समुपदेशनाचे धडे लहान पणीच मिळाले. आई आणि मावशीकडुन. आई अशिक्षित मावशी बर्या पैकी शिकलेली. दोघी मध्ये डावे उजवे करणे कठीण. घराण्यातले सर्व क्लिष्ट प्रश्नसोडव्ण्यात दोघी एकदम पटाइत. मी लहान असल्यामुळे मी आजुबाजुला रहायला परवानगी. मला काही कळत नाही असे त्याना वाटायचे. चंद्रकांत काकोड्कर ९ व्या वर्षी पचवलेला मी. कधी कधी मावशीला संशय यायचा. तेंव्हा ती सांकेतिक भाषा वापरायची. पण ते पण कळायचे.
मावशी स्त्री मुक्ती चळ्वळीची चेयर पर्सन टाइपची. अत्यंत स्फोटक. तेवढीच प्रेमळ. माझ्यावर खुप प्रेम. कारण तीची ३ मुले अमेरिकेत सेट्ल झालेली. कुठ्लेही पाश नसल्यामुळे कोणालाही मदत करायला मोकळी. शेवट्च्या काही वर्षात टेकनिकल प्रॉब्लेम
साठी मला फोन करायची. मोकळे बोलणे. कुठ्लेही बंधन नाही.
असाच एक प्रसंग एका लग्नामधला. साल १९८०. नवरा मुलगा भावो़जी च्या बाजुचा. नवरी आमच्या बाजुची. त्यामुळे मावशी केंद्रस्थानी. लग्न आणि रिसेप्शन आटोपले. पाठ्वणी ची वेळ आली. नवरा नवरी च्या बाजुच्या जवळ्च्यांचा घोळ्का साधारण १०० जणांचा. मी पण होतो. नवरा नवरी ला खुर्ची वर बसवुन मावशी चे समुपदेशन सुरु झाले. अगदी घोळ्क्यात. ते असे.
बाई ग, लग्नानंतर दोन गोष्टी महत्व्वाच्या. एक नवरयाचे पोट दुसरे त्याचे बोट.
इथे मी मधे आलो.
तिसर्या गोष्टीचे काय?
मिश्कील हसत म्हणाली कशी
मी फक्त हाताच्या बोटाबद्द्ल बोलत नव्हते. (इथे सर्व समुदाय खदखदला)(काही हँडी क्राफ्ट असोसियेशन मेंबर जरा जास्तच खद्खद्ले)
क्रिकेट मध्ये धावा काढ्ताना कसे दोन्हीही गडी धावतात. तसे असायला पाहिजे. नाहीतर नुस्ताच हा धावतो आहे आणि तु नुस्ती क्रिझ मधे उभी. असे होउ देउ नको. ( इथे ३ वर्ष लग्नाला झालेल्यानी आपापल्या बायकांकडे अर्थपुर्ण नजरेने बघितले.) नवरी च्या गालावर रक्तिमा पसरला.
नवरेबुवाला टप्पु देउन माझ्याकडे बोट केले. तो बघ माझा भाचा. रामागड्यांचा टोळी प्रमुख आहे. भांडे स्वच्छ कसे घासावे ह्याच्या टीप्स तुला बरोबर देइल. काय अड्चण असेल तर फोन कर त्याला. (इथे मी बोल्ड्-ही लींक मला पण नविन होती).
रामदासाच्या कवितेनंतर हा प्रसंग आठ्वला. आणि काही प्रश्न पडले.
१.२००८ सालामध्ये सुद्धा मोकळ्या बोलण्यावर बंधन का आहे.
२. १२ वर्षे झालेल्या आपल्या पाल्याकडे पालक हा विषय बोलु शकतात का?
३ बायका आपल्या इच्छा नवरोबाकडे मोकळ्या मनाने बोलु शकतात का?
४. त्याना ह्या मॅटर मध्ये काही से असतो का?
५. मि.पा वर काही क्रांती होउ घातली आहे काय?
६. कविता वाचल्यानंतर मला विसोबांच्या खरड वहीतला फोटो का आठवला.?
७.स्त्री मुक्ति चळ्वळ वाले स्त्री देहाच्या जाहिरातीतील प्रदर्शनाबद्दल गप्प का बसतात?
८. अंडर्वेअरच्या बोल्ड जाहिराती बघताना मुलांसमोर काय अवस्था होते.
आन दे भाई
वाचने
9454
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म!
अरे देवा
>>अंडर्वेअ
+१
In reply to >>अंडर्वेअ by दशानन
सना ? कोण बे
In reply to +१ by मदनबाण
च्यायला या
In reply to सना ? कोण बे by दशानन
आन दे भाई? तो ये ले...
+१
In reply to आन दे भाई? तो ये ले... by पिवळा डांबिस
भरुन पावल
In reply to आन दे भाई? तो ये ले... by पिवळा डांबिस
असं आहे होय!
In reply to भरुन पावल by विनायक प्रभू
स्त्री