नमस्कार लोक्स,
मागच्या आठवड्यातील माझ्या रेसिपी तुम्हाला आवडल्याचा तुम्ही अभिप्राय दिलात, त्यामुळे मला खूप आनंद झाला. (आणि परत एक पाकृ ईथे टाकावी असे वाटले.)
कटरले ही तशी डोंगरात उगवणारी भाजी आहे आणि माझ्या आवडीची सुद्धा.
पण पुण्यात मला ही भाजी क्वचित दिसली, या वर्षीही ईथे पुण्यात शोधली पण नाही मिळाली. म्हणुन आईकडून जळगावहून ट्रॅवल मार्फत मागवुन घेतली.
तर मंड्ळी या जेवायला.
साहित्य-
कटरले- ½ किलो,
हरबर्याची डाळ- भिजवुन ½ वाटी,
लसूण चटणी- 3 चमचे,
हळद- ½ टे. स्पुन,
जिरे- ½ टे. स्पुन,
मोहरी- ½ टे. स्पुन,
तेल- आपल्या डायटनुसार(पण या भाजीला तेल जरा जास्तच लागते)
कृती-
कटरले आधी 1 तास तरी पाण्यात घालून ठेवायचे, कारण यातल्या बारीक काट्यामध्ये माती असते ती सगळी निघायला मदत होते.
आता कटरले बारीक चिरून घ्यावेत, जर आत मध्ये लाल निघाले तर टते टाकून द्यावे, त्याची चव थोडी कडसर लागते.
थोड्या जास्त तेलाची फोडणी करून त्यात जिरं, मोहरी टाकावी.
मोहरी तडतडली की त्यात हळद, लसूण चटणी टाकावी.
कटरले टाकून 5 मिनिट एक वाफ येऊ द्यावी.
आता त्यात भिजवलेली हरबरा डाळ टाकावी.
भाजीच्या कढईवर बसेल अश्या मापाचे झाकण ताट किवा ताटली वापरावी आणि त्यात पाणी घालावे. म्हणजे त्या ताट किवा ताटलीतील पाण्याच्या वाफेवर भाजी छान शिजेल.
भाजी शिजायला 20-25 मिनिटे लागतात.
भाजी शिजत आल्यावर त्यात मीठ टाकावे. झाली भाजी तयार.

वाचने
12076
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
कटरले की करटोली?
नक्की माहित नाही,
आमच्यात कर्टुले म्हणतात.
पहिल्यांदाच ऐकल बुवा ह्या
In reply to आमच्यात कर्टुले म्हणतात. by अभ्या..
चांगली पाकृ.
रानभाजीमद्ये सर्वात महाग भाजी
नाही हो काका,
गंमत.
In reply to नाही हो काका, by त्रिवेणी
नाही हो काका खरच राग नाही आला
In reply to गंमत. by प्रभाकर पेठकर
चित्रे लेखनाच्या चौकटीतच व
In reply to नाही हो काका खरच राग नाही आला by त्रिवेणी
"...प्रथम चित्रांच्या लांबी
In reply to चित्रे लेखनाच्या चौकटीतच व by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद सर,
In reply to चित्रे लेखनाच्या चौकटीतच व by डॉ सुहास म्हात्रे
करटोली
मी एकदा हॉटेलात खाल्ली होती
ह्या भाजी ची चव नक्की कशी
नक्की सांगता नाही येणार, मी
हम्म...
@ वेल अआ बरोबर मी पण येतोच
In reply to हम्म... by दिपक.कुवेत
नक्की वाट पाहते.
मी पण येते गं भाजी खायला!
कधी येतेय ते सांग, वाट पाहते.
रानकारली
मी पहिल्यांदाच पहाते आहे ही
कधी खाल्ली नाही
नाही पैसा ताई कडवट नाही
सर्व वाचकांचे व
आम्ही ह्या भाजीला कंटोली