गपगार
बामनाची ईदद्या ग्येली. म्हंजे म्येली.
शेताला गेल्ती सक्काळी.
हा-या धावत आला सांगाया. मोटी माणसं ग्येली पळत.
म्याबी चाल्ली व्हती.
आयनं पायलं, म्हन्ली, “मुकाट्याने निमीकडं जा. तिथं दिसलीस तर लाथ घालीन.”
आमच्या घरातली मान्सं सूद्द बोल्तेत. म्या येकलीच खेडवळ.
ईदद्या माज्याशी चांगली व्हती. बोलायची न्हाई जास्ती, पण कायबाय द्यायची मला.
गजगं; फुटकी काकणं; चिचोके;
गूळश्यांगदाणं; आवळं; जांभळं;
– समदं फुकाट.
म्याबी तिला मोराचं पीस दिल्त येकडाव. हसली व्हती.
“आता ईदद्याचं भूत व्हनार,” जग्या म्हन्ला.
“हाडळ”, भान्या म्हन्ला.
“हाडळ कशापायी? तिला कुटं लेकरू व्हतं?” अंक्याने इचारलं.
“पोटुशी व्हती म्हनं ती,” निम्मी म्हन्ली.
“ह्या! लगीन कुटं झालतं तिचं?” म्या इचारलं.
समदी गपगार बसली.
मेल्यागत.
(शतशब्दकथा)*
* हा शब्द सुचवल्याबद्दल चिगो यांचे आभार.
वाचने
14488
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
!
नेटक्या,अल्प शब्दात दाहक वस्तुस्थिती उभी केलीत
क मा ल!
खलास!
म्या गपगार झालूय!
छान कथा!
अफाट
जमलय
गपगार
हा प्रकार बाकी भारी जमतोय बॉ तुम्हाला!!! मस्तच. :)
जमलंय, मस्त झालंय.
थोडक्यात पण प्रभावी.
जबराट!
स्साला... कमाल आहात राव! जबराट. मानलं तुम्हाला. आम्हाला सालं हातभर लिहून प्रभाव पाडायला येत नाही, तुम्ही शब्द मोजून झटका देता.. :-) सह्ही जमतोय हा प्रकार तुम्हाला..
दोन मिन्टं गप हुबारतो.
सरदांजली इद्द्याला.
वर्सा दोन वर्सानं आशीच त्येल्याची नायतं न्हाव्याची सुलबा मरंन.
तवाबी समद्ये आशेच आस्त्याल.... गपगार!
"थोडक्यात पण प्रभावी."
असेच म्हणते.
तुमच्या ह्या शतशब्दकथा आवडताहेत.
बामनाची इद्द्या नुसत्या या दोन शब्दांनी गोरीगोमटी पोर नजरेसमोर आली.
पुढच काय सांगु.
महान आहात.
एकदम मस्त संकल्पना आहे.
अंगावर काटा आला मात्र वाचून
शतशब्दकथा!
एकदम मस्त संकल्पना आहे.
अंगावर काटा आला मात्र वाचून
सुवर्णमयीसारखेच,
स्वाती
अप्रतिम लिहिता तुम्ही.
ही शतशब्दकथेची कन्सेप्ट तर लै अपील झाली. अशी एक सेपरेट कॅटेगरी पण करायला हरकत नाही मिपावर.
अर्थात या कथाप्रकारातील तुमचे प्रभुत्व वादातीत आहे. :)
शंभर शब्दात हजारों शब्दांचं सार सांगितलंत. आणि तेही लहान मुलीच्या नजरेतून. वाचून आम्ही गपगार.
भारी लिवलय.
आभार बिपिन कार्यकर्ते, भीडस्त, नगरी निरंजन, इनिगोय, श्रावण मोडक, आदूबाळ, वल्ली, मन१, अत्रुप्त आत्मा, बॅटमॅन, ५० फक्त, गणपा, किसन शिंदे, चिगो, प्यारे१, इन्दुसुता, मिहिर, अपर्णा अक्षय, सुवर्णमयी, स्वाती दिनेश, अभ्या, पैसा, लीमाउजेट.
सर्व वाचकांचेही आभार.
इच्चिभनं!
डेंजरफुल लिहिलंय राव, गाप्पकन हालवण्याची ताकद है तुमच्या लेखनात.
एकूण एक कथा शंभर नंबरी आतिवासताई... यावर तुमचे पुस्तक निघालेले बघायला आवडेल.. :)
In reply to एकूण एक कथा शंभर नंबरी by तुमचा अभिषेक
तुमचा अभिषेक, :-)
In reply to एकूण एक कथा शंभर नंबरी by तुमचा अभिषेक
ताई? बायकांना कधी एवढं टू द पॉईंट बोलताना पाहिलच नाहिये हो!! मी स्वतः नमनाला घडाभर तेल घालुनच बोलते.
हलके घ्यालच...!!
In reply to आतिवासताई?? by पिलीयन रायडर
:-)
तुम्ही फार भारी लिहिता हो... !!
!
बामनाची हे विशेषण न लावता सुद्धा कथा उभी करता आली असती.
बामनाची हा शब्द प्रयोग वापरण्याचे काही खास कारण?
आतिवास........."शंभर शब्दात हजारों शब्दांचं सार सांगितलंत. आणि तेही लहान मुलीच्या नजरेतून. वाचून आम्ही गपगार".
पैसा यांच्याशी एकदम सहमत!!!!!!!! पकड जबर्दस्त आहे!!!
आभार स्नेहांकिता, धमाल मुलगा, पिलीयन रायडर, ऋषिकेश, नाना चेंगट, नक्शत्त्रा.
बामनाची हे विशेषण न लावता सुद्धा कथा उभी करता आली असती. बामनाची हा शब्द प्रयोग वापरण्याचे काही खास कारण?मलाही हेच विचारायचं होतं.
मोजक्या शब्दात बरंच काही..
प्रभावी कथा.
!