गपगार
बामनाची ईदद्या ग्येली. म्हंजे म्येली.
शेताला गेल्ती सक्काळी.
हा-या धावत आला सांगाया. मोटी माणसं ग्येली पळत.
म्याबी चाल्ली व्हती.
आयनं पायलं, म्हन्ली, “मुकाट्याने निमीकडं जा. तिथं दिसलीस तर लाथ घालीन.”
आमच्या घरातली मान्सं सूद्द बोल्तेत. म्या येकलीच खेडवळ.
ईदद्या माज्याशी चांगली व्हती. बोलायची न्हाई जास्ती, पण कायबाय द्यायची मला.
गजगं; फुटकी काकणं; चिचोके;
गूळश्यांगदाणं; आवळं; जांभळं;
– समदं फुकाट.
म्याबी तिला मोराचं पीस दिल्त येकडाव. हसली व्हती.
“आता ईदद्याचं भूत व्हनार,” जग्या म्हन्ला.
“हाडळ”, भान्या म्हन्ला.
“हाडळ कशापायी? तिला कुटं लेकरू व्हतं?” अंक्याने इचारलं.
“पोटुशी व्हती म्हनं ती,” निम्मी म्हन्ली.
“ह्या! लगीन कुटं झालतं तिचं?” म्या इचारलं.
समदी गपगार बसली.
मेल्यागत.
(शतशब्दकथा)*
* हा शब्द सुचवल्याबद्दल चिगो यांचे आभार.
वाचने
14487
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
!
दाहक
In reply to दाहक by भीडस्त
+१
क मा ल!
खलास!
गपगार
छान कथा!
अफाट
काय म्हणू?
गपगार
गपगार
हा प्रकार बाकी भारी जमतोय बॉ
जमलंय, मस्त झालंय.
चांगलीच जमली आहे.
जबराट!
दंडवत..
दोन मिन्टं गप हुबारतो.
"थोडक्यात पण प्रभावी."
प्रभावी!
बामनाची इद्द्या नुसत्या या
शतशब्दकथा
ह्म्म..
अप्रतिम
गपगार!
भारी लिवलय.
आभार
!
एकूण एक कथा शंभर नंबरी
In reply to एकूण एक कथा शंभर नंबरी by तुमचा अभिषेक
:-)
In reply to एकूण एक कथा शंभर नंबरी by तुमचा अभिषेक
आतिवासताई??
In reply to आतिवासताई?? by पिलीयन रायडर
:-)
तुम्ही फार भारी लिहिता हो...
!
बामनाची हे विशेषण न लावता
जबर्दस्त
आभार
बामनाची हे विशेषण
आवडलं..
छान...