मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काय आहे आमच्याकडे ?

चाणक्य · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
रंग नाही रूप नाही, काय आहे आमच्याकडे सौंदर्याला तुझ्या द्यायला, न्याय आहे आमच्याकडे ओळखीचे असेल तुला ते, हुरहुरणे पावसातले सांगूच का तुला त्याचाही, उपाय आहे आमच्याकडे ना सुगंध ना वारा, ना पाऊस ना गारा शहारण्या तुला या सर्वांना, पर्याय आहे आमच्याकडे मस्तीत तुझिया आम्ही, बेदुंध होऊ ऎसे उधळून टाकू सारे, जे काय आहे आमच्याकडे लिहशील तूही काही, कविता पावसा-धुक्यावर घेशील जेव्हा भरभरून, जे काय आहे आमच्याकडे कुठवर ऎकशील वेडे, गोष्टी तू ज्या अनुभवायच्या ये इष्क कर जरासा समजेल, काय आहे आमच्याकडे

वाचने 4824 वाचनखूण प्रतिक्रिया 21

निनाव Tue, 07/09/2013 - 19:58
ek observation: 'amuchya' hya shabda cha upayog khoop avaDla karaN tya mule Urdu shaili barobar integration zhalya saarkhe waatle..

जेपी Tue, 07/09/2013 - 20:51
उधुळन टाकु सारे ,जे काय आहे आमच्याकडे ..... आवडल

अभ्या.. Wed, 07/10/2013 - 01:18
लिहशील तूही काही, कविता पावसा-धुक्यावर घेशील जेव्हा भरभरून, जे काय आहे आमच्याकडे
वाहवा वाहवा. केवळ अप्रतिम

कुठवर ऎकशील वेडे, गोष्टी तू ज्या अनुभवायच्या ये इष्क कर जरासा समजेल, काय आहे आमच्याकडे अहाहा. वरील दोन ओळी तर केवळ खल्लास. यातले 'ये इष्क कर जरासा' हा टच लै म्हणजे लैच आवडला. -दिलीप बिरुटे

वेल्लाभट Fri, 07/12/2013 - 10:33
छान आहे. मला वैयक्तिक उर्दू शब्दांना मराठीत घुसडलेलं रुचत नाही. तरीही, गुड.

बॅटमॅन Fri, 07/12/2013 - 11:36
जोरकस अन मस्त! आवडली कविता. एकाच वेळी सेन्सिटिव्ह अन जोरकस अशी ही टिपिकल गजली शैली लै आवडते. श्लोक अन भावगीतांच्या एक स्टेप पुढची वाटते कैकदा.