******************
वाटले की शेवटी होकार झाला -
का विचारे मी पुन्हा इन्कार झाला?
***
जो कवी आनंद होता वांझ होता
घात होता तो बघा फनकार झाला!
***
ज्या जिवाला देत दाणा वाढवे मी
तो जिवाणू होय! हा फुत्कार झाला.
***
काल रात्री काजव्याला देखिले ज्या
काळरात्री तो जणू अंगार झाला.
***
धुंद गंधाने फुला ज्या अंतरीले
त्यात भुंगा अंतरी स्वीकार झाला.
***
होत गेला हो जयाला पारखा जो
होउनी आराध्य तो साकार झाला.
******************
-धनंजय (सप्टेंबर १५, २००८)Taxonomy upgrade extras
वाचने
5368
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
सुंदर..
गझल
वा !!!
कविता /गझल..
आयला
होत गेला
सुरुवातीची गझल
मस्त गझल..
+ -
रसग्रहण
:)
In reply to रसग्रहण by धनंजय
सर्वांना धन्यवाद
फूल-भुंगा
In reply to सर्वांना धन्यवाद by धनंजय
ये हुई ना बात!
In reply to सर्वांना धन्यवाद by धनंजय
उत्तम्!!!
प्रतिक्रिया
धन्याशेठ!
परीक्षानळ
In reply to धन्याशेठ! by चतुरंग
सुरेख गझलेचा जन्म लवकरच होईल.