`रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ (एक)
लेखनप्रकार
मनसे मुक्ती ही तो दरअसल मुक्ती है ! : ओशो (अष्टावक्र महागीता)
__________________________________
मन या जीवनातल्या गहनतम पैलूवरचं हे लेखन तुमच्या समोर मांडताना अतिशय आनंद होतो आहे. विषय कसा पुढे न्यावा याची कोणतीही योजना मनात नाही. तुमचे प्रतिसाद आणि प्रश्न लेखनाची दिशा ठरवतील.
अनेकानेक अंगांनी मनाचा सांगोपांग वेध घेण्याचा प्रयत्न या लेखमालेतनं होईल. वेगवेगळ्या सिद्धांचं मनाविषयीचं आकलन, व्यक्तिमत्त्वाची घडण, आपली स्मृती, माइंड-बॉडी को-ऑर्डिनेशन, मनाचा कल आणि व्यक्तिगत कौशल्य, संगीत, खेळ, फ्रॉइड आणि इतर दिग्गज मनोतज्ज्ञांचे विचार, मानवी नातेसंबंध, मनाचं हृदयाशी नातं (भावनिक विश्व : आनंद, नैराश्य, न्यूनगंड, अल्झायमर, आत्महत्या वगैरे), मानसिक धारणा, भक्तिमार्ग आणि इतर आध्यात्मिक मार्गातल्या मनापलीकडे नेणार्या साधना पद्धती आणि सरते शेवटी मनापासून मुक्ती असा लेखनाचा समग्र आवाका असेल.
____________________________
प्रथम मनाचं अत्यंत उघड स्वरूप समजावून घेऊ.
मनाच्या दोन विंग्ज आहेत, एक ऑडिओ आणि दुसरी विज्युअल. कुठलीही स्मृती मूलतः या दोन प्रकारच्या रेकॉर्डिंग्जवर आधारित असते. श्रवण आणि अवलोकन या दोन संवेदनांनी मानवी आकलनाचा जवळजवळ पंचाण्णव टक्के भाग व्यापल्यानं मन 'ऑडिओ- विज्युअल डिवाइस' आहे. इतर तीन संवेदनांनी (स्पर्श, गंध आणि स्वाद) मनाचा अत्यंत नगण्य भाग व्यापलेला आहे.
संवेदना ही मनाची कारक आहे म्हणजे कोणतीही संवेदना मन सक्रिय करते. जेव्हा आपण मनाची प्रक्रिया जाणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ‘पहिली संवेदना’ हा अत्यंत बेसिक फॅक्टर आहे हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
आजपर्यंत हजारो सिद्धांनी ‘ शांत बसून मनाकडे पाहा’ असा संदेश दिला आहे आणि आजही मनापलीकडे जाण्यासाठी ‘मनाचं तटस्थ अवलोकन’ ही (आध्यात्मिक) जगातली सर्वमान्य साधना मानली जाते. अगदी बुद्धापासून ते जे. कृष्णमूर्तीपर्यंत (इंन्क्लूडिंग ओशो) सर्व ज्ञानमार्गी या साधनेचा पुरस्कार करतात. आजवर कोट्यवधी लोकांनी ही साधना केली असेल पण ती अत्यंत निरर्थक, कंटाळवाणी आणि व्यर्थ आहे.
(भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण तो तर त्याही पेक्षा व्यर्थ आहे. अर्थात त्याविषयी मी इतक्यात काहीही लिहिणार नाही किंवा त्यासंबंधी प्रश्नही विचारले जाऊ नयेत.)
मनाचं अवलोकन व्यर्थ का आहे हे जाणणं अगत्याचं आहे. कारण मनापासून मुक्ती याचा अर्थ ‘मानसिक प्रक्रियेचं समग्र आकलन’ असा आहे. मुक्त तर आपण ऑलरेडी आहोतच. मनाच्या प्रक्रियेमुळे आपण बंधनात असल्याचा भास होतोय आणि म्हणून मनाची प्रक्रिया जाणणं उपयोगी आहे.
मन हा बायो-कंप्युटर आहे. जशी कंप्युटरची सर्व रेकॉर्डिंग्ज एकमेकांशी हेड आणि टेल अॅड्रेसेसनं जोडलेली असतात तशी आपल्या स्मृतीतली सर्व रेकॉर्डिंग्ज एकमेकांशी निगडित असतात. पण कंप्युटरमधला डेटा निर्वैयक्तिक असल्यानं तो सर्वांसाठी एकाच सलग पद्धतीनं रिट्राइव होतो आणि मन हा प्रत्येकाचा व्यक्तिगत बायो-कंप्युटर असल्यानं कुणाची स्मृती कशी सक्रिय होईल आणि त्याला किती दूर नेईल ते सांगता येत नाही.
मन सक्रिय झाल्याबरोबर आपण स्मृती चक्रात अडकून अनेकानेक गतकालीन प्रसंगातून आणि अनुभवातून फिरायला लागतो. हे इतक्या वेगानं घडतं की सुरुवात नक्की कुठून झाली हे लाखातला एखादाच जाणू शकतो.
मनाचं अवलोकन करताना आपण डोळे मिटून शांत बसलेलो असतो आणि या स्मृतीच्या चलत-चित्रपटात इतके गुंतून जातो की अवलोकन कशासाठी करतोय हेच लक्षात राहत नाही. मग मधून केव्हा तरी आपण कुठेही गेलेलो नाही, जागेवरच बसलो आहोत याचं भान येतं. मग थोडा वेळ शांत वाटतं. त्यानंतर कोणत्या तरी संवेदनेनं पुन्हा स्मृती सक्रिय होते मग पुन्हा आपण भोवर्यात सापडतो आणि या कामात बर्याच वेळा झोप लागून जाते. जाग आली की झक मारली आणि वेळ घालवला असं वाटायला लागतं. पण इतक्या थोर लोकांनी सांगितलेली साधना व्यर्थ कशी असेल म्हणून लोक रोजरोज ध्यान करत राहतात. त्यांना ज्याम कंटाळा येतो, यांच्या साधनेमुळे बर्याच वेळा घरचे वैतागतात (कारण साधनाकालात घरात शांतता लागते) पण सांगणार कुणाला? . शेवटी ते गुरुंना विचारतात आणि गुरू सांगतात ‘साधना कमी पडते आहे, जास्त वेळ बसत चला’. अशी साधना जन्मभर केली तरी काही उपयोग होत नाही कारण साधकाला मनापासून मुक्ती मिळत नाही.
मनाचं अवलोकन करायचा प्रश्न नसून त्याची चक्राकार गती जाणणं महत्त्वाचंय. म्हणजे ‘पहिला विचार कुठून सुरू झाला’ हे विचार मालिका सुरू असताना ‘कुठे तरी मध्ये थांबून बॅक ट्रॅक करणं’ ही खरी प्रोसेस आहे.
ज्या क्षणी आपल्याला ‘विचार चालू आहेत’ हे कळतं त्या क्षणी आपण मनापासून वेगळे झालेलो असतो. हा कालावधी अत्यंत अल्प असतो. या अत्यल्प कालावधीत शेवटच्या विचारापासून बॅक ट्रॅक करत पहिल्या विचारा पर्यंत येणं हा मनाची प्रक्रिया जाणण्याचं एकमेव मार्ग आहे.
हे काम अत्यंत कौशल्याचं आहे पण आता तुम्हाला प्रक्रिया कळल्यानं ते नुसतं सोपंच नाही तर अत्यंत इंटरेस्टिंग झालंय. ज्या क्षणी तुम्ही पहिला विचार जाणाल त्या क्षणी तुम्हाला कोणत्या संवेदनेनं तुमचा पहिला विचार निर्माण झाला ते कळेल. आणि मी संवेदना ही मनाची कारक आहे असं का म्हटलंय ते लक्षात येईल.
जेव्हा तुम्हाला मनाची ही समग्र प्रक्रिया समजेल तेव्हा तुमच्या वैचारिक आवर्तनांचा कालावधी कमीकमी होऊ लागेल. तुम्ही पुन्हापुन्हा वर्तमानात येऊ लागाल. मनाच्या एका महत्त्वाच्या दालनावर तुमची हुकुमत चालायला लागेल. मनाच्या अनेक प्रभागांपैकी एका व्यापक प्रभागापासनं तुम्ही मुक्ती अनुभवाल. निरंतर चालू असलेल्या वैचारिक कोलाहलातून बाहेर आल्यानं तुमच्या जीवनात शांतता येईल.
________________________________
‘रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ असं मनाचं अत्यंत कलात्मक वर्णन करणार्या काव्यपंक्तीचं श्रेय अर्थात संत ज्ञानेश्वर महाराजांना विनम्र अर्पण
________________________
पूर्वप्रकाशन : मनोगत
वाचने
47389
वाचनखूण
प्रतिक्रिया
211
स्वागत.
In reply to स्वागत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मनाचा आवाका मोठा वाटतो पण वास्तविकात
In reply to मनाचा आवाका मोठा वाटतो पण वास्तविकात by संजय क्षीरसागर
ह्म्म
In reply to ह्म्म by सोत्रि
सोत्रि, तुझ्या या एकमेव यथार्थ प्रश्नाबद्दल आभार!
In reply to सोत्रि, तुझ्या या एकमेव यथार्थ प्रश्नाबद्दल आभार! by संजय क्षीरसागर
+१
In reply to +१ by सोत्रि
ती फटाक्यांची माळ 'भमराची रुणझुण' होती जी निरर्थक आणि व्यर्थ आहे
संजय क्षीरसागर
In reply to संजय क्षीरसागर by स्पा
@रंजक लेखमाला
सुरवात आवडली आहे .
In reply to सुरवात आवडली आहे . by तर्री
प्रत्येक लेख स्वतंत्र असेल
ऑ?
हे ओशोंचे विचार आहेत की आपले
In reply to हे ओशोंचे विचार आहेत की आपले by सस्नेह
हे ओशोंचे विचार आहेत की आपले ?
In reply to हे ओशोंचे विचार आहेत की आपले ? by संजय क्षीरसागर
जर तुम्ही इतके साधक आहात तर
In reply to हे ओशोंचे विचार आहेत की आपले ? by संजय क्षीरसागर
'मनाचे तटस्थ अवलोकन' ही साधना
In reply to 'मनाचे तटस्थ अवलोकन' ही साधना by सस्नेह
जर मानसिक प्रक्रियेच्या आकलनामध्ये चित्त व्यग्र राहिले तर
वाचत आहे
मनोगत वर हिच चर्चा चालली आहे काय?
एक प्रश्न...
In reply to एक प्रश्न... by अर्धवटराव
एखादा लगाम गवसावा तसा कॉन्फिडन्स येतो!
In reply to एखादा लगाम गवसावा तसा कॉन्फिडन्स येतो! by संजय क्षीरसागर
मनाची प्रक्रिया ऐच्छिक करणं हे आपलं काम आहे
In reply to मनाची प्रक्रिया ऐच्छिक करणं हे आपलं काम आहे by अर्धवटराव
हा ऐच्छीकपणा कोणाचा ?
In reply to हा ऐच्छीकपणा कोणाचा ? by संजय क्षीरसागर
आपला???
In reply to आपला??? by अर्धवटराव
तुम्ही म्हटलं आहे कि "दुसरं मन" असं काही नसतं...
In reply to तुम्ही म्हटलं आहे कि "दुसरं मन" असं काही नसतं... by संजय क्षीरसागर
इच्छा
In reply to इच्छा by जे.जे.
प्रभावी न झालेल्या विचाराला काय म्ह्णतात?
In reply to तुम्ही म्हटलं आहे कि "दुसरं मन" असं काही नसतं... by संजय क्षीरसागर
जरा बोलू का अर्धवटराव?
In reply to जरा बोलू का अर्धवटराव? by प्यारे१
ह्म्म्म्म...
In reply to जरा बोलू का अर्धवटराव? by प्यारे१
हे सरांसाठी नाही?
In reply to हे सरांसाठी नाही? by संजय क्षीरसागर
सर, बस्स का? आम्हाला थोडं
In reply to सर, बस्स का? आम्हाला थोडं by प्यारे१
खेळून उपयोग काय?
In reply to खेळून उपयोग काय? by संजय क्षीरसागर
खिक्क्क!
In reply to खिक्क्क! by प्यारे१
आता काय म्हणावे या बेशरमपणाला
In reply to आता काय म्हणावे या बेशरमपणाला by धन्या
खिक्क्क!
In reply to आता काय म्हणावे या बेशरमपणाला by धन्या
सॉरी शक्तिमान!
In reply to सॉरी शक्तिमान! by प्यारे१
ह्या धाग्यावर हुल्लडबाजी
ह्या धाग्यावर हुल्लडबाजी करायलाह्या ह्या हया... गजा खोत आठवला. :-DIn reply to ह्या धाग्यावर हुल्लडबाजी by मोदक
ये मै नही कहता, उन्होने ही
In reply to तुम्ही म्हटलं आहे कि "दुसरं मन" असं काही नसतं... by संजय क्षीरसागर
:)
In reply to :) by अर्धवटराव
मनाशी इतकं गहन तादात्म्य झालंय की स्वतःचा विसर पडलायं
जबरदस्त लेखमाला
In reply to जबरदस्त लेखमाला by राजेश घासकडवी
तुम्ही थक्क झालात!
In reply to जबरदस्त लेखमाला by राजेश घासकडवी
>>मला वाटतं मन म्हणजे हार्ड ड्राइव्ह आणि मी म्हणजे सीपीयू बहुतेक
In reply to >>मला वाटतं मन म्हणजे हार्ड ड्राइव्ह आणि मी म्हणजे सीपीयू बहुतेक by उन्मेष दिक्षीत
मी म्हणजे निराकार जाणिव
In reply to मी म्हणजे निराकार जाणिव by संजय क्षीरसागर
>> मी म्हणजे निराकार जाणिव
मन वढाय वढाय
In reply to मन वढाय वढाय by संजय क्षीरसागर
अजीबात पटलं नाहि.
In reply to अजीबात पटलं नाहि. by अर्धवटराव
तुम्ही बहिणाबाईंनी केलेलीच चूक करताय!
In reply to तुम्ही बहिणाबाईंनी केलेलीच चूक करताय! by संजय क्षीरसागर
असेल कदाचीत.
अतिशय धडाकेबाज सुरुवात...
In reply to अतिशय धडाकेबाज सुरुवात... by अग्निकोल्हा
दादा ? काय म्हणता ?
In reply to अतिशय धडाकेबाज सुरुवात... by अग्निकोल्हा
नीट समग्रतेनं लेख वाचून प्रतिसाद द्यावेत
In reply to नीट समग्रतेनं लेख वाचून प्रतिसाद द्यावेत by संजय क्षीरसागर
माझा सर्वात प्रमुख आक्षेप हा
In reply to माझा सर्वात प्रमुख आक्षेप हा by अग्निकोल्हा
असो. अनावश्यक फाटे फोडण्यापेक्षा आवरत घेतो.
In reply to असो. अनावश्यक फाटे फोडण्यापेक्षा आवरत घेतो. by अग्निकोल्हा
शाब्बास आणि अभिनंदन!
In reply to शाब्बास आणि अभिनंदन! by संजय क्षीरसागर
तुम्ही सर्वात हुशार आहात. कंपेर टू बुध्द, जेके, अन ओशो टु
In reply to तुम्ही सर्वात हुशार आहात. कंपेर टू बुध्द, जेके, अन ओशो टु by अग्निकोल्हा
एखादा अतिशय महत्वाचा व योग्य मुद्दा ?
In reply to एखादा अतिशय महत्वाचा व योग्य मुद्दा ? by संजय क्षीरसागर
तुमच्या आकलनातल्या त्रुटी
In reply to तुमच्या आकलनातल्या त्रुटी by राजेश घासकडवी
ज्जे बात!
In reply to माझा सर्वात प्रमुख आक्षेप हा by अग्निकोल्हा
सामान्य उदाहरणेच लेखातिल त्रुटि स्पश्ट करतिल?
In reply to सामान्य उदाहरणेच लेखातिल त्रुटि स्पश्ट करतिल? by संजय क्षीरसागर
क्षीरसागरजी, सर्वात आधी एक
In reply to क्षीरसागरजी, सर्वात आधी एक by मदनबाण
मन कुठे असते ते तुम्हाला माहित आहे का ?
In reply to मन कुठे असते ते तुम्हाला माहित आहे का ? by संजय क्षीरसागर
सध्या मी `नाम साधनेवर '
In reply to सध्या मी `नाम साधनेवर ' by मदनबाण
राम चिंतनात असवा असा त्या ओवीचा बोध आहे.
In reply to राम चिंतनात असवा असा त्या ओवीचा बोध आहे. by संजय क्षीरसागर
कुठे असतो हा राम?
In reply to कुठे असतो हा राम? by मदनबाण
>>>भ्रम नक्की कोणाला होतो ?
In reply to >>>भ्रम नक्की कोणाला होतो ? by प्यारे१
अच्छा अच्छा असं हाय का ?
In reply to अच्छा अच्छा असं हाय का ? by मदनबाण
आपल्या प्रतिसादाला सविस्तर उत्तर
उत्तम लेखमाला. माझे डोळे
In reply to उत्तम लेखमाला. माझे डोळे by प्यारे१
मनसे मुक्ती ही तो दरअसल
In reply to मनसे मुक्ती ही तो दरअसल by अग्निकोल्हा
तुम्ही सांगितलेली प्रक्रिया करून तर पाहा, तुम्हाला लगेच कळेल
In reply to तुम्ही सांगितलेली प्रक्रिया करून तर पाहा, तुम्हाला लगेच कळेल by संजय क्षीरसागर
तुम्ही सांगीतलेली प्रक्रिया...
In reply to तुम्ही सांगीतलेली प्रक्रिया... by अर्धवटराव
इट वर्क्स अॅज यु एक्सप्लेन्ड!
जबरदस्त........... लिखाण आवडलं
In reply to जबरदस्त........... लिखाण आवडलं by चेतन माने
म्हणजे शांती फक्त वर्तमानातच असण्यात आहे तर...
+१००
बॅक ट्रॅक करुन पाहिले तुम्हि
म्हणजे ‘पहिला विचार कुठून
In reply to म्हणजे ‘पहिला विचार कुठून by जे.जे.
पहिला विचार कुठला ते कसं ठरवायच?
च्यामारी
हा राम कुठे असतो?
In reply to हा राम कुठे असतो? by संजय क्षीरसागर
थोडक्यात देव दिसला असं
क्षीरसागरजी सर्वाय प्रथम मी
In reply to क्षीरसागरजी सर्वाय प्रथम मी by मदनबाण
वाचतोय!
In reply to क्षीरसागरजी सर्वाय प्रथम मी by मदनबाण
बाणराव...
In reply to बाणराव... by अर्धवटराव
तुमच्याशी वर लिंक दिली आहे तिथे सांगोपांग चर्चा केलीये
In reply to तुमच्याशी वर लिंक दिली आहे तिथे सांगोपांग चर्चा केलीये by संजय क्षीरसागर
भ्रम...
In reply to भ्रम... by अर्धवटराव
तिथले (आणि इथले देखील) प्रतिसाद इतके काँटॅडीक्टरी आहेत ?
In reply to तिथले (आणि इथले देखील) प्रतिसाद इतके काँटॅडीक्टरी आहेत ? by संजय क्षीरसागर
अपेक्षीत प्रतिसाद.
In reply to अपेक्षीत प्रतिसाद. by अर्धवटराव
एकतर तुम्ही काय लिहीताय त्याचा अर्थ तुम्हाला कळत नाहीये किंवा
In reply to एकतर तुम्ही काय लिहीताय त्याचा अर्थ तुम्हाला कळत नाहीये किंवा by संजय क्षीरसागर
असं आहे होय?