ब्राउजर एक्स्टेंशन्स
नमस्कार मंडळी,सुझेच्या अॅन्ड्रॉइड धाग्यात अॅप्स देताना,विचार केला की इथे क्रोम आणि फायरफॉक्स वापरणारी बरीच मंडळी आहेत्.तेव्हा मला माहित असलेले आणि इथल्या अन्य टेक-सॅव्ही मंडळींना माहित असलेले ब्राउजर एक्स्टेंशन शेअर करण्यास काय हरकत आहे.
तर आता मी वापरत असलेले वरील दोन्ही ब्राउजर्सचे एक्स्टेंशन्स इथे देत आहे.
***************************************************
ब्राउजर एक्स्टेंशन हे अगदी छोटे सॉफ्टवेअर असते ज्यामुळे तुमच्या ब्राउजरची फंक्शनॅलिटी वाढवता येते.
आता सर्वात प्रथम मी जे एक्स्टेंशन्स इथे देणार आहे ते प्रायव्हसी इनहान्स करणारे आहेत.प्रायव्हसी बाबतीत बरेचसे इंटरनेट युजर्स जागरुक नसतात,पण जसे जसे नेटकरी मंडळींना ऑनलाईन प्राव्हसीचे महत्व आणि गरज समजु लागली आहे तस तसे या संदर्भातल्या अनेक एक्स्टेंशची निर्मीत होउ लागली आहे.
आत्ताचे युग जरी मोबाईल क्रांतीचे असल्या सारखे वाटत असेल तरी खरे तरी सुद्धा सध्याचे युग हे डेटा जनरेशन आणि येणारे प्रायव्हसीचे आहे. हे दोन्ही मल्टि बिल्यन डॉलर इंडस्ट्री ठरणार आहे.डेटा मधे डेटा सेंटर्स आणि ऑनलाईन स्टोरेज तसेच नविन डेटा स्टॉरेजचे आहे.तुमच्या लक्षात येईल की साध्या पेन ड्राईव्हची तसेच एक्सटर्नल युएसबीची कपॅसिटी प्रचंड वेगाने वाढली आहे.तसेच येणार्या काळात तुमच्या पिसी मधीली हार्डडिस्क ड्राईव्हची जागा एसएसडी {सॉलिड स्टेट ड्राइव्ह्स} घेतील.याची सुरुवात ऑलरेडी झालेली आहे,जो पिसी बुट होउन सुरु होण्यासाठी आणि वापर चालु करण्यासाठी सध्याच्या हार्डडिस्कमुळे वेळ लागतो,तेच एसएसडी ड्राईव्हमुळे फक्त जवळपास २० सेकंदात होईल. :) ३५० पेक्षा जास्त पानांचे वर्ड डॉक्युमेंट फक्त १० सेकंदात तुम्हाला तुमच्या पिसीवर ओपन करता येईल.
आता या डेटा जनरेशन आणि स्टोरेजचा एक अंदाज यावा म्हणुन उदाहरण देतो,युट्युबवर दर मिनीटाला ७२ तासांचे व्हिडीयो अपलोड केले जातात्,तर ४ बिलीयन तासांचे व्हिडीयो युट्यबर दर महिन्याला पाहिले जातात्,तसेच जगभरातुन २५% लोकांच्या मोबाईलवरुन युट्युब पाहिले जाते. यावरुन तुम्हाला डेटा जनरेशन आणि स्टॉरेज याचे महत्व कळुन येईल.
आता मूळ मुद्द्यावर येउया,तो म्हणजे प्राव्हसी... तुम्ही इंटरनेटवर सतत ट्रॅक केले जातात्,तुम्ही कुठल्या साईट वरुन कुठल्या दुसर्या साईटवर गेलात्,काय कंटेन्ट पाहिलेत्,किती वेळ कुठल्या साईटवर थांबलात याची पूर्ण माहिती मिळवली जाते.ट्रॅकरच्या सह्हायाने तुमचा माग काढला जातो.मग तुमची"प्रायव्हसी" राहिलीच कुठे ? मदनबाणने युट्युबर कुठली कुठली गाणी पाहिली,यावरुन याला कुठल्या प्रकारची गाणी आवडतात अशी माहिती ट्रॅकरच्या सहाय्याने काढता येऊ शकेल.या सर्व माहितीचा उपयोग अनेक प्रकारे करता येतो,जाहिरातीसाठी हे तर मुख्य करुन वापरलेच जाते,यात गुगल,फेसबुक आणि अनेक इंटरनेट जायंट्स आहेत.
मग आशा परिस्थीत आपण नेटवर आपली प्रायव्हसी जपण्यासाठी काय करु शकतो ? तर आपण ब्राउजर एक्स्टेंशन्सचा आधार घेउ शकतो.क्रोम आणि फायर फॉक्स साठी अशी प्रायव्हसी आणि डु नॉट ट्रॅक एक्स्टेंशन्स उपलब्ध आहेत.तसेच दोन्ही ब्राउजर्स मधे हा पर्याय सुद्धा देण्यात आलेला आहे.
********************************************************
आता माझ्या वापरातले एक्स्टेंशन्स देत आहे.
१) Collusion :- वर जे ट्रॅकिंग प्रकरण सांगितले आहे,ते पटकन समजुन घेण्यासाठी,तुम्ही नेटवर कसे ट्रॅक केले आहे ते पाहण्यासाठी हे एक उत्तम एक्स्टेंशन फायर फॉक्ससाठी आहे.
२) DoNotTrackMe :- ऑनलाईन प्रायव्हसी जपण्याचे हे अजुन एक उपयोगी एक्स्टेंशन,याने जाहिराती सुद्धा ब्लॉक केल्या जातात.
३) BetterPrivacy :- कुकीज {खायच्या नव्हे तर्,ब्राउजरच्या} ;)मुळे तुमचा माग काढणे सहज आणि सोप्पे होते,त्यांच्यावर नियंत्रण आणि त्यांचा नायनाट करण्यासाठी उपयोगी,प्रायव्हसी जपण्यासाठीचे हे अजुन एक उपयोगी एक्स्टेंशन.
४)Google Privacy :- जसे मी वर सांगितले आहे की गुगल प्रत्येकाला ट्रॅक करतो,आणि जरी फायरफॉक्स ब्राउजर मधे डु नॉट ट्रॅक ऑप्शन एनेबल केला असला तरी गुगल आणि इतर सर्च इंजिन्स या हेडरला इग्नोर करतात्,त्यामुळे या एक्स्टेंशनचा वापर गरजेचा झाला आहे.हे एक्स्टेंशन इन्स्टॉलकेल्यावर गुगल सर्च मारल्यास तुम्हाला फरक लगेच कळेल्,प्रत्येक लिंक जवळ प्रायव्हेट हा पर्याय दिसु लागेल्,जो आपण निवडु शकतो.
५)AVG Do Not Track :- अॅन्टीव्ह्यायरस बनवणार्या एव्हीजी कंपनीचे हे एक्स्टेंशन आहे. आता याच्या वापराचे उत्तम उदाहरण देतो,ते म्हणजे आपले मिपा.
मिपाच्या पानाच्या उजवीकडे फेसबुकचे एक सोशल प्लगइन (सोशल बटन) आहे,मला ते मी मिपावर असताना पहायचे नव्हते,तेव्हा हे एक्स्टेंशन कामाला आले्ए तुम्हाला ब्लॉक करायचा की नाही याचा पर्याय देते,तेव्हा जर मला परत मिपाच्या पानावर फेसबुकचे सोशल प्लगइन बघायचे असेल तेव्हा या पाना परते ते मी एनेबल करु शकतो.(लक्षात असु द्द्या की हे बटन सुद्धा तुमची वेगवेगळ्या प्रकारची माहिती काढु शकते.)
६) Ghostery :- अत्यंत उपयोगाचे प्राव्हसी एक्स्टेंशन.
७) Webutation - Reputation & Security :- जेव्हा तुम्ही गुगलवर एखादी गोष्ट शोधता तेव्हा अनेक पर्याय मिळतात्,यातली सुरक्षित साईट कोणती आणि किती प्रमाणात असुरक्षित कोणती याची माहिती या एक्स्टेंशनमुळे मिळते.हे WOT - Safe Surfing या एक्स्टेंशन प्रमाणेच चालते.
८)HTTPS Everywhere :- एचटीटीपीएस पेजेएर अॅटोमॅटिक रिडायरेक्ट केले जाते.तुम्ही तुमच्या जी मेल मधे लॉगइन करताना किंवा इतर सिक्युर साईटवर(बँकिंग /ट्रेडिंग इ.) ट्रॅन्झॅक्शन करताना अॅड्रेसबारवर पाहिलेत तर तुम्हाला डावीकडे कुलपाचे चित्र दिसुन येईल.{माझा आणि cipher strength चा अनेक वर्ष आधी संबंध आला होता जेव्हा माझ्या पिसीवर मी विंडोज २००० चालवत होतो,तेव्हा SSL साठी कमीत कमी cipher strength १२८बिट असावी लागते हे मला कळाले होते.} हे एक्स्टेंशन खुप उपयोगी आणि महत्वाचे आहे. माझ्या सहीतले युट्युबचे दुवे हे HTTPS चे असतात त्याचे कारण हे एक्स्टेंशनच होय.
९)Greasemonkey :- या एक्स्टेंशन शिवाय कुठल्याही टॉप एक्स्टेंशन्सची यादी पूर्ण होउ शकत नाही. स्क्रीप्टस वापरुन तुमचे ब्राउजर हवेतसे तुम्ही कस्टमाईज करु शकता. जसे मी माझ्या फायरफॉक्सवर केले आहे.
यासाठी https://userscripts.org/ या साईटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो,मी आत्ता पर्यंतच फक्त २दा इथल्या स्क्रिप्ट्स वापरल्या आहेत.
ज्यांना या विषयी अधिक माहिती हवी त्यांनी खालील दुवे जरुर पहावेत / वाचावेत.
दुवे :-
DO NOT TRACK FAQ
How do I turn on the Do-not-track feature?
How to enable Chrome's Do Not Track option
Why Giving Us Control Of Our Online Data Is The Next Multi-Billion Dollar Opportunity
Do Not Track': The Next Billion-Dollar Industry?
What is tracking and AVG Do Not Track?
हे किडुकमिडुक लिखाण करण्यास उद्युक्त केल्या बद्धल पै तै आणि गणापासेठ चे आभार.
तुम्हीही जर कुठल्याही प्रकारचे एक्स्टेंशन्स वापरात असाल तर ते या धाग्यावर द्या.
हॅव सेफ सर्फिग... ;)
वाचने
46053
वाचनखूण
प्रतिक्रिया
70
धन्स रे बाणा.
छान.
In reply to छान. by दादा कोंडके
धन्स...
खुणावले आहे...नंतर वाचण्यात
काही बाण
प्रायव्हसी जपण्यासाठीचा सोपा उपाय म्हणजे
In reply to प्रायव्हसी जपण्यासाठीचा सोपा उपाय म्हणजे by लंबूटांग
थोडक्यात काय
In reply to प्रायव्हसी जपण्यासाठीचा सोपा उपाय म्हणजे by लंबूटांग
खूपच सोपा आणि खात्रीशीर उपाय..
In reply to खूपच सोपा आणि खात्रीशीर उपाय.. by कोमल
माझ्या माहिती नुसार आधीच्या
In reply to माझ्या माहिती नुसार आधीच्या by मदनबाण
धन्यवाद्ज
In reply to धन्यवाद्ज by कोमल
गुगलला रोखणे तसेही कठीणच,फक्त
In reply to गुगलला रोखणे तसेही कठीणच,फक्त by मदनबाण
ह्म्म्
In reply to ह्म्म् by कोमल
काय करणार !
सही धागा रे...
In reply to सही धागा रे... by सुहास झेले
माझापण आवडता आहे,
In reply to माझापण आवडता आहे, by लॉरी टांगटूंगकर
आणि एक प्रश्न म्हणजे
In reply to आणि एक प्रश्न म्हणजे by मदनबाण
तुमच्या नेट सर्फिंगची जर सगळी
In reply to तुमच्या नेट सर्फिंगची जर सगळी by मदनबाण
माहिती महत्वाची वाटते आहे,
In reply to माहिती महत्वाची वाटते आहे, by लॉरी टांगटूंगकर
चेपुवरुन डाउनलोड मारण्यासाठी
उपयुक्त
मस्त रे बाणा.
खूप धन्यवाद
उपयुक्त!
कॉम्प्युटरक्षेत्रात नसलेल्या
In reply to कॉम्प्युटरक्षेत्रात नसलेल्या by शिल्पा ब
कॉम्प्युटरक्षेत्रात नसलेल्या
मस्त लेख!
In reply to मस्त लेख! by पैसा
मी मात्र ही एक्सटेन्शन्स
आवरा राव या अग्निकोल्यावाल्यांना
In reply to आवरा राव या अग्निकोल्यावाल्यांना by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सध्याच व्हर्जन २०.०.१ असे आहे
In reply to सध्याच व्हर्जन २०.०.१ असे आहे by मदनबाण
इथून डाऊनलोडवा
मस्त माहिती
In reply to मस्त माहिती by नीलकांत
धन्यवाद निलकांत !
In reply to धन्यवाद निलकांत ! by मदनबाण
सोबतच युट्युबचे व्हिडीओ
In reply to सोबतच युट्युबचे व्हिडीओ by मदनबाण
एसएमप्लेयर
In reply to सोबतच युट्युबचे व्हिडीओ by मदनबाण
आता वरचा प्रतिसाद वाचल्यावर
In reply to आता वरचा प्रतिसाद वाचल्यावर by मदनबाण
गुगले ने परत यू-ट्युबवर
लीचब्लॉक
गमभनचं फायरफॉक्स एक्स्टेंशन
आणखी काही
@सुधीर्,मराठे आणि चैतन्य धन्स
In reply to @सुधीर्,मराठे आणि चैतन्य धन्स by मदनबाण
फायरफॉक्स चे नविन व्हर्जन इन्स्टॉल केलेय काय ?
In reply to फायरफॉक्स चे नविन व्हर्जन इन्स्टॉल केलेय काय ? by मदनबाण
यप्प... निव्वळ अल्टीमेट.
आजचे एक्स्टेंशनः-Awesome
In reply to आजचे एक्स्टेंशनः-Awesome by मदनबाण
ऑसम
In reply to आजचे एक्स्टेंशनः-Awesome by मदनबाण
+१
आजचे एक्स्टेंशन्स आणि अ
In reply to आजचे एक्स्टेंशन्स आणि अ by मदनबाण
वरती दिलेला एक दुवा चुकला आहे
Disconnect आवडलं... सहीच आहे
In reply to Disconnect आवडलं... सहीच आहे by सुहास झेले
हो. कोणत्या साईटवर किती
In reply to हो. कोणत्या साईटवर किती by मदनबाण
यात थोडा बदल करतो...