' रक्तरेषा '
लेखनविषय:
' रक्तरेषा '
वेळीअवेळी
आकाश नुसतेच भरून येते
एकदाचे हमसून बरसत नाही.
लेखणी कुंद कुंद :
नुसतीच ठिबकते ; झरत नाही.
रक्तरेषा :
उभ्या, आडव्या, तिरप्या
भावनेच्या भरातले अर्धेमुर्धे वार
कागदाच्या पोटात धारदार ..
असे स्वतःचेच कैक खून वेळीअवेळी...!
डॉ. सुनील अहिरराव
http://aaskmed2.blogspot.in/2013/03/blog-post_22.html
वाचने
2703
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
अगदी ओळखीचे काहीतरी..
In reply to अगदी ओळखीचे काहीतरी.. by इनिगोय
" असे रंग आणि ढगांच्या किनारी निळे ऊन लागे मला साजणी
निळे घाटमाथे निळ्या राउळांचे निळाईत माझी भिजे पापणी
निळ्याशार मंदार पाउलवाटा धुक्याची निळी भूल लागे कुणा
तुला प्रार्थनांचे किती अर्घ्य वाहू निळ्या अस्तकालीन नारायणा
निळे गार वारे जळाची शिराणी निळ्या चंद्रओवीत संध्या डुले
निळे दुःख चोचीत घेउन आली निळ्या पाखरांची निळी पाउले "– ग्रेस
नुसत्या शैलीवरून कुणाही रसिकाला सहज फक्त ग्रेस आठवावेत ! अत्यंत सहज, सुंदर, तरल रचना !
धन्यवाद @इनिगोय !
In reply to " असे रंग आणि ढगांच्या किनारी by drsunilahirrao
फक्त कमाल!!!
अगदी ओळखीचे काहीतरी..>>
अगदी असेच !!
In reply to > अगदी असेच !! by इन्दुसुता
@ इन्दुसुता , प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
मोठा आशय लिहून गेलात.
@ पैसा , धन्यवाद !
असच! अगदी असच होतं मलाही. काहीतरी नुसत अस्व्स्थ.
वर ग्रेसांची कविता खुपच छान.
रक्तरेषा :
उभ्या, आडव्या, तिरप्या
भावनेच्या भरातले अर्धेमुर्धे वार
कागदाच्या पोटात धारदार ..
असे स्वतःचेच कैक खून वेळीअवेळी..........
व्वा ! क्या बात है ! ! सुन्दर ! ! !
@ साऊ @निरंन्जन वाहलेकर, मनापासून आभार !
फार सुंदर.
In reply to फार सुंदर. by गंगाधर मुटे
@गंगाधर मुटे, धन्यवाद !
आवडली. स्वतःला आयडेंटीफाय नाही करता येत. पण खूप उत्कट आहे.
In reply to आवडली. स्वतःला आयडेंटीफाय by शुचि
@शुचि जी, धन्यवाद !
कविता आवडली. चित्रण यथार्थ आहे.
In reply to कविता आवडली. चित्रण यथार्थ by बॅटमॅन
@बॅटमॅन, धन्यवाद !
अगदी ओळखीचे काहीतरी..