मध्य वयातील वादळ -पुढे
In reply to अरे हो मला एक प्रश्न by ढालगज भवानी
In reply to योगा सोडुन बाकी कुठलाहि by जेनी...
In reply to योगा सोडुन बाकी कुठलाहि by जेनी...
In reply to काही काय? by मैत्र
In reply to योगा नाहि चालत मासिक पाळी by जेनी...
In reply to तुम्हाला कोणी सांगितलं? जो by शिल्पा ब
In reply to तुम्हाला कोणी सांगितलं? जो by शिल्पा ब
In reply to तुम्हाला कोणी सांगितलं? जो by शिल्पा ब
In reply to थोडक्यात जे झेपेल तेच करा by सुबोध खरे
In reply to काही काय? by मैत्र
In reply to अरे हो मला एक प्रश्न by ढालगज भवानी
In reply to मासिक पाळीच्या दरम्यान व्यायाम by सुबोध खरे
नैराश्य( depression) आहे कि लक्ष वेधून घेण्यासाठी( attention seeking) केले जाते ते सहज सांगणे कठीण जातेलक्ष वेधून घेणं हे लक्षण असून मूळ मानसिक रोग वेगळाच असण्याचीही शक्यता नाही का? मानसिक रोग असेल त्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहेच. प्रगत देशांमधे प्रसूतीसंदर्भात क्लासेस भावी माता-पिता दोघांसाठीही असतात. अशा प्रकारच्या लेखनाची, संवादाची गरजही स्त्रिया आणि स्त्रियांशी संपर्कात येणार्या पुरुषांसाठीही तेवढीच महत्त्वाची आहे. टंकनदुरूस्ती: लेखात तुम्ही hot flashes याऐवजी hot flushes असा शब्द वापरलेला आहेत. (ही अतिरिक्त उष्णता फ्लश झाली तर अडचणच सुटते; निर्माण होत नाही.)
In reply to नैराश्य( depression) आहे कि by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to नैराश्य( depression) आहे कि by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अदिती - by सुबोध खरे
In reply to नैराश्य( depression) आहे कि by ३_१४ विक्षिप्त अदिती
चीड चीड कोणी स्वतःहून करीत नाही तर चिडचिड हि होते. जेंव्हा एखादी परिस्थिती आपल्या हातात नसते आणि तो बदलण्याचे आपल्याला सामर्थ्य नसते तेंव्हा माणसाची/ बाईची चिडचिड होतेपरिस्थिती आपल्या हाताबाहेर असते आणि ती बदलण्याचे सामर्थ्य आपल्याकडे नसते तेंव्हा शांत मनाने परिस्थिती स्विकारणेच फायद्याचे असते. शिवाय परिस्थिति बदलण्याचे सामर्थ्य आपल्याकडे नसले तरी त्याची तीव्रता कमी करण्याचे उपाय अस्तित्वात असतील तर ते उपाय योजण्यात यावेत, असे मला वाटते.
१ ) पुरुषांना पण असे(रजोनिवृत्ती सारखे) होते हे थोड्याप्रमाणात सत्य आहे पण पुरुषांची संप्रेरके साठीच काय सत्तरीपर्यंत कार्यरत असतात त्यामुळे त्या वयालाही पुरुषाला मूल होऊ शकते. पण स्त्रीच्या बाबतीत हि शक्यता एकदम संपत असते. या गोष्टीचाही पुष्कळ स्त्रियांवर खोलवर मानसिक परिणाम होत असतो. आता आपल्याला मुल होऊ शकणार नाही. हि निसर्गाने दिलेली आपल्यासारखा चालता बोलता जीव निर्माण करण्याची अफाट शक्ती आता संपली असे निराशावादी विचार मनात येतात.हल्ली १ किंवा २ मुले असण्याच्या जमान्यात, फार तरूण वयातच, ह्या पुढे मुले होऊ नयेत म्हणून, स्त्री-पुरुष स्वेच्छेनेच वेगवेगळे उपाय योजतात. म्हणजे प्रत्यक्ष रजोनिवृत्तीच्या कितीतरी वर्षे आधीच, आता आपल्याला मुल नकोच ह्याची, स्त्रीच्या मनाची तयारी झालेली असते. जीला अजिबात कधी मुल झाले नाही तिला वाईट वाटणे समजू शकतो. बाकी ज्यांना योग्य त्या वयात संतती प्राप्त झाली आहे त्यांना जरा हळहळ वाटेल पण मनावर खोल परिणाम वगैरे होण्याची शक्यता वाटत नाही.
२)ज्या वयात स्त्रीची रजोनिवृत्ती येते त्याच काळात पुरुषाचे पोट सुटणे, टक्कल पडणे, चष्मा येणे इ. घडत असते. त्यालाही हे सर्व जाणून वाईट वाटत असते पण तो ते 'निसर्ग नियम' ह्या विचाराने सर्व काही स्विकारतो. याच वयात स्त्रियांनाही चष्मा(चाळीशीचा) लागलेला असतो वजन वाढलेले असते,चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात. पण यात अधिक म्हणून रजोनिवृत्ती येते.तसेच पुरूषांच्या बाबतीतही, हल्ली कॉमन होत चाललेला मधुमेह जडतो. मधुमेहानेही पुरुषांच्या लैंगिक सुखात, गरजेत आणि क्षमतेत बाधा येते. तर मधुमेह नसलेल्या पुरुषातही शैथिल्य येतेच. उगीच व्हायाग्रा वगैरेची विक्री होत असते का?
अशीच परिस्थिती पुरुषाची त्या वयात होते जर त्याची नोकरी गेली धंद्यात खोट आली किंवा आर्थिक स्थिती नाजूक झाली तर. कारण जसे सुंदर दिसणे हा स्त्री स्वभावाचा भाग असतो तसे आपल्या पायावर आर्थिक डोलारा सांभाळणे हे पुरुषाच्या स्वभावाचा भाग असतो. या काळात जर आर्थिक स्थिती नाजूक झाली तर पुरुषाचे भावविश्व असेच कोलमडते.ही तर पराकोटीची परिस्थिती झाली. पण तशी खोट वगैरे नाही आली आणि नोकरीही व्यवस्थित चालू असेल तरी, मुलांच्या उच्च शिक्षणाचा वाढता खर्च, वाटती महागाई, (वयोमानानुसार)वाढता हॉस्पिटलचा, औषधपाण्याचा खर्च, इ.इ. मुळे, उद्या आपले उत्पन्न बंद झाले की घरखर्च कसा उचलायचा, आजचे राहणीमान टिकवायचे कसे? ह्या विवंचनेतून अनेक निवृत्त ज्येष्ठ नागरीक शरीर साथ देत नसले तरी कांही तरी उत्पन्नाचे साधन शोधून धडपडताना दिसतात. त्यांचे भावविश्वही कोलमडलेलेच असते.
१.- कामेच्छा desire २.उद्दीपन arousal ३.-स्नेहन lubrication ४.- दाह pain ५.- अत्त्युच्च आनंद -orgasm यात उद्दीपन स्नेहन आणि दाह या तीन गोष्टींच्या प्रभावामुळे त्यांचे कामजीवन अस्ताव्यस्त होते. यात कामेच्छा कमी झाली नाही तरी उद्दीपन कमी होते स्नेहन कमी होते त्यामुळे कोरडेपणा जाणवतो यामुळे योनीमध्ये दाह होतो त्यामुळे स्त्रीला अत्त्युच्च आनंदापर्यंत पोहोचणे कठीण होते.ह्याच अवस्थेतून मधुमेही आणि इतर वयोवृद्ध पुरुषही जात असतात. माझा म्हणण्याचा अर्थ इतकाच की दोघांनाही आज ना उद्या ह्या गोष्टींना सामोरे जावे लागते. दोघांनीही एकमेकांशी बोलून, तज्ञांना सल्ला घेउन उपाय योजना कराव्यात किंवा आहे ती परिस्थिती 'निसर्गनियम' म्हणून स्विकारावी. प्रेम ही उत्कट भावना मनांत असावी, आपल्या साथिदाराला ती वरचेवर दिसून येईल असे वर्तन ठेवावे. शरीरसंबंधातून सुख शोधण्याचा अट्टाहास धरू नये, विशेषतः पुरुषांनी.
या अशा द्विधा वागण्यामुळे पुरुष अतिशय गोंधळात पडतो. बायको जवळ आल्यामुळे तो उद्दीपित होतो पण संबंध नाकारल्यामुळे तो दुखावला जातो. पुढच्या वेळी अशी अवहेलना होऊ नये म्हणून तो बायकोशी भावनिक जवळीक टाळतो.भावनिक नाही शारीरीक. कधी कधी पुरुष कोषात जातो. संवाद तुटतो आणि म्हणूनच वातावरण अधिक तणावपूर्ण होते. इथे पुरुषाने पुढाकार घेऊन संवाद साधावा आणि कोषात जाऊन कोणाचेही भले होणार नाहीए हे जाणून अशी अवस्था टाळावी.
स्त्रियांनी जर आपल्या नवर्याला सुरुवातीलाच स्पष्ट सांगितले कि मला फक्त जवळीक हवी आहे संबंध नको तर पुरुषाची उद्दीपित होणे आणि नंतर थंड पडणे अशी कुचंबणा टळेल आणि निदान संबंधात तणाव वाढणार नाही.ही गोष्ट फक्त स्त्री नाही करू शकत. कारण जर नवरा समंजस नसेल तर तो तिच्या पासून मनाने आणि शरीराने दूर जाऊ शकतो. हीच भिती तीला वाटत असावी, जे नैसर्गिक (तिला भिती वाटणे) आहे. नवराही तितकाच विचार करणारा असावा. निसर्गनियमाने आलेली दुर्बलता म्हणजे आयुष्यातील पराभव किंवा आपल्या पती/पत्नी समोर पराभव अशी भावना मनात येता कामा नये. ह्या साठीच समुपदेशनाची, तज्ञांची गरज जास्त आहे असे मला वाटते.
जसे पुरुषांनी दोन पायर्या उतरणे आवश्यक आहे तसेच स्त्रियांनी दोन पायर्या चढणे तितकेच आवश्यक आहे.अखंड आयुष्यभर प्रत्येक पातळीवर हे आवश्यक आहे फक्त कामजीवनात नाही.
ऑफिसात बॉस ची बकबक गपचूप ऐकून घेताच मग थोडीशी बायकोची ऐकली तर काय बिघडले ?हा:हा: दोन्ही ठिकाणी बिचार्याला 'चॉईस' कुठे असतो? (हे विनोदी विधान आहे. कृपया गांभिर्याने घेऊ नये)
आपल्याला काय होते आहे याचे शांत डोक्याने परीक्षण करा कुठे चुकते आहे त्याचा विचार करा आणि संवाद ठेवण्याचा प्रयत्न करा पहा काही फरक पडतो का?सहमत. अगदी हेच मला म्हणायचे आहे. ह्या अवस्थेतून जात असलेल्या, लवकरच जाणार असणार्या सर्व नवराबायकोंस शुभेच्छा..! ज्यांचे लग्न झालेले नाही किंवा अजून अशा समस्या बर्याच दूर आहेत त्यांनी ह्या विषयावरील मिळेल ते साहित्य वाचून आपापल्या मनाची तयारी करावी. मुळात, ही समस्या नसून एक, टाळता न येणारी, नैसर्गिक अवस्था आहे हे ध्यानात असू द्यावे. असो.... त्यांनाही शुभेच्छा..!
In reply to एकमेका साहाय्य करू.... by प्रभाकर पेठकर
In reply to एकमेका साहाय्य करू.... by प्रभाकर पेठकर
१.- कामेच्छा desire २.उद्दीपन arousal ३.-स्नेहन lubrication ४.- दाह pain ५.- अत्त्युच्च आनंद -orgasm यात उद्दीपन स्नेहन आणि दाह या तीन गोष्टींच्या प्रभावामुळे त्यांचे कामजीवन अस्ताव्यस्त होते. यात कामेच्छा कमी झाली नाही तरी उद्दीपन कमी होते स्नेहन कमी होते त्यामुळे कोरडेपणा जाणवतो यामुळे योनीमध्ये दाह होतो त्यामुळे स्त्रीला अत्त्युच्च आनंदापर्यंत पोहोचणे कठीण होते.या उलट पेठकर प्रश्नाकडे : (तसं न पाहता, मी म्हटल्याप्रमाणे), आपण > जाणिव > शरीर > मन असं बघतात त्यामुळे वेगळे विकल्प उपलब्ध होतात. अर्थात, प्रश्न नक्की सुटेल असं उत्तर येत नाही. त्यामुळे :
मानवी संप्रेरकांवर चर्चा करतांना हे दोन पोलॅरिटीज मधलं आकर्षण हाच विषयाचा केंद्र बिंदू ठरतोहे पारस्पारिक आकर्षण आणि एकमेकातला अनुबंध सर्व प्रश्नांचं एकमेव उत्तर आहे. कामेच्छा, शरीर, वय, आयुष्यातले कोणतेही प्रसंग आणि एकमेकांच्या सर्व मानसिक अवस्था यावर ते मात करतं.
In reply to पेठकरांचा प्रतिसाद विषयाकडे अत्यंत समग्र आणि योग्य दिशेने पाहतो by संजय क्षीरसागर
In reply to वाचतो आहे. समजून घेतो आहे. by प्यारे१
खरे डॉक्टरसाहेबांना अनाहिता विभागाचे मानद सभासदत्व मिळावे
आता हा कोणता नवीन विभाग..??In reply to सुबोधजी by संजय क्षीरसागर
स्री देह पुरूष देहाला आकर्षित करण्यासाठी तयार झालेला आहे.=)) =)) तुमच्या विनोदबुद्धीबद्दल मला फार आदर आहे. यात माझ्या लिंगभावाचा काहीही संबंध नाही.
In reply to स्री देह पुरूष देहाला आकर्षित by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to तु यांचे प्रतिसाद वाचतेस by शिल्पा ब
In reply to स्री देह पुरूष देहाला आकर्षित by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमच्या विनोदबुद्धीबद्दल मला फार आदर आहेसहमत. संजय क्षीरसागर यांचे प्रतिसाद आम्हाला मिपाकडे आकर्षित करण्यासाठी तयार झाले आहेत. ..
In reply to अकाली रजोनिवृत्ती by सुबोध खरे
पाळी येणे बंद झाले कि रुग्ण सोनोग्राफी साठी पाठवला जातोअनपेक्षित विनोद होतो आहे. रहावलं नाही. या विषयाचा अभ्यास नसताना स्पेक्यूलेशनः पाळी अनपेक्षित वयात बंद होण्याचं कारण एकच एक नाही; तणाव, कुपोषण अशांपैकी एक काही असेल का? विशीत पाळी बंद होण्यामागे अनुवांशिकता किती असेल? काही सांख्यिकी तर्क?
In reply to भाषेतली पुरुषप्रधानता by ३_१४ विक्षिप्त अदिती
अशा केसेस मी बर्याच प्रमाणात पाहिलेल्या आहेत. याचे नक्की कारण माहित नाही. कारण माहित नसले कि आधुनिक आयुष्यातील तणाव हे सदा धोपटायला मिळणाऱ्या गादीसारखे परंतु ते अजून सिद्ध झालेले नाही. आणी असे रुग्ण आदिवासी आणी खेड्यात सुद्धा दिसतात जेथे आधुनिक आयुष्यातील तणाव नसतो.याचा अर्थ की यावर अजून पुरेसे संशोधन झालेले नाही. पण मी वाचलेल्या टाईम्सच्या बातमी/लेखात मात्र त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातल्या महिलांमधे हा प्रकार आढळल्याचं म्हटलं आहे आणि बंगलोर इथे त्यावरून काही प्रमाणात संशोधन चालू आहे असे दिसते. अशा केसेसंना होमिओपाथी आणि योगाचा फायदा झाल्याचेही वाचनात आले होते. अर्थात हे सगळे अजून प्राथमिक अवस्थेतले निष्कर्ष असावेत.
In reply to अकाली रजोनिवृत्ती by सुबोध खरे
बीजांड कोशात (ovary) मध्ये स्त्री बीज निर्मिती थांबली होती.याबद्दल अधिक शंका, प्रश्न आहे. मुलगी जन्माला येतानाच तिच्या बीजांड कोशात २०-३० लाख* बीजं असतात; त्यातली अर्ध्याधिक ती वयात येईपर्यंत मरतात. वयात आल्यापासून दर महिन्याला एक बीज परिपक्व होऊन बाहेर पडतं इथपर्यंत माहिती वाचलेली आहे. रजोनिवृत्ती (कोणत्याही वयात का होईना) होताना ही बीजं पूर्णपणे मरतात का परिपक्व होणं थांबतं का आणखी काही? (हा आकडा निश्चितपणे आठवत नाही; पण असाच कैच्याकै जास्त वाटू शकेल असा आकडा होता. त्यावरून कोंबडीच्या बीजांड कोशात अशीच रचना असेल तर किती बीजं असतील याचा विचार केला होता. कोंबडी दर २४-३६ तासांत एक अंडं देते.)
In reply to प्रश्न by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मुलगी जन्माला येतानाच तिच्या by सुबोध खरे
In reply to मुलगी जन्माला येतानाच तिच्या by सुबोध खरे
In reply to धन्यवाद by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अदिती ताई by सुबोध खरे
In reply to मुलगी जन्माला येतानाच तिच्या by सुबोध खरे
In reply to एक शंका by सेरेपी
In reply to अस्तित्वाची संरचना by संजय क्षीरसागर
निसर्गाचा उद्देश स्वतःची पुनर्निमिती (प्रोलिफरेशन) आहेअसे असेल तर निसर्गाने स्वतःच दोन पोलॅरिटिची बंधने का घालून घेतली
In reply to निसर्गाचा उद्देश स्वतःची by मराठी_माणूस
In reply to अस्तित्वाची संरचना by संजय क्षीरसागर
निसर्गाचा उद्देश स्वतःची पुनर्निमिती (प्रोलिफरेशन) आहे आणि प्रणय त्याची प्रक्रिया आहेतुम्ही रिचर्ड डॉकिन्सची किंवा उत्क्रांतीशास्त्र या विषयावरची पुस्तकं मुद्दामच वाचत नाही का ठरवून आम्हां लोकांना हसवता? गुलाबाची कलमं, मोगर्याचं रोप वाकवून दुसरं झाड तयार करणं वगैरे asexual (मराठी?) पुनरुत्पादनाची, समोर दिसणारी उदाहरणं शालेय अभ्यासक्रमात शिकवली जातात हो! आंबेडकरांनी काय सांगितलं, "शिका, मोठे व्हा". त्यातली "शिका" ही पायरी गाळायची नाही.
In reply to अस्तित्वाची संरचना by संजय क्षीरसागर
In reply to अस्तित्वाची संरचना by संजय क्षीरसागर
In reply to दोन धृवांचे आकर्षण हा by सुबोध खरे
god has linked procreation with recreation.otherwise no man will marry. हे आम्हाला वंध्यत्व वर उपचार या विषयात शिकवलेकॅथलिक किंवा अन्य ख्रिश्चन पंथाचं पाठ्यपुस्तक आणि/किंवा शिक्षक होते का?
In reply to कॅथलिक? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to कॅथलिक किंवा अन्य ख्रिश्चन पंथाचं by सुबोध खरे
In reply to हे आणखीनच मजेशीर. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अदिती -ताई by सुबोध खरे
असा साधा अर्थ आहे.हेच तर इतका वेळ सांगतोय! आणि तुमच्यासारखा अनुभवी माणूस सहमत झाला म्हणजे प्रश्नच मिटला.
मानव सोडून फारच कमी प्राणी केवळ आनंदासाठी सम्भोग करत असावेत.त्यांचा संभोग कंपल्सिव असतो. मानवी प्रणय ऐच्छिक असू शकतो आणि तो पारस्पारिकार्षण आणि नातं (जे केवळ मानवात आहे) यातला महत्त्वाच दुवा आहे. आयुष्याच्या उत्तरंगात दोघातलं एकमेकांप्रती आकर्षण आणि प्रेमच निर्णायक ठरतं. प्रणय दुय्यम ठरतो.
आणी हा आनंद जितका मिळेल तितका घ्यावा हा विचार नसेल तर किती पुरुष स्त्रीची जबादारी गळ्यात अडकवून घेईल?हे नागडे सत्य आहेसही! पण हे इतकं एकांगी नाही. स्त्रीला सुद्धा प्रणयाचा आनंद असतोच.
विसाव्या शतकातील स्त्रियांसाठी सर्वात मोठा आणी क्रांतिकारी शोध म्हणजे कुटुंब नियोजनाची साधने हा होय.यू वील अग्री, इतक्या क्रांतीकारी शोधानंतर सुद्धा प्रणयातला आनंद सर्वतोपरी एकाच गोष्टीवर अवलंबून आहे : पारस्पारिक आकर्षण! नाही तर प्रणयानंतर नातं कसं टिकणार? कारण ती काही दिवसभर चालणारी गोष्ट नाही.
In reply to अदिती -ताई by सुबोध खरे
जर संभोगात आनंद मिळणार नसेल तर मानवी नर कोणत्याही स्त्री च्या जवळ जाणार नाही.हे फक्त मानवी नराच्या बाबतीतच आहे आणि इतर प्राणिमात्रांमध्ये संभोगात आनंद मिळत नाही? अन्य प्राणिमात्रांमध्ये एका मादीसाठी होणारी दोन नरांची जीवघेणी मारामारी पाहता विश्वास बसत नाही.
अपत्य संगोपनात नराचा वाटा शून्य आहे.असहमत. नैसर्गिक, शारीरीक भेदभाव वगळता, कमी-अधिक प्रमाणात मानवी नराचाही अपत्य संगोपनात सहभाग असतो.
ते आईच्या( किंवा कोणत्याही बाहेरील मदतीशिवाय) पहिली जवळ जवळ १० वर्षे पर्यंत परावलंबी असते. मानवी मूल हे पूर्ण नैसर्गिक प्रेरणेवर जगू शकणार नाही आणी मानवी बालपण हे जवळ जवळ १५ वर्षे इतके लांब असते.सहमत. परंतू मानवी मुल एकट्या आईच्या मदतीवर मोठे होत नसते. त्याला वडिलांचे साहाय्यही असावे लागते. बहुतांशी असते. जर एखादा पुरूष आपली जबाबदारी टाळत असेल तर ते चुकीचे आहे.
हा आनंद जितका मिळेल तितका घ्यावा हा विचार नसेल तर किती पुरुष स्त्रीची जबादारी गळ्यात अडकवून घेईल?म्हणजे फक्त संभोगासाठी पुरूष लग्न करतो? पण त्यासाठी लग्न करायची काय गरज आहे? फक्त संभोगासाठी कितीतरी वेश्या उपलब्ध असतात. कायद्यानेही त्याला संमती आहे. आर्थिक भार वगळता कुठलीही जबाबदारीही नाही. प्रत्येक स्त्री-पुरुषाची शारीरीक गरजे इतकीच, किंबहुना जास्त, भावनिक गरज असते. प्रेम करणे आणि करवून घेणे हा प्रत्येक स्त्री-पुरूषाचा मुलभूत हक्क आहे. भावनेशिवाय (परंतु संभोगासह) सहजीवन ही एक शिक्षा ठरावी इतके भावनेला महत्त्व आहे. विषय अत्यंत गहन आहे. वरवरची विधाने करू नयेत.
विसाव्या शतकातील स्त्रियांसाठी सर्वात मोठा आणी क्रांतिकारी शोध म्हणजे कुटुंब नियोजनाची साधने हा होय.विसाव्याशतकातील अनेक क्रांतीकारी शोधातील एक म्हणजे कुटुंब नियोजनाची साधने असे म्हणावे लागेल. सहमत आहे.
याशिवाय स्त्री मुक्ती हि अशक्य होती ( आणी आहे) अन्यथा स्त्री हि चूल आणी मूल यातून कधीच बाहेर आली नसती. कारण संभोगेच्छा टाळणे शक्य नाही आणी त्यातून येणारे गर्भारपण तिला आयुश्या साठी बंधनात टाकणारे असते.गर्भारपणामुळे आणि संतती निर्माण करण्याने एकटी स्त्रीच बंधनात अडकते? फार एकांगी विचार वाटतो आहे. मुलांच्या तळमळीने घराकडे धावणारे पुरुष पाहा, मुलांपासून मोठ्या कालावधीसाठी दूर राहून पाहा. पत्नीशी कितीही बेबनाव झाला तरी, मुलांसाठी म्हणून घटस्फोट न घेणारे पुरुष पाहा. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी हाडाची काडं करणारे पुरुष पाहा, मुलांच्या आजारपणात काळजीने काळवंडणारे, त्यांच्या उशाशी बसून राहणारे पुरूष पाहा. पुरुषाचा शारीरीक, मानसिक, भावनिक सहभागाशिवाय कुटुंब चालत नसतं. गर्भारपण टळणे म्हणजे स्त्री मुक्ती असा संकुचित विचार का? एक 'व्यक्ती' म्हणून समानाधिकार, वैचारिक, आर्थिक स्वातंत्र्य, भावना व्यक्त करण्याच्या, सामाजिक स्वातंत्र्य उपभोगण्याच्या समान संधी आदी अनेक पैलू 'स्त्री-मुक्ती'च्या विचारांमागे असतात/असावेत. पुरुषाचा सर्वस्तरावरील सहयोग महत्त्वाचा आहे. हल्लीच्या जमान्यात दोन मुलांच्यावर अधिक मुले होऊ न देण्याकडे सर्वच पती-पत्नीचा कल असतो. म्हणजे दोन मुलांनंतर गर्भारपण टळले. झाली का अशा सर्व स्त्रीयांची मुक्ती?? क्षमा असावी पण आपले विचार काही पटले नाहीत.
In reply to कांहीसा असहमत. by प्रभाकर पेठकर
अन्य प्राणिमात्रांमध्ये एका मादीसाठी होणारी दोन नरांची जीवघेणी मारामारी पाहता विश्वास बसत नाही.अन्य प्राण्यांच्या बाबतीत एकदा मादीशी संबंध संपल्यावर नर तिच्याकडे ढुंकूनही बघत नाही. तो इतर नरांशी जीवघेणी मारामारी फक्त आपले वंशसातत्य ठेवण्याच्या आंतरिक प्रेरणेने करतो. (सिंह आणी चित्ते यांच्यात तर दोन किंवा तीन किंवा चार नर सुद्धा यासाठी सामंजस्य(!) करतात). तेंव्हा त्यांच्यात संभोग हा नैसर्गिक प्रेरणेनेच होतो आनंदासाठी नाही.
अपत्य संगोपनात नराचा वाटा शून्य आहे.हे वाक्य मानवाला नव्हे तर कनिष्ठ प्राण्याना उद्देशून आहे. संभोगात आनंद आहे म्हणून मानव एकदा संबंध ठेवल्यावर स्त्री ला सोडून जात नाही आणी अपत्य संगोपनात सहभागी होतो. (जसा कनिष्ठ प्राण्यामध्ये नर सोडून जातो)
हा आनंद जितका मिळेल तितका घ्यावा हा विचार नसेल तर किती पुरुष स्त्रीची जबादारी गळ्यात अडकवून घेईल? हे आणी इतर सर्व वाक्ये मानवाच्या आंतर प्रेरणेबद्दल लिहिली आहेत. एक तरुण माणूस आणि स्त्री भेटले तर त्यांचा पहिला विचार हा नैसर्गिक आकर्षणाचा असतो. विवाह अपत्य संगोपन इत्यादी हे मानवाच्या विचारशक्ती चे प्रतिक आहेत नैसर्गिक प्रेरणेचे नव्हेत. एका रात्री पुरते भेटले आणी नंतर वेगळे झाले. यातून जर संतती निर्माण झाली तर तो पुरुष त्याची किती काळजी घेईल? मात्र अशी स्त्री पूर्वी एकतर बेकायदेशीर गर्भपाताच्या दिव्यातून जात असे किंवा आत्महत्या करत असे अन्यथा त्या मुलाला गपचूप जन्म देत असे आणी अनाथाश्रमात सोडत असे. लग्न झालेल्या स्त्रिया सुद्धा आयुष्भर बाळंतपण स्तनपान परत बाळंतपण या चक्रातून सुटका नसे. माझ्या आजीला १२ अपत्ये झाली. तिचे आयुष्य काय होते? आमचे आजोबा कितीही चांगले होते तरी चूल आणी मुल यातून तिची सुटका झाली का? माझी आई (तिचा त्या अपत्यात १२ वा क्रमांक होता) - आम्हा दोन मुलांना जन्म दिल्यावर थोडे मोठे झाल्यावर( ६-७ वर्षाचे) तिने स्वतःचे शिक्षण सुरु केले. मी १० वी होई पर्यंत तिने आपले एम ए आणी बी एड पूर्ण केले मी १२ झाल्यावर तिने शिक्षिकेची नोकरी धरली आणी २००० साली ती सन्मानाने मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाली. माझ्या आजीत आणी माझ्या आईत हा फरक का दिसतो? दोनच मुले. हे त्याचे उत्तर आहे. आता वेळ नाही म्हणून मी आपल्या प्रत्येक वाक्याचे उत्तर देत नाही आपण माझ्या लेखाचे एक विशिष्ट विचार मनात धरून वाचन केले आहे त्यामुळे असे झाले आहे असे वाटते
In reply to अन्य प्राणिमात्रांमध्ये एका by सुबोध खरे
संभोगात आनंद आहे म्हणून मानव एकदा संबंध ठेवल्यावर स्त्री ला सोडून जात नाही आणी अपत्य संगोपनात सहभागी होतो.संभोगात आनंद आहे ह्यात वाद नाहीच परंतू, पुरूष फक्त म्हणून स्त्रीला सोडून जात नाही हा तर्क मला तरी पटत नाही. माझ्या आधीच्या प्रतिसादात प्रतिपादिलेली 'भावना' ह्या गरजेकडे आपण काणाडोळा करीत आहात.
विवाह अपत्य संगोपन इत्यादी हे मानवाच्या विचारशक्ती चे प्रतिक आहेत नैसर्गिक प्रेरणेचे नव्हेत.फक्त संभोग सुखासाठी पुरूष लग्न करतो ह्या विचारांशी मी असहमत आहे. मनुष्यप्राणी हाही एक 'प्राणी' आहे. त्याला नैसर्गिक प्रेरणा असणे स्वाभाविक आहे. पण विवाहासाठी ती आणि तेवढीच गरज आहे असे नाही. ज्या 'विचारशक्ती'च्या नैसर्गिक देणगीतून त्याने विवाहसंस्था जन्माला घातली आहे त्याच विचारशक्तीने त्याला/तिला 'भावना' दिलेली आहे.
माझ्या लेखाचे एक विशिष्ट विचार मनात धरून वाचन केले आहेजरा उलगडून सांगणार का? कुठला तो विशिष्ट विचार? माझ्या प्रश्नांची, शंकांची तुम्हाला उत्तरे द्यायची नसतील तर जबरदस्ती नाही. पण माझ्या हेतू बद्दल शंका का यावी हे कळले नाही.
In reply to नैसर्गिक प्रेरणा.. by प्रभाकर पेठकर
In reply to माझ्या लेखाचे एक विशिष्ट विचार मनात धरून वाचन केले आहे by सुबोध खरे
मी आपले लिखाण पूर्वग्रह दुषित आहे असे लिहिले आहे. तसे नाही.धन्यवाद. आंतरीक प्रेरणा मला मान्य आहेच. इतर प्राण्यांप्रमाणे मानवातही ती आहे. पण, मानवात फक्त तेवढ्याच प्रेरणेने विवाह होत नाहीत. त्यात प्रेम भावनाही असते. पुरुषाला फक्त संभोगात रस असतो आणि मुलांच्या संगोपनात त्याचा सहभाग नसतो (ह्या मुद्द्यावर तुमचे उत्तर आले आहेच), अपत्य संगोपनातून सुटका झाल्यास स्त्री मुक्ती येईल वगैरे विधानांना माझा विरोध आहे आणि राहील. आपण आई आणि आजीचे जे उदाहरण दिले आहे ते सर्वसमावेशक नाही. शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती झाली. पण स्त्री मुक्ती एवढ्या दोनच मुद्यांवर उभारलेली नाही. तसे असते, तर दोन मुलांनंतर सर्वच स्त्रीयांची मुक्ती झालेली दिसून आली पाहिजे. पण तसे होत नाही. कारण स्त्री-मुक्ती हा एक गहन आणि बहुआयामी विषय आहे. पुरुष वर्चस्व आणि स्त्रीचे दुय्यम स्थान संपुष्टात आले तर तिथून स्त्री मुक्तीस प्रारंभ होईल.
In reply to माझ्या लेखाचे एक विशिष्ट विचार मनात धरून वाचन केले आहे by सुबोध खरे
In reply to याचा प्रेमाशी काय संबंध आहे by आजानुकर्ण
In reply to एक आर्ग्युमेंटः- अनेक बाय्कांवर प्रेम असूही शकते. by मन१
In reply to काय आर्ग्युमेंट आहे.. झकास. by गवि
In reply to काय आर्ग्युमेंट आहे.. झकास. by गवि
In reply to लग्न नामक करारवजा रचना by मन१
In reply to अदिती -ताई by सुबोध खरे
god has linked procreation with recreation.otherwise no man will marry.याचा अर्थ धार्मिक असा अजिबात नाही.१. देवाचा उल्लेख करूनही हे वाक्य धार्मिक कसं नाही हे मला समजलं नाही. २. दुसरं महत्त्वाचं कारण हे की विज्ञान, मनोव्यापार, इतिहास इत्यादि विषयांच्या अभ्यासातून हे वरचं वाक्य साफ चूक आहे हे दिसलेलं आहे. अभ्यास नाकारून "बाबा वाक्यं प्रमाणम्" मानणं हे धर्म आणि धार्मिकपणाचं एक लक्षण आहे. त्या दृष्टीनेही हे वाक्य धार्मिक आहे.
जर संभोगात आनंद मिळणार नसेल तर मानवी नर कोणत्याही स्त्री च्या जवळ जाणार नाही.आत्तापर्यंत जी काही उत्क्रांतीशास्त्र, मानववंशशास्त्राची पुस्तकं वाचलेली आहेत त्यात असं काहीही लिहीलेलं नाही. या सगळ्यांच्या संशोधनानुसार मानवी नर आणि अन्य प्राण्यांमधला नर यांची प्रेरणा समान असते, स्वतःची गुणसूत्र पुढे ढकलणं. प्रेयिंग मँटीस या कोळ्यांच्या जातीत आणि अन्य काही प्राण्यांच्या जातीमधे मादी नरांकडून स्पर्म घेतल्यानंतर त्याला खाते, त्यातून पोषण मिळवते आणि तरीही हे नर मेटींग करतात.
शिवाय एक स्त्री गरोदरपण आणी मुलाच्या जन्माच्या वेळी जवळ जवळ ११ -१२ महिने पूर्ण परावलंबी असते आणी त्यापुढे १३ ते १४ वर्षे अपत्य संगोपनात जर एखाद्या स्त्रीला द्यावी लागतात. पुरुषाला जर संभोगात आनंद नसेल तर पुरुष एवढी जबाबदार का घेईल?१. याच धाग्यात खालच्या प्रतिसादांमधे 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' या पुस्तकाची लिंक दिलेली आहे. इतिहासाचार्य राजवाडेंनी त्यात शेतीपूर्वकालीन आणि शेतीच्या शोधानंतरचा मनुष्यांमधले लैंगिक संबंध, कुटुंबसंस्था आणि पुनरूत्पादनाचा इतिहास दिलेला आहे. खासगी मालमत्ता जमा करण्याची सुरूवात झाल्यानंतर, आपल्या कष्टांनी जमा केलेली मालमत्ता आपल्याच मुलांना मिळावी या विचारांपोटी पुरुष स्वतःच्या मुलांची जबाबदारी घेतो. २. (जशी अनेक स्त्रियांना अपत्य संगोपनाची इच्छा नसते तसंच) अनेक पुरुषांनाही अपत्य संगोपनाची इच्छा आणि हौस असते असं समाजात दिसतं. या पुरुषांवर तुमचं हे वाक्य प्रचंड अन्याय करणारं आहे. (हे एक उदाहरण) ३. हे "पूर्ण परावलंबीपण" अलिकडे फारच कमी झालेलं दिसतं. प्रसिद्ध स्त्रियांचं उदाहरण द्यायचं तर नोबेल पारितोषिक विजेत्या मेरी क्यूरी, गेर्टी कोरी या स्त्रिया प्रसूतीच्या दोन-तीन दिवस आधीही प्रयोगशाळेत काम करत होत्या. सर्वसामान्य आयुष्यात बघायचं तर मुंबईच्या लोकल ट्रेनमधेही पाच-सहा महिने गर्भार असणार्या स्त्रिया नियमितपणे ऑफिसात जाताना दिसतात. प्रसूतीच्या पुढच्या आठवड्यात स्त्रिया कामालाही लागलेल्या दिसतात. अशी एक बाई आमच्या ऑब्झर्व्हेटरीतही पाहिली आहे; शुक्रवारी संध्याकाळी नेहेमीप्रमाणे निघाली, सोमवारी मुलं झाली. ही बाई पुढच्या सोमवारी तिचं संशोधन प्रसिद्ध करण्यासाठी लिखाण करायला लागली होती. बांधकामाच्या साईटवरही तान्ही पोरं एकीकडे आणि त्यांच्या आया विटा वहाताना दिसणं हे प्रकार दिसतात. Evolution of sexual reproduction, Kin selection आणि तत्संबंधी पानांवर बरीच तपशीलवार माहिती आहे. तुमच्या प्रतिसादातली अधलीमधली वाक्य ठीकठाक असली तरी त्यातला कार्यकारणभाव सुसंगत नाही; लैंगिकता, शरीरसंबंध, अपत्यसंगोपनाची आवड वगैरे गोष्टींमधेही बरीच गडबड दिसते आहे. स्त्री-स्वातंत्र्यामधे कुटुंब नियोजनाची साधनं स्त्रियांच्या हातात येणं महत्त्वाचं असलं तरी हेच एकमेव कारणही नाही. माझा प्रतिसाद फारच त्रोटक आहे. मानववंशशास्त्र, उत्क्रांती, यांचा इतिहास या विषयांवर आणि स्त्रियांचं समाजातलं खालचं स्थान कशामुळे आलं याबद्दलही लिहीण्यासारखं बरंच काही आहे.
In reply to गडबडगुंडा by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to <<<<em>१. देवाचा उल्लेख by शिल्पा ब
In reply to गडबडगुंडा by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to धागा बराच भरकटलेला आहे by सुबोध खरे
In reply to गडबडगुंडा by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to त्यात स्री देह पुरूष देहाला by राही
In reply to त्यात स्री देह पुरूष देहाला by राही
In reply to थोडे फार वाचन by राही
In reply to मुळात ही पोस्ट मानवी देह, रजोनिवृती, संप्रेरकं, कामेष्णा, by संजय क्षीरसागर
In reply to ... म्हणून वर लिहिलेले वाक्य बरोबर आहे असे वाटते by संजय क्षीरसागर
In reply to अधिक माहिती by आजानुकर्ण
केमिकल लोच्या