मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काळा-गोरा

सार्थबोध · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काळा-गोरा गोऱ्या रंगाचे फार कौतुक; काळा रंग तितकासा कधी कुणाला आवडत नाही, या आवड-निवडीला कंटाळून; वैतागून काळा रंग गोऱ्या रंगाला काय म्हणतो ....... नाही कसला फरक देवाला, कसले काळे-गोरे जरा हटकूनच वागतो रंग गोरा, हे नाही बरे!!! ll १ ll आकाशात चमचम रात्री, शोभती अनेक तारे झालर पाठीमागे काळी, म्हणून सगळे तोरे ll २ ll आभाळात चांदोमामा, झळकतो किती छान काळे दोन डाग जणू, शोभती ससुल्याचे कान ll ३ ll कसे आकाश निळे, पसरले अनंत अथांग नसेल मेघ काळा तर, दिसेल कसे सांग? ll ४ ll दिवसभर प्रकाशात सारे, राबत जग असते निजायला मस्त-शांत, काळी रात्रच हवी असते ll ५ ll स्वाद छान तांदूळ पांढरा, हवा सगळ्यांना असतो परी काळ्या मातीमध्ये, अंकुर त्याचा रुजतो ll ६ ll शुभ्र-निळे कोणाचे डोळे, रूपडे सुंदर असते जपायाला शोभायाला, परी हवे काजळ असते ll ७ ll दु:ख होता कोणी कधी, चालत एकटेच असते नसेल सोबत तरी सावली, साथ सोडत नसते ll ८ ll गोरा रंगच फक्त छान, हा समज आहे भोळा जीवाचा राम-श्याम, अन् माझा विठ्ठल सावळा ll ९ ll नको दाखवू गोऱ्या रंगा, फुशारकी मला तुझी तीट लावून माझीच मग, दृष्ट काढतात तुझी ll १० ll - सार्थबोध

वाचने 2441 वाचनखूण प्रतिक्रिया 7

चौकटराजा Tue, 08/06/2013 - 10:17
अतिगोरा वा अति़काळा दोन्ही रंगाची कातडी बरोबर दिसत नाही. हे झाले कातडीचे पण काळा व पांढरा याना एकमेकाशिवाय शोभा नाही हे त्रिवार सत्य आहे. बरीचशी उदाहरणे पटण्यासारखी आहेत. शेवटच्या ओळीत तीट असा शब्द हवा राव ! बाकी आणखी येउ द्या !

In reply to by चौकटराजा

मदनबाण Tue, 08/06/2013 - 10:58
मस्त कविता ! :) काळे दोन डाग जणू, शोभती ससुल्याचे कान हे वाचुन मात्र मला गब्दुल गालाच्या ससुल्या आठवल्या... ;) सतत तोबरा भरुन कुरु कुरु चरण चालु असत ! पुष्ट असण्या मागच हेचं खरं कारण असावं काय ? ;) शेवटच्या ओळीत तीट असा शब्द हवा राव ! बाकी आणखी येउ द्या ! चौकट रावांशी प्रचंड सहमत ! हो मग ! उगाच गैरसमज नको ! ;)

सार्थबोध Tue, 08/06/2013 - 11:34
टीट बद्दल मनापासून दिलगिरी … लिखाण चूक लक्षात आणून दिलेबद्दल आणि आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे… इथे दुरुस्ती करता येईल का? असल्यास कशी करावी?

आदूबाळ Tue, 08/06/2013 - 12:01
रात्र काळी,घागर काळी,यमुना जळे ती काळी हो माय || बुंथ काळी,बिलवर काळे, गळामोती एकावळी काळी हो माय || मी काळी, कांचोळी काळी, कांसे कांसिली ती काळी हो माय|| एकली पाणीया नच जाय साजणी, सवे पाठवा मूर्ती सावळी हो माय || विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी, कृष्ण्मूर्ति बहु काळी हो माय ||
शरद काकांचा हा धागा पहा.

In reply to by आदूबाळ

चौकटराजा Tue, 08/06/2013 - 16:20
हे माझं फार आवडतं गीत आपण इथे दिले आहे. मी बर्‍याच वेळा हे गीत सकाळ सकाळी की बोर्डवर वाजवितो.बहुदा याच्या जोडीनेच " काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती " हे गीत ही वाजवले जाते.

In reply to by आदूबाळ

चौकटराजा Tue, 08/06/2013 - 16:21
हे माझं फार आवडतं गीत आपण इथे दिले आहे. मी बर्‍याच वेळा हे गीत सकाळ सकाळी की बोर्डवर वाजवितो.बहुदा याच्या जोडीनेच " काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती " हे गीत ही वाजवले जाते.