मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एका शब्दात उत्तर द्या

प्रेमसाई · · काथ्याकूट
मन म्हणजे काय

वाचने 13485 वाचनखूण प्रतिक्रिया 46

सुनील 27/02/2008 - 18:57

प्रेमसाई,

तुमच्या प्रश्नाचे उत्तर बहिणाबाईंनी केव्हाच दिलयं -

मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोरं

किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावरं !

एका शब्दात न सांगता येण्यासारखं

 

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 27/02/2008 - 19:51

माफ करा हं ...!!!
मी जरा प्रतिसाद देता येतो का ? त्याची  ट्रायल घेतोय :)

 

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 27/02/2008 - 19:52

माफ करा हं ...!!!
मी जरा प्रतिसाद देता येतो का ? त्याची  ट्रायल घेतोय :)

 

प्रियाली 27/02/2008 - 19:58

मन म्हणजे मी

मी आहे म्हणून मन आहे. मी नसेन तर मनही नसेल.

तसं "मी" या शब्दात म्+ई अशी अक्षरे असली तरी एकत्र जोडली गेल्याने हे एका अक्षरातील उत्तर आहे.

ब्रिटिश टिंग्या 27/02/2008 - 19:56

जाणीव बुद्धी यांच्यामुळे घडणार्या ज्ञान, विचार, मत, स्मरणशक्ती, भावना, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, चेतना या गोष्टी ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणाला मन असे म्हणतात.

स्त्रोत : विकिपेडिआ

 अवांतर : हा 'मनसे' मधला मन हाव काय? तसा असनं तर इनायकभौंना इचारा.....त्यांस्नी समध ठावं हाये....

- छोटी टिंगी ;)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

इनोबा म्हणे 28/02/2008 - 00:31

हा 'मनसे' मधला मन हाव काय? तसा असनं तर इनायकभौंना इचारा.....त्यांस्नी समध ठावं हाये....
आणि मनसेचा नसेल तर आमाला इचारु नका.आपूण आपल्या मना'चा मालक हाये,काय?

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा(मिसळबोध)

विकास 28/02/2008 - 02:09

मिसळपावसारख्या उपक्रमावर मनोगत लिहीता येण्यासाठीचे म्हणून असलेले एक विचारांचे माध्यम आहे.

तात्या विन्चू 28/02/2008 - 08:45

आतला आवाज!

आपला,

ओम फट स्वाहा.... तात्या विन्चू

विसोबा खेचर 28/02/2008 - 09:11

एका शब्दात न सांगता येण्यासारखं

सुनीलरावांशी सहमत...

विकासरावांचा कोटीक्रमही आवडला...

(मनस्वी) तात्या.

किशोरी 28/02/2008 - 17:59
मन म्हणजे 'वारा'
भावनांचे सुगंध घेउन कुठेही मुक्तपणे संचार करणारा

सुधीर कांदळकर 28/02/2008 - 22:53
सर्व नियम धाब्यावर बसवू शकणारी जगतातील एकमेव शक्ती.

In reply to by कोलबेर

सृष्टीलावण्या 08/03/2008 - 22:11
भाषाशास्त्र म्हणते समास करा. ;) दोन शब्दांचा एक शब्द करा. :):) विचारगुन्ता = विचारांचा गुन्ता = षष्ठी तत्पुरुष.... *|:-)} परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

नन्दु 17/03/2008 - 11:53
सुनिल शी पुर्ण पणे सहमत तुमच्या प्रश्नाचे उत्तर बहिणाबाईंनी केव्हाच दिलयं - मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावरं ! एका शब्दात न सांगता येण्यासारखं मि. पा. कुटुबातील शेडेफळ नन्दु

मनस्वी 17/03/2008 - 13:36
मनिषाकोईरालाआणिआमीरखानचाएकहिंदीपिक्चर मनस्वी

कुलभूषण 16/03/2013 - 11:55
सर्वसंवेदनाग्रहणप्रतिक्रियात्मकतामाध्यम

In reply to by नाना चेंगट

प्यारे१ 16/03/2013 - 18:57
विज्ञानवादी नि आध्यात्मिक अशा चांचल्यामुळे नाना चेंगट चंचल (पक्षी :...)आहे हे सिद्ध होते.... झाली सिद्धता एकदाची. (कोण रे तो आम्हाला आधीच माहिती आहे म्हणणारा? ;) )