शत'शब्द शोधिताना...!
काव्यरस
शतशब्द कथा
हा प्रकार सध्या वेगात प्रचलीत होत आहे.मी ही प्रयत्न करायला गेलो.पण छ्छे! मग माझं मन म्हणालं मला--आत्मू..तुझा प्रांत नाही रे हा.आपला वकूब ओळख मेल्या! पण तरिही ते ऐकेल तर माझं मन कसलं? सलग दोन रात्री मेंदूबरोबर हुतुतू खेळून सुद्धा,हाती काही लागलं नाही.मग मन म्हणालं,तू सावरकरनिष्ठ ना? मग त्यांचे काव्य वाच,स्फूर्ती येइल.अरे अगीचे भस्म आणी राखेचाही अंगार करणारा माणूस तो! त्याच्या शब्द स्पर्शाने तुझा मेंदू चेतणार नाही काय? आणी खरच मेंदू चेतला,पण कुठे? तर काव्याच्याच प्रांतात."कथा" या प्रांतातली "गती" दाखवून,एक खराखुरा "मोक्ष" दिला त्या स्पर्शानी मला!
========================================================
शत'शब्द शोधिताना
शत रात्री व्यर्थ गेल्या
कथिता तुला व्यथा ही
त्या रात्री धन्य झाल्या!
खर्ची पडे वह्यांची
एक थप्पी एका पाठी
कशी साधना तुझी ही
हातात अंती "वाटी"
हाय हाय..जमे न काही
ठेव पाने तू मिटोनी
प्रतिभा नभातं गेली
घरट्यातूनी उडोनी!
वाचने
6591
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
शत जन्म शोधिताना | शत आर्ति व्यर्थ झाल्या |
शत सूर्य मालिकांच्या | दीपावली विझाल्या ||
तेव्हा पडे प्रियासी | क्षण एक आज गाठी |
सुख साधना युगांची | सिद्धीस अंती गाठी ||
हा हाय जो न जाई | मिठी घालु मी उठोनी |
क्षण तो क्षणात गेला | सखी हातचा सुटोनी ||
कवी: स्वातंत्र्यवीर सावरकर
In reply to शत जन्म शोधिताना | शत आर्ति by मदनबाण
हायला... मूळ काव्य "सांगायचं" र्हायलं :( माफी असावी हो! :)
In reply to शत जन्म शोधिताना | शत आर्ति by मदनबाण
वाचता वाचताच वसंतखाँच्या आवाजात ह्या ओळी ऐकू यायला लागल्या राव. :)
ठ्यांक्यु मदनवा :)
ह्या धाग्यातली मेख ओळखणार्याला माझ्याकडून येक बक्षिस.. ;)
वळखा..वळखा..बरं!!! :)
In reply to ह्या धाग्यातली मेख ओळखणार् by अत्रुप्त आत्मा
तुमचा "शत शब्द अनुभव" आवडला बर्का! काव्य झक्कास! या निमित्ताने एका सुंदर गीताची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद! एवढे बोलून मी माझे २४ शब्द संपवते.
In reply to :) by पैसा
या निमित्ताने एका सुंदर गीताची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!
In reply to ह्या धाग्यातली मेख ओळखणार् by अत्रुप्त आत्मा
" शतशब्द अनुभव".. ;-)
In reply to पैसातईंशी बाडीस ! by चिगो
दोन..! ;)
मला तर बुवा एक ओळ पटकन सुचली.
शत लुब्ध शीधताना
फिल्डिंग व्यर्थ गेल्या
शत लेख काव्य माला
किती त्वदर्थ लिहिल्या
हाय हाय करू मी काय
ही सांज गे उदास
चिती चितारलेल्या
स्माईली उडून गेल्या
In reply to मला तर by चौकटराजा
_/\_
In reply to मला तर by चौकटराजा
छान प्रयत्न आहे ! जागलेल्या रात्रींचे चीज झाले !
चिती चितारलेल्या
स्माईली उडून गेल्या हे मात्र आत्माबुवांना चपखल लागू आहे ! +DIn reply to छान प्रयत्न आहे ! जागलेल्या by डॉ सुहास म्हात्रे
हे मात्र आत्माबुवांना चपखल लागू आहे!
+११११११
In reply to छान प्रयत्न आहे ! जागलेल्या by डॉ सुहास म्हात्रे
हेच म्हण्णार होतो, एकदम चपखल =))
In reply to हेच म्हण्णार होतो, एकदम चपखल by बॅटमॅन
हम्म
लै जणांच्या रात्र रात्र जागलेल्या अन चितार्लेल्या स्मायल्या उडून जातेत. फ़क्त गुरजी बिनधास्त कबूल करतेत.;-)
गुरजी तुस्सी ग्रेट हो.
In reply to हम्म by अभ्या..
लै जणांच्या रात्र रात्र जागलेल्या अन चितार्लेल्या स्मायल्या उडून जातेत.हा हा हा =))
फ़क्त गुरजी बिनधास्त कबूल करतेत.अगदी अगदी.
शतशब्दकाव्य आहे की काय असं वाटलं आधी :-)
यस्स! आत्मुस तुस्सी ग्रेट हो।
वाचकांना एक विनंती- हे सावरकरांच्या काव्याचे विडंबन नाही. फक्त रचनेचे आधारभूत प्रतीरूप आहे. :)
In reply to वाचकांना एक विनंती- हे by अत्रुप्त आत्मा
विडंबनात मूळ काव्याची चेष्टा नसतेच. खरे तर त्याचा फॉर्म विडबन कर्त्याने स्वीकारला यात मूळ काव्याचा सन्मानच होतो.
प्रयोग आवडला रे...
सर्वांचे आभार..! :)
अपितु सहजीचि म्हणोनी धागा उघडुनि पाहो तो आपुली काव्यशलाका आमुचिये मनास स्पर्शून गेली असे ऐसे लिहावयासि मात्र मिपामाजी आज प्रवेशकर्ता झालो आहो.
शत जन्म शोधिताना | शत आर्ति