प्रेमे नादली पंढरी..!
आषाढी एकादशीला ही कविता लिहिलेली. लिहिल्या गेल्यावर माझा मलाच खूप आनंद झाला होता. :)
मेघ आषाढाचा गर्जे, गाज गूंजे चराचरी,
प्रेमे नादली पंढरी उभा बघून श्रीहरी!
मी बालक अजाण मन सोडीना पदर!
माझी बालकाची मती त्यास कोठला आधार?
दिंडी चालली माहेरा, वाट ओली अंतरीची!
उभी लेकराच्यासाठी माय सावळी कधीची!!
अश्रू वाहती सहज, भाव कोवळा सांभाळा!
मायभेट उराउरी आज आनंद सोहळा!!
मुमुक्षू
[टीपः अगोदरही याच नावने जालावर प्रसिद्ध केलेली आहे. किंचित बदल करून येथे प्रकाशित करतो आहे. येथेही आवडेल अशी आशा करतो.]
वाचने
4416
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
खूपच छान, सहज सुंदर.
फार सुंदर ओळी!
मिपाकर संत मुमुक्षूराव,
अत्यंत सुरेख आणि प्रासिदिक ओळी! वाचून खूप प्रसन्न वाटले....
आपला,
(विठ्ठलप्रेमी) तात्या.
.......भाव कोवळा सांभाळा
आवडली कविता
चिंतामणराव .....आमचा हरी आहे...
मस्त आहे कविता... शब्द सहज आल्यासारखे वाटले, ओढून ताणून रचल्या सारखे नाही वाटले.
बिपिन.
सगळ्यांचे मनापासून आभार.
तुम्हांस आवडली कविता हे बघून छान वाटले :)
मुमुक्षू
कविता आवडली.
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
In reply to आवडली by रामदास
कविता आवडली.
चकली
http://chakali.blogspot.com
|
In reply to चाल ऐका! by प्रमोद देव
फार सुंदर... धन्यवाद! :)
राघव.
अतिशय भावपूर्ण.
एकदम आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
कविता सुंदर आहे,मनाला भावली. :)
मिपाकर संत मुमुक्षूरावांचा विजय असो. :) :) :)
सुंदर कविता...
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
खूपच छान,