोकम घाला. चांगल उकळा.
सुटलं का पाणी तोंडाला?
कट-वडा साहित्य-
वरचे दोन वडे, बारिक चिरलेला कांदा, कोथींबीर, टोमॅटो (ऑप्शनल) फरसाण, लिंबु. अन पाव. बाजुला कटाची वाटी. अन भरपुर पाणी. नाक डोळे पुसायला एक हातरुमाल.
आता वडे बाऊलमध्ये असे निट ठेवा, त्यांच्याकडे एकदा डोळेभरुन पहा. हात मागे! अस हावरटासारख नुसता वडाउचलुन तोंडात नाही टाकायचा! आता त्यावर मस्त फरसाण घाला. मग चांगला दोन पळ्या कट घाला. कांदा-कोथींबीरीची पखरण करा. पाहीजे असेल तर टोमॅटो पसरा. जर्र्र्रा लिंबु पिळा. अन बसा डाव्या हाताला पाव घेउन. आता काय विचारताय? हाणा !!
__/\__
अपर्णा





तर उकडलेल्या बटाट्याचे बारिक तुकडे करुन त्यात एका कढईत कांद्याची जीर,मोहरी,हिंग,कडीपत्ता,मिरच्या घालुन केलेली फोडणी मिसळा. चवीप्रमाणे मिठ घाला. आता या मिश्रणाचे दोन भाग करुन एका भागात आल्याची तर दुसर्या भागात लसणीची पेस्ट मिसळा. एकाचवेळी दोन वेगवेगळ्या चवीचे वडे खायला मिळतील. ते ही अॅज अ सरप्राइज! तर आता या मिश्रणाचे लिंबाएव्हढे अथवा त्यापेक्षा मोठे गोळे बनवुन घ्या.
आवरणाच्या साहित्यात पाणी मिसळुन भजीच्या पिठासारखे घट्टसर भिजवा. वडे तळायला ठेवलेल्या तेलातले थोडे तेल यावर मोहन म्हणुन घाला. अन घ्या तळुन वडे!
आता बनवुया कट!!
मी या कटासाठी सगळ आंतरजाल पालथ घातल! सगळ्या रेसीपी ट्राय केल्या. चकली ताईची केली, स्वाती ताईची केली, पेठकर काकांच्या खरडवहीचे उंबरे झिजवले, पण उंहुं! नो रिझल्टस! माझ्या कटाच्या चवीला चटावलेल्या जिभेला काही ती जी कोल्हापुरी विशिष्ट चव असते, ती काही मिळेना. उगा कट म्हणुन हौस भागवायची अस चालु होतं. अन मग एक दिवस अतृप्त आत्म्यान करंssट-मिसळ(४४० व्होल्ट) टाकली, अन त्यात कटाचा उल्लेख करताना, त्यात बटाटाभाजी मिसळतात असा दणका मारला. हान तेच्या मारी! अहो काय शॉट लागला ते वाचुन म्हणता? लागलीच त्याप्रकारे कट बनवुन पाह्यला अन काय सांगु राव? चक्क गारद!
तर कट साहित्य-
१ वाटी कांदा पेस्ट,१ वाटी टोमॅटो पेस्ट,१ वाटी ओल खोबर,१ वाटी पापडी अथवा गाठी (हो फरसाणतली)चा चुरा, एक वाटी बटाटा भाजी (चुरुन घ्या),१ तमालपत्र,४ लवंगा,१" दालचिन,१ १/२ टीस्पुन लसूण पेस्ट, मिठ, आमच तिखट, अन कोकम.
थोड्याश्या तेलात तमालपत्र,लवंगा,दालचिनी पर्तुन घ्या त्यावर कांदा पेस्ट घालुन कच्चा वास जाईपर्यंत परता, आता त्यात ओल खोबर घालुन परता.मग टोमॅटो पेस्ट घालुन साधारण शिजवुन घ्या.
हे सगळ मिक्सरवर फिरवुन छान बारिकस वाटुन घ्या. त्यातच बटाट्याची भाजी अन पापडी अथवा गाठीचा चुरा मिसळा.
आता जरा जास्त तेल घ्या एका पातेल्यात. तेल तापल की गॅस बंद करा, वरचा एक्झॉस्ट लावा, दारे खिडक्या उघडा अन तेल किंचीत तापमानाला उतरल की त्यात आमच कोल्हापुरी तिखट घाला. जळु देउ नका! भरभर पळीने हलवत रहा. आता त्यात वरील पेस्ट घालुन पुन्हा गॅस सुरु करा. पाहिजे तेव्हढ पाणी, मिठ अन कोकम घाला. चांगल उकळा.
सुटलं का पाणी तोंडाला?
कट-वडा साहित्य-
वरचे दोन वडे, बारिक चिरलेला कांदा, कोथींबीर, टोमॅटो (ऑप्शनल) फरसाण, लिंबु. अन पाव. बाजुला कटाची वाटी. अन भरपुर पाणी. नाक डोळे पुसायला एक हातरुमाल.
आता वडे बाऊलमध्ये असे निट ठेवा, त्यांच्याकडे एकदा डोळेभरुन पहा. हात मागे! अस हावरटासारख नुसता वडाउचलुन तोंडात नाही टाकायचा! आता त्यावर मस्त फरसाण घाला. मग चांगला दोन पळ्या कट घाला. कांदा-कोथींबीरीची पखरण करा. पाहीजे असेल तर टोमॅटो पसरा. जर्र्र्रा लिंबु पिळा. अन बसा डाव्या हाताला पाव घेउन. आता काय विचारताय? हाणा !!
__/\__
अपर्णा
सकाळी सकाळी का अत्याचार करता
सकाळी सकाळी का अत्याचार करता ओ इतके.
यम्म यम्म !
यम्म यम्म !
सकाळच्याला हापिसात बसुनशान असं सगळं गरमा गरम बघीतल की लयं त्रास व्हतो बघा ! ;)
( कोल्हापुरी कट प्रेमी) :)
मस्त
चिपळुणहुन गुहागरला जाताना श्रुंगारतळी गावाच्या पुढे एका हाटीलात रस्सा-वडा नावाने बर्याचदा खाल्ला आहे.
अफलातुन लागतो. मात्र हा हॉटेलवाला रस्सा/कट म्हणुन चिकन्/मटणाचा शिळा रस्सा देतो असा संशय आहे. पण त्यामुळे या डिशला मात्र चार चांद लागतात ;)
वेळणेश्वरलादेखील समुद्रकिनारी कट वडा आणि चहा नाष्त्याला खाल्ला आहे.
काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
मस्त मस्त मस्त
खरच? माझ्या मते आमच्या
खरच? माझ्या मते आमच्या कोल्हापुरव्यतिरिक्त ही डीश आणखी कोठेही मिळत नाही.
बर झाल तुम्ही सांगितलात ते.
बाकी कुठे काहीसं साम्य असलेला
बाकी कुठे काहीसं साम्य असलेला पदार्थ अन्य नावाने मिळत असेलच. पण कट वडा हे नाव आणि तो विशिष्ट पदार्थ हा सांगली, कोल्हापूर, कराड, सातारा इतक्या पट्ट्यात ओरिजिनल असतो असं खात्रीने म्हणता येईल. त्या परिसरात पाचसहा वर्षे काढल्याने कटवड्याशी अत्यंत जवळचा परिचय आहे. कॉलेज आणि कटवड्याचं नातं लेखात म्हटल्याप्रमाणे एकदम घट्ट आहे.
बाकी कटवडा या प्रकारात वडा गार चालतो आणि बहुधा असतोही. कट वाफाळता असणं अनिवार्य. शिवाय कोल्हापूर सांगलीकडे बटाटेवड्याचे आवरण एकदम जाड करण्याची पद्धत आहे. असा वडा गार झाल्यावर नुसता खायला आणखीच भयंकर लागतो. पण हाच वडा उकळत्या कटात घालून दिला की मस्त खुलतो.
कट आणि वडा वेगवेगळा देणे (आणि वरुन अॅड ऑन्स आजुबाजूला ठेवलेले) हा सर्व्ह करण्याचा फॅन्सी प्रकार झाला. ते फरसाण आणि अन्य सजावट काढून टाकून वड्याला थेट कटात बुडवून बाजूने तुडुंब कट भरुन खोलगट वाडगा-थाळी हीच सर्व्ह करण्याची योग्य पद्धत. सोबत पाव मात्र चालेल..एरवी जाळच तेजायला.
सर्व प्रथम १० वर्षापुर्वी
सर्व प्रथम १० वर्षापुर्वी गुहागरला जाताना खाल्ला, तेव्हाच बेहद्द आवडला. त्यानंतर प्रत्येक वेळी गेलो तेव्हा खाल्ला. गुहागर, हेदवी, वेळणेश्वर परिसरात कोणत्याही उपहारग्रुहार नाष्त्याला मिळेल (मला तरी ३-४ वेगवेगळ्या ठीकाणी मिळाला.)
हे बघा मागच्या वर्षीच वेळणेश्वरला खाल्लेला रस्सा-वडा. देवळाच्या मागे समुद्रकिनार्याजवळ गोखल्यांच्या हॉटेलात. अप्रतिम चव (आणि गोखल्यांचे लोकेशनसुध्दा)


चिकन्/मटणाचा शिळा रस्सा देतो
चिकन्/मटणाचा शिळा रस्सा देतो असा संशय आहेअशी मिसळ कुठे देतात याच्या शोधात आहे
मीही!!! गेलाबाजार फिश
मीही!!! गेलाबाजार फिश करीसुद्धा चालेल असे वाटते.
फिशकरी मिसळीत /कट म्हणून बरी
फिशकरी मिसळीत /कट म्हणून बरी लागेल असं थिऑरिटिकली वाटत नाही. मिसळ / कट हा तर्री बेस्ड असतो. फिशकरी त्या मानाने खोबरे आणि अन्य मसाल्यांमुळे त्या गटातली वाटत नाही. काही ठिकाणी फिशकरीही लालभडक तर्रीवाली (अंडाकरीसारखी) बनवतात. पण मुळात गोवन किंवा कोंकणातली फिशकरी ही कट म्हणून तेवढी योग्य चवीची / टेक्स्चरची वाटणार नाही.
हम्म तेही खरंच म्हणा. काय
हम्म तेही खरंच म्हणा. काय माहिती एखादी "कोकणी" आवृत्ती कुणी तयार करेलही याची.
मात्र फिशकरीत आप्पे आणि मटण
मात्र फिशकरीत आप्पे आणि मटण रश्श्याबरोबर थालीपीठ चांगले लागेल का?
(गविंनी उद्युक्त केले असा विचार करायला ;))
फिशकरी आणि मटणकरी हे दोन्ही
फिशकरी आणि मटणकरी हे दोन्ही स्वतःमध्ये स्वादाचं वर्चस्व असलेले (फ्लेवर इंटेन्स) पदार्थ आहेत. त्यासोबत थालीपीठ हा दुसरा फ्लेवर इंटेन्स पदार्थ खाऊन दोन्हीची स्वतंत्र चव मारली जाईल. अशा मसालेदार रश्श्यासोबत त्याच्या स्वादाची थेट तीव्रता कमी करु शकणारा आणि मूळ स्वादात काही बदल न घडवणारा न्यूट्रल साथीदार (भाकरी, भात) हेच चांगले लागतील.
आप्पेसुद्धा बर्यापैकी मसाला / मिरची / स्वाद घालून बनवलेले असतात असं पाहिलं आहे. आप्प्यांचा इडलीइतका प्लेन प्रकार असेल तर तो मटण / चिकन रश्श्यासोबत चांगला लागेल.. लागेल कशाला, लागतोच.. तसा इडली / जाड डोसा / आप्पम आणि रस्सा असा बेत द. भारतात अनेक घरांत बनवतात आणि खातातही.
आप्पमची आठवण करून दिलीत, आता
आप्पमची आठवण करून दिलीत, आता हे खाणे आले.
अवांतरः आप्पम हा आप्प्यांचा प्रकार बहुतेककरून नव्हे.
आप्पम हा आप्प्यांचा प्रकार
आप्पम हा आप्प्यांचा प्रकार नक्कीच नव्हे..
अगदी.
आप्पे म्हणजे छोटे गोल गोळे.
आप्पम म्हणजे जाड जाळीदार घावनाचा अवतार.

आप्पम म्हणजे जाड जाळीदार घावनाचा अवतार.

अजून एक शंका. घावन म्हंजे
अजून एक शंका. घावन म्हंजे नीरडोसा, बरोबर? त्याच्या आणि आप्पमच्या पिठात फरक असतो भौतेककरून. नीरडोश्याचे पीठ आंबवत नाहीत बहुधा.
घावन निराळे आणि नीरदोसा
घावन निराळे आणि नीरदोसा निराळा. इफ आयाम नॉट राँग नीरदोशाचं पीठ नारळाच्या दूधात भिजवतात.
नारळाच्या दुधात? घरी मातु
नारळाच्या दुधात? घरी मातु:श्रींना एकदा करण्याची रिक्वेष्ट केली होती. दोश्याची चव अगदी हाटलातल्यागत झाली होती पण नारळाच्या दुधात कै घातले नव्हते. असो, पाहून सांगतो इकडेतिकडे.
एकच.
नीर दोसा आणि घावन हे दोन्ही प्रकार एकच आहेत असे मला वाटते.
नीर डोश्यात नारळाचे दूध वापरण्याची पद्धत आहे पण साध्या पाण्यात पीठ भिजवूनही नीर डोसा करतात. तसेच, तांदूळाचे पीठ भिजवून जसे नीर डोसे करतात तसेच तांदूळ रात्रभर भिजवून, सकाळी मिक्सरमध्ये फिरवून अगदी मुलायम पीठ बनवून पाणी घालून ही बनवितात.
घावन सुद्धा वरील प्रमाणेच दोन्ही प्रकारे करतात. मात्र घावन करताना नारळाचे दूध वापरल्याचे कधी ऐकले नाही.
ओह ओक्के. माहितीकरिता धन्यवाद
ओह ओक्के. माहितीकरिता धन्यवाद पेठकरकाका!
खरतर अप्पम बरोबर जी मटण रस्सा
खरतर अप्पम बरोबर जी मटण रस्सा वा चिकनची चव लागते ती अगदी अप्रतिम म्हणावी लागेल.
भात आणि तत्सम पदार्थ.
कुठल्याही मांसाहारी रश्याला तांदूळाचे पदार्थच न्याय देऊ शकतात. जसे, सधा भात, अप्पम, सेट किंवा दावणगीरी डोसा, आंबोळ्या, नीर डोसा इ.इ.इ.
आंध्र च्या
काही भागात जावई बापु साठी खास बेत असतो ...मटण चा दाट रस्सा रत्री करून ठेवतात आणि सकाळी तांदळाच्या गरम डोसे किंवा आप्पे करतात ..
आप्पे त्यात बुडवून खायला लै भारी लागता ...
चिकन्/मटणाचा शिळा रस्सा देतो
चिकन्/मटणाचा शिळा रस्सा देतो असा संशय आहे
अशी मिसळ कुठे देतात याच्या शोधात आहे
मीही!!! गेलाबाजार फिश करीसुद्धा चालेल असे वाटते.
ठिकाण सापडले..!!!
कर्वे रोड - यात्री हॉटेलजवळ चिकन मिसळ मिळाली. चिकन खीमा + फरसाण + रस्सा असा प्रकार होता. आवडला.
वा... तोंडाला पाणी सुटले आणि
वा... तोंडाला पाणी सुटले आणि तुझी लिहण्याची शैली पणा झकास!!! :)
तोंपासु अप्पी तै..
तोंपासु अप्पी तै..
लै भारी.. कोलापूरला घिऊन गेलातकी सक्काळ सक्काळी..


पाकृ आणि लिखाणासाठी __/\__ __
पाकृ आणि लिखाणासाठी __/\__ __/\__ __/\__ !
एक मस्त रेस्त्रॉ टाका, अश्याच नाट्यमय पद्ध्तीने सेवा द्यायची व्यवस्था करा. एक वेगळी गुर्मे प्लेस म्हणून टेरिफिक चालेल. पेप्राबिप्रात नक्की छापून येईल :)
त्रिवार सहमत,
त्रिवार सहमत,
अपर्नातई पण लोक खायला येतील का तुझ्या अशा रसाळ गप्पा ऐकायला?
दोन्हीचे कोम्बो अर्थातच लाजवाब :)
लै म्हणजे लै म्हणजे लैच भारी
मृणालिनी, अमोल, सविता, कोमल,
मृणालिनी, अमोल, सविता, कोमल, दत्ता काळे, अन इस्पिकचा राजा मनापासुन धन्यवाद.
सविता ००१ निषेधाची नोंद घेतली गेली आहे. ००७ यावर काम करतील. या क्षणी ते कटात बुडाले आहेत, वर आले की लग्गीच पाठवते.
ऑ !!! आमचं एक्क्यावरून राजावर
ऑ !!! आमचं एक्क्यावरून राजावर डिमोशन कां बरं ??? आम्ही चांगलाच प्रतिसाद लिहीला होता ;) :)
आयो! आवं लय माणसांची नाव
आयो! आवं लय माणसांची नाव घ्याया लागल्याने (ऑ? काय लिहीते आहे मी? देवा! वाचव!) जरा उपाधी बदलली. माफी असावी एक्का साहेब, उगा खेळी नका उलट्वु जी!
फिकर णॉट.... होतं कधीकधी असं.
फिकर णॉट.... होतं कधीकधी असं. थोडी गंमत केली होती इतकंच :)
आता 440 करंट ला भेट द्यावी
आता 440 करंट ला भेट द्यावी लागणार.
ताई उपवासाच्या दिवशी नका हो अश्या रेशीपी टाकत जाऊ.
वा वा सुन्दर ... वीकांताला
वा वा सुन्दर ... वीकांताला करुनच बघते...
तर्रिबाज....
मिसळिच्या कटासारखेच झणझणीत लेखन.....नुसतं वाचुनच भुक चाळवली. ओ मॅडम एक विनंती आहे....ह्या पुढे तु नुसती पाकॄ/फोटो तरी टाक किंवा नुसतं रसाळ्/ओघवतं लिखाण तरी कर.....हे असलं वाचुन वर जळवणारे फोटो पहायचे म्हणजे ये सरासर नाईन्साफि है|
@ मग कटापर्यंत पोचले तेव्हा
@ मग कटापर्यंत पोचले तेव्हा आत्मा अमर आहे याची खात्री पटली >>> =))
......................
......................तुंम्ही कित्तिही काहिही
=)) तुंम्ही कित्तिही काहिही म्हणलात,,,तरी...
मी
अ मर आहे...च्च! =))व्वा काय कटकट.....
काय योगायोग आहे पाहा. आजच मुंबईचा 'उसळ-पाव' करण्याचा बेत आहे. आणि त्यात कट-वडाची पाकृ आली. उसळपाव आणि कटवड्याची पाककृती अगदी सख्खी भावंडं वाटतात.
कटवड्याच्या कटाचा कट करण्यात येईलच.
कालरात्री सोडा घालून पांढरे
कालरात्री सोडा घालून पांढरे वाटाणे भिजवले होते. आज स़काळी कुकरला २(च) शिट्या घेऊन शिजवले पण तरीही अतिशिजले. कांहीचे पीठ झाले त्यामुळे उसळ फसली.
पुढच्या खेपेस जास्त काळजी घेऊन शिजविन आणि मिपावर पाकृ टाकेन.
चूक झाली.
सोडा का घालायचा?गरज नाही. वाटाणे नीट शिजणार नाहीत ह्या अनाठायी भिती पोटी सोडा घातला होता. पण अनुभवातून शहाणपण आले आहे. असो. तुमच्या कोल्हापुरातला हाच झणझणीत कट-वडा आमच्या मुंबईत माझ्या लहानपणी (साठच्या दशकात) मिळायचा. अनेकदा खाल्ला आहे. सध्याची परिस्थिती माहीत नाही.
कट कट करत असते ही ताईटली
कट कट करत असते ही ताईटली नेहमी!, :) :)
पहिल्या रांगेतल्या दुसर्या फोटो मधली माझी प्लेट आवडली... =))
अगदी तोंपासू
कट वडा खावा तर खासबागच्या मागे !
सांगली कोल्लापूर ला गोल वडा मिळतो त्याचे कव्हर जाड असते... तसाच वडा खायला मज्जा येते ..
>>आवरणाच्या साहित्यात पाणी मिसळुन भजीच्या पिठासारखे घट्टसर भिजवा.
अपर्णाताय.. परफेक्ट जमलाय बघा!!
ख प लो ! !
या विकन्ताला करुन पहाणे आले. त्या शिवाय जळजळ कमी होणार नाही.
गणपाभाउ, रोहीणी,श्रुती,
गणपाभाउ, रोहीणी,श्रुती, झकासराव,दिपक.कुवेत,त्रीवेणी, अन नित्य नूतन, निमिष ध धन्यवाद.
कपिलमुनी, अन इष्टुर फाकडा अनेक धन्यवाद.
कपिलमुनी तुम्ही आपल्या कोल्हापुरचे? :)
आनंदिता..आता तू तर येत नाहीस मग प्लेट ठेवुन काय करु? म्हणुन वापरली.
त्यातच चार वडे पण तळा
त्यातच चार वडे पण तळा मीनलाक्का!
येकदम नादखुळा होउन जाइल घर तुमच.
हायला..
हायला कहर आहे..
अपर्णाबेन मिसळपुराण थांबवा आणि कटवडा करा असं कंठशोष करुन सांगतेय तरी पुन्हा तेच 'मिसळपाव करेन'.. वडे नाही केलेत तर शेजारणीला सांगा.. म्हणजे तुमचा कट आणि तिचा वडा :))
अपर्णातै, लयीच जळवणूक.. पुण्यात कुठेशी मिळेल बर! सँपल वडा मला तरी अगदीच पिचकावणि वाटतो मजबूत कट आणि त्यात मुसमुसलेला वडा असं पाहिजे :) बरं ह्या पाकृ ला लागणारा एकंदर वेळ किती? त्यावरुन ठरवण्यात येईल की स्वतः करायचं की आउटसोर्स ते ;)
झक्कास.................मलाही
झक्कास.................मलाही कटाची कॄती हवी होती...आता करुन पहाते
वडे असलेला फोटो काय झकास आलाय
वडे असलेला फोटो काय झकास आलाय. तोंडाला पाणी सुटले अगदी.
कट वडा करून मोठा कटच केला आम्हा भुकेलेल्यांवर.
आहो कसले कट शिजवता
सकाळी ह्या निर्जन वस्तित (ज्यास IT PARK हिन्जवडी असे म्हणतात) हे असे कट बघीतले कि पोटाल खड्डा पडतो हो..:(
अपर्णाताई, मला दत्तक घे ना
अपर्णाताई, मला दत्तक घे ना थोडे दिवस! :D
मी तर वार लावुन जेवणार.
मी तर वार लावुन जेवणार.
अपर्णाताई, सानिकाताई, पेठकरकाका, गणपाभाऊ, जागुताई, खादाड अमिता (सोम ते शनि) आणि रविवार गविंसोबत हॉटेलिंग ;)
ओ नका ओ या पुण्या मुंबई
ओ नका ओ या पुण्या मुंबई वाल्यांना कोल्हापूरच्या पाककृती सांगू. नंतर त्यात दही बिही घालून पुणेरी कटवडा करून त्याचा अपमान करतात! वर कटवड्याची किंमत पण वाढवून त्याला उगीचच महाग करून ठेवतात. या दुर्दैवी जीवांना बसू दे उसळपाव (मुंबईवाले) आणि तो लेचा पेचा वडापाव (पुणेवाले) खात.
बादवे, कटवडा हा ब्रेडबरोबर (तोही लादीपावाला कापून बनवलेल्या) खायचा विषय आहे, पावाबरोबर नव्हे. निषेध!
अगदी! अगदी!!
बादवे, कटवडा हा ब्रेडबरोबर (तोही लादीपावाला कापून बनवलेल्या) खायचा विषय आहे, पावाबरोबर नव्हे. निषेध!तो सकाळी सकाळी भाजलेला जरा वाकडा तिकडा पण भारी मउ लुसलुशीत पाव म्हणजे काय सांगु? तो कापायला त्या बेकरीवाल्याची पातळ सुरी. आहाहा! अगदी साताला ब्रेड भाजल्याचा वास दरवळायच, बरोबर बिस्किट (आता कुकीज). चवी हरवल्या राव!
अगदी! पाव म्हणजे तोच. खेमराज
अगदी! पाव म्हणजे तोच. खेमराज जवळ सकाळी ब्रेड भाजल्याचा वास बी.टी. कॉलेजपर्यंत पसरलेला असायचा. विद्यापीठाच्या जवळ असलेला शामचा वडा आणि कटवडा लऽऽऽय भारी! तसाच राजारामपुरी १०व्या गल्लीतल्या गणेशचा!
एकदम भारी आठवणी आहेत तिथल्या, बागल चौकातल्या, राजारामपुरीतल्या.
कोल्हापुरी जगात भारी गं ताई!
जगात भारी कोल्हापुरी
क्या बात है शिवोऽहम्! कॉलेजच्या आठवणी जाग्या झाल्या. शिवाजी विद्यापीठात आमच्या बॅडमिंटनच्या स्पर्धा असायच्या. मॅच आम्ही जिंको अथवा हरो शामचा वडा खाल्याशिवाय जायचा नाही असा आमचा नियम(च) होता. शामच्या वडा इतकाच मंगळवार पेठेतला अनेगाबी लई भारी.