मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कटरले

त्रिवेणी · · पाककृती
नमस्कार लोक्स, मागच्या आठवड्यातील माझ्या रेसिपी तुम्हाला आवडल्याचा तुम्ही अभिप्राय दिलात, त्यामुळे मला खूप आनंद झाला. (आणि परत एक पाकृ ईथे टाकावी असे वाटले.) कटरले ही तशी डोंगरात उगवणारी भाजी आहे आणि माझ्या आवडीची सुद्धा. ithe ithe पण पुण्यात मला ही भाजी क्वचित दिसली, या वर्षीही ईथे पुण्यात शोधली पण नाही मिळाली. म्हणुन आईकडून जळगावहून ट्रॅवल मार्फत मागवुन घेतली. तर मंड्ळी या जेवायला. साहित्य- कटरले- ½ किलो, हरबर्‍याची डाळ- भिजवुन ½ वाटी, लसूण चटणी- 3 चमचे, हळद- ½ टे. स्पुन, जिरे- ½ टे. स्पुन, मोहरी- ½ टे. स्पुन, तेल- आपल्या डायटनुसार(पण या भाजीला तेल जरा जास्तच लागते) कृती- कटरले आधी 1 तास तरी पाण्यात घालून ठेवायचे, कारण यातल्या बारीक काट्यामध्ये माती असते ती सगळी निघायला मदत होते. आता कटरले बारीक चिरून घ्यावेत, जर आत मध्ये लाल निघाले तर टते टाकून द्यावे, त्याची चव थोडी कडसर लागते. ithe थोड्या जास्त तेलाची फोडणी करून त्यात जिरं, मोहरी टाकावी. मोहरी तडतडली की त्यात हळद, लसूण चटणी टाकावी. ithe कटरले टाकून 5 मिनिट एक वाफ येऊ द्यावी. ithe आता त्यात भिजवलेली हरबरा डाळ टाकावी. भाजीच्या कढईवर बसेल अश्या मापाचे झाकण ताट किवा ताटली वापरावी आणि त्यात पाणी घालावे. म्हणजे त्या ताट किवा ताटलीतील पाण्याच्या वाफेवर भाजी छान शिजेल. भाजी शिजायला 20-25 मिनिटे लागतात. भाजी शिजत आल्यावर त्यात मीठ टाकावे. झाली भाजी तयार. ithe ithe

वाचन 12074 प्रतिक्रिया 0