`रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ (एक)
In reply to असं आहे होय? by अर्धवटराव
मनाच्या स्कोप बाबत, आणि मी जी समीकरणे दिली होती ति माझी वाक्ये ....या लेखात मी फक्त स्मृती या प्रभागा विषयी लिहीलं आहे. विषयाचा आवाका मोठा असल्यानं इतर फॅकल्टीज वर यथावकाश चर्चा पुढील लेखात होऊ शकेल. पण तुम्ही डायरेक्ट :
भुकेल्याला अन्न दे, अन्यथा अन्नाचा चिवडा होईल.वगैरे सुरू केलंत याचा अर्थ तुमचा स्वतःच्याच अनुभवावर विश्वास नाही. आणि याचं उघड कारण म्हणजे तुमची चित्तदशा `सांख्य की भक्ती' यात दोलायमान आहे.
In reply to तुमचा कॉम्प्युटर हँग झाला असेल? by संजय क्षीरसागर
In reply to क्षीरसागरजी सर्वाय प्रथम मी by मदनबाण
आंतर मनात आणि बाह्यमनात सुद्धा !थोडक्यात ती एका जनसमूहाची धारणा आहे, इट हॅज नो एक्झिस्टन्स बिसाइडस वन्स ओन माइंड. सत्य सार्वभौम आहे. त्याला कोणत्याही श्रद्धेची वा धारणेची गरज नाही. राम होता की नव्हता हा वाद नाही. तो आता, इथे, (सर्वांना आणि सर्वत्र) उपलब्ध आहे का? मुळात ज्याला राम म्हणजे कोण हे शिकवलं नाहीये त्याला तो दिसेल का? आणि माझा दावा आहे, सत्य आता, इथे, सर्वांना आणि सदैव उपलब्ध आहे, फक्त मन धारणारहित हवं. धारणा कशा सघन होतात हे देखील तुम्ही तुमच्याच प्रतिसादात सांगितलंय:
मला वाटत बाह्य मनातुन तो अंतरमनात साठवावा म्हणुन चिंतन करण्यावर भर दिला जातो.हे चिंतन, भ्रम सघन करण्याचा राजमार्ग आहे. मन हे जसं बायो कंप्युटर आहे तसंच बायो-प्रोजेक्टरही आहे. तुमच्या धारणा ते प्रोजेक्ट करायला लागतं. तुम्हाला (एकट्याला) समोरचं स्पष्ट दिसण्या ऐवजी तुमच्या मानसिक प्रतिमा दिसायला लागतात. आणि भ्रम म्हणजे जे नाही त्याचा आभास. या उलट तुम्ही मनापासनं जसजसे मोकळे होता तसतसं तुम्हाला समोरचं स्पष्ट दिसायला लागतं आणि आजूबाजूला चालू असलेलं ऐकू यायला लागतं. त्याला `दॅट विच इज' म्हणतात. आणि ते जगातला कुणीही नाकारू शकत नाही. तुम्ही आणि इथले सदस्य थोडे सामंजस्यानं काय लिहीलंय ते समजावून घेतील आणि चर्चा व्यक्ती निरपेक्ष होईल अशी अपेक्षा आहे. मी इथे कुणाचेही उतारे, लिंक्स काहीही डकवत नाही, तुम्ही देखील कुणाला मधे आणू नका. अमका शहाणा की वेडा हे ठरवण्यात काही अर्थ नाही. आणि ते आपल्याला ठरवताही येणार नाही. मी स्वतः कधीही त्या फंदात पडलो नाही. द ओन्ली क्रायटेरीआ इज यू. तुम्हाला लेखनातली प्रक्रिया उपयोगी ठरते का ते पाहा. प्रक्रिये विषयी मी निशं:क आहे, तुम्ही लेखनावर फोकस करा.
In reply to भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण by संजय क्षीरसागर
भ्रम नक्की कोणाला होतो ? मनाला की मेंदुच्या प्रोसेसिंगला ?सततच्या चिंतनानं मन भ्रम निर्माण करतं आणि व्यक्ती भ्रमिष्ट होते.
मन या जीवनातल्या गहनतम पैलूवरचं हे लेखन तुमच्या समोर मांडताना अतिशय आनंद होतो आहे.आनंद नक्की कोणाला होतो आहे? मनाला की व्यक्तीला?
मन हा बायो-कंप्युटर आहे. जशी कंप्युटरची सर्व रेकॉर्डिंग्ज एकमेकांशी हेड आणि टेल अॅड्रेसेसनं जोडलेली असतात तशी आपल्या स्मृतीतली सर्व रेकॉर्डिंग्ज एकमेकांशी निगडित असतात. पण कंप्युटरमधला डेटा निर्वैयक्तिक असल्यानं तो सर्वांसाठी एकाच सलग पद्धतीनं रिट्राइव होतो आणि मन हा प्रत्येकाचा व्यक्तिगत बायो-कंप्युटर असल्यानं कुणाची स्मृती कशी सक्रिय होईल आणि त्याला किती दूर नेईल ते सांगता येत नाही.कोणत्या कंप्युटर बद्दल बोलत आहात आपण? सर्व स्मृती निगडीत असणे तर कै च्या कै च. एक उदाहरण घ्या. एखाद्याची आपल्या वडिलांच्या अंतर्विधीची स्मृती ही त्याच्या विवाहाच्या पहिल्या रात्रीच्या/ जेव्हा केव्हा त्याने/ तिने पहिल्यांदा शरीर सुख अनुभवले त्या स्मृतीशी निगडीत असेल का? वर कोणीतरी विचारल्याप्रमाणेच तुमचा लिहीण्यात तरी किंवा समजण्यात किंवा समजवण्यात काही तरी घोळ आहे. तुम्ही एक टेबलच बनवा ना की मन म्हणजे CPU, मेंदू अथवा अजून काय जे स्मृती जतन करत असेल ते हार्ड-ड्राईव्ह. मला आजपर्यंतचे एकच कळत नाहीये की तुम्हाला जे काही बॅक ट्रॅक वगैरे मार्ग अवलंबून जे काही साध्य झाले आहे त्याची इतरांना गरज आहे का ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की जर काही लोकांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स अथवा काय मानसिक ताण वगैरे वगैरे असतील त्या सर्वांवर त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने उपाय शोधू देत की. तुम्हाला त्या मनाच्या अवलोकनाने वा नाम साधनेने आणि काय ध्यान धारणेने वगैरे फरक नसेल पडला पण बाकीच्यांना पडत असेल तर त्यांना मूर्खात काढण्याची अथवा चूक ठरवण्याची काय गरज आहे? त्यातून तुम्हाला त्या गोष्टी जमत/ झेपत नाहीत असाही निष्कर्ष निघू शकतो. असो आता हातातला वेळ संपला आणि घरी जायची वेळ झाली. तेव्हा तूर्तास इतकेच.
In reply to तुमचे सर्व लेखन आणि प्रतिसाद बॅक ट्रॅक करून by लंबूटांग
वगैरे वगैरे असतील त्या सर्वांवर त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने उपाय शोधू देत की. तेच तर तुम्हाला सांगतोय, माझ्या लेखनात रस असणारे आणि मी पाहून घेऊ. तुम्ही मधे पडण्याची आवश्यकता नाही.
बाकीच्यांना पडत असेल तर त्यांना मूर्खात काढण्याची अथवा चूक ठरवण्याची काय गरज आहे?मी त्या प्रक्रियांबद्दल लिहीलंय आणि त्यांची व्यर्थता सकारण सांगितलीये. कुणालाही मूर्खात काढण्यात मला काहीही रस नाही. अर्थात, तसं कोणी स्वतःला समजत असेल तर माझा नाईलाज आहे.
In reply to लोकांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स अथवा काय मानसिक ताण वगैरे by संजय क्षीरसागर
In reply to ?? by कवितानागेश
In reply to तुम्ही संपादक आहात म्हणून सांगतो by संजय क्षीरसागर
In reply to ह्या धाग्यावर खुद्द लेखक by यशोधरा
In reply to विषय काय आहे म्हणायचा? by लंबूटांग
In reply to विषय ना? भुंगा कसा गुणगुणतो by यशोधरा
In reply to नाही हो by संजय क्षीरसागर
In reply to मुळात गुणगुण आहे म्हणूनच ना? by यशोधरा
In reply to काय हो.. दोन देशांनी एकमेकांत by मोदक
In reply to अपेक्षित शब्दांचे खेळ by लंबूटांग
In reply to भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा by मदनबाण
जर इतक्यात काही लिहायचे नव्हते तर मग त्या विषयावर या लेखानं आपण विधाने कोणत्या कारणाने करत आहात ?`या विषयावर मी चर्चा करणार नव्हतो कारण तो संवेदनाशील आहे. पण आता विषय निघालाच आहे तर सांगतो' हे मी या आधीच म्हटलंय. थोडक्यात विषय तुम्ही सुरू केलाय म्हणून प्रतिसाद देतोय. तरी आता परत परत तो मुद्दा काढू नका हे नम्रपणे सांगतो कारण आता चर्चा सुरू झालीये. आता तुमचे मुद्दे :
जेव्हा बाह्यमनातुन घेतले जाणारे नाम आंतर मनातुन सुद्धा घेतले जाउ लागते तेव्हा साधकाची पुढची अवस्था अजपाजप ही असु शकते.श्वासागतीक ही क्रिया घडली जाते.मग कोणी सोहम् म्हणते तर कोणी राम कोणता मंत्र आपण नामात घेतला हे त्यावर अवलंबुन आहे आणि साधनेवर.अजपाजप याचा अर्थ आता मनाची विचार करण्याची क्षमता संपली. भ्रम अंतर्मनात पोहोचला. तुम्हाला कल्पना नसेल म्हणून सांगतो, मन श्वासातून घेतलेल्या प्राणवायुवरच चालत असल्यानं, विचार करतांना श्वासाची लय बदलते. एकदा भ्रम अंतर्मनात पोहोचला की न्यूनतम श्वासात तो संगृहित राहतो. याचा अर्थ तुम्ही श्वासाची लय बदलून सुद्धा त्यात काही फरक पडत नाही. म्हणजे नॉर्मली एखादा नेगटीव विचार आपण खेळायला लागतो तर त्याच्याकडे दुर्लक्ष होऊन आणि श्वासाचा जोम वाढून निघून जातो आणि आपण फ्रेश होतो पण अजापाजपात भ्रम कायमस्वरूपी मेंदूत राहतो. तो हटता हटत नाही.
आपणास वाल्मिकी ठावुक असतील असे गॄहित धरुन सांगतो...त्यांना सुद्धा राम कोण होता हे माहित नव्हते, नारद मुनींनी त्यांना राम नाम घेण्यास प्रवॄत्त केले. सुरवातीला मरा मरा असे नाम उलटे घेणारा नंतर रामनाम चिंतनात मग्न झाला आणि या रामनाम चिंतनानेच वाल्या कोळ्याचा वाल्मिकी महर्षि झाले.अर्थात! ते दाऊदला उपरती होऊन त्याचा साने गुरुजी होण्यासारखं आहे. याच्या विपरित घटना म्हणजे एखाद्या होतकरू तरूणाचा संपूर्ण चिंतन-मननानं ओसामा बिन लादेन होणं. पण प्रस्तुत लेख ज्यांच्यासाठी लिहीला आहे ते या कॅटेगरीत येत नाहीत. इथे मनावर हुकुमत मिळवण्याची गोष्ट चालू आहे. व्यक्तिमत्त्वाच्या रूपांतरणाची नव्हे.
गंमतच आहे,हजारो साधकांनी साधना केली, संतांनी नामाचे महत्व सांगितले आणि ते जगमान्य असताना देखील तुम्ही त्यास व्यर्थ म्हणता ! मात्र स्वतः जे काही लिहता त्याला जगात कोणीही नाकारु शकत नाही असे प्रमाणपत्र जोडता.मी साधनेला व्यर्थ म्हणतो कारण ती फारफार तर (खरं तर थोडं फार) व्यक्तिमत्त्व बदलू शकते. पण सूज्ञ माणूस कधीही वाल्मिकी सारखं वागत नाही त्यामुळे त्याला असल्या साधनेची गरज नसते. आणि त्याही पुढे जाऊन त्यानं अजपाजप वगैरे साधना केली तर तो हमखास भ्रमिष्ट होतो. माझ्या एका मित्राच्या आईनं (अक्कलकोट का कुणी तत्सम) स्वामींचं असंच घनघोर चिंतन, मनन आणि जप अनेक वर्ष केला. आता कुणीही आलं तरी त्या, "स्वामी आलात? यावं. किती उशीर करायचा तो. आता जेवूनच जायचं हं. आणि असं मला सोडून, न सांगता जायचं नाही" वगैरे सुरू करतात.
माझ्या प्रतिसादातले संदर्भ आणि शेवटी दिलेला व्हिडीयो तुमच्या उपयोगी पडतो का ते पहादादा, आता हा तुम्हाला शेवटचा प्रतिसाद आहे याचा उपयोग होतो का ते पाहा. नाही तर माझं लेखन वाचणं तरी थांबवा, तुम्हाला कधीमधी दिसणारा राम एकदम अंतर्धान पावेल.
In reply to तुम्ही कमाल करताय! by संजय क्षीरसागर
In reply to पण प्रस्तुत लेख ज्यांच्यासाठी by कवितानागेश
In reply to तुम्ही कन्क्लूजनला यायची घाई करताय : by संजय क्षीरसागर
In reply to मी अजापजप या साधनेची फलश्रुती by कवितानागेश
हे तरी आम्हाला कसे कळावं की आम्ही तुमची साधना विश्वासानी करुन पाहवी.मला किती कळलंय ते तुम्हाला साधना यशस्वी झाल्या क्षणी कळेल!. आणि, अर्थात साधना सोपी आणि निर्धोक आहे. तुम्हाला त्यासाठी कुठेही जायची गरज नाही की त्यात फारसा कलापव्यय ही नाही.
तुम्ही स्वतः कधी अजपाजप करुन पाहिला आहे का, की त्याची फलश्रुती तुम्ही सांगताय..मनाची `धारणा' ही फॅकल्टी अशी काम करते : एखाद्या गोष्टीचा ध्यास घेण्यासाठी मनाला तिचं सतत स्मरण घडवून द्यावं लागतं. समजा राम भेटावा अशी इच्छा असेल तर उठता-बसता, प्रत्येक वेळी, जरा फुरसत मिळाली की त्याचा जप करावा लागतो. असा जप दीर्घ काल केल्यानं मनात येणारे इतर विचार थांबून केवळ रामनाम मनात रूंजी घालू लागतं. मनाला सवय लावायला वेळ लागतो पण एकदा लागली की सुटणं कठीण. जप करणार्याला जपाचा आधार वाटायला लागतो कारण अनेकानेक विचारांऐवजी मनात `राम' हाच विचार घुमू लागतो. वास्तविकात मात्र भक्ताची श्रवणसंस्था निकामी व्हायला लागते कारण जाणीवेची नॉर्मल डायनॅमिक स्टेट संपून (थोडक्यात आपण जसं एकावेळी आजूबाजूला चाललेलं सगळं ऐकत असतो), आता तिचा रोख मनाकडे वळायला लागतो. अजपाजप सुरू झाला की भक्ताला आजूबाजूचं ऐकू येण्याऐवजी `रामनाम' ऐकू यायला लागतं. मग त्याला आणखी बरं वाटतं पण परिस्थिती गंभीर व्हायला लागलेली असते. कारण मनाचा दुसरा पैलू दृक आहे. एकदा अजपाजप सुरू झाला की नामघोष निद्रेत प्रवेश करतो. मग मनात रामाची प्रतिमा तयार व्हायला लागते. एकदा अंतर्मनात (किंवा सबकाँशसमधे) अशी प्रतिमा तयार झाली की भक्ताच्या जाणीवेचा रोख मनाच्या पुरत्या कह्यात जातो. आधी श्रवण नादुरस्त आणि मग अवलोकन नादुरूस्त होऊ लागतं कारण अंतर्मन ती प्रतिमा समोरच्या निराकारावर प्रोजेक्ट करायला लागतं. भक्ताला समोरचं स्पष्ट दिसण्याऐवजी सगळीकडे राम दिसायला लागतो आणि आजूबाजूचं नीट ऐकू येण्याऐवजी रामनाम ऐकू येऊ लागतं. तो मनाच्या पूर्ण ताब्यात जातो, याला सायकॉलॉजित भ्रमिष्टावस्था म्हटलंय. भक्ताला वाटतं आपण भवसागर पार केला पण परिस्थिती नेमकी विपरित असते, तो वास्तविकतेपासून पूर्णपणे भरकटलेला असतो. ही इज टोटली कट ऑफ फ्रॉम द रिअॅलिटी. मी मनाला इतकं अंतर्बाह्य जाणलंय की माझ्या जाणीवेचा रोख ते माझ्या इच्छेशिवाय स्वतःकडे वळवू शकत नाही. त्यामुळे मला समोरचं लख्खं दिसतं आणि बाजूचं स्पष्ट ऐकू येतं! तुमच्या `तुम्ही स्वतः कधी अजपाजप करुन पाहिला आहे क`?' या प्रश्नाचं आता वेगळं उत्तर देण्याची गरज नाही. मनावर हुकुमत याचा अर्थ मन शत्रू आहे असा नाही तर मनाच्या गुलामीत न जगता, मन या फॅकल्टीचा उपयोग करत स्वेच्छेनं जगणं असा आहे. अंतःप्रेरणेबद्दल पुढच्या लेखात लिहीन.
In reply to तुम्हाला मानवी मनाबद्दल सगळं काही कळतंय... by संजय क्षीरसागर
In reply to मनाचे अवलोकन करणं अगदीच by कवितानागेश
ते मात्र पूर्णतः गैरसमजांवर आधारीत आहे असं खेदानी नमूद करतेय. अजपाजप करणारे शिवाय अतिशय बुद्धिमान आणि मेन्दूच्या सगळ्या फॅकल्टॅज उत्तम चालू असणारे, मनानी आणि शरीरानी व वागणूकीनीदेखिल अतिशय निर्मळ असणारे अनेक लोक माझ्या पाहण्यात आहेत.`अजपाजप' याचा अर्थच: "तुमच्या आवाक्या पलिकडे गेलेला सबकाँशस माइंडमधे सतत चालू असणारा नामघोष". तुम्हाला बहुदा अजपाजप म्हणजे नक्की काय याची कल्पना नसावी. तुम्ही तुमची व्याख्या लिहा म्हणजे चर्चा होईल.
अर्थात, मी इथे जपाचे फायदे लिहित बसणार नाही.तोच तर चर्चेचा विषय आहे!
तुम्हाला कधी वेळ असेल तर पूर्वग्रहदूषित द्रुष्टीकोन न बाळगता करुन पाहा.माझा कोणताही पूर्वग्रह नाही. सध्या जगात प्रचलित असलेल्या सर्वच्यासर्व साधनांचा (तंत्रसूत्र, झेन (जाझेन), सूफी (वर्लिंग), डायनॅमिक आणि कुंडलिनी (ओशो), गुर्जेफियन स्टॉप मेथडस, पातंजलींच्या अष्टांगयोगाची सूत्र, बुद्धाची विपश्यना) मी अभ्यास केला आहे. आणि मनाच्या `धारणा' या अत्यंत महत्त्वाच्या फॅकल्टीवर इथे सविस्तर प्रतिसाद दिला आहे. "राम दिसणं म्हणजे नक्की काय?" या माझ्या साध्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देऊ शकाल काय?
अजून एक प्रश्न म्हणजे 'स्वेच्छेने जगणं' हे अन्तिम ध्येय कसं काय होउ शकत?मला ही त्यावर लिहीयंच आहे पण प्रथम हा इश्यू सेटल व्हायला हवा.
In reply to जपामुळे ज्या गोष्टी होतात असं तुम्ही खत्रीपूर्वक लिहिताय ... by संजय क्षीरसागर
In reply to अजपाजप... by अर्धवटराव
ज्याप्रमाणे परागकणांत सुगंध आहे त्याप्रमाणे नामात सच्चिदानंद आहे....वगैरे वगैरेआनंद शांततेत आहे (नामात नाही कारण कोणतही नाम हा ध्वनी आहे). शांततेत आनंद असण्याच कारण शांतता हेच आपलं मूळस्वरूप आहे. मन शांत झालं की देह, मन आणि विश्वशांती यांची एकरूपता साधते कारण शांतता एकसंध आहे. तिचं विभाजन होऊ शकत नाही. या स्थितीत आपण अखिल विश्वाशी एकरूप होतो (म्हणजे मुळात आहोतच पण त्याची प्रचिती येते). त्याला सत-चित-आनंद (अॅबसल्यूट-काँशसनेस-इक्सटसी) म्हटलंय. त्यातून सच्चिदानंद ही स्थिती आहे आकार नाही आणि स्थिती ही नेहमी स्थितीच राहते ती कधीही आकार होत नाही. त्यामुळे तुमचा फंडाच गंडला आहे. तुम्ही व्याख्येतच पराभूत झालात त्यामुळे पुढचा सर्व प्रतिसाद व्यर्थ आहे. अर्थात तुमचे आभार मानायलाच हवेत कारण `नामसाधनेचा' संपूर्ण भोंगळपणा तुम्ही (स्वतःच्या आकलनासहित) सविस्तर उलगडून दाखवला आहे.
In reply to `अजपाजप?' by संजय क्षीरसागर
In reply to नामात नाही कारण कोणतही नाम हा by कवितानागेश
अवांतर: तुम्ही कायम हे असे पराभूत, हल्ले, हुकुमत अश्या प्रकारचे शब्द का वापरता? त्यामुळे मला फार हसू येतं.करमणुकीच्या स्रोताला तू करमणूक का करतोस असे विचारून करमणुकीचा सप्लाय बंद का करतेस गं मौतै ;) =))
In reply to अवांतर: तुम्ही कायम हे असे by बॅटमॅन
In reply to नामात नाही कारण कोणतही नाम हा by कवितानागेश
त्याचा फक्त निर्देश करता येतो. 'ऐकता येत नाही... जौ दे. ते फार कॉम्प्लिकेटेड आहे.तुम्ही आता विनोदी लिहायला लागलात! आहो मग नाम घ्यायचंच कशाला?
कसेही असलं तरी जर मूळ्स्वरुप कायम तसेच राहणार आहे तर त्यापर्यंत जायचे कशाला?शब्बास! आहो स्वरूप म्हणजे आपण! तिथे जायला कशाला लागतंय?
जिथे काहितरी बिघडतय तिथे जौन दुरुस्त करायला नको का?नका फंदात पडू दुरूस्तीच्या, तिथे दुरूस्ती लागतच नाही
In reply to `अजपाजप?' by संजय क्षीरसागर
In reply to जपामुळे ज्या गोष्टी होतात असं तुम्ही खत्रीपूर्वक लिहिताय ... by संजय क्षीरसागर
In reply to तुमच्या आवाक्या पलिकडे गेलेला by कवितानागेश
अजपाजप हा अनाहत नाद असतोअनाहत नाद म्हणजे वैश्विक शांततेची तुम्हाला झालेली जाणीव. द साऊंड ऑफ सायलेंस. ती एकदा झाली की सतत तुमच्या बरोबर असते कारण तुम्ही आणि ती वेगळी राहात नाही.
जप फक्त नामाचा नसतो. जपाचे अनेक प्रकार आणि पद्धती आहेत.......पण एकच सांगते.....तो दोष त्या मार्गाचा किंवा त्या मारगाकडे बोट दाखवणार्या व्यक्तीचा नाही.जाऊं द्या, एकच सांगतो जर तुम्ही जप-साधना केली असती तर त्याविषयी निश्चित असं काही तरी लिहू शकला असता. इतकी गोलमाल वाक्य फक्त हेच दर्शवतात की तुम्ही ती साधना केलेली नाही आणि तुम्हाला त्या विषयाची माहिती नाही.
आणि मनाच्या `धारणा' या अत्यंत महत्त्वाच्या फॅकल्टीवर इथे सविस्तर प्रतिसाद दिला आहे. कुठे?इथे तर तुम्ही कहरच केलायं! आहो :
मनाची `धारणा' ही फॅकल्टी अशी काम करते : एखाद्या गोष्टीचा ध्यास घेण्यासाठी मनाला तिचं सतत स्मरण घडवून द्यावं लागतं......हा इतका दीर्घ आणि मौलिक प्रतिसाद मी तुमच्याच प्रश्नाला दिलाय! याचा अर्थ तुम्ही प्रतिसाद देखील वाचत नाही! आणि काहीही न वाचता बिनधास्त फक्त प्रश्न फेकता.
"राम दिसणं म्हणजे नक्की काय?" या माझ्या साध्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देऊ शकाल काय?>नाही. मला माहित नाही. मला आजपर्यंत कुणी भेटलं नाही 'राम दिसला' असं सांगणारं.. = आख्ख्या प्रतिसादात हे एकमेव वस्तुस्थिती निदर्शक वाक्य तुम्ही लिहीलंय!
तुम्ही सततच्या चिंतनानं मन भ्रम निर्माण करतं आणि व्यक्ती भ्रमिष्ट होते.> असे लिहिलं आहे. हे कसं काय? आईन्स्ताईनबद्दल किंवा तश्याच अनेक शास्त्रज्ञांबद्दल देखिल तुमचे हेच मत आहे का?या अत्यंत निरागस प्रश्नासाठी तुम्हाला सगळ्या चुका माफ! शास्त्रज्ञ अस्तित्वागत प्रश्नांवर (उदा, गुरूत्त्वाकर्षण) चिंतन करतात, रामावर नाही. आणि त्यांच्या चिंतनातून ते प्रश्नांची उकल साधतात. राम भेटावा हा त्यांच्या चिंतनाचा हेतू नसतो त्यामुळे ते भ्रमिष्ट होत नाहीत.
In reply to तुम्ही आता माहित नसलेल्या विषयावर लिहीताय! by संजय क्षीरसागर
In reply to >> अनाहत नाद म्हणजे वैश्विक शांततेची तुम्हाला झालेली जाणीव. by उन्मेष दिक्षीत
In reply to अनाहत by उन्मेष दिक्षीत
"अनाहत" शब्दाचा अर्थ काय ?उन्मेषदादा अनाहत म्हंजे आपण सगळे 'नॉन वेरीफाईड जेन्टस' ;)
In reply to आता प्रतिसादांची पण शंभरी by प्यारे१
In reply to हो ना! by संजय क्षीरसागर
In reply to हो ना! by संजय क्षीरसागर
In reply to घोड्याला पाण्यापर्यंत आणता by मदनबाण
In reply to जाऊ द्या हो बाणराव by अर्धवटराव
In reply to चखन्याला शाकाहारी काय आहे? by प्यारे१
In reply to जाऊ द्या हो बाणराव by अर्धवटराव
In reply to घोड्याला पाण्यापर्यंत आणता by मदनबाण
In reply to घोड्याला पाण्यापर्यंत आणता येते पण त्याला पाणी पाजता येत नाही! by संजय क्षीरसागर
In reply to मला निराकार गवसलायं by कवितानागेश
ती कशी जाणीवेतच येणार नाही.येते! कारण निराकार ही जाणीवेचीच स्थिर अवस्था आहे.
तरीही समजा की जाणीव फारच प्रगल्भ झालीये आणि काहितरी निराकारच आहे असं वाटतय तर तो भ्रम/ झोप कशावरुन नाही?आपण निराकार आहोत हा उलगडा झाल्यावर माझ्या आयुष्यात दोन बदल झाले : एक, मी कधीही आणि कश्यानंही निराश होत नाही. आणि दोन, आपण मरू ही शक्यताच संपली. एक्दा का झोप लागली की सगळं अस्तित्वच निराकार होउन जातं. नाही. जाणीव जागृत असते.
असं मला रोजच वाट्तं.. जाग आल्यावर! मग मलापण निराकार गवसलाय की काय?तुम्ही देखील स्वरूपानं निराकारच आहात पण स्वतःला व्यक्ती समजून जगतायं आणि ती मनाची किमया आहे! ही मनाची किमया नक्की काय आहे ते उलगडण्याचा प्रयत्न लेखमाला करणार आहे.
आणि समजा यापेक्षा वेगळं काहितरी होत असेलही, तरिही त्याचा उपयोग काय? सर्वसामन्य आयुष्य जगणार्या साध्या सरळ माणसाला त्याच्या आयुष्यात या निराकाराचा काय उपयोग, की त्यानी त्यासाही काहितरी धडपड करावी?व्यक्ती म्हणून एक बंदिस्त आयुष्य जगणं आणि स्वतःच्या निराकारत्त्वाचा उलगडा होऊन मुक्त आणि स्वच्छंद जगणं असा तो फरक आहे. तुम्ही इतके बेसिक आणि कमालीचे सार्थ प्रश्न विचारले त्याबद्दल मन:पूर्वक आभार.
In reply to एखादी गोष्ट निर्गुण-निराकार असेल तर ती गवसेल कशी काय? by संजय क्षीरसागर
In reply to निराकार ही जाणीवेचीच स्थिर by कवितानागेश
त्यात मातीत ही सिस्टीम बंद पडल्यावर मिसलणार आहे,
मिसलणार म्हणजे काय गं..?In reply to त्यात मातीत ही सिस्टीम बंद by मोदक
In reply to निराकार ही जाणीवेचीच स्थिर by कवितानागेश
तुम्हाला अनेक्वेळा निराश होउन व्यक्त झालेले इथे अनेकांनी पाहिलं आहे.उलट आहे. इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं सतत (शाब्दिक) हल्ले होऊन देखील आजही मी जसाच्यातसा आहे!
त्याव्यतिरिक्त तुम्ही अमर असाल तर चांगलंच आहे. त्याची काही मी पडाताळणी घेणार नाही. तुम्ही निश्चिन्त रहातुम्हीही अमर आहात! माझ्या अमरत्त्वाचा प्रत्यय तुम्हाला, `तुम्ही निराकार आहात' हे माझं म्हणणं समजल्या क्षणी येईल.
त्यापेक्षा राग ही भावना जरा जास्त डेन्जरस आहेहा एक पूर्वापार आणि मजेशिर गैरसमज आहे. राग हा अभिव्यक्तीचा आवेग आहे. त्यात विषेश काही नाही. अर्थात, माझ्या परखडपणाला राग समजणं हा दुसरा गैरसमज आहे. आणि तो प्रत्त्युत्तर न देता आल्यामुळे घेतलेला स्टँड असू शकतो. निराशा मात्र चिंताजनक आहे आणि त्यावर उपायाची गरज आहे.
तसेही मरण म्हणजे फक्त change of form आहे हे सगळ्यांनाच माहित असते.....इथून पुढे मात्र तुमचा सर्व प्रतिसाद चुकला आहे. निराकार अपरिवर्तनीय आहे. आणि आपण निराकार असल्यानं अमर आहोत. तो उलगडा अर्थात, मनाच्या बाहेर पडल्याशिवाय अशक्य आहे.
In reply to म्हणजे कोमा का? by संजय क्षीरसागर
In reply to सिद्धत्व म्हणजे नक्की काय? by कवितानागेश
यासाठी तुमच्याकडे काही उपाय आहेत का?हा लेख त्यासाठीच आहे.
मनाच्या बाहेर कशासाठी पडायचं? त्याचा नक्की उपयोग काय?ते तर लेखातच शेवटी सांगितलंय :
जेव्हा तुम्हाला मनाची ही समग्र प्रक्रिया समजेल तेव्हा तुमच्या वैचारिक आवर्तनांचा कालावधी कमीकमी होऊ लागेल. तुम्ही पुन्हापुन्हा वर्तमानात येऊ लागाल. मनाच्या एका महत्त्वाच्या दालनावर तुमची हुकुमत चालायला लागेल. मनाच्या अनेक प्रभागांपैकी एका व्यापक प्रभागापासनं तुम्ही मुक्ती अनुभवाल. निरंतर चालू असलेल्या वैचारिक कोलाहलातून बाहेर आल्यानं तुमच्या जीवनात शांतता येईल.
In reply to माझा फॉर्म अबाधित असेपर्यन्त माझे आयुष्य सुरळित चालावं by संजय क्षीरसागर
In reply to सिद्धत्व म्हणजे नक्की काय? by कवितानागेश
मनाच्या बाहेर कशासाठी पडायचं? त्याचा नक्की उपयोग काय?करेक्ट! असाच प्रश्न मी पहिल्या पानावर विचारला आहे आणि त्याच्या उत्तराच्या प्रतिक्षेत आहे. :) - ('मनातलं जनात,ब्रिजेश उवाच' बोलणारा) सोकाजी
In reply to सिद्धत्व म्हणजे नक्की काय? by कवितानागेश
मनाच्या बाहेर कशासाठी पडायचं? त्याचा नक्की उपयोग काय?करेक्ट! असाच प्रश्न मी पहिल्या पानावर विचारला आहे आणि त्याच्या उत्तराच्या प्रतिक्षेत आहे. :) - ('मनातलं जनात,ब्रिजेश उवाच' बोलणारा) सोकाजी
In reply to आता चर्चा समाधानकारक झाली असेल.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझ्या अनुभवानं सर्वांना उपयोगी होईल अशी एक अत्यंत नवी पद्धत सांगितली आहे. सदस्यांनी एकतर त्या पद्धातीचा उपयोग करून येणारे निष्कर्श लिहावे किंवा मनावर हुकुमत मिळवण्यास प्रचलित पद्धती (अवलोकन आणि नामसाधन) कश्या सहाय्यक ठरतात ते दाखवावं इतकी साधी अपेक्षा होती.हे वर नमूद केलं आहेच. पुढच्या भागात स्मृती ऐवजी जाणिवेनं कसं जगावं, अंतःप्रेरणा म्हणजे काय आणि तन्मयता कशानं साधते यावर लिहीणार होतो पण ते पहिली स्टेप ( जो या लेखाचा विषय आहे : `स्मृती सक्रिय होण्यावर हुकुमत') जमल्याशिवाय शक्य होत नाही.
In reply to या धाग्यावर प्रतिसाद द्यायची by धन्या
In reply to या धाग्यावर प्रतिसाद द्यायची ईच्छा नव्हती! by संजय क्षीरसागर
पुस्तकाचं परीक्षण लिहिण्याईतका मी मोठा नाही.परीक्षण तर लिहायचे नव्हते परंतू पुस्तकाचा विषय या धाग्याशी संबंधीत आहे. म्हणून इथेच प्रतिसाद लिहिला.
In reply to तुम्ही माझा प्रतिसाद by धन्या
In reply to बाकी काही म्हणा, "रुणुझुणू by बॅटमॅन
In reply to बाकी काही म्हणा, "रुणुझुणू by बॅटमॅन
In reply to नाकमुका नाकमुका ऑर चिंताता by अभ्या..
In reply to या धाग्यावरचे सगळे इश्यूज by मोदक
In reply to संक्षी... by मोदक
In reply to बडे नासमझ हो.. ये क्या चाहते by पिलीयन रायडर
In reply to संक्षी म्हणजे .... by चौकटराजा
त्यासाठी आपल्याच मनाचे निरिक्षण करायला जमले पाहिजे म्हणजेच अहंकारावर मात करता आली पाहिजे. समाजधर्म म्हणून इतराना बदलायचा प्रयत्न थोडाफार करावा पण आपल्या मनाकडे दुर्लक्ष न करता.तुमचं हे म्हणणं सर्वसामान्यांना लागू होतं, ज्यांना निराकार गवसलाय त्यांना नाही. ;)
In reply to त्यासाठी आपल्याच मनाचे by धन्या
In reply to अनंताकडे जाण्याचे by अवतार
कुठला तरी एकच मार्ग बरोबर आणि बाकीचे मार्ग तितकेसे उपयुक्त नाहीत हे म्हणजे आमचाच देव खरा आणि तुमचा देव खोटा ह्यातला प्रकार झाला.मी फक्त दोन प्रचलित साधना पद्धतींचे दोष सविस्तर दाखवून दिले आहेत आणि नवी प्रणाली मांडली आहे. इथे कुणीही त्याचा प्रतिवाद करू शकलेला नाही. तुम्ही काय करावं हा आता सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे.
आपल्याला अंतिम सत्याची जाणीव झाली आहे असा ज्यांचा दावा असेल त्यांनी इतरांच्या चुका पोटात घालून सातत्याने सत्य मांडत राहणे ही त्यांची जबाबदारी आहे.मग चर्चाच होणार नाही.
साक्षात श्रीकृष्ण स्वत: अर्जुनाचा सारथी होता तरी अर्जुनाने विचारल्याशिवाय त्याने मार्गदर्शन केले नाही आणि अर्जुनाच्या इच्छेविरुद्ध सारथ्यही केले नाही.एकदा तुम्ही म्हणतायं `सत्य मांडत राहा' आणि आता म्हणताय `विचारल्याशिवाय बोलू नका'. शिवाय मी कुणाच्या रथाचं सारथ्य करत नाही कारण ज्यानं त्यानं आपला रथ चालवायचा आहे याची मला पूर्ण कल्पना आहे.
अमुक मार्ग चूक आणि तमुक मार्ग बरोबर या द्वैतातून जे बाहेर पडू शकत नाहीत त्यांना अद्वैत कसे कळावे?`मार्ग अनंत असू शकतात' हे तुमचं विधान आहे (आणि ते अर्थात योग्य आहे) याचा अर्थच मार्गात द्वैत आहे. अद्वैताप्रत पोहोचायला निश्चयात्मकपणे एकाच मार्गावर चालावं लागतं आणि अद्वैत जाणलेल्यालाच सर्व मार्गांचं आकलन असू शकतं त्यामुळे तो सर्वात सोपा मार्ग सांगू शकतो.
In reply to मार्गही अनंत असू शकतात. by संजय क्षीरसागर
येस, पण तुम्हाला एकच मार्ग अनुसरावा लागतो.हा एकच मार्ग कोणता असावा हे निवडण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. इतर मार्गांना व्यर्थ ठरवून आपलाच मार्ग बरोबर आहे असे सिद्ध करण्याची गरज वाटत असेल तर ते मानसिक असुरक्षिततेचे लक्षण आहे. अध्यात्म हे निव्वळ शब्दांतून मांडण्यापेक्षा आचरणातून दिसले पाहिजे. संतांनी केवळ अभंग लिहून ठेवले म्हणून ते श्रेष्ठ ठरत नाहीत. तर त्यांनी त्या अभंगांतील तत्वज्ञान प्रत्यक्ष आचरणात आणून दाखवले म्हणून आज त्यांना समाजात आदराचे स्थान आहे. तथागत बुद्धांना स्वत:चे बुद्धत्व शाब्दिक पांडित्यातून सिद्ध करण्याची वेळच आली नाही. त्यांच्या अस्तित्वातूनच त्यांच्या बुद्धत्वाची ओळख पटत होती.
मग चर्चाच होणार नाही.वरील प्रतिसादात प्रतिवाद हा शब्द वापरला आहे. चर्चेचा उद्देश विचारमंथन करून एका निष्कर्षाप्रत येणे हा असतो. प्रतिवादाचा उद्देश स्वत:ची बाजू बरोबर आहे हे पटवून देण्याचा असतो. तुमचा मार्ग चुकीचा आहे असे सिद्ध करण्यात कोणालाच रस नाही. पण इतर मार्ग दोषपूर्ण आहेत हे तुमचे मत इतरांना मान्य नाही. अध्यात्माचा मुख्य उद्देश इतरांचे दोष दाखवणे हा नसून स्वत:मधील दोष दूर करणे हा आहे. प्रत्येक नदी आपापल्या मार्गाने सागराला जाऊन मिळतच असते. एका नदीचे पात्र विशाल आहे म्हणून इतर नद्यांनी आपले मार्ग सोडून तिला जाऊन मिळावे अशी अपेक्षा निसर्ग देखील करत नाही.
एकदा तुम्ही म्हणतायं `सत्य मांडत राहा'इतरांच्या चुका पोटात घालून सत्य मांडत राहणे असे पूर्ण वाक्य आहे. आपल्याला अंतिम सत्याचे ज्ञान झाले आहे अशी धारणा असेल तर इतरांचे दोष दाखवण्यापेक्षा त्यांच्यात स्वत:मधील दोष दूर करण्याइतके परिवर्तन घडवून आणणे हे ध्येय असले पाहिजे.
याचा अर्थच मार्गात द्वैत आहे. अद्वैत जाणलेल्यालाच सर्व मार्गांचं आकलन असू शकतंजशी दृष्टी तशी सृष्टी. आमच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्ती ज्या जगात आहेत त्याच जगात संत महात्मे देखील आहेत. पण त्यांची जगाकडे पाहण्याची दृष्टी सामान्य जनांहून वेगळी असल्यानेच ते त्या पदाला पोचले आहेत. द्वैत हे मार्गांत नसून दृष्टीमध्ये असते. ज्यांच्या दृष्टीतच अद्वैत आहे त्यांना मार्ग अनंत असले तरी त्यांत भेद दिसत नाही.
In reply to एकच मार्ग by अवतार
In reply to एकच मार्ग by अवतार
In reply to एकच मार्ग by अवतार
तुमचा कॉम्प्युटर हँग झाला असेल?