' रक्तरेषा '

drsunilahirrao जे न देखे रवी...
' रक्तरेषा ' वेळीअवेळी आकाश नुसतेच भरून येते एकदाचे हमसून बरसत नाही. लेखणी कुंद कुंद : नुसतीच ठिबकते ; झरत नाही. रक्तरेषा : उभ्या, आडव्या, तिरप्या भावनेच्या भरातले अर्धेमुर्धे वार कागदाच्या पोटात धारदार .. असे स्वतःचेच कैक खून वेळीअवेळी...! डॉ. सुनील अहिरराव http://aaskmed2.blogspot.in/2013/03/blog-post_22.html
वर्गीकरण
लेखनविषय:

16 टिप्पण्या 2,703 दृश्ये

Comments

drsunilahirrao नवीन

In reply to by इनिगोय

" असे रंग आणि ढगांच्या किनारी निळे ऊन लागे मला साजणी निळे घाटमाथे निळ्या राउळांचे निळाईत माझी भिजे पापणी निळ्याशार मंदार पाउलवाटा धुक्याची निळी भूल लागे कुणा तुला प्रार्थनांचे किती अर्घ्य वाहू निळ्या अस्तकालीन नारायणा निळे गार वारे जळाची शिराणी निळ्या चंद्रओवीत संध्या डुले निळे दुःख चोचीत घेउन आली निळ्या पाखरांची निळी पाउले "– ग्रेस नुसत्या शैलीवरून कुणाही रसिकाला सहज फक्त ग्रेस आठवावेत ! अत्यंत सहज, सुंदर, तरल रचना ! धन्यवाद @इनिगोय !

निरन्जन वहालेकर नवीन

रक्तरेषा : उभ्या, आडव्या, तिरप्या भावनेच्या भरातले अर्धेमुर्धे वार कागदाच्या पोटात धारदार .. असे स्वतःचेच कैक खून वेळीअवेळी.......... व्वा ! क्या बात है ! ! सुन्दर ! ! !