आरोग्य पंचविशी --
प्रस्तावना --हि एक आरोग्य विषयक लेख मला लिहायचे माझ्या मनात होते त्याला सुरुवात करीत आहे त्यातील हा पहिला लेख. यातील साहित्य हे बरेचसे श्रुती, स्मृती, ग्रंथोक्त आहे.बरेचसे लिखाण हे माझ्या वाचन, विचार किंवा चिंतनातील आहे आणी त्यामागे अभ्यासलेल्या वैद्यकीय ज्ञानाचा भाग आहे यामध्ये कोणतीही चूक आढळल्यास (किंवा काही नवीन संशोधन) कृपया निदर्शनास आणावी( संदर्भासहित) म्हणजे त्यात सुधारणा करण्यात येईल. वैयक्तिक मतभेद जरूर लिहावेत.
यात कोणतीही संगती नाही जसे सुचेल तसे लिहित आहे( जात्यावर बसल्यावर ओवी सुचते असे म्हणतात तसा एक प्रयत्न आहे.
आरोग्य पंचविशी-१
"बाहेरील खाणे अनारोग्यकारक का असते?"
आपण बाहेर वडा पाव खातो त्यात आणी घरी केलेल्या वड्यात काय फरक आहे ?
बाहेर वडा तळतात तेंव्हा त्याचे तेल हे काळ्या रंगाचे दिसते कारण ते तेल गरम केले जाते पंधरा वीस वडे तळ्ल्यावर परत गैस बंद केला जातो आणी पुढच्या घाण्य़ासाठी गैस परत चालू केला जातो या प्रक्रियेत ते तेल जाळले जाते आणी काळे होते. शिवाय त्यात असलेली अ, ड, इ आणी क हि चरबीत विरघळणारी जीवनसत्त्वे जळून नाहीशी होतात त्यामुळे त्या तेलाची पौष्टिकता कमी होते. यातील अ आणी इ हि जीवन सत्त्वे त्वचेसाठी आवश्यक असतात. ड जीवनसत्त्व आपल्या हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक आहे आणी क जीवनसत्त्व आपल्या रक्तासाठी.तरुण मुलामुलींच्या हे ध्यानात आणून देणे आवश्यक आहे कि बाहेरचे पदार्थ फार खाल्ले तर त्वचा खराब का होते आणी मुरुमे आणी तारुण्य पिटीका का येतात
वारंवार बाहेर खाल्यामुळे( कोणताही तळलेला पदार्थ) आपल्या शरीराला चरबी मिळते पण जीवनसत्त्वे मिळत नाहीत. बाहेर वापरलेल्या तेलाच्या गुणवत्तेबद्दल न बोलणेच बरे.
घरी जेंव्हा आपण वडे तळतो ते चांगल्याच तेलात तळले जातात परत आपली आई/ बायको ते तेल जरुरीपुरतेच घेते. एकदा दोनदा च वापरून उरलेले तेल भाजीत किंवा फोडणीत वापरुन टाकले जाते त्यामुळे आपल्या घरात काळे झालेले तेल आपल्याला दिसत नाही.
घरच्या वडा पावला/ भज्यांना बाहेरची चव येत नाही - घरी आपण जर प्रत्येकी एकच वडा केला आणी तीन तर्हेच्या चटण्या आणी कांदा घालून पावाबरोबर भूक लागलेली असताना खाल्ला तर तो कितीतरी रुचकर आणी चविष्ट लागेल. पण घरी पदार्थ बर्याच जास्त प्रमाणावर केला जातो आणी मग अतिपरिचयात अवज्ञा प्रंमाणे किंवा तीन तीन चटण्या कोण करणार या विचाराने त्याला बाहेरची चव येत नाही.वडा पाव ची आणी लसुणीची चटणी विकतपण मिळते
(घरी बर्गर केला तरी मी त्याबरोबर चिप्स आणी शीतपेय सुद्धा आणतो आणी पाहुण्यांना वापरण्याच्या डिश मध्ये "सर्व्ह"करून घेतो. शेवटी आपणच आपले लाड करावेत केवळ पाहुण्यांसाठीच का ?
आपण कधी हा विचार केला आहे का कि "बाहेरून पार्सल करून आणलेल्या भाज्यावर तेलाचा/ बटरचा एक मोठा थर असतो" पण घरची भाजी फ्रीज मध्ये ठेवली तर त्यावर तसा थर दिसत नाही?
आपली आई/ बायको जेंव्हा भाजी परतते तेंव्हा चमचा दोन चमचे( जितके आवश्यक आहे तितकेच) तेल घालून भाज्या त्यात परतून घेते. भाजी परतेपर्यंत ती सारखी हलवत असते.
पण हॉटेल च्या आचार्याला वेळ नसतो तो प्रथम काढीत तेल ओततो मग त्यात चिरलेल्या भाज्या टाकतो आणी थोड्या थोड्या वेळाने ते हलवतो. मधल्या काळात तो इतर काही कापणे चिरणे हि आपली कामे उरकत असतो. त्याला हे माहिती असते कि दोन चमचे तेल टाकले तर भाजी खाली जळण्याची शक्यता आहे तेंव्हा भरपूर तेल टाका. भाजी परतण्याच्या ऐवजी तळली जाते. तेल हॉटेल मालकाचे असते आणी अंगावर तुमच्या चढते त्याच्या बापाचे काय जाते? (हाच प्रकार स्वयंपाकाच्या बाईच्या बाबतीत बर्याच अंशाने दिसतो).
"मुळात आपल्याला तळलेले पदार्थ का आवडतात?"
हा प्रश्न आपल्या उत्क्रांतीशी निगडीत आहे. आदिमानवाच्या काळात अन्नाची सुबत्ता नव्हती. तेंव्हा त्याला दिवसे न दिवस शिकार मिळत नसे तेंव्हा त्याला शरीरात साठवलेल्या चरबी वर अवलंबून रहावे लागे. उत्क्रांती मध्ये माणूस हे शिकला कि चरबीयुक्त किंवा प्रथिनयुक्त पदार्थ हे आपल्याला अशा काळात तारून नेतात त्यामुळे हे त्याच्या DNA स्मृतीवर कोरले गेले आणी ते आपल्याला वारसा हक्काने मिळालेले आहे. आपल्याला सर्वात जास्त आवडणाऱ्या पदार्थात तळलेले पदार्थ किंवा दुधाच्या मलई युक्त मिठाया आणी मांसाहारी पदार्थ येतात. अगदी लहान मुलाला सुद्धा बटर/ लोणी आवडते.
याच उत्क्रांती मध्ये मिळवलेल्या स्मृती मुळे आपल्याला दुधाची खमंग मिठाई(कलाकंद कुंदा, कंदी पेढे इ ) किंवा तंदूर मध्ये भाजलेले पदार्थ ( चिकन/ पनीर तंदुरी) आवडतात. आदिमानवाला एक लक्षात आले कि पदार्थ भाजले कि ते पचायला हलके होतात त्यातील जंतू आणी विष नष्ट होतात शिवाय त्यातील पाण्याचा अंश कमी होऊन ते जास्त संतृप्त(CONCENTRATED) होतात.त्यामुळे एका वेळी जास्त घन द्रव्य पोटात जाते हीच स्मृती तुमच्या आमच्या DNA वर कोरली गेली आहे. म्हणून दुधाची खमंग मिठाई इत्यादी बरोबरच भाजलेला कांदा वांगे ई भाज्या सुद्धा आपल्याला आवडतात.
तेंव्हा आपण जरी कितीही सुविकसित किंवा अत्याधुनिक असल्याचा दावा केला तरी अजून आपली आदिमानवाशी नाळ जोडलेलीच आहे.
वाचने
18822
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
>
खायचा सोडा म्हणजे सोडियम बाय
In reply to > by प्रकाश घाटपांडे
मुळात आपल्याला तळलेले पदार्थ
+१ हेच लिहायला आलो होतो!
In reply to मुळात आपल्याला तळलेले पदार्थ by स्पा
+१
In reply to +१ हेच लिहायला आलो होतो! by आदूबाळ
आदिमानवाइतके शारीरिक कष्ट
In reply to +१ हेच लिहायला आलो होतो! by आदूबाळ
नाही ना. पण काय, शेवटी डीएने
In reply to आदिमानवाइतके शारीरिक कष्ट by विश्वनाथ मेहेंदळे
NO SITUATION IN LIFE IS SO
In reply to नाही ना. पण काय, शेवटी डीएने by आदूबाळ
(No subject)
In reply to +१ हेच लिहायला आलो होतो! by आदूबाळ
+११११११११११११११११११११११११११,
In reply to मुळात आपल्याला तळलेले पदार्थ by स्पा
ही लेखमाला खात्रीने रोचक
पण काही पदार्थ न तळताच..
तरुण मुलामुलींच्या हे ध्यानात
गैरसमज.
अत्यंत माहितीपूर्ण प्रतिसाद.
In reply to गैरसमज. by प्रभाकर पेठकर
अंशतः खरं...
In reply to अत्यंत माहितीपूर्ण प्रतिसाद. by राजेश घासकडवी
पेठकर साहेब,
In reply to गैरसमज. by प्रभाकर पेठकर
वस्तुस्थिती.
In reply to पेठकर साहेब, by सुबोध खरे
या व्यवसायातले
In reply to वस्तुस्थिती. by प्रभाकर पेठकर
आवश्यक आणि उपयुक्त विषय. हा
माहितीपूर्ण लेख
आरोग्यपुर्ण खाणे व चविष्ट
एका प्रकारचे मीठ
In reply to आरोग्यपुर्ण खाणे व चविष्ट by प्रकाश घाटपांडे
आणि ते एक कार्सिनोजेन (कॅन्सर
In reply to एका प्रकारचे मीठ by पैसा
एम एस जी किंवा मोनो सोडियम
In reply to आणि ते एक कार्सिनोजेन (कॅन्सर by आदूबाळ
ऐला! असं असतं होय!
In reply to एम एस जी किंवा मोनो सोडियम by सुबोध खरे
काही मानवसमूह..(एक पृच्छा)
असिड मध्ये तळलेला वडापाव.
डॉक्टरसाहेब लेख आवडला. पटला.
पर्यायी शब्द
In reply to डॉक्टरसाहेब लेख आवडला. पटला. by नरेंद्र गोळे
प्रसन्ना, हो. बरोबर आहे.
In reply to पर्यायी शब्द by प्रास
प्रसन्न?
In reply to प्रसन्ना, हो. बरोबर आहे. by नरेंद्र गोळे
दिलगीर आहे!
In reply to प्रसन्न? by प्रास
हरकत नाही. कारण प्रासभाऊ
In reply to दिलगीर आहे! by नरेंद्र गोळे
बरोबर
In reply to डॉक्टरसाहेब लेख आवडला. पटला. by नरेंद्र गोळे
वापरात नसलेला शब्द क्वचित निराळ्या अर्थाने वापरला जाऊ शकतो
In reply to बरोबर by सुबोध खरे
पुभाप्र.
लेख आवडला.
छान विषय!!
लेख आणि प्रतिसाद आवडले
महत्वाच्या विषयावर लेखमालिका.
अत्यंत उपयुक्त माहिती........
लेख आणि प्रतिसाद
मूळ लेख आणि पेठकरकाकांचे
माहितीपूर्ण लेख.. पुभाप्र!
अवांतर कुतूहल