काही अठवणी...!
लेखनविषय:
काव्यरस
काही अठवणी...उन्हातल्या
काही अठवणी...पावसातल्या
काही नुसत्या...तालातल्या
काही गुलाबी...गालातल्या
काही आनंदी...सुखाच्या
काही त्रासिक...दु:खाच्या
काही केवळ..जनातल्या
कित्येकांच्या..मनातल्या!
काही..हसर्या मुलांच्या
काही..गळल्या फुलांच्या
देठांनाही सोडून गेल्या..
उमलणार्या कळ्यांच्या!
काही माझ्या गावाच्या
काहि..तर,नुसत्या नावाच्या
काही...दूरं देशांच्या
तळहातांवरिल..रेशांच्या!
काही..मंद वासांच्या
काही..धूंद श्वासांच्या
तिच्या माझ्या मिठितल्या
कूंद मोहक स्पर्शांच्या!!!
बेबंदिच्या अठवणी काही..
मुक्त मोकळ्या वाटांच्या
फुलांनिही बहरून यावे
अश्या गोजिर्या क्षणांच्या
अठवणींच्या प्रदेशा बा
घ्यावा अमुचा सलाम
मुक्त मोकळी श्वसने अमुची...
एरवी फक्त गुलाम...!
==============================
==============================
==============================
वाचने
4425
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
वाह बुवा.
बुवा - एक सुधारणा...
काही..मंद वासांच्या काही..धूंद श्वासांच्या तिच्या माझ्या मिठितल्या कूंद मोहक स्पर्शांच्या!!!काही..मंद वासांच्या काही.. बेधुंद श्वासांच्या तिच्या माझ्या मिठितल्या धुंद मोहक स्पर्शांच्या!!!In reply to बुवा - एक सुधारणा... by मोदक
तू म्हणतोस ते बरोबर,पण...
In reply to तू म्हणतोस ते बरोबर,पण... by अत्रुप्त आत्मा
तुम्ही शिनीयर शिटीझन आहात हे
कूंद मोहक स्पर्शांच्यामाझा आक्षेप कुंद या शब्दावर आहे. बाकी भावना पाहता हा शब्द अस्थानी आहे.In reply to तुम्ही शिनीयर शिटीझन आहात हे by मोदक
@(तुम्हीच म्हटलेले) >>>
In reply to @(तुम्हीच म्हटलेले) >>> by अत्रुप्त आत्मा
आन्ना..गपा आन्ना गपा.. :)
In reply to आन्ना..गपा आन्ना गपा.. :) by धमाल मुलगा
राजाधिराज...धमुराज..आपलेच
In reply to आन्ना..गपा आन्ना गपा.. :) by धमाल मुलगा
आन्ना..गपा आन्ना गपा..
In reply to आन्ना..गपा आन्ना गपा.. :) by धमाल मुलगा
कान टोचायचा ...
In reply to आन्ना..गपा आन्ना गपा.. :) by धमाल मुलगा
अशाच
In reply to अशाच by स्पा
बाकी शेवाळलेले, धुकट वातावरण
In reply to बाकी शेवाळलेले, धुकट वातावरण by प्रचेतस
असा अनुभव आहे.
In reply to असा अनुभव आहे. by स्पा
हा अनुभव सार्वत्रिक असतो.
आठवण झाली...
वाह!! एकदम अप्रतिम. बुवांच्या
कविता बेहद्द आवडली
वाह
In reply to वाह by स्पा
?
In reply to ? by कवितानागेश
कविता छानच >> कोण कविता..??
सुंदर... बस इतकेच !!!