`रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ (एक)
In reply to स्वागत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मनाचा आवाका मोठा वाटतो पण वास्तविकात by संजय क्षीरसागर
निरंतर चालू असलेल्या वैचारिक कोलाहलातून बाहेर आल्यानं तुमच्या जीवनात शांतता येईल.ह्यानुसार जीवनात शांतता कशी येईल ? - (विचारात पडलेला) सोकाजी
In reply to ह्म्म by सोत्रि
समजा ही आवर्तने मनात चालू आहेत : माझ्या नोकरीत मेजर प्रोब्लेम चालू आहे -> नोकरी राहिल की नाही माहिती नाही -> कदाचित नोकरी जाईल -> च्यायला नोकरी गेली तर काय? -> 'इएमआय'चे काय करायचे? -> बायको मुलं उपाशी मरतील -> च्यायला ती मॅनेजरची चमची आहे तिची नोकरी काही जात नाही -> पण तिचा फॉर्म अजून कडक आहे -> त्यानेच बहुतेक मॅनेजर तिच्यावर फिदा आहे -> तिला ते कळत नसावे का? -> तिला ह्या वर्षीच्या पार्टीत समजावून द्यायचा प्रयत्न केला होता -> पण शी..तीलाही त्याची जाणिव असूनही काही फरक नाही! -> च्यायला कुठे चाललो मी ? ->
इथे थांबून बॅक ट्रॅक केले आणि मूळ विचारापर्यंत आले की 'नोकरीचे काय करायचे?'यू हॅव मिस्ड ऑन द वेरी लास्ट स्टेप! पहिला विचार होता 'नोकरीचे काय करायचे?' पण तो कोणत्या संवेदनेनं सक्रिय झाला? दॅटस द पॉइंट. मग तुझ्या लक्षात येईल: समोर असलेली कॉईन त्रूची बाटली दिसली आणि त्या संवेदनेनं हे सगळं सुरू झालं! बाटली दिसल्यावर किंमत आठवली (मायला, परवडणार का हे आयुष्यभर असा विचार आला) आणि मग.... माझ्या नोकरीत मेजर प्रोब्लेम चालू आहे -> नोकरी राहिल की नाही माहिती नाही -> कदाचित नोकरी जाईल ->... ही फटाक्याची माळ लागली. ज्या क्षणी `समोर असलेली कॉईन त्रूची बाटली पाहून हे सुरू झालं' हे लक्षात येईल त्या क्षणी तुम्ही शांत व्हाल. कारण पहिली गोष्ट म्हणजे अजून नोकरी गेलेली नाही. दुसरी गोष्ट, आता इथे बसून आपण कितीही विचारमैथुन केलं तरी समोर प्रसंग उभा राहिल्या शिवाय स्वतःला छळून काही उपयोग नाही. तुम्ही शांतपणे दोन-चार नव्या ठिकाणी सिवी पाठवाल, मित्रांना फोन करून वेकन्सी असेल तर कळवायला सांगाल आणि सगळं झालं की बाटली उघडाल! यू विल स्टार्ट सेलिब्रेशन. मी तुम्हाला मनाच्या कोलाहलातून बाहेर यायचा मार्ग सांगतोय. एकदा भ्रमाराची रुणझूण थांबली, तुम्ही शांत झालात की प्रसंग कसा हाताळायचा ते तुमचं कौशल्य आहे.
In reply to सोत्रि, तुझ्या या एकमेव यथार्थ प्रश्नाबद्दल आभार! by संजय क्षीरसागर
In reply to +१ by सोत्रि
In reply to संजय क्षीरसागर by स्पा
In reply to सुरवात आवडली आहे . by तर्री
आजवर कोट्यवधी लोकांनी ही साधना केली असेल पण ती अत्यंत निरर्थक, कंटाळवाणी आणि व्यर्थ आहे.बापरे ! म्हणजे अर्थपूर्ण आणि सफल साधना कोणती ते तुम्हालाच फक्त माहिती आहे ? आदर वाढला आहे...
In reply to हे ओशोंचे विचार आहेत की आपले by सस्नेह
म्हणजे अर्थपूर्ण आणि सफल साधना कोणती ते तुम्हालाच फक्त माहिती आहे ?तुम्ही `मनाचं तटस्थ अवलोकन' ही साधना केली आहे का? केली असेल तर तुमचा अनुभव काय आहे? या लेखात लिहीलेल्या प्रक्रियेचा तुम्ही अनुभव घेतला का? ते इतक्या चटकन होणरं काम नाही. पण प्रक्रिया यशस्वी होता क्षणी तुम्हाला अनुभव येईल. तुमचा प्रतिसाद वेगळा असेल
In reply to हे ओशोंचे विचार आहेत की आपले ? by संजय क्षीरसागर
In reply to हे ओशोंचे विचार आहेत की आपले ? by संजय क्षीरसागर
मनापासून मुक्ती याचा अर्थ ‘मानसिक प्रक्रियेचं समग्र आकलन’हे कसे ? जर मानसिक प्रक्रियेच्या आकलनामध्ये चित्त व्यग्र राहिले तर मनाच्या व्यवहारांपासून मुक्ती कशी मिळणार ? मनाच्या अभिव्यक्तींपासून संपूर्णतया अलिप्त असणारे 'Absolute' असे स्वत्व, त्याची जाणिव मनाच्या माध्यमातून होऊ शकत नाही. तेव्हा मनाचे आकलन होण्याचा उद्देश काय ?
In reply to 'मनाचे तटस्थ अवलोकन' ही साधना by सस्नेह
मनाच्या व्यवहारांपासून मुक्ती कशी मिळणार ?मनाच्या प्रक्रियेला जाणणारा, मनाशी तादात्म्य पावत नसल्यानं कायम मुक्तच असतो.
मनाच्या अभिव्यक्तींपासून संपूर्णतया अलिप्त असणारे 'Absolute' असे स्वत्व, त्याची जाणिव मनाच्या माध्यमातून होऊ शकत नाही. तेव्हा मनाचे आकलन होण्याचा उद्देश काय ?मुळ फंडा असा आहे की आपण मनापेक्षा वेगळे आहोत. मनामुळे (किंवा सतत चालू असलेल्या विचार प्रवाहामुळे) आपल्याला समोरचा निराकार दिसत नाही किंवा शांतता ऐकू येत नाही. बॅकट्रॅक ही प्रक्रिया तुम्हाला प्राथमिक ठेवून मनाला दुय्यम करते आणि मनाची प्रक्रिया उलगडवते. एकदा निराकार दिसला आणि शांतता ऐकू आली की आपण 'निराकार शांतता आहोत' हा बोध होणं क्रमप्राप्त आहे, आणि त्याला सिद्धत्व म्हटलंय.
In reply to एक प्रश्न... by अर्धवटराव
In reply to एखादा लगाम गवसावा तसा कॉन्फिडन्स येतो! by संजय क्षीरसागर
In reply to मनाची प्रक्रिया ऐच्छिक करणं हे आपलं काम आहे by अर्धवटराव
मला वाटतं कि इच्छा, आकांक्षा, राग-लोभ, सुख-दु:ख... या तर सर्व मनाच्या भानगडी आहेत.अर्थात, पण त्यात आपण सापडलेलो नाही काय? त्या सर्व भानगडी मनाच्या परीघात घडत असतांना मनाची प्रक्रिया जाणणं महत्त्वाचं ठरत नाही काय? मग ओशो म्हणतात तसं `मनसे मुक्ती ही तो दरअसल मुक्ती है !' सार्थ वाटत नाही का? ....आणि तेच तर या लेखनाचं प्रयोजन आहे.
In reply to हा ऐच्छीकपणा कोणाचा ? by संजय क्षीरसागर
In reply to आपला??? by अर्धवटराव
म्हणजे ज्याप्रमाणे मनात इच्छा उत्पन्न होतात तशा "आपल्यात"ही उत्पन्न होतात ?इच्छा मनात उत्पन्न होतात, मन शरीरात आहे आणि आपलं शरीर आणि मनाशी इतकं तादात्म्य आहे की आपल्याला वाटतं `मला इच्छा झाली'.
आपण मनाची प्रक्रिया शोधण्यापेक्षा आपल्या इच्छेची प्रक्रिया शोधावी...इच्छा मनात उत्पन्न होतात, त्यामुळे मनाचा उलगडा इच्छेचा उलगडा करतो. इच्छा म्हणजे प्रभावी झालेला विचार.
(२) मनाची इच्छा आणि आपली इच्छा अशा दोन वेगवेगळ्या स्वतंत्र यंत्रणा आहेत काय?अर्थात! इच्छा हा प्रभावी झालेला विचार असला तरी त्यावर कृती करणं आपल्या हातात आहे. मानसिक प्रक्रियेचा वेध जर आपण `विचार' या प्राथमिक स्टेजला म्हणजे संवेदना या उगमापाशीच घेतला तर इच्छा मनाच्या कह्यात राहणार नाही. आपण स्वेच्छेनं जगायला लागू. त्यालाच तर मी स्वच्छंद जगणं म्हणतोय आणि ओशो `मनसे मुक्ती' म्हणतायत.
(३) आपला ऐच्छीकपणा" काय भानगड आहे?आपण काय करायचं ते ठरवतो आणि मनाला ते करण्यासाठी फॅकल्टी म्हणून वापरतो. आपण प्राथमिक आणि मन दुय्यम होतं.
(४) इच्छेचा स्त्रोत आणि वर्क एरीया जर केवळ "आपण" असु....याचं उत्तर वर दिलंय
In reply to तुम्ही म्हटलं आहे कि "दुसरं मन" असं काही नसतं... by संजय क्षीरसागर
In reply to इच्छा by जे.जे.
मनात कि (मेन्दुत?) प्रभावी झालेले सर्व विचार नेहेमीच इच्छा असतात का?नाही. त्या विचारानं आपलं समग्र लक्ष वेधून घेतलं की त्याचं रूपांतर इच्छेत होतं.
In reply to तुम्ही म्हटलं आहे कि "दुसरं मन" असं काही नसतं... by संजय क्षीरसागर
In reply to जरा बोलू का अर्धवटराव? by प्यारे१
In reply to जरा बोलू का अर्धवटराव? by प्यारे१
कार्याच्या स्वरुपावरुन त्याला मन, बुद्धी, चित्त अशी नावं दिली गेली आहेत= मनाचं आकलन नसताना तुम्ही वेगवेगळ्या कल्पना मांडून निष्कारण गोंधळ घालतायं. तुमच्याकडे निव्वळ माहिती आहे, अनुभव नाही हे तुमचे (प्रदीर्घ) प्रतिसाद (वेळोवेळी) स्पष्टपणे दाखवतात. इथे ही तुम्ही सुरूवातीला दोन `नो बॉल' टाकून पाहिलेत आणि आता हा प्रतिसाद!
चहा घ्यावा की नको म्हणणारं मन, चहा घेऊ म्हणून निर्णय घेणारी बुद्धी, चहाचा तो समोर येऊन पिण्यापर्यंतच्या प्रवासात चहाचा विचार धरुन ठेवणारं चित्त.चहा घ्यावा हे आपण ठरवतो, उत्तमात उत्तम चहा, प्राप्त परिस्थितीत कुठे मिळेल हे ठरवायला मनाचा उपयोग करतो आणि शरीर त्या बरहुकुम कृती करतं. निर्णय खुद्द आपण घेतलेला असल्यानं संभ्रमाचा प्रश्न येत नाही आणि तो धारण करण्याचा तर त्याहून नाही कारण ती सर्व प्रक्रिया आनंददायी असते.
In reply to हे सरांसाठी नाही? by संजय क्षीरसागर
In reply to सर, बस्स का? आम्हाला थोडं by प्यारे१
कारण ती सर्व प्रक्रिया आनंददायी असते.कुणाला कशात आनंद तर कुणाला कशात, कसं?
In reply to खेळून उपयोग काय? by संजय क्षीरसागर
In reply to खिक्क्क! by प्यारे१
In reply to आता काय म्हणावे या बेशरमपणाला by धन्या
In reply to आता काय म्हणावे या बेशरमपणाला by धन्या
In reply to सॉरी शक्तिमान! by प्यारे१
ह्या धाग्यावर हुल्लडबाजी करायला
ह्या ह्या हया... गजा खोत आठवला. :-DIn reply to ह्या धाग्यावर हुल्लडबाजी by मोदक
In reply to तुम्ही म्हटलं आहे कि "दुसरं मन" असं काही नसतं... by संजय क्षीरसागर
In reply to :) by अर्धवटराव
कृती करण्याची इच्छा/निर्णय घेणे हे मनाचं काम आहे. इथे "आपण" फॅक्टर कुठुन आला?आजपर्यंत मनच इच्छा/निर्णय घेणं ही कामं करतंय आणि आपण असहाय्यपणे त्यात ओढले जातोय. इतके की आपल्याला स्वतःची इच्छा आणि निर्णय घेण्याची क्षमता आहे हे उमजलेलंच नाही.
इच्छेचे उगमस्थानच जर मन आहे......तुमची पुन्हापुन्हा तीच चूक होतेय (आणि इतक्या वर्षांच्या धारणांमुळे ते स्वाभाविक आहे) . तुम्ही इच्छेची भाषा करताय, मी स्वेच्छेचा मार्ग सांगतोय. इच्छा म्हणजे मनात स्वयेच निर्माण होऊन प्रभावी झालेला विचार, तो स्मृतीशी निगडित असतो. स्वेच्छा म्हणजे आपण संपूर्णपणे वर्तमानात असतांना झालेली अंतःप्रेरणा. ही अंतःप्रेरणा प्रथम आपल्याला सुखावते आणि मग मनाचा उपयोग करून आपण ती प्रत्यक्षात आणतो. अशा कृत्यात नेहमी आनंद असतो आणि त्यावर फेरविचार करण्याची गरज भासत नाही. मी इथे कितीही लिहीलं तरी हा नुसत्या चर्चेचा विषय नाही. स्वेच्छेनं जगणं हा व्यक्तिगत अनुभव आहे (आणि हे स्वानुभवानं लिहीतोय). तुम्ही एकदम पुढच्या पायरीला जाऊ शकणार नाही. प्रथम मनाच्या प्रक्रियेचं आकलन झालं पाहिजे.
..... "आपण" अॅज सच कुणी नाहि.प्रतिसादात पुढेपुढे तुम्ही स्वतःला संपूर्ण नाकारताय, ते स्व-विस्मरण गहन झाल्याचं निदर्शक आहे.
In reply to जबरदस्त लेखमाला by राजेश घासकडवी
In reply to जबरदस्त लेखमाला by राजेश घासकडवी
In reply to >>मला वाटतं मन म्हणजे हार्ड ड्राइव्ह आणि मी म्हणजे सीपीयू बहुतेक by उन्मेष दिक्षीत
In reply to मी म्हणजे निराकार जाणिव by संजय क्षीरसागर
In reply to मन वढाय वढाय by संजय क्षीरसागर
In reply to अजीबात पटलं नाहि. by अर्धवटराव
प्रक्रिया अनैच्छीक नसली तरी तिला कंट्रोल करावं कि नाहि हा ऐच्छीक भागच आहे... व तो मनाचाच निर्णय आहे.बहिणाबाईंना वाटतंय मनाची प्रक्रिया अनैच्छिक आहे आणि म्हणून त्या ‘मन वढाय वढाय’ म्हणतायत. संपूर्ण कविता त्याच धारणेचा परिपोष आहे. तुम्ही त्यांच्या एक स्टेप पुढे जाताय, तुम्हाला वाटतंय ती प्रक्रिया स्वाधिन करणं `मनाचं काम आहे'. तुम्ही पुन्हा स्वत:ला विसरतायं. मनाची प्रक्रिया ऐच्छिक करणं आपल्या मर्जीवर आहे आणि तेच संबंध लेखभर आणि सर्व प्रतिसादातून मी सांगतोय. तुमची बेसिकच चूक होतेय त्यामुळे प्रतिसादातल्या उर्वरित भागावर बोलण्यात अर्थ नाही कारण तो त्याच चुकीचा फक्त विस्तारित भाग आहे.
In reply to तुम्ही बहिणाबाईंनी केलेलीच चूक करताय! by संजय क्षीरसागर
मनाच्या दोन विंग्ज आहेत, एक ऑडिओ आणि दुसरी विज्युअल. कुठलीही स्मृती मूलतः या दोन प्रकारच्या रेकॉर्डिंग्जवर आधारित असते.म्हणजे ? हेलन केलर ला मन न्हवत का हो ? अन मनाला जाणवणारे स्पर्शज्ञान वगैरे वगैरे वगैरे थोतांडच की ???
In reply to अतिशय धडाकेबाज सुरुवात... by अग्निकोल्हा
In reply to अतिशय धडाकेबाज सुरुवात... by अग्निकोल्हा
श्रवण आणि अवलोकन या दोन संवेदनांनी मानवी आकलनाचा जवळजवळ पंचाण्णव टक्के भाग व्यापल्यानं मन 'ऑडिओ- विज्युअल डिवाइस' आहे. इतर तीन संवेदनांनी (स्पर्श, गंध आणि स्वाद) मनाचा अत्यंत नगण्य भाग व्यापलेला आहे.आपण नॉर्मल मनाचा उलगडा करून घेतो आहोत. तुम्ही अपवादात्मक केसेसमधे आणू नका. हेलन केलर डेफ-ब्लाइंड होती आणि ती यश मिळवू शकली याचा अर्थ तीनं बाकीच्या तीन संवेदनांच्या मदतीनं तृटी भरून काढली. पण याचा अर्थ तिला मन नव्हतं असा नाही. मेंदू सर्व संवेदनांच्या रेकॉर्डींगचं काम करतो. तिला मेंदू नव्हता असं नाही. जाणिव आपल्याला होते ती इंद्रियगम्य असते (पाच संवेदना) आणि मेंदूत त्याची साठवण केली जाते.
In reply to नीट समग्रतेनं लेख वाचून प्रतिसाद द्यावेत by संजय क्षीरसागर
मनाच्या दोन विंग्ज आहेत, एक ऑडिओ आणि दुसरी विज्युअल. कुठलीही स्मृती मूलतः या दोन प्रकारच्या रेकॉर्डिंग्जवर आधारित असते.याच वाक्याला आहे. तो तुम्हाला विनाशंका मान्य असेल तर लेखातिल इतर चुकिच्या मुद्यांवरही विस्त्रूत चर्चा होइल. त्यातही अपवादात्मक केसेसकडे लक्ष द्यायची गरजच नाहिये. अगदी सामान्य उदाहरणेच लेखातिल त्रुटि स्पश्ट करतिल.
In reply to माझा सर्वात प्रमुख आक्षेप हा by अग्निकोल्हा
In reply to असो. अनावश्यक फाटे फोडण्यापेक्षा आवरत घेतो. by अग्निकोल्हा
माणुस ज्या इंद्रियाचा वापर इतरांशी क्म्युनिकेशन करायला सगळ्यात जास्त वापरतो (नॉर्मल माणुस द्रुक श्राव्य माध्यम) त्याच्या संबधिच स्मृति सगळ्यात जास्त असतातआता तुम्ही नॉर्मलवर आलात!
असो. अनावश्यक फाटे फोडण्यापेक्षा आवरत घेतो.लेखन नीट वाचलंत तर असा प्रसंग पुन्हा येणार नाही.
In reply to शाब्बास आणि अभिनंदन! by संजय क्षीरसागर
लेखन नीट वाचलंत तर असा प्रसंग पुन्हा येणार नाही.अहो वाचलंच होतं म्हणून तर फाटे फोडत होतो. पण अचानक चर्चेची उर्मीच गेली बघा. वाटलं कशाला हा विक्षिप्त टाइमपास ? कारण फाटे फोडता फोडाता कंटाळा येउन एखादा अतिशय महत्वाचा व योग्य मुद्दा समजा अतिशय व्यवस्थित विरोधात सांगुनही गेलो तरी तो थोडाच तुमच्याकडुन मान्य केला जाणार आहे ? भेंडी, जो बुध्द जेके अन ओशों, एकाच लायनीत आउटस्मार्ट करतो तेच्या पुढं सालं आपन कोण बे बोलणारे ?
In reply to तुम्ही सर्वात हुशार आहात. कंपेर टू बुध्द, जेके, अन ओशो टु by अग्निकोल्हा
समजा अतिशय व्यवस्थित विरोधात सांगुनही गेलो तरी तो थोडाच तुमच्याकडुन मान्य केला जाणार आहे ?तुम्हाला `विक्षिप्त टाइमपास' वाटला असला तरी मला नाही. मी सर्व उत्तरं प्रामाणिकपणे दिली आहेत
भेंडी, जो बुध्द जेके अन ओशों, एकाच लायनीत आउटस्मार्ट करतो तेच्या पुढं सालं आपन कोण बे बोलणारे ?मी `मनाचं अवलोकन' या साधनेला त्या सर्वांच्या असणार्या दुजोर्याबद्दल लिहीलं आहे. या सर्वांचा समग्र आणि सखोल अभ्यास केल्याशिवाय तसं म्हटलेलं नाही. त्या सर्वांचे उत्तमोत्तम पैलू आज माझ्याकडे आहेत आणि त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी असेन. त्यांना आउटस्मार्ट वगैरे करण्याचा विचारही मी करू शकत नाही. पण `अवलोकन' साधनेचा दोष मला माहिती आहे आणि सर्वांना उपयोगी व्हावी म्हणून एक नवी साधना सांगितलीये. तुम्ही त्या प्रक्रियेचा काहीही संबंध न ठेवता : डायरेक्ट हेलन केलरला मन नव्हतं का? लेखनातल्या त्रुटी, इतर त्रुटींवर विस्तृत चर्चा, मन नष्ट झालं काय? वगैरे सुरू केल्यामुळे तुमच्या आकलनातल्या त्रुटी दाखवाव्या लागल्या.
In reply to एखादा अतिशय महत्वाचा व योग्य मुद्दा ? by संजय क्षीरसागर
तुमच्या आकलनातल्या त्रुटी दाखवाव्या लागल्या.माझ्याही आकलनात अनेक त्रुटी आहेत बहुतेक. त्या दाखवून देण्यासाठी तुम्ही किती चार्ज करता? मिपावरती जाहीर चर्चा करण्याऐवजी मला प्रायव्हेट सेशन आवडेल, म्हणून विचारतो आहे. व्यनिने उत्तर दिलंत किंवा खरडवहीत कळवलं तरी चालेल.
In reply to तुमच्या आकलनातल्या त्रुटी by राजेश घासकडवी
In reply to माझा सर्वात प्रमुख आक्षेप हा by अग्निकोल्हा
आज सकाळिच पावसात खाल्लेल्या कांदाभजिची जिभेवर चव रेंगळणे यात मनाच्या ऑड्योव्हिड्योमेमोरीचा संबधच नाहीये म्हणजे मन नष्ट झाले की काय ?स्वाद आणि गंध या इंद्रियगम्य संवेदना आहेत आणि त्यांची स्मृती मेंदूत आहे. तुम्ही सारखं `मन नष्ट झालं काय?' असा घोषा लावला आहे. लेखनात एक पैश्याची चूक नाही. तुम्हाला रेकॉर्ड आणि रेकॉर्डिंग डिवाइस यातला फरक कळत नाहीये. जर सकाळी केलेल्या गोष्टीची स्मृती संध्याकाळी होत नसेल तर तो मेंदूचा प्रॉब्लम आहे, मनाचा नाही.
In reply to सामान्य उदाहरणेच लेखातिल त्रुटि स्पश्ट करतिल? by संजय क्षीरसागर
In reply to क्षीरसागरजी, सर्वात आधी एक by मदनबाण
आता मला सांगा हे संत वेडे की तुम्ही शाहणे ?सध्या मी `नाम साधनेवर ' काहीही लिहीणार नाही हे प्रथमच सांगितलं आहे.
प्रभाते मनी राम चिंतीत जावा।आता तुम्ही सांगा, कुठे असतो हा राम?
यावरुन एकच गोष्ट सहज सिद्ध होते ती म्हणजे मनाला लगाम लावणे किंवा त्यावर नियंत्रण ठेवणे वाटते तितके सोप्पे अजिबात नाही.सोपं आहे असं मी म्हणतोय, फक्त प्रक्रिया योग्य हवी. ती तुम्ही करून पाहिली की लक्षात येईल. प्रक्रिया निर्वैयक्तिक आहे आणि त्यासाठी कोणत्याही श्रद्धेची गरज नाही.
मनाचे अवलोकन केले नाही तर त्याच्या गतीचा प्रभाव कसा कळणार ?एक अत्यंत सोपी प्रक्रिया लेखात सांगितली आहे. पण मजा म्हणजे त्याविषयी कुणीही काहीही बोलत नाहीये.
ज्या क्षणी मनाला फक्त एकाच गोष्टीवर नियंत्रीत करण्यात यश मिळते त्या क्षणी इतर विचार नाहीसे होताततसं नाही. तुम्ही विचारांच्या कारक असलेल्या पहिल्या संवेदनेपाशी येता तेव्हा मनाची सर्व प्रक्रिया थांबते.
हिप्नोटिझम किंवा साउंडमेडिटेशन मधे माईंड ड्रिफ्ट ऑफ {drift of } होते."गाढ झोपेत" सुद्धा माईंड ड्रिफ्ट ऑफ होते.निद्रेवर अजून लेखन होणार आहे.
मला फक्त पक्षाचा डोळाच दिसतो आहे हे अर्जुनाने दिलेले उत्तर इतर विचारापासुन तो वेगळा झाला आहे आणि लक्ष फक्त एकाच जागी केंद्रित झाले आहे याचे उत्तम उदाहरण आहे.ते मनाच्या केंद्रिकरणाचं उदाहरण आहे, ती मनाची एक क्षमता आहे. आपण संपूर्ण मनाच्या प्रक्रियेचा उलगडा करतोय.
In reply to मन कुठे असते ते तुम्हाला माहित आहे का ? by संजय क्षीरसागर
In reply to सध्या मी `नाम साधनेवर ' by मदनबाण
In reply to राम चिंतनात असवा असा त्या ओवीचा बोध आहे. by संजय क्षीरसागर
In reply to कुठे असतो हा राम? by मदनबाण
In reply to >>>भ्रम नक्की कोणाला होतो ? by प्यारे१
In reply to अच्छा अच्छा असं हाय का ? by मदनबाण
In reply to उत्तम लेखमाला. माझे डोळे by प्यारे१
In reply to मनसे मुक्ती ही तो दरअसल by अग्निकोल्हा
In reply to तुम्ही सांगितलेली प्रक्रिया करून तर पाहा, तुम्हाला लगेच कळेल by संजय क्षीरसागर
In reply to तुम्ही सांगीतलेली प्रक्रिया... by अर्धवटराव
(तपशीलाबद्दल थोडा मतभेद आहे. या (इतर तत्सम) प्रक्रियेचा कर्ता आणि उपभोक्ता स्वतः मनच आहे हा माझा अनुभव)यथावकाश तुम्हाला `स्व' चा बोध होईल.
In reply to जबरदस्त........... लिखाण आवडलं by चेतन माने
एवढ्या थंड डोक्याने इतक्या वेगवेगळ्या प्रश्न आणि शंकांना तुम्ही उत्तर देतायजे लिहीतोय तो माझा अनुभव आहे त्यामुळे मी निश्चिंत आहे.
जे लिहीतोय तो माझा अनुभव आहे त्यामुळे मी निश्चिंत आहे.नक्कीच :)
In reply to म्हणजे ‘पहिला विचार कुठून by जे.जे.
In reply to हा राम कुठे असतो? by संजय क्षीरसागर
In reply to क्षीरसागरजी सर्वाय प्रथम मी by मदनबाण
In reply to क्षीरसागरजी सर्वाय प्रथम मी by मदनबाण
In reply to बाणराव... by अर्धवटराव
प्रॅक्टीकली भ्रम म्हणजे जे नाही त्याचा आभास.आणि तुमच्या तिथल्या शेवटच्या प्रतिसादालाही सविस्तर उत्तर दिलंय. आता मला पुन्हा वेळ घालवायचा नाही.
In reply to तुमच्याशी वर लिंक दिली आहे तिथे सांगोपांग चर्चा केलीये by संजय क्षीरसागर
In reply to भ्रम... by अर्धवटराव
पण त्यात मूळ मुद्द्याला साजेसं काहि मटेरीअल नसणार याची खात्री आहे.इतकी खात्री आहे तरी तुम्ही मला प्रश्न विचारता! खाली एका प्रतिसादात तर तुम्ही प्रक्रिया बरोबर असं देखील आहे म्हटलंय.
In reply to तिथले (आणि इथले देखील) प्रतिसाद इतके काँटॅडीक्टरी आहेत ? by संजय क्षीरसागर
In reply to अपेक्षीत प्रतिसाद. by अर्धवटराव
तुम्ही सांगीतलेली प्रक्रिया...इट वर्क्स अॅज यु एक्स्प्लॅण्ड
In reply to एकतर तुम्ही काय लिहीताय त्याचा अर्थ तुम्हाला कळत नाहीये किंवा by संजय क्षीरसागर
स्वागत.