काय आहे आमच्याकडे ?
लेखनविषय:
काव्यरस
रंग नाही रूप नाही, काय आहे आमच्याकडे
सौंदर्याला तुझ्या द्यायला, न्याय आहे आमच्याकडे
ओळखीचे असेल तुला ते, हुरहुरणे पावसातले
सांगूच का तुला त्याचाही, उपाय आहे आमच्याकडे
ना सुगंध ना वारा, ना पाऊस ना गारा
शहारण्या तुला या सर्वांना, पर्याय आहे आमच्याकडे
मस्तीत तुझिया आम्ही, बेदुंध होऊ ऎसे
उधळून टाकू सारे, जे काय आहे आमच्याकडे
लिहशील तूही काही, कविता पावसा-धुक्यावर
घेशील जेव्हा भरभरून, जे काय आहे आमच्याकडे
कुठवर ऎकशील वेडे, गोष्टी तू ज्या अनुभवायच्या
ये इष्क कर जरासा समजेल, काय आहे आमच्याकडे
वाचने
4826
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
ek observation:
'amuchya' hya shabda cha upayog khoop avaDla karaN tya mule Urdu shaili barobar integration zhalya saarkhe waatle..
.
मस्त
मस्त.
उधुळन टाकु सारे ,जे काय आहे आमच्याकडे
..... आवडल
झक्कास.........!
:( मला का कळ्ळी नाय ?? :( :(
In reply to मला का कळ्ळी नाय ?? by जेनी...
कारन अन्भ्वायची गोष्ट हाय :-)
कुठवर ऎकशील वेडे, गोष्टी तू ज्या अनुभवायच्या ये इष्क कर जरासा समजेल, काय आहे आमच्याकडेक्या बात!! व्वाह!!
मस्त. :)
लिहशील तूही काही, कविता पावसा-धुक्यावर घेशील जेव्हा भरभरून, जे काय आहे आमच्याकडेवाहवा वाहवा. केवळ अप्रतिम
In reply to केवळ अप्रतिम by अभ्या..
+1
मस्त आहे.
कुठवर ऎकशील वेडे, गोष्टी तू ज्या अनुभवायच्या
ये इष्क कर जरासा समजेल, काय आहे आमच्याकडे
आहाह...
अगदी मस्त जमलीय!
.
का कोण जाणे, पण उगाचच भाऊसाहेब पाटणकरांची याद देऊन दिलीस भैय्या! :)
In reply to लढ बाप्पू... by धमाल मुलगा
+१ असंच वाटलं
कुठवर ऎकशील वेडे, गोष्टी तू ज्या अनुभवायच्या
ये इष्क कर जरासा समजेल, काय आहे आमच्याकडे
अहाहा. वरील दोन ओळी तर केवळ खल्लास. यातले 'ये इष्क कर जरासा' हा टच लै म्हणजे लैच आवडला.
-दिलीप बिरुटे
छान आहे.
मला वैयक्तिक उर्दू शब्दांना मराठीत घुसडलेलं रुचत नाही. तरीही, गुड.
जोरकस अन मस्त! आवडली कविता.
एकाच वेळी सेन्सिटिव्ह अन जोरकस अशी ही टिपिकल गजली शैली लै आवडते. श्लोक अन भावगीतांच्या एक स्टेप पुढची वाटते कैकदा.
aflaatoon!