आम्हा घरी धन..
"...आलेल्या सुखाकडे, प्रेमाच्या पूर्तीकडे, जन्मोजन्मीच्या मोहाकडे विठोबा पाठ फिरवतो तो देवमाणुस म्हणून. देवमाणूस म्हणूनच तो चिरंतन दुःखाचे आवाहन करतो. ते आटू देत नाही. सुखाच्या वरदानाहून, कर्तव्याचा व सत्याच रंग असलेले दुःख अधिक सुफळ असते..." -- पंढरीचा विठोबा : पैस : दुर्गा भागवत
"...मी माझ्या भक्तांना सुख देत नाही. दुःख देतो. दारिद्र्य देतो. मुद्दामच करतो मी ते. पराभक्तीचे सुख मानवमात्राला मिळावे, मला भक्ताशी एकरूप होण्याचे भाग्य मिळावे, म्हणून मी तसे करतो. तिळभर आशा जरी माझ्या भक्ताला राहिली तरी मी ती मोडतो. त्याला निराश करणे मला आवडते. कारण, निराशेची शीग गाठल्याशिवाय, ऐहिक वासना मेल्याशिवाय परमसुखाचा कोंबही कुठे रुजत नाही. ऐहिक सुख हा मी आणि माझे भक्त यांच्यामधला अंतराय आहे; तो मी दूर करतो. माझ्या भक्तांना निर्वाणीच्या घडीला, आर्त झाल्यावर, माझ्याशिवाय अन्य सहारा राहू नये म्हणून मी फार जागरूक असतो. म्हणूनच दुःखांची पेरणी करून मी त्याला दुखवतो नि टोचून, तापवून माझ्याकडे वळवतो. एकदा माझ्याकडे आल्यावर नि माझ्याशी तद्रूप झाल्यावर ही दुःखे, ही दैन्ये, हे क्लेश मिटतात. कायमचे मिटतात. तिथून सुख फुटते..." -- व्दारकेचा राणा : पैस : दुर्गा भागवतता.क.: हे लेखन माझ्या ब्लॉग वर पुर्वप्रकाशीत आहे.
In reply to दुर्गा भागवत by पांथस्थ
In reply to लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच by सुहास..
वेळ आणि परवानगी असल्यास अजुन टाकतो
चेष्टा करतो काय..?? बिन्धास्त टाक!!! :-)In reply to वेळ आणि परवानगी असल्यास अजुन by मोदक
In reply to लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच by सुहास..
अनेकदा आपल्या प्रिय व्यक्तीवर लोकांनी चुकीने, न समजता आरोप केलेले असतात असे आपल्याला वाटत असते. असे आरोप कधी खरे असतात, तर कधी नसतात, तर कधी गैरसमज असतात. कधी अशा व्यक्तींना शूर, किंवा उत्तम किंवा खुजे किंवा दुष्ट किंवा लबाड म्हणून सिद्ध करण्यासाठी म्हणून काहींनी त्यांच्याविषयी लंब्याचौड्या बाता मारलेल्या असतात. अशा आपल्याशी जोडलेल्या लोकांवरचे आरोप दूर करण्याची कधीकधी इच्छा होऊ शकते. जेव्हा ही व्यक्ती या काळात, जितीजागती, रक्ताच्या नात्याने जोडलेली अशी आपल्यासमोर असते किंवा आरोप दूर होण्याशी काहीतरी स्वार्थ जोडलेला असतो, तेव्हा असे आरोप दूर करणे एखाद्याच्या दृष्टीने निकडीचे असू शकते. मात्र जेव्हा अशी व्यक्ती ही अनेक पिढ्यांमागची, लांबची नातेवाईक असण्याची शक्यता असते, तेव्हा अशा काळाने, आहाराविचाराने दूरस्थ अशा व्यक्तीवरचे असे आरोप दूर झाले काय किंवा नाही झाले काय, आपल्या "खुद्द" स्वत:च्या सध्याच्या स्थितीत काहीही ढिम्म फरक पडणार नाही असे बहुदा दिसून येते. उगाच वेळ वाया का घालवा? भारतातल्या ऐतिहासिक गोष्टींत इतकी भेसळ झाली आहे की कशाचा कशाला पत्ता लागत नाही. या अशा कथांमधील भेसळीला दूर करून अशा कथेतील ऐतिहासिक सत्य काय असू शकते याचे थोडेफार अंदाज लावण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो, पण तसा करण्याची गरज आहे का असा प्रश्न स्वतःलाच विचारावा.
अमोल (जातीवंत भटका) चे एके काळचे गूगल स्टेटस.
गड कसा पाहावा याचं एक तंत्र आहे. तो धावता पळता पहाता उपयोगाचा नाही. त्याची भौगोलीक पार्श्वभूमी, त्याचं नकाशातील स्थान, संरक्षणदृष्ट्या त्याचं महत्वं, त्याच्या जवळ असलेले घाट, मैदान, खिंडी, पठार, नद्या, ओढे, रणक्षेत्र, त्यावर चढायचे मार्ग, त्यावरून दिसणारा प्रदेश, त्या प्रदेशातील किल्ले, शिखरं, त्यांची मजबूती, त्यावरील पाण्याची ठिकाणं-हौद, तलाव, त्याचे तट, त्याचे बुरूज, त्याची प्रवेशद्वारं.... हे सगळं कसं नीट तपासलं पाहिजे, तरचं त्याचं महत्व ध्यानी येतं. धावता पळता किल्ला बघायला तो काही भोज्जा नव्हे !
आजच व्यनीमधून मिळालेले डोस.. ;-)
Effort is very important. But, knowing 'when', 'where', and 'how' to apply it, gets the results 'you want'
आणखी पेस्टवतो आहे..In reply to मिपाकर चित्रा मॅडमनी एके by मोदक
सीटला, टाकीला ओरखडे पडले /पडतात. याचा अर्थ बोका एकटा झोपत नाही.टाकीवर पुरेशी पकड (ग्रीप)न मिळाल्याने ओरखळे उठतात. काही दिवसानी ओरखळ्यांची नवलाई संपली की तो गपगुमान झोपून राहील. या बाबतीत दुय्यम स्वरुपाचे असे काही प्रश्न मनात येतात. तो झोपण्यापूर्वी वेगवेगळे आवाज काढतो का ? तसे असेल तर प्रकरण नविन आहे. आवाज नसेल तर भाटी जुनीच आहे असे समजा. सिटवर सकाळी केस मिळतात का ते बघा. कदाचीत भाटी येत नसेल पण बोका दाढी करत असेल .केस आढळले नाहीत तर तो बोका नसून भाटी आहे असे समजा .भाटी बोक्यापेक्षा वस्ताद असते आणि तिची नखे तिक्ष्ण असतात. नखांवरून भाटी आहे की बोका ते समजते. अंगपरीक्षा करावयाचा प्रयत्न करू नये.काहीवेळा गळ्यापर्यंत उडी मारून जुगुलर का काहीशा नावाची नस पकडते.जुगुलरचा आणि जुगण्याचा काही संबंध नाही.त्या नसा वेगळ्या . त्यांची नावे एखाद्या हुशार विद्यार्थ्याला विचारावी. पराचा अभ्यास बरा आहे असे म्हणतात बॉ. पूर्वी धम्याला पण मांजरी पाळण्याचा षौक होता म्हणे. पण त्याला नोकरी लागली .त्याखेरीज मिपावर एक कृष्णमार्जार प्रेमी नावाचा मुलग्या आहे. त्याला विचारा. तूर्तास त्या मार्जारावर लक्ष ठेवा . ते आत झोपले की वरून मच्छरदाणी घाला. नंतर सिटवर (गाडीच्या ) पाणी ओता. हे पाणी ओतण्यापूर्वी कोसला नावाची एक कादंबरी वाचा. त्यात मांजर हाकलण्या/पकडण्यासाठी एक आख्खा धडा आहे. ह्या धड्यामुळे ते लेखक अजूनही बोक्यासारखी मिशी ठेवतात. हां तर मी सांगत होतो ते पाणी ओतण्यासाठी .पाणी ओतले की कुत्र्याचा पण मूड जातो.पूर्वी असं काही आमच्या घराच्या समोर असं काही आलं की आमचा गडी पाणी ओतायचा ते आठवलं. हां तर मच्छरदाणी. काळ्या रंगाची नको. फार पूर्वी गिरणगावात एकाच रुम मध्ये दोन कुटुंब राहयची तेव्हा काळ्या मच्छरदाणीचा वापर केला जायचा. मांजराला संकोच नसतो. त्यामुळे पांढरी वापरली तरी चालेल. पाणे ओतल्यावर मार्जार बाहेर येईल .त्याची नखे मच्चारदाणीत अडकतील .मग मच्छरदाणीमें मांजर. त्यानंतर पुण्यात असाल तर लकडीपुलावर जा. लकडीपूल माहीती नसेल तर मिपावर एक लेख आला होता लकडीपूलाचा तो वाचा. तो वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की दुचाकी वाहनाला प्रवेश नाही. नो प्रॉब्लेम तुम्ही सरकारी नोकर आहात. तुम्हाला कोणीच प्रश्न विचारणार नाही. तुम्हाला प्रश्न पडला तर तर ....मिपावर पुढचा धागा टाका.
:-)) :-)) :-))In reply to रामदास काकांचा एक अशक्य by मोदक
परवाच मी पुण्याला चाललो होतो .. बाईकवर .. तोच रस्त्यात मला एक गाय दिसली , तिने मला हाय केले .. पण मला घाई असल्याने मी तिला बाय म्हंटले , म्हणतात ना "जिसका टोपी उसका डिजे " . पण झाले काय ते माहित नाय , तिला आला राग .. तिने उगारली शिंगं माझ्यावर पण मी ही तयारीतंच होतो , तिला समोरुन चाल करुन येताना पाहुन मी माझं जॅकेट काढलं , आणि जरा वॉर्म अप केलं , शेवटी म्हंटलं च आहे "आंधळा दळतो आणि गणपा चिकन तंदुरी बनवतो " . तो गाय अजुंनंच चेकाळली आणि जोरात माझ्या रोखाने येऊ लागली .. मग मी सुमारे २०१ जोर आणि बैठका आलटुन पलटुन मारल्या , आता माझी बॉडी दबंग मधल्या सलमान खान सारखी फुगत होती नव्हे फुगलीच .. माझं टिशर्ट अगदी फाटलाच जसे "भित्र्या पाठी ब्रम्हराक्षस आणि नाना पाठी संपादक " तसेच अगदी . एक हवेचा झोका आला तोच मला चौकट राजा ह्या अप्रतिम सिनेमातले "एक झोका ... एक झोका .. चुके ... काळजाचा ठोका एक झोका " हे बालगीत आठवले त्यावरुन मला कोणीतरी नुकताच बालगितांचे आवाहन करणारा धागा काढल्याचे आठवले , हे सगळं मला एका सेकंदाच्या एक हजार दोनशे चाळीस (अंकी १२४१) वेळा आठवलं पण अक्षरात माझा एक लिहायचा राहिल्या , त्यामुळे बँकेने मला ५० रुपये चार्ज केले आणि माझी घोर अशी फसवणुक केली . त्याबद्दल मी बँका कशी फसवणुक करतात या धाग्यावरचा एक प्रतिसाद आठवुन हसत सुटलो तशी ती गाय मला वेडा समजली आणि ह्याच्या शी पंगा घेण्यात आपलंच नुसकान हाय हे तिला उमगले .... पण तोवर उशीर झाला होता ... म्हणतात ना " काळ आला होता पण नळाला पाणी नव्हतं ! " तसंच काहीसं . गायी चे अँटिलॉक डिस्क ब्रेकिंग फेल झाले आणि ती माझ्या अंगावर येउन आदळनार तोच मी पटकन मागे जाऊन तिचं शेपुट धरलं आणि अशी हॅलिकॉप्टर सारखी फिरवली .. अशी फिरवली ... की तिला चश्मा च लागला , म्हणतात ना "काखेत कळसा आणि गाई ला चश्मा " . तसं तोच गाई चा मोबाईल वाजला .. मोबाईल वर आलं "दुबैचा शेख कॉलींग .. दुबैचा शेख कॉलींग .. " गाई ने मला माझ्या आयडी चा वास्ता दिला तेंव्हा माझा राग मी आवरता घेतला , पण तरीही तिला मी असं सोडणार नव्हतो .. " डोक्यात शिंग असणारी ... " ह्या नव्या लेखमालेत तिच्यावर लेख पाडणारंच होतो .. शेवटी तिने ही मान्य केले संत कोदाराम आपल्या अभंगांत म्हणतात तेच सत्य . "दुबैचा मित्र बोले तास भर .. बोले भारंभर ... कोदा म्हणे " असा अनुभव कोणाला आला असेल तर बोला , त्याच्या खरडवहीत " तुम्ही जोहार आहात " असं मोठ्या अक्षरात लिहील्या जाईल . smiley - विडीफुकुया एका प्रतिसादातच मी टारझनभौंचा "फॅण" झालो :))
In reply to संपलो संपलो!! by आदूबाळ
In reply to संपलो संपलो!! by आदूबाळ
In reply to संपलो संपलो!! by आदूबाळ
एकदा एक गुरू शिष्याबरोबर दुसर्या गावी चालला होता. रस्त्यात एक नदी लागली आणि गुरु-शिष्य पाणी प्यायला पाण्यात उतरले. त्या पाण्यातून एक विंचू वाहताना गुरूने पाहिला. त्याने भूतदयेने त्याला ओंजळित उचलून काठावर न्यायला सुरुवात केली. अर्थातच विंचवाने गुरुच्या हाताला दंश केला आणि तो परत पाण्यात पडला. गुरूने त्याला परत उचलले, परत विचवाने दंश केला आणि तो पाण्यात पडला. असे तीन चारदा झाल्यावर गुरू त्या विंचवाला काठावर आणण्यात यशस्वी झाला. शिष्य हे सगळे विस्मयाने पाहात होता. तो गुरूला म्हणाला, "गुरुजी, एका क्षुद्र जीवाकरिता तुम्ही हे काय करत होता? हा वेडेपणा नाही का?" गुरु म्हणाला, "एक क्षुद्र जीव जर त्याचा नांगी मारण्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही तर सर्वोत्तम जीव समजल्या जाण्यार्या माझ्यासारख्या माणसाने माझा मदत करण्याचा चांगला गुणधर्म का सोडावा?"
In reply to मिपाकर चित्रा मॅडमनी एके by मोदक
गड कसा पाहावा याचं एक तंत्र आहे. तो धावता पळता पहाता उपयोगाचा नाही. त्याची भौगोलीक पार्श्वभूमी, त्याचं नकाशातील स्थान, संरक्षणदृष्ट्या त्याचं महत्वं, त्याच्या जवळ असलेले घाट, मैदान, खिंडी, पठार, नद्या, ओढे, रणक्षेत्र, त्यावर चढायचे मार्ग, त्यावरून दिसणारा प्रदेश, त्या प्रदेशातील किल्ले, शिखरं, त्यांची मजबूती, त्यावरील पाण्याची ठिकाणं-हौद, तलाव, त्याचे तट, त्याचे बुरूज, त्याची प्रवेशद्वारं.... हे सगळं कसं नीट तपासलं पाहिजे, तरचं त्याचं महत्व ध्यानी येतं. धावता पळता किल्ला बघायला तो काही भोज्जा नव्हे !माझ्या माहितीप्रमाणे गोनिदांच्या "दुर्गभ्रमणगाथा" मधला उतारा आहे..
In reply to लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच by सुहास..
In reply to धन्यवाद मित्रा.. by चिगो
In reply to मैनें इक मां को, बिखरते हुए, टूंटते हुए देखा है...क्या बात है! by बहुगुणी
In reply to धन्यवाद मित्रा.. by चिगो
In reply to अग्नी आणि पृथ्वी यांच्या धुंद by किसन शिंदे
In reply to तुझ्या स्वाक्षरीतल्या by इनिगोय
माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल ओवीमधून पाझरे निळ्या अमृताची ओल
In reply to नदीच्या किनारी नदीला म्हणावे by किसन शिंदे
In reply to माझे अति आवडते...गुलजार -- यार जुलाहे by मैत्र
In reply to धन्यवाद हो, मैत्र! by बहुगुणी
कभी कभी बाज़ार में यूं भी हो जाता है कीमत ठीक थी, जेब में इतनें दाम नही थे ऐसे ही इक बार मैं तुम को हार आया था!मनाला चरा पाडून गेली ही त्रिवेणी...
In reply to धन्यवाद हो, मैत्र! by बहुगुणी
सारा दिन बैठा मैं हाथ में लेकर खाली कास रात जो गुज़री, चांद की कौडी डाल गयी उसमें सूदखोर सूरज कल मुझसे ये भी ले जायेगा!ही एक अतिशय आवडती रचना आहे! आभार..
In reply to रामप्रसाद बिस्मिल by लॉरी टांगटूंगकर
In reply to रामप्रसाद बिस्मिल by लॉरी टांगटूंगकर
In reply to रामप्रसाद बिस्मिल by लॉरी टांगटूंगकर
In reply to रामप्रसाद बिस्मिल by लॉरी टांगटूंगकर
In reply to रामप्रसाद बिस्मिल by लॉरी टांगटूंगकर
In reply to दुःखाच्या वाटेवर गाव तुझे by यशोधरा
मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेलक्या बात!
In reply to १. Specialization is knowing by बाळ सप्रे
In reply to टर्निंग पॉईंट प्रा. यशपाल by आदूबाळ
He is the Richest whose pleasures come cheapest. -Unknown Chin Shengt’an नावाचे एक चीनी विद्वान अतिवृष्टीमुळे त्यांच्या मित्राबरोबर एका देवळात दहा दिवस अडकून पडले होते. नुसतंच बसलोय तर करायचं काय ? लेखक महाशयांनी त्यांच्या 'सुखांची' एक यादी बनवली. Chin's 33 Happy Moments या नावाने ती प्रसिध्द आहे. सुखांची ती यादी नुकतीच वाचनात आली. विचार केला, आपण पावसामुळे अडकून पडण्याची वाट कशाला पहायची ? चीनच्या 'चीन' साहेबांकडून प्रेरणा घेऊन स्वतःची यादी बनवायची ठरवली. प्रामाणिकपणे सांगायचं तर, बराच वेळ काहीच सुचेना. मग ठरवलं, जसं आठवेल तसं लिहून ठेवायचं. चार पाच दिवसांच्या या प्रोसेसमध्ये एक गोष्ट लक्षात आली. तिखट-गोड भेळ खाताना मधेच कैरीची फोड दातात यावी आणि जिभेवरचा सगळा 'समा' बदलून जावा तसंच सुखाचं असावं. सुख 'शोधत' बसलो तर हाताला लागत नाही. खिशात एक छोटा कागद ठेवू लागलो. जगता जगता जिथे 'कैरी' लागली ते प्रसंग टिपून ठेवले, काही अनुभवलेले प्रसंग आठवून लिहिले. त्यातील काही निवडक शेअर करतोय... • घरात वीज नसते. मेणबत्तीच्या अंधुक प्रकाशात, पंखे-टीव्ही चालू नसलेल्या घरात सगळे व्यवहार चालू असतात. नीजानीज होते. मला थंडीतही डोक्यावर (आवाज करणारा) पंखा लागतो. आता तर उन्हाळ्याचे दिवस. झोप कशी लागणार? घामट अंगाने आडवा होतो. एकदा डावा, एकदा उजवा असे हात बदलत वर्तमानपत्राने वारा घालण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू असतो. हात दुखायला लागतो. मी डोळे बंद करतो. माझ्या ओळखीतली माणसं मोजू लागतो, कळपातल्या मेंढ्या मोजतो...पण झोपेचं चिन्ह नाही. वीज कंपनी, सरकार, उन्हाळा, डास यांच्या नावाने चडफडत असताना कधी डोळा लागतो ते कळत नाही.... आणि... खुsssप वेळाने घामट अंगावर एक गार झुळूक येते. मी डोळे उघडून छताकडे पाहतो. वीज आली या आनंदात पंखा (आवाज करत) गोल गोल नाचत असतो. त्या अंधाऱ्या खोलीतही ‘चैतन्याचा प्रकाश’ पडल्याचा भास होतो. • डावीकडे....थोडं वर...इतकं वर नाही गं...थोsssडं खाली...हा, बरोबर. तिथेच...! माझा हात पोचू न शकणारी, माझ्या पाठीवरची 'खाज सुटणारी' जागा बायकोला बरोब्बर सापडते. समाधी लागल्यासारखे माझे डोळे आपसूक बंद होतात. • मी आणि माझा शाळेतला वर्गमित्र खूप वर्षांनी शाळेजवळ भेटतो. मित्राला सिगरेट ओढायची लहर येते. आम्ही शाळेजवळच्या एका दुकानात जातो. आमच्या वेळचा दुकानदार आता नसतो. मी सहज विचारतो, 'अजूनही तो पिशवीतला पेप्सी-कोला मिळतो का?.... मिळतो ? मग एक ऑरेंज, एक कालाखट्टा द्या...दुकानदार फ्रीज उघडतो. फ्रीजमध्ये पेप्सी कोलाचे जितके नग असतात ते सगळे विकत घेण्याइतके पैसे पाकिटात असतात. मला शाळेचे दिवस आठवतात. पेप्सी कोलासाठी खिशात जपून ठेवलेलं पन्नास पैशाचं नाणं आठवतं. मी खिशातल्या पाकिटातून एक नोट काढतो. दुकानदार म्हणतो, सुट्टे पैसे द्या. मी पाकिटाची चेन उघडतो आणि सुट्टे पैसे देतो. मी दाताने पेप्सी-कोलाची पिशवी फोडतो तशी ऑरेंज सरबताची एक चिळकांडी मित्राच्या शर्ट वर उडते. मी सॉरी म्हणतो. मित्र म्हणतो, सुधारणार नाहीस साल्या ! तिशी पार केलेले आम्ही दोन टोणगे पेप्सी-कोला खात खात दुकानातून बाहेर पडतो. • रस्त्यात एक माणूस दिसतो. कुठे तरी पाहिलंय याला...पण जाम आठवत नाही..दातात पेरूची बी अडकावी, ती बराच वेळ निघू नये आणि त्याहून कहर म्हणजे आपली जीभ सारखी-सारखी दाढेच्या त्याच फटीकडे जात रहावी तसा या माणसाचा चेहरा दिवसभर छळत राहतो. चार दिवसांनी, काहीही संदर्भ नसताना, त्या चेहऱ्याचा धनी अचानक आठवतो. ऑफिसातला एक कलीग विचारतो, 'काय रे आज खूष दिसतोयस.' मी म्हणतो, 'नाही, काही विशेष नाही.' मी चक्क खोटं बोलतो. • दोन दिवसांची ऑफिस टूर आटपून मी संध्याकाळी घरी येतो. घरी शुकशुकाट. वॉचमन सांगतो की सगळे शेजारच्या बागेत गेलेत. मी बागेशी जातो. माझा अडीच वर्षांचा मुलगा घसरगुंडीवर खेळताना दिसतो. मी त्या दिशेने चालत जातो. माझ्या मुलाचं माझ्याकडे लक्ष जातं. बाबाssssssssss ! असं तिथूनच ओरडून तो माझ्या दिशेने धावत सुटतो आणि माझ्या पायाला घट्ट मिठी मारतो. बागेतले सगळे माझ्याकडे बघायला लागतात. मी त्यांच्याकडे पाहिलं न पाहिल्यासारखं करतो. मुलाचं बोट धरून घसरगुंडीशी जातो. 'डॅडी' सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर अनुपम खेरला जितका आनंद झाला असेल त्याच्या दहा पट आनंद मला आत्ता होत असतो. • बायकोच्या साडीला मॅचिंग ब्लाउज घेण्यासाठी मी बायको बरोबर 'मॅचिंग सेंटर' मध्ये जातो. आज नशीब माझ्या बाजूने असतं. बायकोला हवी असलेली हिरव्या रंगाची शेड ‘फक्त’ चौतीस मिनिटात सापडते. • एक पावसाळी रविवार सकाळ. आई म्हणते, 'जेवण झाल्यावर ठाण्याला जायचंय. अमुक तमुकच्या पहिल्या वाढदिवसाची पार्टी आहे.' बाहेर टोम पाऊस पडत असतो. आमची जेवणं होतात. जड अंगाने (आणि जड अंतःकरणाने) मी पार्टीला घालायचे कपडे बाहेर काढतो. तेवढ्यात कोणाचा तरी फोन वाजतो. ठाण्याहून फोन असतो. पावसामुळे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेला असतो. मनात नाचणाऱ्या आनंदाच्या कारंजाचे पाणी बाहेर जराही न सांडता मी इस्त्री केलेले कपडे निमुटपणे कपाटात ठेवतो. खिडक्यांचे पडदे लावून घेतो. खोलीत अंधार होतो. पंखा मध्यम गतीने चालेल असा ठेवतो. अंगावर पांघरूण घेतो. बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज कानात साठवून घेतो. भीमसेनजींचा 'रामकली' लावतो. पंडितजी पहिला 'सा' लावतात आणि अंगावर काटा येतो. रविवार दुपार, पावसाळी काळोख, डोक्याखाली उशी, डोक्यावर पंखा, अंगावर पांघरूण, झाडाच्या पानांवर पडणाऱ्या पावसाचा आवाज, पंडितजींचा रामकली, आणि जडावून मिटत जाणारे डोळे हे सगळं एक तरफ और बाकी दुनिया एक तरफ..! • मी काहीतरी लिहायला बसतो. सुचत नाही तेव्हा बराच वेळ खिडकी बाहेर बघत बसतो. काहीतरी सुचतं, पण ते लिहिल्यावर इतकं ग्रेट नाही असं वाटतं. मी लिहिलेलं खोडून टाकतो. बायको बाहेर येण्याबद्दल विचारते. मी नाही सांगतो. ती मुलाला घेऊन बाहेर जाते. वाटतं, आता एकटाच आहे - मस्त लिहित बसेन. काहीतरी खर्डेघाशी करतो पण मजा येत नसते. कोऱ्या कागदांकडे मी बराच वेळ नुसताच पाहत राहतो. बेल वाजते. 'खूप बोलणारे' बिल्डींग मधले एक काका दरवाजात उभे. मी उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून 'या' म्हणतो. ते खरोखरीच आत येतात. ते बोलू लागतात. आणि अचानक कुठल्यातरी संदर्भावरून मला लिखाणाला विषय मिळतो. काका रंगात येऊन भ्रष्टाचार, वर्ल्ड कप वगैरे वर बोलत असतात, पण माझं त्याकडे लक्षच नसतं. माझ्या डोक्यात लेखाची मांडणी सुरु होते. सुरुवात अशी करूया.. नको अशी करूया... म्हणता म्हणता सगळा लेख डोक्यात तयार होतो. आता फक्त जाऊन कागदावर उतरवायचा बाकी असतो. तासभर बोलून झाल्यावर काका उठतात आणि जाऊ लागतात. चपला घालता घालता मी काहीतरी बोलेन या अपेक्षेने माझ्याकडे बघतात. माझ्या नकळत मी patkanबोलून जातो - 'बरं झालं काका, आलात ते !’ • मंगळवार. सकाळचे दहा वाजलेले. चर्चगेटचा गजबजलेला अंडरग्राउंड सबवे. भोवताली माणसांचा समुद्र. फेरीवाले-भिकारी यांच्या मधून वाट काढत मी चालत असतो. अंगातून घामाच्या धारा. एका दुकानात लावलेल्या रेडियो मधून काहीतरी कानावर पडतं - वक़्त ने किया, क्या हसीं सितम | तुम रहे न तुम, हम रहे न हम.... कैफ़ी आज़मीचे शब्द, सचिनदेव बर्मनची चाल आणि गीता दत्तचा स्वर मला कैद करतात. मी जागच्या जागीच थिजून जातो. एका जागी स्वस्थ उभा राहून मी ते अख्खं गाणं ऐकतो. स्वतःला या 'क्षुद्र' जगात परत आणतो आणि माझ्या कामाला निघतो. ‘जायेंगे कहाँ, सुझता नहीं | चल पडे मगर, रास्ता नहीं | क्या तलाश है, कुछ पता नहीं !’...... ...या ओळींसाठी चर्चगेट स्टेशनपेक्षा अधिक योग्य जागा आणखी कुठली असू शकेल ? मी माझ्या 'सुखांच्या यादीवरून' पुन्हा एकदा नजर फिरवतो. सुखाचे हे सगळे अनुभव त्या त्या वेळी उपभोगुन एकही अनुभव आत्ता, या क्षणी माझ्या मुठीत नसतो. मग नक्की खरं काय? सुखाचा 'तो' अनुभव ? की त्या सुखाची नुसती 'आठवण' ?... मी विचार करत असतानाच माझा मुलगा अमृत माझ्याजवळ येतो. 'बाबा, चल, घोडा-घोडा खेळूया.' मी कागद पेन बाजूला ठेवून निमूटपणे अमृत बरोबर चालू लागतो. मी घोडयासारखा ओणवा बसतो. अमृत माझ्या ओणव्या पाठीवर बसतो. मी जरा हललो की अमृत खिदळत राहतो. मी मागे वळून अमृतचा खिदळणारा चेहरा बघतो. अमृतच्या हास्यात मला माझं ‘आणखी एक’ सुख गवसतं आणि मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तरही !दुवा - http://kahitarinavinahe.blogspot.in/2011/03/blog-post_24.html
In reply to सुखांची यादी :-) by दिपक
In reply to निव्वळ अप्रतीम!!!!!!!!! by मोदक
In reply to सुखांची यादी :-) by दिपक
घरात वीज नसते. मेणबत्तीच्या अंधुक प्रकाशात, पंखे-टीव्ही चालू नसलेल्या घरात सगळे व्यवहार चालू असतात. नीजानीज होते. मला थंडीतही डोक्यावर (आवाज करणारा) पंखा लागतो. आता तर उन्हाळ्याचे दिवस. झोप कशी लागणार? घामट अंगाने आडवा होतो. एकदा डावा, एकदा उजवा असे हात बदलत वर्तमानपत्राने वारा घालण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू असतो. हात दुखायला लागतो. मी डोळे बंद करतो. माझ्या ओळखीतली माणसं मोजू लागतो, कळपातल्या मेंढ्या मोजतो...पण झोपेचं चिन्ह नाही. वीज कंपनी, सरकार, उन्हाळा, डास यांच्या नावाने चडफडत असताना कधी डोळा लागतो ते कळत नाही.... आणि... खुsssप वेळाने घामट अंगावर एक गार झुळूक येते. मी डोळे उघडून छताकडे पाहतो. वीज आली या आनंदात पंखा (आवाज करत) गोल गोल नाचत असतो. त्या अंधाऱ्या खोलीतही ‘चैतन्याचा प्रकाश’ पडल्याचा भास होतो._/\_
In reply to सुखांची यादी :-) by दिपक
In reply to टूटे हुए चूड़ियों से जोड़ूं ये by आदूबाळ
In reply to वाहवा.. by इनिगोय
In reply to वाहवा.. by इनिगोय
In reply to वाहवा.. by किसन शिंदे
In reply to आमचे मित्र, तत्ववेत्ते नि by प्यारे१
In reply to क्या बात है !!!!!!!! by लॉरी टांगटूंगकर
In reply to क्या बात है !!!!!!!! by लॉरी टांगटूंगकर
In reply to अध्ये मध्ये मोदकाने ही हे by पिलीयन रायडर
In reply to . by मूकवाचक
In reply to . by मूकवाचक
या धाग्यात मी नेमकं काय केलं..? समुद्रात मोती बनताना शिंपल्याच्या आत वाळूचा एक कण शिरतो. तो शिंपल्यातल्या ऑयस्टरला बोचत राहतो. मग एरवी शांत असलेला ऑयस्टर त्या वाळूच्या कणाभोवती थरावर थर देऊन सुंदर मोती बनवतो. मोती किती सुंदर बनला आहे ते तुम्ही ठरवा. पण तो मी बनवला नाही. मी त्यातला वाळूचा बोचरा कण फक्त.
दुर्गा भागवत