मध्य वयातील वादळ
In reply to पंच्चेचाळीसावं वरीस धोक्याचं.... by प्रभाकर पेठकर
In reply to पंच्चेचाळीसावं वरीस धोक्याचं.... by प्रभाकर पेठकर
पण तो ते 'निसर्ग नियम' ह्या विचाराने सर्व काही स्विकारतोपेठकरकाका, ही इतकी एकांगी कमेंट तुमच्याकडून आली आहे ह्यावर विश्वास बसत नाहीये.
In reply to पण तो ते 'निसर्ग नियम' ह्या by यशोधरा
स्त्रीया त्यांच्या शरीरातील बदल 'निसर्ग नियम' ह्या विचाराने का स्विकारू शकत नाहीत?ह्या वाक्यातून मला स्त्रीयांच्या अशा काळातील वागण्यावर सखोल चर्चा घडावी अशी अपेक्षा आहे.
आपल्या वागण्याने, चिडचिड करण्याने सर्व संसाराची राखरांगोळी होते आहे हे पाहूनही समंजसपणा दाखवून, नवर्याशी बोलून ह्यावर उपाययोजना का करीत नाहीत.स्त्रीयांच्या शारीरीक आणि मानसिक बदलांबद्दल नोंद घेऊनच ह्यावर नवर्याशी चर्चा करण्याचा, शांतपणे बोलून समस्या सोडविण्याचा विचार मांडला आहे.
ह्याच काळात पुरूषाला त्याच्या (व्यवसाय) निवृत्तीचे वेध लागलेले असतात. निवृत्ती काळातील आर्थिक गणितांनी तोही व्यथित, चिंतित असतो. त्याच्या सहनशक्तीची पातळीही, महागाईशी झुंजता झुंजता, उतरणीला लागलेली असते त्यात निवृत्तीकाळातील समस्यांची चिंता ह्या सर्वांशी एकांगी लढणार्या त्याच्या कडून 'पत्नीला, तिच्या शारीरीक बदलाला समजून घेण्याची' अपेक्षा करणं म्हणजे त्याच्या दुर्बल खांद्यावर अतिरिक्त भार टाकण्यासारखे आहे.पुरुषाची ह्या वयातील मानसिक अवस्था विशद करण्याचा एक क्षीण प्रयत्न केला आहे. ह्या व्यतिरि़क्तही अनेक भावभावनांना तोही सामोरा जात असतोच. त्यामुळे 'नवर्याने समजून घेतले पाहिजे' असा विचार न करता, त्याच्या एकट्याच्या खांद्यावर बोजा न टाकता हा भावनिक बोजा दोघांनीही उचलून समस्या निवारण केले पाहिजे.
अशा वयात दोघांनीही एकमेकांना समजून घेतले पाहीजे, एकमेकांना भावनिक आधार दिला पाहीजे आणि चर्चेतून समस्येची धार बोथट केली पाहीजे.ह्या विचारातही दोघांनाही स्थान आहे. दोघांच्याही गरजेचा विचार केला आहे. एक्मेकांनी एकमेकांचे समुपदेशन करून धीर, आधार दिला पाहिजे.
शब्दांना अतिशय धार असते. धारदार शब्दांचा बेबंद वापर (शारीरीक बदलामुळे)केल्याने नाती कायमस्वरुपी तुटतात. अशा वयात विधायक वाचन आणि डॉक्टरांची मदत घेतल्यास आयुष्यातील हे वळणही पार करताना जास्त कठीण जाऊ नये.जेंव्हा आपल्याला समुपदेश जमण्यासारखे नसते तेंव्हा तज्ञांची (डॉक्टरची) मदत घ्यावी, विधायक वाचन करावे. असे सुचविले आहे. ज्या प्रतिसादात दोघांचाही विचार मांडला आहे. तो एकांगी कसा?
In reply to एकांगी कसा? by प्रभाकर पेठकर
In reply to एकांगी कसा? by प्रभाकर पेठकर
In reply to एकांगी कसा? by प्रभाकर पेठकर
In reply to पेठकरकाका, by यशोधरा
पुरुष निसर्गनियमानुसार सर्व काही स्वीकारतात, असं खरंच वाटतं तुम्हांला?सर्वच पुरुष सर्व काही स्विकारत नसले तरी बरेच पुरुष बरंच काही स्विकारतात, हे माझे वैयक्तिक निरिक्षण आहे.
आणि स्त्रिया स्वीकारत नाहीत हा निष्कर्ष तुम्ही कुठून काढलात?हा निष्कर्ष मी काढलेला नाही. मुळ धाग्यात डॉक्टरसाहेबांचे विधान आहे, रजोनिवृत्ती झाली म्हणजे आपण म्हातारे होणार आणि सुंदर राहणार नाही, आपल्या त्वचेला सुरकुत्या येणार आणि आपली कांती पूर्वीसारखी राहणार नाही या दडपणाखाली त्यांचे मानसिक आयुष्य उलथापालथ होते.
.........सतत हेच आयुष्य असेल तर हळूहळू वार्धक्याकडे झुकताना तिची अधिक चिडचिड होणं पर्याप्त नाही का?चिडचिड होणे (शारीरीक बदलामुळे) हे मी कुठे नाकारले आहे? माझे म्हणणे एवढेच आहे की पुरूष म्हणून कदाचित नवर्याला ह्या शारीरीक बदलांची संपूर्ण माहीती नसू शकते तेंव्हा त्याच्याशी बोलून, चर्चा करून प्रश्न सोडवायचा प्रयत्न करावा. ह्यात मी गैर असे काय सुचविले आहे?
स्त्रिया आर्थिक भार उचलत नाहीत?हे स्त्रियांच्या शारीरिक बदलाच्या विषयाला सोडून होते आहे. स्त्रियांच्या रजोनिवृत्तीसमयी होणार्या शारीरीक/मानसिक्/भावनिक बदलांमुळे उद्भवणार्या समस्यांवर स्त्रियांच्या बाजूने मुद्दे मांडताना त्याच काळात पुरुषाचेही कांही प्रश्न निर्माण झालेले असतात त्याचा विशेष उल्लेख डॉक्टरसाहेबांच्या लिखाणात आढळला नाही तेंव्हा हा मुद्दाही सर्व सदस्यांनी विचारात घ्यावा आणि साधक-बाधक चर्चा करावी असे मला अपेक्षित आहे.
एकीकडे म्हणता की नवर्याशी चर्चा करुन मार्ग काढावा आणि पुढे म्हणता की त्याच्या दुर्बल खांद्यांवर भार टाकू नये? मग जर नवराच स्त्रीच्या शरीरात, मनात घडणारे बदल समजून घेणं ह्याला "भार" समजणार असेल तर बोलणंच खुंटलं की!कुठलीही चर्चा, सल्लामसलत, तज्ञांचे मार्गदर्शन न घेता 'माझ्या रजोनिवृत्तीचा काळ आहे तेंव्हा मी जे कांही वागेन, बोलेन ते मनावर न घेता मला सगळ्यांनी, विशेषतः नवर्याने, समजून घ्यावे' ह्या समजूतीला मी, तोही कांही विशिष्ट समस्यांना तोंड देत असताना, नवर्याच्या खांद्यावर अतिरिक्त भार टा़कणे म्हणतो आहे. चर्चेला नक्कीच वाव आहे. चर्चा, सल्ला मसलत, तज्ञांचे मार्गदर्शन ह्या मार्गाने जाण्यास मी 'भार टाकणे' म्हणत नाहीए.
नक्कीच पण जर समजून घेण्याला भार समजले तर हे होणार कसे?वर म्हंटल्याप्रमाणे, चर्चेविना, सल्याविना, तज्ञांच्या मार्गदर्शनाविना 'नुसते समजून घेणे' अपेक्षिणे हा भारच आहे.
हे दोघांनाही लागू आहे, जितके स्त्रीला तितकेच पुरुषांनाही. केवळ स्त्रियांना नव्हे इतके लक्षात ठेवले तरी खूप झाले.पुन्हा विषयाला सोडून होते आहे हे. पुन्हा सांगतो विषय असा आहे की, 'रजोनिवृतीसमयी स्त्रीच्या शारीरीक, मानसिक आणि भावनिक बदलांमूळे येणार्या समस्या.' हे सर्व स्त्री बद्दलच असल्याने माझ्या प्रतिसादातील माझे विधान फक्त स्त्रियांना (आणि तेही रजोनिवृत्ती काळातील) लागू आहे. इतर वेळी ते दोघांनाच नाही तर घरातील सर्वांनाच (आई, वडील, नवरा, बायको, बहीण, भाऊ, सासू, सासरे, मुले, इ.इ.इ.) लागू आहे. अगदी मिसळपाववरील सर्व सदस्यांनाही. अत्यंत, महत्त्वाचा आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्यावर निकोप चर्चा व्हावी ह्या उद्देशाने मी पुरुषांच्यावतीने काही मुद्दे मांडले होते. स्त्री-पुरुष वेगळेपणा, स्वभाव विशेष किंवा दोघांपैकी एकाला कमी वगैरे लेखण्याचा माझा उद्देश नाही. मुद्दाम आगी लावण्यासाठी बेछूट विधाने करण्याचे उद्योग मी करीत नाही. पण माझ्या हेतूंबद्द्ल शंका असेल तर संपादक मंडळाने माझे सर्व प्रतिसाद संपादीत करावेत. माझी काही हरकत नाही.
In reply to स्पष्टीकरण... by प्रभाकर पेठकर
पण माझ्या हेतूंबद्द्ल शंका असेल तर संपादक मंडळाने माझे सर्व प्रतिसाद संपादीत करावेत. माझी काही हरकत नाहीअरे बापरे पेठकरकाका! असो. :( यापुढे काळजी घेईन.
In reply to पण माझ्या हेतूंबद्द्ल शंका by यशोधरा
In reply to सॉरी. by प्रभाकर पेठकर
In reply to सॉरी. by प्रभाकर पेठकर
पण ह्याच धाग्यावर 'काही प्रतिसाद याला स्त्री विरुद्ध पुरुष असे स्वरुप देउ पहातात.' असा आरोप दिसलाहे माझ्या एका चारोळी प्रतिसादातील विधान आहे. आरोप नव्हे.आपले मत दर्शवणारे एखादे विधान म्हणजे आरोप म्हणता येणार नाही.ते विधान म्हणजे त्रिकालाबाधित सत्य असेही म्हणता येणार नाही. एखादे मतभिन्नता दर्शवणारे विधान म्हणजे सुद्धा आरोप नव्हे.सार्वजनिक व्यासपीठावर अशी अनेक विधाने होत असतात.प्रत्येक विधान हा फार गांभीर्यानेच केलेले असते अशातला अजिबात भाग नाही. दुसरी गोष्ट अशी आपण या विधानाशी सहमत नाही असे विधान आपण करु शकता! तिसरी गोष्ट अशी की या धाग्यावरील आपल्या प्रतिसादाशी मी बहुतांशी सहमत आहे. चौथी गोष्ट अशी स्त्री पुरुष वर्तनाबाबत मी निरंजन घाटयांच्या पुस्तकाची लिंक एका प्रतिसादात दिली आहे. कोणी पुस्तक वाचले असल्यास तो काही मत देउ शकेल.
In reply to विधान by प्रकाश घाटपांडे
In reply to कोणाचा गैरसमज असल्यास..... by प्रभाकर पेठकर
In reply to हॅहॅहॅ by प्रकाश घाटपांडे
In reply to स्पष्टीकरण... by प्रभाकर पेठकर
In reply to पंच्चेचाळीसावं वरीस धोक्याचं.... by प्रभाकर पेठकर
In reply to स्त्री मुद्दाम चिडचिड करत by जेनी...
स्त्री मुद्दाम चिडचिड करत नसावी .... हे बदल सुद्धा " निसर्ग नियम " असावेत ...बदल हे 'निसर्ग नियमाने' होतात. त्यांना स्विकारणे हे परिपक्वतेचे लक्षण आहे.
ती नवर्याला " मला समजुन घे " अशी जबरदस्तीही करत नसावी ... नवर्याचं ते कर्तव्य असावं ....हेच म्हणतो मी. एकदा 'कर्तव्याचे' लेबल लावले की त्याने ते केलेच पाहिजे ही जबरदस्ती असते.
कबूल आहे पूरुष टक्कल , पोट सुटणं या गोष्टिंकडे दुर्लक्ष करतो ... पण तसं करायला स्त्री त्याला नक्कीच सांगत नाहि ...मी कुठे म्हंटल आहे की तसं करायला स्त्री त्याला सांगत असते म्हणून?
त्याने लक्ष द्यायला हवं पण चालढकल करणे हाच पूरुषाचा मुळ स्वभाव आहे याला स्त्री काय करणार ???सगळ्या पुरुषांचा 'चालढकल करणे' हा मूळ स्वभाव असतो?
पूरुषाला निव्रुत्तीचे वेध लागतात ... पण स्त्रीयाना निव्रुत्ती कुठे मिळते ??हा वेगळा विषय आहे. त्यावर वेगळी चर्चा घडू शकते.
त्याप्रमाणे संप्रेरके ही स्त्रीयांत होणार्या मानसिक बदलाला कारणीभुत असतात .. मग स्त्री मुद्दमहुन संसाराची राखरांगोळी करतेय हे म्हणणं कितपत योग्य???सर्व स्त्रीया करतातच असे मी म्हणत नाहीए. पण अशा केसेसही असतात. शारीरिक बदलांना न स्विकारणे, 'आपण आजन्म तरूण राहणार आहोत' हा भ्रम, आजूबाजूच्या स्त्रियांशी संवाद न करणं आणि आपलाच हेका चालवणं ह्या गोष्टी आपल्या संसारासाठी घातक आहेत ह्याची जाणीव ठेवल्यास आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार केल्यास 'राखरांगोळी' टाळता येते. 'राखरांगोळी' हा शब्द टाळता येईल पण 'संसारसुखाची होणारी पराकोटीची हानी' असा शब्दप्रयोग केला तरी ते घटीत टाळता आल्यास जास्त चांगले. ------------------------------------------------------------------------------
...रजोनिवृत्ती झाली म्हणजे आपण म्हातारे होणार आणि सुंदर राहणार नाही, आपल्या त्वचेला सुरकुत्या येणार आणि आपली कांती पूर्वीसारखी राहणार नाही या दडपणाखाली त्यांचे मानसिक आयुष्य उलथा पालथ होते.... ....आपले वाढते वय साजरे करावे असे कोणाही स्त्रीला वाटत नाही.....ह्यावर प्रत्येक स्त्रीने जरूर विचार करावा आणि अशी दडपणे आपल्या आयुष्यात येऊ नयेत म्हणून प्रयत्नशील राहावे.
In reply to थोडा विचार करण्याची गरज आहे. by प्रभाकर पेठकर
अशा वयात दोघांनीही एकमेकांना समजून घेतले पाहीजे, एकमेकांना भावनिक आधार दिला पाहीजे आणि चर्चेतून समस्येची धार बोथट केली पाहीजे.पुरुषाला सहसा स्त्रीच्या तुलनेत मिळणारा आराम, स्त्रियांची घर, नोकरी ह्या दोन्ही आघाड्यांवर होणारी मानसिक व काही कालाने शारीरीक दमछाक आणि त्याची सहसा न घेतली जाणारी दखल, आर्थिक सहभाग देऊनही बर्याचदा त्याची कदर नसणं वा एकूणात घरामधील लोकांनी गृहीत धरल्याची भावना आणि तत्सम इतर गोष्टी ह्या सार्यांचा मानसिक परिणाम शरीरावर जाणवल्याशिवाय राहील का? तेह्वा हे सर्व एकमेकांत गुंतलेले विषय आहेत, एकापासून दुसारा असा वेगळा काढता येत नाही. तुम्ही पुरुषांना आर्थिक विवंचना असतात हे म्हणालात तेह्वा मी स्त्रिया आर्थिक भार उचलत नाहीत का हे विचारले आहे. तो विषय वेगळा कसा?
कुठलीही चर्चा, सल्लामसलत, तज्ञांचे मार्गदर्शन न घेता 'माझ्या रजोनिवृत्तीचा काळ आहे तेंव्हा मी जे कांही वागेन, बोलेन ते मनावर न घेता मला सगळ्यांनी, विशेषतः नवर्याने, समजून घ्यावे' ह्या समजूतीलाअशी का आणि कशाला समजूत असेल बरे स्त्रियांची? :) हा काही फार सुखद काळ असतो का त्यांच्यासाठी तरी? 'रजोनिवृतीसमयी स्त्रीच्या शारीरीक, मानसिक आणि भावनिक बदलांमूळे येणार्या समस्या' - ह्या समस्या एकदम येत नाहीत. हे वर्षानुवर्षे साचत रहत असते. त्रास होत असतो, काहीतरी अशा निमित्ताने तो बाहेर पडतो. असो.
In reply to पेठकरकाका, मला वाटते तुमच्या by यशोधरा
'रजोनिवृतीसमयी स्त्रीच्या शारीरीक, मानसिक आणि भावनिक बदलांमूळे येणार्या समस्या' - ह्या समस्या एकदम येत नाहीत. हे वर्षानुवर्षे साचत रहत असते. त्रास होत असतो, काहीतरी अशा निमित्ताने तो बाहेर पडतो.म्हणूनच नवर्याशी संवाद महत्त्वाचा असे म्हणतो. संवादाने अशा भावनांचा निचरा होऊन अशा निमित्ताने 'एकदम' स्फोट होण्याचे टळेल असे माझे मत आहे.
In reply to कांही मुद्दे... by प्रभाकर पेठकर
In reply to पुरुषांच्या मानसिक समस्या by सुबोध खरे
In reply to खरेसाहेब, नेमकं चित्र रंगवलं आहे तुम्ही by काकाकाकू
In reply to काय गोळ्या वेग्रे घ्यायच्या by शिल्पा ब
चांगले दिसणे आणि चांगले राहणे( good looking and well groomed) हा एक स्त्री स्वभावाचा पैलू आहे.पुरुषांना आकर्षित करणे हा त्या व्यक्तिमत्त्वाचा एक छोटासा भाग आहेयाबाबतीत असहमती. शिल्पा ब आणि यशोधरा यांच्या वर दिलेल्या प्रतिसादांना +१.
In reply to रुणुझुणू यांनी मायबोलीवर by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अदिती ताई by सुबोध खरे
In reply to अदिती ताई by सुबोध खरे
In reply to अदिती ताई by सुबोध खरे
In reply to :-) by सहज
बायकोचे सरासरी वय २० ते ४० मधे ठेवतातजबरदस्त प्रेरणा हीच संप्रेरकांवर मात करायचा एकमेव जालीम उपाय!
आपण कधी एखाद्या स्त्री चा चाळीशीचा वा पन्नासावा वाढदिवस थाटात साजरा केलेला पहिला आहे काय?यांसारखी वाक्यं वाचताना. असो. * म्हणजे पूर्वीही घडत असेल; किंवा कधीच घडले नसेल इतरांच्या बाबतीत - मी आपली माझ्या अनुभवावरुन सांगते आहे. इतर कुणाला यापेक्षा वेगळा अनुभव असेल हे मान्य आहे.
In reply to हल्ली* अनेकदा डॉक्टर मंडळींना by आतिवास
In reply to आपले म्हणणे by सुबोध खरे
In reply to बहुतेक धाग्यांमध्ये आणि by पिंपातला उंदीर
In reply to vulnerable- असुरक्षित किंवा हळव्या by सुबोध खरे
In reply to बहुतेक धाग्यांमध्ये आणि by पिंपातला उंदीर
In reply to याचा अनुभव मलाही आला आहे व by महेश नामजोशि
In reply to याचा अनुभव मलाही आला आहे व by महेश नामजोशि
In reply to हार्मोनियम by कानडाऊ योगेशु
In reply to हार्मोन्सचा त्रास कमी व्हावा म्हणुन हार्मोनियमचा क्लास लावणे by संजय क्षीरसागर
In reply to कारण शेवटी सूर जुळणे महत्वाचे by डॉ सुहास म्हात्रे
ते झालं की सगळे त्रास आपोआप कमी होतातक्या बात है एक्का! तुमने तो मारा छक्का!
In reply to स्वातत्तता by ऋषिकेश
In reply to स्वातत्तता by ऋषिकेश
In reply to स्वातत्तता by ऋषिकेश
In reply to स्वातत्तता by ऋषिकेश
In reply to स्वातत्तता by ऋषिकेश
स्त्रियांना रजोनिवृत्ती मुळे आपले स्त्रीत्व संपले असे वाटू लागते. आपण म्हातारे होणार हि भीती बोचू लागते. आता आपण पूर्वी सारख्या तरुण राहिलो नाही याची खंत वाटू लागते. आपल्या नवर्याला आपल्याबद्दल आकर्षण राहणार नाही हि भीती वाटू लागते.इत्यादि इत्यादिअसहमत. आपण तरुण ‘दिसत’ नाही यापेक्षा आता आपल्याला काम पूर्वीसारखे निभत नाही, ही खंत स्त्रीला जास्त असते. म्हणजे स्वत:पेक्षा कुटुंबाची काळजी. फारच कमी स्त्रिया या वयात तरुण दिसण्याचा प्रयत्न करतात. जास्तीत जास्त स्त्रिया उलट सुटकेचा श्वास टाकतात (पाळीची अन पुरुषांच्या लघळपणाची कटकट मिटली म्हणून.) असे निरिक्षण आहे..
रजोनिवृत्ती झाली म्हणजे आपण म्हातारे होणार आणि सुंदर राहणार नाही, आपल्या त्वचेला सुरकुत्या येणार आणि आपली कांती पूर्वीसारखी राहणार नाही या दडपणाखाली त्यांचे मानसिक आयुष्य उलथा पालथ होते.( age miracle cream) सारख्या सौंदर्य प्रसाधनाचा जबरदस्त खप यामुळेच होतो.पुन्हा असहमत. तारुण्याचे आकर्षण काही फक्त स्त्रियांनाच असते काय ? पुरुष सौंदर्य प्रसाधने किंवा तरुणांसारखे स्टायलीश कपडे वापरत नाहीत काय ? वयस्कर पुरुष स्त्रियांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत नाहीत काय ? दडपण असेल तर सौंदर्य टिकवण्यापेक्षा सर्व अवधाने सांभाळण्याची शक्ती टिकवण्याचे.
आपण कधी एखाद्या स्त्री चा चाळीशीचा वा पन्नासावा वाढदिवस थाटात साजरा केलेला पहिला आहे काय? क्वचितच. पण एखाद्या प्रथितयश माणसाचा(राजकारण्याचा सुद्धा) पन्नासावा वाढदिवस सहज साजरा होताना दिसतो कारण काय? पुरुषाचे कर्तृत्व पहिले जाते स्त्री चे कर्तृत्व पहिले जाते पण आपले वाढते वय साजरे करावे असे कोणाही स्त्रीला वाटत नाही.कौटुंबिक पातळीवर कितीतरी स्त्रियांचे चाळीस अथवा पन्नासचे वाढदिवस थाटात साजरे झालेले पाहिले आहेत. मोठ्या प्रमाणावर ते साजरे न करण्याचे कारण वय लपवणे हे नसून स्वत:ला फार एक्सपोज न करण्याची स्वाभाविक स्त्रीसुलभ वृत्ती हे आहे. तसेच कर्तृत्वाचा दिंडोरा पुरुष जितके उत्साहाने पिटून घेतात, तसा स्त्रियांचा कल नसतो. ....वयामुळे स्त्रियांच्या शरीरात होतात तसे संप्रेरकांचे वगैरे बदल पुरुषांचे होत नसल्यामुळे चाळीशीनंतर पुरुषांना अशा काही समस्यांना तोंड द्यावे लागत असेल असे वाटत नाही. बाकी लेखातील इतर निरिक्षणांशी सहमत.
In reply to स्त्री अन पुरुष.. by सस्नेह
आपण तरुण ‘दिसत’ नाही यापेक्षा आता आपल्याला काम पूर्वीसारखे निभत नाही, ही खंत स्त्रीला जास्त असते.अगदी बरोबर!!! अनेक वर्षांनी मुलीचं बाळंतपण झेपण्याइतके आपण खमके/खंबीर राहू का असली भीती मधेच डोके वर काढू लागते. :)
कौटुंबिक पातळीवर कितीतरी स्त्रियांचे चाळीस अथवा पन्नासचे वाढदिवस थाटात साजरे झालेले पाहिले आहेत.प्रचंडच सहमत. उलट या नव्या फेझ चे एक अॅड्वेन्चरस आकर्षण वाटते :)
In reply to स्त्री अन पुरुष.. by सस्नेह
(पाळीची अन पुरुषांच्या लघळपणाची कटकट मिटली म्हणून.) असे निरिक्षण आहे..बाप रे! हेच तर कारण आहे संप्रेरकं लवकर मंदावण्याचं आणि मंदावल्यावर निरूत्साही वाटण्याचं.
आपण तरुण ‘दिसत’ नाही यापेक्षा आता आपल्याला काम पूर्वीसारखे निभत नाही, ही खंत स्त्रीला जास्त असते.वयपरत्वे शारीरिक जोम कमी होणारच याचा अस्विकार असं नैराश्य आणतो. पण आहे ते शरीर योग्य व्यायामाच्या आभावामुळे वेळेपेक्षा लवकर अकार्यक्षम झालं हाच सार्वत्रिक अनुभव आहे, मग तो पुरूष असो की स्त्री. बाकी इतर गोष्टींवर चर्चा मुळ प्रश्न सोडवायला कोणतीहि मदत करत नाही म्हणून व्यर्थ आहे.
In reply to निम्न मध्यम वर्गीय आणि कनिष्ठ by यशोधरा
In reply to हार्मोनल बदलांची वस्तुस्थिती by यशोधरा
In reply to निम्न मध्यम वर्गीय आणि कनिष्ठ by यशोधरा
निम्न मध्यम वर्गीय आणि कनिष्ठ वर्गीय स्त्रियांचे प्रमाण लोकसंख्येत वरील वर्गाच्या पाच पट आहे आणि त्यांना सुद्धा रजोनिवृत्ती चा त्रास होतोचइंटरनेट वापरणारा, मिसळपाव वाचणारा वर्ग हा उच्च मध्यमवर्ग आहे. निम्न मध्यमवर्ग आणि कनिष्ठ वर्गाला इंटरनेट वापरणे आणि मिसळपाव वाचण्यएवढा वेळ परवडेल अशी आर्थिक स्थिती दुर्दैवाने अजूनतरी मराठी भाषिक (आणि भारतीयही) समाजाची नाही. इथल्या लेखनाचा टार्गेट ऑडियन्स हा उच्चमध्यमवर्गीयच आहे. पण तरीही यशोधरा यांचा मुद्दा तेवढाच ग्राह्य आहे. आर्थिक वर्ग सुधारलेला असला म्हणून स्त्रियांकडे होणारं दुर्लक्ष, गृहित धरलं जाणं संपलेलं आहे असं अजिबातच दिसत नाही. कनिष्ठ वर्गातल्या स्त्रिया मात्र सबला असल्याचं अनेकदा दिसतं.
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to उफ्फ्फ... by अर्धवटराव
In reply to हा हा हा by आजानुकर्ण
In reply to उफ्फ्फ... by अर्धवटराव
In reply to उफ्फ्फ... by अर्धवटराव
सुंदर...