काही अठवणी...!
लेखनविषय:
काव्यरस
काही अठवणी...उन्हातल्या
काही अठवणी...पावसातल्या
काही नुसत्या...तालातल्या
काही गुलाबी...गालातल्या
काही आनंदी...सुखाच्या
काही त्रासिक...दु:खाच्या
काही केवळ..जनातल्या
कित्येकांच्या..मनातल्या!
काही..हसर्या मुलांच्या
काही..गळल्या फुलांच्या
देठांनाही सोडून गेल्या..
उमलणार्या कळ्यांच्या!
काही माझ्या गावाच्या
काहि..तर,नुसत्या नावाच्या
काही...दूरं देशांच्या
तळहातांवरिल..रेशांच्या!
काही..मंद वासांच्या
काही..धूंद श्वासांच्या
तिच्या माझ्या मिठितल्या
कूंद मोहक स्पर्शांच्या!!!
बेबंदिच्या अठवणी काही..
मुक्त मोकळ्या वाटांच्या
फुलांनिही बहरून यावे
अश्या गोजिर्या क्षणांच्या
अठवणींच्या प्रदेशा बा
घ्यावा अमुचा सलाम
मुक्त मोकळी श्वसने अमुची...
एरवी फक्त गुलाम...!
==============================
==============================
==============================
वाचने
4426
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
वाह बुवा.
सुंदर आठवणी.
शेवटची दोन कड़वी बेहद्द आवडली.
बुवा - एक सुधारणा...
काही..मंद वासांच्या
काही..धूंद श्वासांच्या
तिच्या माझ्या मिठितल्या
कूंद मोहक स्पर्शांच्या!!!
काही..मंद वासांच्या
काही.. बेधुंद श्वासांच्या
तिच्या माझ्या मिठितल्या
धुंद मोहक स्पर्शांच्या!!!In reply to बुवा - एक सुधारणा... by मोदक
तू म्हणतोस ते बरोबर,पण...
अगदी सिरियसली सांगतो...
आपापल्या वयातला फरक पहाता... तुझा अँगल तुझ्यासाठी,आणी,माझा अँगल माझ्यासाठी ठीक आहे. :)
In reply to तू म्हणतोस ते बरोबर,पण... by अत्रुप्त आत्मा
तुम्ही शिनीयर शिटीझन आहात हे (तुम्हीच म्हटलेले) मान्य करूनही.. ;-)
कूंद मोहक स्पर्शांच्या
माझा आक्षेप कुंद या शब्दावर आहे. बाकी भावना पाहता हा शब्द अस्थानी आहे.In reply to तुम्ही शिनीयर शिटीझन आहात हे by मोदक
@(तुम्हीच म्हटलेले) >>> म्हणजे नै का? :p
@माझा आक्षेप कुंद या शब्दावर आहे. >>> असू द्या!!!
@बाकी भावना पाहता हा शब्द अस्थानी आहे.>>> ती भावना तुंम्हाला (तुमच्या सध्या असलेल्या वयात!) तशी दिसते आहे! म्हणून शब्द "अस्थानी" वाटतोय!
अता माझं पश्टिकरण बगा---
तिच्या माझ्या मिठितल्या
कूंद मोहक स्पर्शांच्या!!!>>>असा स्पर्श जेंव्हा वरवरचा वाटत असतो तेंव्हा तो सुखावणारी धुंदी देतो,पण जेंव्हा या स्पर्शातली खरी खोल ओढ कळते,तेंव्हा तो स्पर्श शरिरा इतकाच मनाच्या गाभ्याशी जाऊन भिडतो,अगदी खोल उतरतो...मुरतोही...म्हणूनच तो थंडीत दाट धुकं पडलेल्या वातावरणासारखा,उबदार/समजदार...म्हणजेच कूं....द भासतो! ... म्हणून मी वयातला(माफक असला,तरी महत्वाचा असा...
) फरक अधीच सांगितला होता...! त्यामुळे आमचा शब्द अस्थानी नसून बरोब्बर "अ"स्थानीच पडलेला आहे. :)
@बाकी भावना पाहता हा शब्द अस्थानी आहे.>>> ती भावना तुंम्हाला (तुमच्या सध्या असलेल्या वयात!) तशी दिसते आहे! म्हणून शब्द "अस्थानी" वाटतोय!
अता माझं पश्टिकरण बगा---
तिच्या माझ्या मिठितल्या
कूंद मोहक स्पर्शांच्या!!!>>>असा स्पर्श जेंव्हा वरवरचा वाटत असतो तेंव्हा तो सुखावणारी धुंदी देतो,पण जेंव्हा या स्पर्शातली खरी खोल ओढ कळते,तेंव्हा तो स्पर्श शरिरा इतकाच मनाच्या गाभ्याशी जाऊन भिडतो,अगदी खोल उतरतो...मुरतोही...म्हणूनच तो थंडीत दाट धुकं पडलेल्या वातावरणासारखा,उबदार/समजदार...म्हणजेच कूं....द भासतो! ... म्हणून मी वयातला(माफक असला,तरी महत्वाचा असा...
) फरक अधीच सांगितला होता...! त्यामुळे आमचा शब्द अस्थानी नसून बरोब्बर "अ"स्थानीच पडलेला आहे. :)In reply to @(तुम्हीच म्हटलेले) >>> by अत्रुप्त आत्मा
च्यायला! कुंद वातावरण थंडीत दाट धुकं पडल्यानंतरचं नसतंय. पाऊस पडणार,पडणार वाटतं पण पडत नाही तेव्हाचं दमटसं, ओलसरसं दाटून आलेलं वातावरण असतं त्ये कुंद वातावरण म्हणतात (असं मला वाटतं. )
- धमु खोत.
In reply to आन्ना..गपा आन्ना गपा.. :) by धमाल मुलगा
राजाधिराज...धमुराज..आपलेच बरोबर आहे... :) आमचा प्रतिक्रीया ल्याह्याच्या जोसात रूर्तु चुकलाच! :)
In reply to आन्ना..गपा आन्ना गपा.. :) by धमाल मुलगा
आन्ना..गपा आन्ना गपा.. :-))
In reply to आन्ना..गपा आन्ना गपा.. :) by धमाल मुलगा
धनराव , तुमच्याकडं कान टोचायचा चिमटा हाय काय ?
@ आअ कवितेचा फॉर्म व कन्टेन्ट दोन्ही आवडले. बुवा बेडशाच्या लेंण्यांपेक्षा गूढ आहात आपण ! कुठं कपाळावरील टिळ्याचा विचार तर कोठे गाल्यावरल्या तिळाचा विचार ! व्वा !
In reply to आन्ना..गपा आन्ना गपा.. :) by धमाल मुलगा
कुंद , शेवाळलेल्या वातावरणात .. धुकट वाटेवरून .. ओल्या रानातून ती अचानक समोर दिसते ...
आकाशातून थेंब थेंब हलकेच खाली येत असतात. निळा काळसर उजेड आस्ते आस्ते कमी होत असतो ..मधूनच वीज आकाशात घुमत असते
आणि रानातल्या पडळी समोरच्या गंजलेल्या फाटकात ती उभी असते, नुकताच कोसळू लागलेला पाउस अंगावर घेत ...
;)
In reply to अशाच by स्पा
बाकी शेवाळलेले, धुकट वातावरण जेव्हा असते तेव्हा विजा चमकत नाहीत असा अनुभव आहे.
In reply to बाकी शेवाळलेले, धुकट वातावरण by प्रचेतस
असा अनुभव आहे.तुमच्या आणि आमच्या वयातला फरक पाहता , दोघांना वेगवेगळा नुभव येणे शक्य आहे -- अतृप्त स्पा
In reply to असा अनुभव आहे. by स्पा
हा अनुभव सार्वत्रिक असतो. एकदा अनुभवाची बेशर्त स्वीकृती करून तर पहा.
माननिय कविवर्य सुरेश भट ह्यांची 'क्षण' ही कविता आठवली.
वाह!! एकदम अप्रतिम. बुवांच्या खास ठेवणीतले शब्द.
हा बुवा भलताच अत्रूप्त दिसतोय, आठवणीतुन बाहेरच यायला मागत नाही.
बुवा श्रावण सुरु होतोय, लवकर लायनीवर या, नाहीतर
मम आत्मन :
श्रुतिस्मृति पुराणोक्त,
फलप्राप्त्यर्थं
श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थ्यं
अशी सुरुवात करण्या ऐवजी
काही अठवणी...उन्हातल्या
काही अठवणी...पावसातल्या
काही नुसत्या...तालातल्या
काही गुलाबी...गालातल्या
अशी झाली तर यजमानांची पंचाईत होईल.
बाकी कविता बेहद्द आवडली
वाह
जबराट रोम्यांटिक कविता हाय ;)
अवांतर : बाकी ज्यात त्यात चुका काढून , उगाच किडे करणाऱ्या मोदक रावांचा जाहीर निषेध .
वयानुसार वागा मोदक राव ;)
In reply to वाह by स्पा
वयानुसार वागा मोदक राव>>
कोणाच्या वयानुसार??? :(
कविता छानच.
In reply to ? by कवितानागेश
कविता छानच >>
कोण कविता..?? ;-)
सुंदर... बस इतकेच !!!
वाह बुवा.