एलियनायटीसेलिया भाग २
मागील भागः एलिनायटीसेलिया भाग १
{डिस्केमर}यातले बरेचसे फोटो मी माझ्या मित्रांच्या साईट्सवरून घेतले आहेत. विचार होताच फोटो टाकायचा आणि तशी मागणीही आल्यामुळे आता माझी हिंमत वाढली आहे (पाणी घालण्याची!).{डिस्क्लेमर संपलं}
विमानतळाबाहेर आले, त्याने वर्णन केलं होता तसा एक "सांताक्लॉज" दिसला; हातात एक कागद होता, त्यावर अत्यंत गचाळ अक्षरात लिहिलं होतं Jodrell Bank Observatory. त्याचं लक्ष नव्हतं माझ्याकडे, मीच पुढ्यात उभी राहिले आणि म्हटलं, "तू इयन का? मी संहिता, संहिता जोशी."
"हो, मीच तो. मँचेस्टरमधे आणि या देशातही मी तुझं स्वागत करतो.", इयन म्हणाला. इयन हा साधारण साठीच्या पुढचा, जवळजवळ ९९% केस पांढरे झालेला, पण तरिही अतिशय उत्साही, तरुण वाटला. ट्रॉली ढकलत तो मला स्वतःच्या गाडीकडे घेऊन गेला. गाडी विमानतळाच्या बाहेर आली आणि समोर आले भव्य, रुंद, स्वच्छ, नुकत्याच एखाद सरीने धुतले गेलेले रस्ते! समोरचं जंक्शन दाखवत इयन म्हणाला, "आपण इथून आता विल्मस्लोच्या दिशेने जाऊया. इथून मँचेस्टर उत्तरेला आहे आणि आपली ऑब्झर्व्हेटरी आहे दक्षिणेला, दोन्ही साधारण १५ मैलांवर!". एकदम डोक्यात प्रकाश पडला, सायबाच्या देशात अजूनही इंपीरियल युनिट्स वापरतात, मैल, यार्ड, दगड (स्टोन, वजन मोजायला), पाईंट (pint) वगैरे. अर्थात या पाईंटची गंमत असते, फक्त दूध आणि बियर या पाईंटमधे मोजतात, बाकी पेट्रोल आणि पाण्यासाठी लिटर्स... असो. इयन पुढे सांगत होता, "तुला आधी जसं इमेलमधे सांगितलं आहे तसं तिथे जवळपास काहीही मिळत नाही. तर आपण एखाद्या वाटेवरच्या दुकानात थांबूया आणि तुला काही, दूध, फळं, वगैरे घ्यायचं असेलच!" मी हो म्हटलं, आणि आठवलं, माझ्या जुन्या काही शिक्षकांनी त्याच्यासाठी "रिगार्ड्स" पाठवले होते, ते दिल्यावर तो लगेचच "थ्यँक्स" म्हणाला. त्या दोघा शिक्षकांची चौकशी झाली. तोपर्यंत आम्ही एका दुकानासमोर थांबलो. छोटसंच दुकान होतं, आणि शुक्रवार दुपार असल्यामुळे फारशी गर्दीही नव्हती. मी दुकानात शिरले.
आतमधे गेल्यावर मात्र मी चक्रावलेच. छोट्या, कमी प्रमाणात काही नाहीच. दूध घ्यायचं तर कमीतकमी ४ पाईंट होतं, २ लिटरपेक्षा जास्त, भाज्या आधीच प्लास्टीकमधे पॅक केलेल्या, मला एकटीला एक भाजी तीनदा होईल एवढी, फळांचीपण तीच गत! "एवढं सगळं घ्यायचं आणि अर्ध्यावर टाकून द्यायचं", या विचारानी पुन्हा वाईट वाटलं. शिवाय पौंडात खर्च होणार होता ती गोष्ट निराळीच! एक लिटर दूध साधारण ८० रुपयाला. आत्तातर खिशातले रुपयेच होते, रुपयातून विकत घेतलेले पौंड म्हणजे रुपयेच ना! पण घरी एवढं काही लोकांनी सांगितलं होतं "प्रत्येक वेळी रुपये मोजू नकोस, पौंड मोज", ते आठवलं, आणि साधारण पाचेक दिवस पुरेल एवढं सामान घेतलं आणि बाहेर आले. माझ्या हातातली एकमेव पिशवी बघून इयनला आश्चर्यच वाटलं, "हे काय? तुला हे एवढंच सामान लागणार? आत्तातर तुझ्याकडे काहीच नाही आहे खायला-प्यायला." मी म्हटलं, "जसं लागेल तसं तसं आणेन आणखी नंतर." ब्रिटीश लोकांना भारतीय पद्धतीचं जेवण फार आवडतं ही माहिती तेव्हा मला नव्हती. त्यामुळे आता ही आयती आली आहे तर नवीन काहीतरी खाता येईल, शिकून घेता येईल हा त्याचा डाव माझ्या लक्षात यायला बरेच दिवस गेले. इयन म्हणाला, "ते ही बरोबरच आहे. बरं तुला पहिले घरी जायचंय का ऑब्झर्व्हेटरीत?". मला पहिले ऑब्झर्व्हेटरीत जायचं होतं, इयननी गाडी त्या दिशेला नेली. "आपल्याला तो टेलिस्कोप दिसतोय ना, तिकडे जायचंय," इयननी गाडी चालवताना एकीकडे बोट दाखवलं, आणि ते पाहून माझं तोंड उघडंच राहिलं. प्रचंड मोठा (७६ मी. व्यास) टेलिस्कोप आकाशात एका दिशेला, क्षितिजाच्याजवळ बघत होता, शेजारी एक चिंटू त्या मोठ्याकडे पहातोय की काय असं वाटत होतं आणि त्या दोन टेलिस्कोप आणि आमच्या मधे एक विस्तीर्ण शेत, त्यात टर्फ "पिकवतात" अशी तत्पर माहिती इयनने दिली.
"सध्या संध्याकाळच्या वेळेस पल्सार्स बघितले जातात, आणि तो छोटा आहे ना तो मुलांना शिकवण्यासाठी आहे. बहि:शाल विभागाचे विद्यार्थी आले आहेत आत्ता तिकडे, ते लोक नक्की क्रॅब नेब्युला बघत असणार!" इयननी माझ्या माहितीत पुन्हा एकदा भर टाकली. बोलता बोलता आम्ही आतमधे पोहोचलो. "या मुख्य इमारतीत शिरताना कोड माहित असणं गरजेचं आहे," इयननी मला कोड सांगितला. अहो आश्चर्यम्, आमचा ठाण्याच्या घरच्या फोन नंबरचे शेवटचे आकडे आणि हे चार, सारखेच, तंतोतंत! मला लगेच जॉड्रल आवडायला लागली. "संध्याकाली चार ते साडेचार सगळे लोक चहा पितात आणि सकाळी अकरा ते साडेअकराचा कॉफिब्रेक असतो. आत्ताच लोक चहा पिऊन गेले असतील, पण नील असेल अजून कदाचित टी-रुममधे! तो पेपरातलं सुडोकू सोडवत होता. आता शुक्रवारी काय तो पाचनंतर काम करणार आहे?", असं इयन म्हणतच होता आणि मला घेऊन टी-रूममधे आला. समोरच एक प्रश्न आला. "हाय, तू संहिताच ना?"
क्रमशः
"सध्या संध्याकाळच्या वेळेस पल्सार्स बघितले जातात, आणि तो छोटा आहे ना तो मुलांना शिकवण्यासाठी आहे. बहि:शाल विभागाचे विद्यार्थी आले आहेत आत्ता तिकडे, ते लोक नक्की क्रॅब नेब्युला बघत असणार!" इयननी माझ्या माहितीत पुन्हा एकदा भर टाकली. बोलता बोलता आम्ही आतमधे पोहोचलो. "या मुख्य इमारतीत शिरताना कोड माहित असणं गरजेचं आहे," इयननी मला कोड सांगितला. अहो आश्चर्यम्, आमचा ठाण्याच्या घरच्या फोन नंबरचे शेवटचे आकडे आणि हे चार, सारखेच, तंतोतंत! मला लगेच जॉड्रल आवडायला लागली. "संध्याकाली चार ते साडेचार सगळे लोक चहा पितात आणि सकाळी अकरा ते साडेअकराचा कॉफिब्रेक असतो. आत्ताच लोक चहा पिऊन गेले असतील, पण नील असेल अजून कदाचित टी-रुममधे! तो पेपरातलं सुडोकू सोडवत होता. आता शुक्रवारी काय तो पाचनंतर काम करणार आहे?", असं इयन म्हणतच होता आणि मला घेऊन टी-रूममधे आला. समोरच एक प्रश्न आला. "हाय, तू संहिताच ना?"
क्रमशः
वाचन
9526
प्रतिक्रिया
27
वा फ़ास्ट
In reply to वा फ़ास्ट by भडकमकर मास्तर
अरेच्चा
नमस्कार
In reply to नमस्कार by ऋषिकेश
हो, अरे
वाचत
अरे वा....
वाचतो आहे..
हा भाग
In reply to हा भाग by मेघना भुस्कुटे
असेच म्हणतो
In reply to असेच म्हणतो by आनंदयात्री
नाही रे,
चिंटू आवडला
In reply to चिंटू आवडला by टारझन
बरोबर
In reply to बरोबर by आनंदयात्री
>>पटकन्
In reply to >>पटकन् by ३_१४ विक्षिप्त अदिती
अगं बाई
In reply to चिंटू आवडला by टारझन
बरोबर
In reply to बरोबर by आनंदयात्री
दोनदोनदा
In reply to चिंटू आवडला by टारझन
बरोबर
व्वा..छान...प
छान..
छान.. मजा
तो एलीयन
In reply to तो एलीयन by विजुभाऊ
जरा दम धरा
छान पण थोडे
In reply to छान पण थोडे by सुनील
>> लिहिलय
ह्म्म
"प्रत्येक वेळी रुपये मोजू नकोस, पौंड मोज",
मस्त लेखन शैली.