बहु भुकेला झालो...
१९३०-३२ चा सुमार असेल.. गदगच्या आपल्या राहत्या घरातून एक मुलगा अंगावरील वस्त्रानिशी घरातून पळाला..
संगीत देवतेला 'जोहार मायबाप जोहार.. ' असं म्हणत निघाला..!
त्याच्या आईनं त्याला काही भजनं शिकवली होती. गावातल्या कुणा मास्तरांकडून त्याला काही सांगितिक भाकऱ्यांची शिदोरी मिळाली होती. पण तेवढ्यानं त्याचं पोट नव्हतं भरत.. त्यामुळे सोबत ती थोडीशी शिदोरी घेऊन तो महाराचा महार 'जोहार मायबाप जोहार..' असं म्हणत निघाला..
ग्वाल्हेर, रामपूर, बनारस, जालंदर... खूप खूप वणबण केली त्या बहू भुकेल्याने... गावोगावचं सांगितिक उष्टं अगदी आवडीनं खाल्लं..जिथे जे काही मिळेल ते वेचलं..
आणि एके दिवशी हा महाराचा महार कुंदगोळला पोहोचला.. तिथे त्याचा 'मायबाप' त्याला भेटला..
त्या मायाबापाच्या दारात उभं राहून त्या महाराने पुन्हा एकदा 'जोहार मायबाप जोहार.. ' अशी करुणा भाकली..
उष्ट्यासाठी पाटी आणली होती..बहू भुकेला होताच तो.. परंतु आता ती भूक शमणार होती.. खुद्द मायबापाच्या घरचं चुलीवरचं गरमागरम सांगितिक अन्न मिळालं त्याला. अगदी पोटभर..!
आता आम्हीही त्याच्या गायकीचे बहू भुकेले आहोत. तो आता नाही.. पण त्याच्या कलाश्री बंगल्यातील थोडीशी माती. तीच आम्हाला आता साखर-फुटाणा-बत्ताश्याच्या प्रसादासारखी आहे आणि तीच माती आम्ही अबीरबुक्क्यासारखी कपाळावर आयुष्यभर मिरवणार आहोत...
-- तात्या.
वाचने
13859
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
किती दिवसांनी हो
कथेचा नायक कोण?
In reply to कथेचा नायक कोण? by NiluMP
पंडीत भीमसेन जोशी
In reply to कथेचा नायक कोण? by NiluMP
बाप रे!!!
In reply to बाप रे!!! by मुक्त विहारि
मुवि अहो किती कान टोचाल
In reply to कथेचा नायक कोण? by NiluMP
असो...
In reply to असो... by विसोबा खेचर
माझ्या लेखनाची उंची खूपच कमी पडली म्हणायची..!
आवडलं
तात्या..
चांगलं लिहिलंत
मस्त लिहिलयं
एवढच ?
In reply to एवढच ? by कपिलमुनी
सहमत
In reply to एवढच ? by कपिलमुनी
अगदी अगदी!!!
+१
रुप पहाता लोचनी सुख झाले हो साजणी...बहुती सुकितांची जोडी, म्हणुन
In reply to रुप पहाता लोचनी सुख झाले हो साजणी...बहुती सुकितांची जोडी, म्हणुन by केदार-मिसळपाव
"भाग्यदा लक्ष्मी बारम्मा"
In reply to "भाग्यदा लक्ष्मी बारम्मा" by आदूबाळ
होय
काय राव
अगदी त्या महारा सारखेच तात्या
In reply to अगदी त्या महारा सारखेच तात्या by स्पंदना
+१ हेचि दान देगा देवा.
तात्या आपल्या लेखांमधुन
तुमच्या लेखांची नेहमीच वाट पाहतो
वाह
सुंदर ओळी
In reply to सुंदर ओळी by शुचि
च च
In reply to च च by शुचि
कसं काय?
हिमालया एवढ्या...
कुंदगोळचा मायबाप
आणि एके दिवशी हा महाराचा महार कुंदगोळला पोहोचला.. तिथे त्याचा 'मायबाप' त्याला भेटला..त्बांच्याबद्दल कोणीच काही लिहिले नाही. ते सवाई गंधर्व आता फक्त उत्सवाच्या नावापुरतेच राहिले आहेत.खुद्द मायबापाच्या घरचं चुलीवरचं गरमागरम सांगितिक अन्न मिळालं त्याला. अगदी पोटभर..!स्व.पं.भीमसेन जोशी यांनी आपल्या गुरूचे ऋण वेळोवेळी व्यक्त केले होते. पुढच्या पिढीला कदाचित त्यांच्याबद्दल काहीच माहिती नसण्याची शक्यता आहे.वाह तात्या !
डोंगराएवढा कलाकार पण..
सर्वांचे मनापासून आभार..