सावरकर आणि नेहरु.... दोन दिग्गजांना अभिवादन
In reply to >>> अंदमानला सावरकरांचा पुतळा by श्रीगुरुजी
In reply to नेहरू आणि सावरकर या दोन भिन्न by श्रीगुरुजी
नेहरूंना सुदैवाने अनेक गोष्टी मिळाल्या. ते तब्बल १७ वर्षे पंतप्रधान होते. आपल्या पंतप्रधान पदाच्या कारकीर्दीत त्यांनी असंख्य गंभीर घोडचुका केल्या. त्याचे दुष्परिणाम भारत आजही भोगत आहे. काश्मिर प्रश्नावर युद्ध न करता तो प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नेणे, काश्मिरला विशेष दर्जा देणे....,काश्मीर प्रश्नावर काळेकाकांच्या या धाग्यावर अगदी मॅरॅथॉन चर्चा झाली आहे. तरीही त्यात न मांडलेले (किंवा ४७४ प्रतिसादांमध्ये कुठेतरी हरवलेले) मुद्दे मी इथे मांडत आहे. काश्मीरात पाकिस्तानी घुसखोरांनी केलेल्या हल्ल्यावर तत्कालीन महासत्तांनी (अमेरिका, इंग्लंड) अगदी पहिल्यापासून पाकिस्तानला अनुकूल अशीच भूमिका घेतली होती. त्याचे कारण स्पष्ट होते. काश्मीरचे भौगोलिक स्थान लक्षात घेता तिकडे बेस स्थापन करता आल्यास आजूबाजूच्या बऱ्याच प्रदेशावर नजर ठेवणे शक्य होणार्यातले होते.आणि असा बेस स्थापन करायला नेहरूंचा भारत कदापि मान्यता देणार नाही पण पाकिस्तान देईल हे न कळण्याइतके अमेरिकेचे नेते दुधखुळे नव्हते.तेव्हा अमेरिकेने पाकिस्तानला समर्थन देणे क्रमप्राप्त होते. आपल्याला २०१३ मध्ये बसून १९४७-४८ मध्ये नक्की काय घडले हे classified documents आपल्याकडे नसताना सांगता येणे कठिण आहे.तेव्हा इतर अनेक लोक तर्क करतात तसा हा माझा तर्कच समजा.काश्मीर प्रश्नावर अमेरिका भारताला समर्थन देत नाही हे समोर दिसतच होते.पाकिस्तानच्या बाजूने १९४७-४८ मध्येच अमेरिका युध्दात उतरली असती का?आपल्याला या प्रश्नाचे उत्तर नक्की देता येणार नाही पण नंतरच्या काळात अनेक ठिकाणी अमेरिकेने ज्या पध्दतीने स्वत:चा स्वार्थ साधायला नाक खुपसले ते पाहता ती शक्यता अगदी ०% असे वाटत नाही.तसे झाले असते तर साध्या शब्दात सांगायचे तर आपल्याला पार्श्वभागाला पाय लावून पळ काढावा असता.अमेरिकेशी लढण्याइतके त्या काळी प्रबळ होतो का?आणि असे होण्याची शक्यता किती याची माहिती आपल्याला २०१३ मध्ये आहे त्यापेक्षा १९४७-४८ मध्ये नेहरूंना जास्त असणार यात शंका नाही. तेव्हा काय करा?जग त्यावेळी भारताला महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखत होते.तसेच युनोमध्ये आपण प्रश्न नेण्यामुळे भारत सरकारला शांतता हवी आहे ही high ground position भारताला घेता येणे शक्य झाले.तेव्हा शांतता पाहिजे असलेल्या महात्मा गांधींच्या देशाविरूध्द उघड उघड position घेणे हे अमेरिकेतल्या लोकांना विकता येणाऱ्यातली गोष्ट नव्हती (not easy to sell). सगळ्यात महत्वाचे म्हणजे नेहरूंनी काश्मीर प्रश्न युनोत नेला तो UN Charter च्या Chapter 6 अंतर्गत.या चॅप्टर अंतर्गत युनोमध्ये आणलेल्या प्रश्नांवर युनोने पास केलेले ठराव संबंधित देशांसाठी बंधनकारक नसतात.तेव्हा युनोने आपल्या बाजूने ठराव पास केल्यास तो आपला विजय आणि आपल्या विरूध्द ठराव पास केल्यास त्याला फाट्यावर मारणे या दोन्ही गोष्टी करता येण्यासारखी ही खेळी होती.नंतरच्या काळात युनोने युध्दबंदी करायचा ठराव पास करूनही त्या ठरावाला ७-८ महिने फाट्यावर मारून आपले सैन्य लढतच होते यावरून ही गोष्ट लक्षात येईलच. आणि काश्मीर-युनोचा विषय निघालाच आहे म्हणून नंतरच्या युध्दबंदीचा विषयही निघणार म्हणून आधीच लिहितो.काळेकाकांच्या धाग्यावरील चर्चेत थत्तेचाचा, धनंजय इत्यादींचे मुद्दे परत मांडायचे टाळतो. या दुव्यावर २ जानेवारी १९४९ चा इंडिअन एक्सप्रेस बघता येईल.त्या पेपरमध्ये काश्मीरातील युध्दबंदीची बातमी आहे.त्या बातमीत एक वाक्य आहे: "it seems that Pandit Nehru took his cabinet colleagues into confidence". जर नेहरूंनी काश्मीर प्रश्नाचा विचका केला आणि सरदार पटेलांच्या हातात सुत्रे असती तर प्रश्न चुटकीसरशी सुटला असता असे म्हणणाऱ्यांना मला एक प्रश्न नेहमी विचारावासा वाटतो:काश्मीरात युध्दबंदी करायच्या निर्णयाविरूध्द सरदार पटेलांनी राजीनामा का दिला नाही?पंतप्रधानांशी मतभेद झाले म्हणून मंत्र्यांनी राजीनामे द्यायचे प्रकार झाले का नव्हते? त्यातून काश्मीर प्रश्न म्हणजे कुठचा तरी क्षुल्लक प्रश्न नव्हता की ज्यावरून डावलले जाणे पटेलांनी फारसे गांभीर्याने घेतले नसते.तसेच शामाप्रसाद मुखर्जी सुध्दा त्यावेळी नेहरूंच्या मंत्रीमंडळात मंत्री होते.त्यांनी नंतर लियाकत अली खान-नेहरू कराराच्या विरोधात राजीनामा दिला पण काश्मीरातील युध्दबंदीच्या विरोधात राजीनामा दिला नाही.याचा अर्थ हा काश्मीरात युध्दबंदी करणे हा घुसखोरांना अजून मागे पिटाळणे शक्य नाही हे लक्षाय येऊन सर्वानुमते घेतलेला निर्णय होता.मग त्या निर्णयाचे "खलनायक" एकटे नेहरू कसे? मी कोणत्याही पक्षाचा कट्टर समर्थक वगैरे अजिबात नाही.त्यामुळे सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या गोष्टींवर माझे अनुकूल-प्रतिकूल मत मांडत असतो आणि तसे करणे कोणाचाही समर्थक नसल्यामुळेच शक्य होते.
In reply to काही मुद्दे by क्लिंटन
In reply to >>> जग त्यावेळी भारताला by श्रीगुरुजी
In reply to (No subject) by आजानुकर्ण

In reply to >>> जग त्यावेळी भारताला by श्रीगुरुजी
In reply to >>> जग त्यावेळी भारताला by श्रीगुरुजी
पण 'आपण आता स्वतंत्र राष्ट्र असल्याने ब्रिटिश व्यक्ती आमचा राष्ट्रप्रमुख असू शकत नाही' असे बाणेदारपणे सांगून पाकिस्तानने ही मागणी धुडकावली.छे हो कुठला बाणेदारपणा आणि कुठचे काय. पाकिस्तानला इतका स्वाभिमान असता तर नंतरच्या काळात अमेरिकेपुढे इतका लाळघोटेपणा त्यांनी केला असता का? आजही पाकिस्तानात माऊंटबॅटन आणि नेहरूंविषयी राग आहे.त्याचे कारण काय?तर या दुकलीने मुस्लिम लीगच्या नेत्यांना अंधारात ठेऊन पंजाबमधील गुरदासपूर जिल्हा (५१% मुस्लिम लोकसंख्येचा) भारतात ठेऊन घेतला.तो पाकिस्तानात गेला असता तर काश्मीरला जोडणारा एकही खुष्कीचा मार्ग भारताकडे राहिला नसता आणि काश्मीर भारतात ठेवणे जवळपास अशक्य झाले असते. याविषयी अनेक लेख मी पाकिस्तानी वर्तमानपत्रांमध्ये वाचले आहेत. त्यातील दोन लिंका इथे देतो: एक आणि दोन
युद्धबंदी केल्यावर पटेल वगैरेंनी राजीनामा का दिला नाही हे मला माहित नाही. कदाचित भारत नुकताच स्वतंत्र झाला असल्याने सुरवातीलाच समस्या निर्माण करू नयेत या भूमिकेतून त्यांनी राजीनामा दिला नसावा.महात्मा गांधींची हत्या व्हायच्या तास-दीड तास आधी पटेलांनी गांधीजींची भेट घेतली होती.त्यावेळी पटेल नाराज होते आणि राजीनामा द्यायच्या मनस्थितीत होते असे गांधीजींच्या रॉबर्ट पेन या लेखकाने लिहिलेल्या चरित्रात वाचले आहे.या भेटीत गांधीजींनी नक्की पटेलांना काय सांगितले याची कल्पना नाही.पण गांधीजींच्या सांगण्यावरून किंवा नंतर त्यांचीच हत्या झाल्यानंतरच्या परिस्थितीत राजीनामा देऊ नये असे वाटून पटेलांनी राजीनाम्याचा निर्णय रहित केला.पण जानेवारी १९४९ पर्यंत देशातील दंगली संपल्या होत्या.तसेच हैद्राबादचा कटकटा प्रश्न मार्गी लागला होता.तेव्हा पटेलांना तडफेने मार्गी लावण्यासारखा इतर कोणता मोठा प्रश्न उरला होता असेही वाटत नाही.तरीही पटेलांनी राजीनामा दिला नाही याचाच अर्थ पटेलांचीही युध्दबंदीच्या निर्णयाला संमती होती असा घेतला तर त्यात काय चुकले?
लष्करी अधिकार्यांनी लिहिलेल्या अजून काही लेखानुसार, केवळ काही दिवसातच भारतीय सैन्याने लाहोर काबीज करून पाकिस्तानी घुसखोरांनी व्यापलेला काश्मिरचा भाग मुक्त करता आला असता. परंतु युद्धबंदी केल्याने भारतीय सैन्याची आगेकूच थांबली.ऑक्टोबर १९४७ ते डिसेंबर १९४८ या काळात भारतीय सैन्याला घुसखोरांना मागे का पिटाळता आले नाही या प्रश्नाचे उत्तर त्या लेखात नसेलच. असो.मी नेहरू समर्थक नक्कीच नाही (चीनप्रश्नावरील त्यांच्या भूमिकेला माझे समर्थन नाही).पण कोणत्याही राजकीय नेत्याचे मूल्यमापन मुद्द्यांच्याच आधारे व्हायला हवे (भावनेच्या किंवा आपल्या विचारसरणीच्या आधारे नाही) या भावनेतून मला नेहरूंविषयी जे काही लिहायचे आहे ते लिहिले आहे.
In reply to आणखी काही मुद्दे by क्लिंटन
In reply to काही मुद्दे by क्लिंटन
In reply to मग त्या निर्णयाचे "खलनायक" एकटे नेहरू कसे? by अर्धवटराव
In reply to काही मुद्दे by क्लिंटन
In reply to १९४८ साली अमेरिका by श्रीगुरुजी
१९४८ साली अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने कदाचित युद्धात उतरली असती असे मला वाटत नाही. इतर अनेक देशांप्रमाणे अमेरिकासुद्धा दुसर्या महायुद्धात पोळून निघालेली होती. लगेचच २-३ वर्षात पुन्हा युद्धात पडणे अमेरिकेने टाळले असते.पण १९५० मध्येच अमेरिका कोरिअन युध्दात उतरलीच होती आणि ते युध्दही चांगले तीन वर्ष चालले होते.आणि युध्दात पोळून निघणेच म्हणत असाल तर मोठ्या देशांपैकी युध्दात सर्वात कमी नुकसान झाले ते अमेरिकेचेच. अमेरिकेच्या मुख्य भूमीवर एकही बॉम्ब पडला नाही की एकही गोळी झाडली गेली नाही.
१९४८ च्या युद्धापूर्वी भारत-पाकिस्तानचा जन्म होउन जेमतेम ४ महिने झाले होते. इतक्या कमी अवधीत अमेरिकेला या दोन्ही देशांच्या परराष्ट्र धोरणाचा पुरेसा अंदाज आला नसणार. काश्मिरमध्ये पाकिस्तान लष्करी तळ उभारु देईल व भारत असा तळ उभारू देणार नाही असा अंदाज अमेरिकेला इतक्या कमी अवधीत आलेला नसणार.पण नेहरूंचा साम्राज्यवादाला असलेला विरोध हा पण अमेरिकेला माहिती नव्हता? तसेच ब्रिटिशांच्या फोडा आणि राज्य करा या भूमिकेला यश येऊन पाकिस्तानची निर्मिती झाली.तसेच मुस्लीम लीगचा लढा ब्रिटिशांविरूध्द असण्यापेक्षा "हिंदू" काँग्रेसविरूध्द होता.तेव्हा त्या दृष्टीनेही पाकिस्तानचा इंग्लंड-अमेरिकेला विरोध असायचे कारण नाही हे अमेरिकेच्या लक्षात आले नसेल असे वाटत नाही.
In reply to नेहरू आणि सावरकर या दोन भिन्न by श्रीगुरुजी
In reply to तुलना चुकीची by फारएन्ड
In reply to तुलना चुकीची by फारएन्ड
पाकला अनुकूल असण्याबद्दल ब्रिटिशांबद्दल जे लिहीले आहे ते खरे आहे, पण माझ्या माहितीनुसार सुरूवातीला अमेरिका भारतालाच अनुकूल होती. अटलांटिक करार महायुद्ध संपल्यावर भारताला लागू झाला पाहिजे याकरिता चर्चिलवर्/अॅटलीवर अमेरिकेने दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता.अटलांटिक करार दुसरे महायुध्द चालू असतानाचा.महायुध्दात वसाहतींचे सहकार्य मिळावे या उद्देशाने चर्चिलने युध्द संपल्यानंतर वसाहतींना स्वातंत्र्य देण्यात येईल असे म्हटले पण हा करार भारताला लागू होणार नाही असेही म्हटले. याचे कारण म्हणजे चर्चिलचा भारताविषयीचा दुस्वास हे असावेच आणि दुसरे म्हणजे भारत ही ब्रिटिश साम्राज्याची सगळ्यात मोठी वसाहत होती.भारताला स्वातंत्र्य दिल्यास साम्राज्य लयाला जाईल याची कल्पनाही चर्चिलना असावी.त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट यांनी युध्दानंतर भारतालाही स्वातंत्र्य द्यावे असे म्हटले होते.पण त्यांनीही तो मुद्दा नंतर लावून धरला नाही. पुढे १९४५ मध्ये रूझवेल्ट यांचे निधन झाले आणि हॅरी ट्रुमन अध्यक्ष झाले.त्यांचा काही प्रश्नांमध्ये approach रूझवेल्ट यांच्यापेक्षा वेगळा होता.उदाहरणार्थ पॅलेस्टाईनमध्ये इस्राएलची स्थापना होण्यास हॅरी ट्रुमन यांचा wholehearted पाठिंबा होता तर रूझवेल्ट यांचा त्यामानाने थंड approach होता.पुढे जॉन केनेडींचा भारताविषयीचा approach आणि लिंडन जॉन्सन आणि त्यानंतर रिचर्ड निक्सन यांचा approach यात फरक होता.तेव्हा रूझवेल्ट यांच्या कार्यकालात अमेरिकेचे भारताच्या स्वातंत्र्याला समर्थन असले तरी ट्रुमन अध्यक्ष झाल्यावर अमेरिका भारताच्या बाजूने होती असे नक्कीच नाही. (हे निर्णय अनेकदा त्या काळाची गरज म्हणून घेतलेले असतात.जॉन केनेडींचा भारताविषयीचा approach चांगला असला तरी समजा केनेडी १९७१ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष असते तर त्यांनी निक्सनपेक्षा फार काही वेगळे केले असते असे वाटते नाही).
तसेच पूंछ व गिलगिट हे भाग मूळ काश्मीर राज्यातले असल्याने भारतात गेले पाहिजेत असाही आग्रह तेव्हा युनोमधे अमेरिकेने धरला होता. पण खुद्द भारतानेच तो आग्रह सोडला तेव्हा.याविषयी आणखी सविस्तर लिहाल का? हे यापूर्वी मी कधीच वाचले नव्हते.
In reply to सावकराना प्रातःस्मरणीय by विजुभाऊ
In reply to >>> भारतीय जनता पक्ष या by श्रीगुरुजी
In reply to स्वा. सावरकर विरुद्ध महात्मा गांधी हा वाद आंतरजालावर बरेचदा रंगत by अनिरुद्ध प
In reply to सत्तेवर असणे वेगळे आणि सत्ते by पिंपातला उंदीर
कन्दाहार विमान अपहरण, कारगिल, संसदेवर हलला , गुजरात दंगल अशे अनेक डाग लीलया झेललेकाँग्रेस वाले आणि त्यांचे समर्थक च होते ना या सगळ्यात. विचारा अफझल गुरु च्या भुताला.. कुणी जिवंत ठेवलं त्याला इतके दिवस.. आणि का जिवंत ठेवलं.. संसदेवर हल्ल्याच्या मागे कोण होतं? गोध्रा इथे हिंदूंचं हत्याकांड करण्यामागे कोणती 'सेक्युलर' शक्ती कार्यरत होती.. बीजेपी वाले नेभळट आहेत हे खरच आहे. नसतील तर सत्तेवर आल्यावर काँग्रेस वाल्यांना आणि त्यांच्या समर्थकांना घरातून फरपटत आणून तुरूंगात टाकतीलच. करूणानिधी ला टाकला तसा.
स्व.स्वा.वी.सावरकरांना...