विरंगुळा
लेखनविषय:
काव्यरस
नाते नाही मीच एकला
श्वासांमधुनी नाद ऐकला
कान्हा कान्हा बोले राधा
तूच आसरा तू विरंगुळा
कोषामधले उमलू पाहे
गंध आतला दाटुन आला
भेद तरी पण इथला तिथला
तूच आसरा यू विरंगुळा
मंद कशी ही झाली मेधा
अंध मती पथभर मन बाधा
न कळे कोणी का लपलेला
तूच आसरा तू विरंगुळा
........................अज्ञात
वाचने
1909
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
कोषामधले उमलू पाहे गंध आतला दाटुन आला भेद तरी पण इथला तिथला तूच आसरा तू विरंगुळाहे खासचं!!
In reply to सुंदर by मिसळलेला काव्यप्रेमी
मनःपूर्वक आभार :)

In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
धन्यवाद :)
खुप छान..!
छानच आहे विरंगुळा .
सुंदर