पेरी-पेरी (बटरफ्लाय) चिकन
राम राम मिपाकरहो.
उद्या रविवार त्यात परत एकादशी, संकष्टी वैग्रे ही काही नाही. तेव्हा कोंबडी हाणायला कुणाची हरकत नसावी. काय म्हणता ? ;)
ईथे बाहेर मस्त धो धो पाऊस कोसळतोय. काही तरी झणझणीत चापायची इच्छा होतेय.
आज फार दिवसांनी मुड ही लागलाय. (त्यात आम्ही वार पाळत नसल्याने आम्हाला एक संकष्टी सोडली तर सगळे दिवस सारखेच.)
काय मग करायची का सुरवात?
पेरी पेरी सॉस
साहित्यः
लाल मिरच्या (मिरच्यांची संख्या त्यांच्या तिखटपणाच्या तीव्रतेवर अवलंबून.)
मी habanero peppers वापरल्यात.
एक लहान कांदा.
एक गड्डा लसुण.
एका लिंबाचा रस.
२ लहान चमचे काळीमीरी पुड
३ मोठे चमचे पेपरीका (नसल्यास काश्मीरी लालतिखट) याने रंग चांगला येतो.
१/२ कप व्हिनेगर.
१/२ लहान चमचा साखर (ऑप्शनल. व्हिनेगरचा उग्रपणा कमी करण्यासाठी.)
१/२ कप तेल. (ऑलिव्हच असल्यास उत्तम)
चवी नुसार मीठ.
कृती :
मी वापरलेल्या मिरच्या अतीजहाल असल्यामुळे त्यांचा तिखटपणा थोडा कमी करण्यासाठी व एक स्मोकी फ्लेवर देण्यासाठी मी या मिरच्या शेगडीवर भाजुन आणि नंतर सोलून घेतल्या.
(कांद्याचा कच्चटपणा घालण्यासाठी कांदा थोडा परतुन घेतला होता.)
सॉससाठी म्हणुन लागणारे सगळे पदार्थ मिक्सरमध्ये वाटुन घेतले.
तयार सॉस बाटलीत बंद करुन फ्रीजमध्ये ठेवल्यास ४-५ आठवडे सहज टिकतो.
शक्य असल्यास हा सॉस आदल्या दिवशी करुन ठेवावा. मुरल्यावर याची चव अधीक खुलते.
कोंबडी स्वच्छ धुवून घेतली. तिच्या पाठीच्या कण्याकडचा भाग खालील चित्रफितीमध्ये दाखवल्या प्रमाणे कापून टाकला. (सुपसाठी स्टॉक बनवायचा असल्यास याचा काढुन टाकलेल्या भागाचा वापर करता येईल.)
चिकन ब्रेस्टमध्ये असणारं हाड/कुर्चा काढुन टाकल्यास चिकन एकदम फ्लॅट होतं.
कोंबडीला चरे देऊन चवी नुसार मीठ भुरभुरलं. तयार असलेला पेरी-पेरी सॉस लावून किमान ३-४ तास मुरत ठेवलं.
ओव्हन १० मिनिटं २००°C वर प्रीहिट करुन घेतला. आणि नंतर मुरवलेली कोंबडी आत अंदाजे ६०-८० मिनीटं शिजत ठेवली. (कोंबडीच्या आकारावर शिजण्यासाठी लागणारा वेळ कमी जास्त करावा.)
चियर्स.
वाचने
26366
वाचनखूण
प्रतिक्रिया
44
मस्त! भारतात कधी येतो आहेस रे
वा वा!
अतिसुबक पाकृ अन फोटो !
झक्कास!
सॉलिड फोटो!
बटरफ्लाईज् इन स्टमक :)
लाल सॉसचा रंग एकदम मस्त! मी
In reply to लाल सॉसचा रंग एकदम मस्त! मी by रेवती
अरे काय पहातोय मी हे!!
In reply to अरे काय पहातोय मी हे!! by बहुगुणी
छे हो! मी कुठली खातीये......
In reply to लाल सॉसचा रंग एकदम मस्त! मी by रेवती
खाण्यायोग्य प्रकार होईल का?
In reply to खाण्यायोग्य प्रकार होईल का? by गणपा
ओके. धन्यवाद.
In reply to खाण्यायोग्य प्रकार होईल का? by गणपा
Noted.....
अत्युत्तम.
नॉनव्हेज खात नसल्याने ही फक्त
_/\_ _/\_ _/\_
दम कसा धरवला म्हणते मी फोटो
मस्त...
व्वा..
मार डाला !!!!
गणपा शेट गल्लि चुकलात........
आता ह्या habanero peppers
डोळे निवले आणि जीभ खवळली...
वजन आटोक्यात आलेलं दिस्तंय.
(No subject)
भारी!!!!!
मस्तच
भारी रेसिपी,
माझा पहिला प्रतिसाद का दिसत
पेरीपेरी सॉस आणलय घरी.
क्या बात! क्या बात!! क्या बात
हे बघून
मी अज्जिबात.........
अप्रतिम
शेवटचे २ फोटो पाहुन जेव्हा मी
ती मिक्सी कोणती आहे एवढे
In reply to ती मिक्सी कोणती आहे एवढे by पेरु
फिलीप्स कंपनीचा मिक्सर आहे.
बेष्ट.
In reply to बेष्ट. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(कात्रीचा उपयोग फक्त कागद आणि
वाहवा!
गंपादादानी "कोंबडीचे
"_
In reply to "_ by देवांग
(No subject)
In reply to "_ by देवांग
एका नव्या धाग्याचे पोटेन्शिअल
बराच वेळ ते फोटो बघतोय नुसते