Skip to main content

विरंगुळा

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 24/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
नाते नाही मीच एकला श्वासांमधुनी नाद ऐकला कान्हा कान्हा बोले राधा तूच आसरा तू विरंगुळा कोषामधले उमलू पाहे गंध आतला दाटुन आला भेद तरी पण इथला तिथला तूच आसरा यू विरंगुळा मंद कशी ही झाली मेधा अंध मती पथभर मन बाधा न कळे कोणी का लपलेला तूच आसरा तू विरंगुळा ........................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1909
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

कोषामधले उमलू पाहे गंध आतला दाटुन आला भेद तरी पण इथला तिथला तूच आसरा तू विरंगुळा
हे खासचं!!