मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'ती' एक बातमी!!

निनाव · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
सांज होता वाट आंधळी जनावरांची काया भयाण करणारी मात्र , जंगल म्हण्जे जनावरेच नि शहर असायला माणसेच असा काही नियम नाही रक्त वाहिले का कुणी पाहिले का खोल किती जखमा चौकशी चा चष्मा घातले लोखंडी सळे वय होते खुळे सगळे मात्र कळे तरी निरपराध मी रोज रोज तेच रस्ते वेगळे नावे वेगळी भुकेल्यांची ताटे भरली उद्वेगांची गर्दी निराशेत सरली वेशी वर लखतरे मोकाट जनावरे लपलेली 'समोर' मात्र 'न' दिसणारी रडणारी ओरडणारी सोसून छळ प्राण सोडणारी निष्पाप… निरागस लक्ष वेधणारी निर्लज्जांचे , बाधिरांचे, पुन्हा एक बातमी उद्या च्या अंकात सांडलेल्या स्याहीनं ओरबाडलेल्या कागदावर लिहिणारी… सांज होता वाट आंधळी जनावरांची काया भयाण करणारी

वाचने 2005 वाचनखूण प्रतिक्रिया 7

मिसळलेला काव्यप्रेमी 02/07/2013 - 03:32
भन्नाट... सिंपली भन्नाट!!!

स्पंदना 03/07/2013 - 05:18
घातले लोखंडी सळे वय होते खुळे सगळे मात्र कळे तरी निरपराध मी चर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!!!

Bhagwanta Wayal 06/07/2013 - 13:30
रडणारी ओरडणारी सोसून छळ प्राण सोडणारी निष्पाप… निरागस लक्ष वेधणारी निर्लज्जांचे , बाधिरांचे, खुपच छान...!

इन्दुसुता 09/07/2013 - 02:08
मात्र , जंगल म्हण्जे जनावरेच नि शहर असायला माणसेच असा काही नियम नाही
करेक्ट !!!!
मोकाट जनावरे लपलेली 'समोर' मात्र 'न' दिसणारी
परत, करेक्ट...... बहुगुणींप्रमाणेच म्हणते "आतपर्यंत हलवून नि:शब्द करणारी कविता.... "