महाराज
लेखनप्रकार
श्री निसर्गदत्त महाराज या औलीयाची तुम्हाला ओळख व्हावी म्हणून हा लेख.
एक अत्यंत सामान्य माणूस सुद्धा सिद्ध होऊ शकतो याचा दाखला म्हणजे महाराज. आपल्याला त्यांच्या जीवनात डोकावण्याच कारण नाही. ते सामन्याहून सामान्य होते, त्यांची शैक्षणिक, आर्थिक किंवा कौटुंबिक स्थिती फारशी आशादायक नव्हती इतकी माहिती पुरेशी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते मराठी होते. त्यांनी स्वतः तपासलेलं आणि त्यांच्या सिद्धत्वाची अपूर्व झलक दाखवणारं एकमेव पुस्तक म्हणजे 'सुखसंवाद'. साधकांच्या विविध प्रश्नांना समोरासमोर दिलेल्या उत्तरांच ते संकलन आहे.
महाराज कोणत्या साधनेनं सिद्धत्वाला पोहोचले हे जाणणं उपयोगी आहे. शांत बसून 'मी आहे' या जाणिवेवर स्थिर राहणं ही एकमेव साधना त्यांना बोधाप्रत घेऊन गेली.
त्यांच्या शब्दात :'मी आहे' या शुद्ध असण्यावर मन एकाग्र करणे आणि त्यातच राहाणे ही गुरूंची सूचना मी पाळली. केवळ 'मी आहे' ही जाणिव मनात धरून मी तासंतास बसत असे. लवकरच शांती, आनंद आणि सखोल सर्वव्यापी प्रेम ही माझी सहजस्थिती बनली. त्या स्थितीत मी, माझे गुरू, माझे रोजचे जीवन आणि सभोवतालचे जग सारे अदृश्य झाले. केवळ शांती आणि अथांग मौन उरले.(सुखसंवाद - ५१)
'जागणे, झोपणे आणि परत जागणे सतत चालू असते पण हा अवस्था पालट मला घडत नाही. त्या अवस्था फक्त घडतात एवढेच. मला केव्हाच काही घडत नाही. काहीतरी अपरिवर्तनीय, गतिहीन, स्थिर, सुमेरूवत, खडकासारखे अभेद्य आहे. घनदाट सच्चिदानंद स्वरूप आहे. मी त्या वेगळा कधीच नसतो. कोणताही छळ किंवा आपत्ती मला स्वरूपापासून विचलित करू शकणार नाही. ही अवस्था संपूर्ण स्थिर आणि कायमची आहे. मी काही केले तरी ती सुमेरूवत स्थिर असते. एकदा तुम्हाला सत्यस्वरूपाची प्रचिती आली की तुम्ही त्यात स्थिर होता'. (सुखसंवाद -४२)
या गृहस्थाचा आत्मविश्वास कमाल आहे आणि त्यांचे शब्द प्रत्येक साधकाला अपरिमित दिलासा आहेत.
ते म्हणतात : 'मी आहे' हा साधा भाव सर्वात उत्तम. त्यावर धीमेपणानं स्थिर राहा. येथे धीमेपणा हा सुज्ञपणा आहे. अपयशाचा विचार करू नका. या कार्यात अपयश येऊच शकत नाही'. (सुखसंवाद - ५१)
'मी तुम्हाला परत सांगतो, तुम्ही सर्वव्यापी, सर्वातीत, सदवस्तू आहात - त्याप्रमाणे वागा. विचार, भावना, कृती ऐक्याने होऊ द्या. मग मी जे म्हणतो त्याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला येईल. प्रयत्नाची गरज नाही. विश्वास ठेवा आणि त्याप्रमाणे वागा'. (सुखसंवाद - ५१)
'मी सध्या चौऱ्याहत्तर वर्षांचा आहे तरी मी चौऱ्याहत्तर वर्षांपूर्वीचे अर्भक आहे. मला स्पष्ट जाणवते की सर्व बदल होऊनही मी ते मूल आहे. माझ्या गुरूंनी मला सांगितले, "आत्ता देखील जे मूल तू आहेस तेच तुझे स्वरूप आहे.
'मी हे आहे' किंवा 'मी ते आहे' अशा कल्पनेमुळे बिघडण्यापूर्वी 'मी आहे' हे जेथे अजून शुद्ध आहे, अशा शुद्ध असण्याच्या स्थितीत मागे जा". तुमचे ओझे तुमच्या खोट्या तद्रूपतेमुळे आहे. त्याचा त्याग करा'. (सुखसंवाद - ५१)
_______________________________
रोजच्या जगण्यातल्या प्रश्नांची उत्तरं सिद्ध कशी देतो, तो कसं जगतो हे सुखसंवादाच्या निमित्तानं आपल्याला कळू शकतं. आगदी आपल्यातलामाणूस आपल्याला सांगतोय असे हे संवाद आहेत.
कोणताही सिद्ध तीन गोष्टी साधत असतो : एक, तुम्हीच सत्य आहात हे तुम्हाला सांगणं; दोन, आपण सत्य नाही असं वाटण्याला तुमच्या ज्या धारणा कारणीभूत आहेत त्या दूर करणं आणि तीन, सत्य आणि आपण यांची स्वतःच्या प्रतिभेनं सांगड घालून देणं!
सत्य जरी एक असलं आणि अनेकांनी ते अनेक प्रकारे सांगितलं असलं तरी ज्या सिद्धाशी आपलं ट्युनिंग जमतं तो आपल्याला भावतो.
'स्व'चा गौरव महाराज कसा करतात ते पाहा :
प्रथमच तुम्ही जाणले पाहिजे की प्रत्येक गोष्टीचा, तुमचा स्वतःचा देखील पुरावा तुम्हीच आहात. तुमचे अस्तित्व कोणी सिद्ध करू शकत नाही कारण त्याच्या अस्तित्वाला प्रथम तुम्हीच बळकटी आणली पाहिजे. तुमच्या असण्याबद्दल आणि जाणण्याबद्दल तुम्ही कोणाचे देणे लागत नाही. तुमच्या लक्षात असू द्या की तुम्ही संपूर्णपणे स्वयंसिद्ध आहात. तुम्ही कोठून येत नाही किंवा कोठे जात नाही. तुम्ही कालातीत असणे आहात, जाणिव आहात. (सुखसंवाद - ३७)
सिद्धत्वाच्या स्थितीचं ते किती साधेपणानं वर्णन करतात ते पाहण्यासारखं आहे :
'मी जगाशी एकरूप आहे तरीही त्यापलिकडे आहे असे जाणल्यामुळे मी सर्व भीती आणि इच्छा यापासून मोकळा झालो. मोकळा व्हावे असे मी बुद्धिने ठरवले नाही. मला असे अढळले की मी अनपेक्षितपणे, विनासायास मोकळा आहे. तेंव्हापासूनच इच्छा आणि भिती यांचापासूनची ही मोकळीक टिकून आहे.
आणखी मला असे अढळले की मी प्रयत्न करण्याची जरूरी नाही. विचारामागोमाग घटना विनाविलंब आणि अविरोधपणे घडते. विचार स्वयंपूर्ण होतात. सर्व गोष्टी योग्य रितीने आणि सहजपणे जमून जातात.
मुख्य बदल मनात झाला. मन गतिहीन, मौन झाले. ते जलद प्रतिसाद देते पण प्रतिसादाला चिरस्थायी करू पाहात नाही. स्वयंस्फूर्ती हीच जीवनपद्धती झाली. खरे नैसर्गिक झाले आणि नैसर्गिक खरे झाले.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे अपरंपार स्नेह, दुर्बोध आणि शांत सर्वप्रकाश, सर्वव्यापी प्रेम, स्वयंसिद्ध झाले आणि त्यामुळे सर्व चित्तवेधक, सुंदर, अर्थपूर्ण आणि प्रेम करण्याजोगे बनले. (सुखसंवाद - ५७)
_______________________________
अहंकार या सर्वात मोठ्या गैरसमजाबद्दल महाराज काय सांगतात ते अफलातून आहे :
'अमकातमका मी ही कल्पनाच फोल असल्यामुळे ती सातत्य चाहते. आपले नित्यस्वरूप मात्र असतेच त्याला सातत्याची गरज नाही. पण ' मी अमकातमका ' असे मानल्यामुळे ती भावना घट्ट टिकवून ठेवण्यासाठी आपण ती वागवेल तसे वागतो. तिच्या मर्जीशिवाय कुठलाही व्यवहार तिला कबूल नसतो. क्षणोक्षणी ती वेगळे रूप घेते आणि आपला व्यवहार नित्य, अखंडीतपणे चालूच ठेवते. ही अनर्थकारी परंपरा कायमची थांबवण्यासाठी मी अमकातमका ही कल्पना एकदाच कायमची सोडणे हाच एक रामबाण उपाय आहे.
देह आणि देहाचे नांव याचा अंगीकार केला नाही, ती कल्पना सांडली तर स्वच्छ आपण, केवळ ज्ञान तेच शिल्लक राहते. अमूकतमूक म्हणून जाण नव्हे तर केवळ ज्ञान.' (सुखसंवाद - ६३)
_________________________________
मला वाटतं, न्यूनगंड हा अहंकाराचा सर्वात गहन पैलू आहे. मानवी अस्वास्थ्याचं ते मूळ कारण आहे. महाराज किती सहजपणे त्याचं निराकरण करतात ते पाहण्यासारखं आहे :
साधकानं विचारलंय ' मी काय शिकावे बरे? '
महाराज उत्तरतात : ' निश्चिंतपणे जगणे. ह्यासाठी तुम्ही जाणले पाहिजे की तुमचे स्वरूप अजिंक्य, निर्भय आणि सदाविजयी आहे. एकदा तुम्ही निश्चितपणे जाणले की आपल्या कल्पनेखेरिज कोणीच आपल्याला त्रास देऊ शकत नाही, मग तुम्ही आपल्या इच्छा, भिती, पूर्वधारणा याकडे दुर्लक्ष करता आणि केवळ सत्याने जीवन जगता' (सुखसंवाद - २९)
_____________________
कुणालाही स्वत:प्रत आणतील अशी त्यांची ही वक्तव्यं अफलातून आहेत :
'शाश्वताला जाणणे म्हणजे शाश्वत होणे, संपूर्ण होणे, विश्वातील सर्वासहित विश्वरूप होणे. प्रत्येक घटना ही संपूर्णाचा परिणाम आणि व्यक्तता असते आणि संपूर्णाशी तिचा मूलभूत मेळ असतो. संपूर्णाचा सर्व प्रतिसाद योग्य, प्रयत्नरहित आणि तात्कालिक असतो. ' (सुखसंवाद - १७)
'आपल्या असण्याबद्दल पूर्णपणे जागृत राहा म्हणजे तुम्ही जाणिवपूर्वक आनंदात राहाल. तुम्ही आपले मन जे तुम्ही जे नाही त्याकडे लावता त्यामुळे तुम्ही सुस्थितीची, खुशालीची जाणिव गमावून बसता.' (सुखसंवाद - २५)
' स्वतःला जाणायचे आहे असे तुम्ही म्हणता. तुम्ही स्वतःच आहात, तुम्ही जे आहात त्या वेगळे तुम्ही असूच शकत नाही. जाणणे असण्याहून वेगळे असते काय? स्वतःची व्याख्या आणि स्वतःचे वर्णन करण्याचा प्रयत्न केल्याखेरीज तुम्ही स्वतःच्या असण्यानेच स्वतःला जाणू शकता. (सुखसंवाद - ९९)
____________________________________
साधकाला निश्चित दिशा देणारं त्यांचं हे उत्तर उद्धृत करून लेख संपन्न करतो.
एका साधकानं विचारलंय : 'अध्यात्मिक प्रगतीची लक्षणं कोणती? '
आणि महाराज अत्यंत सहजपणे सांगतात : ' निश्चिंतपणा, आराम, आनंदाची जाणिव, अंतर्यामी सखोल शांती आणि बाहेर भरपूर उत्साह!' (सुखसंवाद - ८९)
(लेख मनोगतवर पूर्वप्रकाशित)
वाचने
30941
वाचनखूण
प्रतिक्रिया
107
वाचत आहे..
चांगली ओळख
वाचतोय...
चांगली ओळख.
काय की....
In reply to काय की.... by मन१
लेखातल्या कोणत्याही वाक्यावर समजेलसं
In reply to काय की.... by मन१
मन रे
In reply to काय की.... by मन१
रे मना धीर धर...लवकरच कळेल !
In reply to रे मना धीर धर...लवकरच कळेल ! by अत्रुप्त आत्मा
प्रश्न सब्र करण्याचा नाहीये
सुखसंवाद
कहर आहे.
In reply to कहर आहे. by अग्निकोल्हा
शु मुश्कील? काय अडचण?
In reply to शु मुश्कील? काय अडचण? by प्यारे१
तमे शु मुश्किल कोनी ?
In reply to तमे शु मुश्किल कोनी ? by अग्निकोल्हा
सिद्धाचं दुसरं लक्षण ते काय?
In reply to सिद्धाचं दुसरं लक्षण ते काय? by संजय क्षीरसागर
सिद्धाचं दुसरं लक्षण ते काय?
In reply to सिद्धाचं दुसरं लक्षण ते काय? by अग्निकोल्हा
अनुभव हीच खात्री!
In reply to अनुभव हीच खात्री! by संजय क्षीरसागर
तेच तर. अनुभव हीच खात्री.. मग आता मुद्याच बोलायचं ?
In reply to तेच तर. अनुभव हीच खात्री.. मग आता मुद्याच बोलायचं ? by अग्निकोल्हा
तुमच्या डिफॉल्ट स्थितीचा अनुभव तुम्ही केवळ जागेपणी घेताय
In reply to तुमच्या डिफॉल्ट स्थितीचा अनुभव तुम्ही केवळ जागेपणी घेताय by संजय क्षीरसागर
मग तुम्ही महान आहात.
In reply to मग तुम्ही महान आहात. by अग्निकोल्हा
तुमचा प्रश्न उत्तम होता म्हणून सांगतो,
In reply to तुमचा प्रश्न उत्तम होता म्हणून सांगतो, by संजय क्षीरसागर
गोंधळ होउ नये म्हणुन सांगतो...
In reply to सिद्धाचं दुसरं लक्षण ते काय? by अग्निकोल्हा
ग्लिफ,
In reply to ग्लिफ, by प्यारे१
याचं उत्तर मला असं वाटतं की
In reply to याचं उत्तर मला असं वाटतं की by अग्निकोल्हा
तथास्तु!
In reply to तथास्तु! by प्यारे१
सविनय नकार.
In reply to सविनय नकार. by अग्निकोल्हा
तथास्तु चा अर्थ आपल्या
In reply to तथास्तु चा अर्थ आपल्या by प्यारे१
तथास्तु चा अर्थ आपल्या
In reply to तथास्तु चा अर्थ आपल्या by अग्निकोल्हा
खिक्क्क!
In reply to सविनय नकार. by अग्निकोल्हा
अग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गा.................
In reply to अग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गा................. by अत्रुप्त आत्मा
अ. आ.
In reply to याचं उत्तर मला असं वाटतं की by अग्निकोल्हा
कर्मयोग...
In reply to कर्मयोग... by सामान्य वाचक
गीता रहस्य मधील "कर्मविपाक"
In reply to गीता रहस्य मधील "कर्मविपाक" by शुचि
खरय.
In reply to गीता रहस्य मधील "कर्मविपाक" by शुचि
''कर्माणू सिद्धांत''
In reply to ''कर्माणू सिद्धांत'' by सामान्य वाचक
संजय क्षीरसागर,
In reply to संजय क्षीरसागर, by अग्निकोल्हा
कर्मयोगावर मनोगतवर लिहीलंय
In reply to कर्मयोगावर मनोगतवर लिहीलंय by संजय क्षीरसागर
मी मनोगत वाचत नाही. कधिच वाचलं नाही.
In reply to मी मनोगत वाचत नाही. कधिच वाचलं नाही. by अग्निकोल्हा
प्रतिसादाबद्दल अत्यंत मनःपूर्वक धन्यवाद!
In reply to सिद्धाचं दुसरं लक्षण ते काय? by संजय क्षीरसागर
सुपर्ब.
आय अॅम दॅट चे काही
In reply to आय अॅम दॅट चे काही by शुचि
आय एम दॅट आणि सुखसंवाद
कुठे मिळेल हे पुस्तक?
In reply to कुठे मिळेल हे पुस्तक? by यशोधरा
मुंबईत असाल तर वर दिलेल्या फोनवर चवकशी करा
शब्दांचे पोकळ बुडबुडे
In reply to शब्दांचे पोकळ बुडबुडे by स्पा
प्रसन्न, मन लावून वाच
In reply to प्रसन्न, मन लावून वाच by संजय क्षीरसागर
प्रसन्न, मन लावून वाच
In reply to प्रसन्न, मन लावून वाच by पिलीयन रायडर
खतरनाक कॉमेंट
In reply to खतरनाक कॉमेंट by अमोल खरे
मि.पा इतकं महत्वाचं आहे तुमच्यासाठी?
हम्म्म...
In reply to हम्म्म... by सामान्य वाचक
एकदा असं काही नाही
In reply to एकदा असं काही नाही by संजय क्षीरसागर
का बरं?
In reply to का बरं? by राजेश घासकडवी
कशानेच काहीही फरक पडत नसेल, आणि कधीही काहीही होत असेल,
In reply to कशानेच काहीही फरक पडत नसेल, आणि कधीही काहीही होत असेल, by संजय क्षीरसागर
हा प्रश्न त्यांच्याविषयी
In reply to हा प्रश्न त्यांच्याविषयी by राजेश घासकडवी
अर्थ तुमचा आहे
In reply to अर्थ तुमचा आहे by संजय क्षीरसागर
अहंकार नाही, आत्मप्रतिमा
In reply to अहंकार नाही, आत्मप्रतिमा by राजेश घासकडवी
स्वप्रतिमा आणि अहंकार दोन्ही एकच
In reply to स्वप्रतिमा आणि अहंकार दोन्ही एकच by संजय क्षीरसागर
???
In reply to स्वप्रतिमा आणि अहंकार दोन्ही एकच by संजय क्षीरसागर
पुढचा भाग कधी..?
In reply to स्वप्रतिमा आणि अहंकार दोन्ही एकच by संजय क्षीरसागर
बरं बुवा, तुमचंच खरं.
In reply to बरं बुवा, तुमचंच खरं. by राजेश घासकडवी
हा प्रश्न अनुत्तरणीय आहे हे लक्षात येत नाही का?
वाचतोय.
इथे ग्लिफ आणि प्यारेची जुगलबंदी झालीये त्याविषयी थोडं लिहीतो
In reply to इथे ग्लिफ आणि प्यारेची जुगलबंदी झालीये त्याविषयी थोडं लिहीतो by संजय क्षीरसागर
हो माऊली. चूक पदरात घ्या.
In reply to हो माऊली. चूक पदरात घ्या. by प्यारे१
माव्लि लै मुडी हैत.
इथे संजय क्षीरसागर आणि अत्रुप्त आत्माची कडाक्याची जुगलबंदी झाली
In reply to इथे संजय क्षीरसागर आणि अत्रुप्त आत्माची कडाक्याची जुगलबंदी झाली by अग्निकोल्हा
ग्लिफ, प्रश्न तुम्ही विचारले आहेत
मला (मिपावरील)
ग्लिफ यांची मतं चक्क
-
लेख मस्तच अहे. खुप आवडला..
महाराज भर प्रवचनात विड्या
चर्चा
In reply to चर्चा by अवतार
अवतार-दा-तुस्सी ग्रेट हो... :)
आध्यात्माचा जीवनवादी/व्यावहारिक अर्थ सांगणारा प्रतिसाद
In reply to चर्चा by अवतार
गुरू आणि शिष्य
In reply to गुरू आणि शिष्य by संजय क्षीरसागर
अंतिम सत्य
In reply to अंतिम सत्य by अवतार
प्रतिसाद आवडला
In reply to अंतिम सत्य by अवतार
अंतिम सत्याची जाणीव होणे म्हणजे
In reply to गुरू आणि शिष्य by संजय क्षीरसागर
"बर्याच वेळा ग्रंथच गुरू ठरतात"
माझा मुद्दा असा आहे की कसलीच इच्छा न करता 'निव्वळ असणं' हे
क्षीरसागर साहेब
In reply to क्षीरसागर साहेब by Dhananjay Borgaonkar
या मनःपूर्वक प्रतिसादाबद्दल
हे आध्यात्मिक लोक स्वतः
In reply to हे आध्यात्मिक लोक स्वतः by चेतन माने
मस्त प्रश्न आहे
In reply to मस्त प्रश्न आहे by संजय क्षीरसागर
अगदी अगदी !!
आमचा बेंबट्या झालाय. गुरुदेव
In reply to आमचा बेंबट्या झालाय. गुरुदेव by बाळ सप्रे
पुलंनी अध्यात्मिक फ्रस्ट्रेशनच सुरेख वर्णन केलंय
In reply to पुलंनी अध्यात्मिक फ्रस्ट्रेशनच सुरेख वर्णन केलंय by संजय क्षीरसागर
पण याला दुसरी बाजूही आहे.
In reply to पण याला दुसरी बाजूही आहे. by अग्निकोल्हा
पुलंना आनंदाचं सूत्र गवसलं होतं
In reply to पुलंना आनंदाचं सूत्र गवसलं होतं by संजय क्षीरसागर
तिव्र सहमत.
In reply to पुलंना आनंदाचं सूत्र गवसलं होतं by संजय क्षीरसागर
सत्य आधी गवसते की आनंद..?