मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेमे नादली पंढरी..!

राघव · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आषाढी एकादशीला ही कविता लिहिलेली. लिहिल्या गेल्यावर माझा मलाच खूप आनंद झाला होता. :) मेघ आषाढाचा गर्जे, गाज गूंजे चराचरी, प्रेमे नादली पंढरी उभा बघून श्रीहरी!
मी बालक अजाण मन सोडीना पदर! माझी बालकाची मती त्यास कोठला आधार?
दिंडी चालली माहेरा, वाट ओली अंतरीची! उभी लेकराच्यासाठी माय सावळी कधीची!!
अश्रू वाहती सहज, भाव कोवळा सांभाळा! मायभेट उराउरी आज आनंद सोहळा!!
मुमुक्षू [टीपः अगोदरही याच नावने जालावर प्रसिद्ध केलेली आहे. किंचित बदल करून येथे प्रकाशित करतो आहे. येथेही आवडेल अशी आशा करतो.]

वाचने 4416 वाचनखूण प्रतिक्रिया 13

सर्वसाक्षी 01/09/2008 - 22:48
फार सुंदर ओळी!

विसोबा खेचर 02/09/2008 - 09:23
मिपाकर संत मुमुक्षूराव, अत्यंत सुरेख आणि प्रासिदिक ओळी! वाचून खूप प्रसन्न वाटले.... आपला, (विठ्ठलप्रेमी) तात्या.

चिंतामणराव 02/09/2008 - 12:05
.......भाव कोवळा सांभाळा आवडली कविता चिंतामणराव .....आमचा हरी आहे...

बिपिन कार्यकर्ते 02/09/2008 - 19:51
मस्त आहे कविता... शब्द सहज आल्यासारखे वाटले, ओढून ताणून रचल्या सारखे नाही वाटले. बिपिन.

राघव 03/09/2008 - 13:42
सगळ्यांचे मनापासून आभार. तुम्हांस आवडली कविता हे बघून छान वाटले :) मुमुक्षू

रामदास 04/09/2008 - 09:42
कविता आवडली. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

प्राजु 12/03/2009 - 20:58
अतिशय भावपूर्ण. एकदम आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मदनबाण 13/03/2009 - 10:59
सुंदर कविता... मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.