एकांकीका : धडा
अंक पहिला / प्रवेश पहिला.
वेळ : सकाळी ७:३०
प्रसंग रोजचाच.
मावशी (किचन मधून) : अनोखी, लवकर लवकर आटप बस येईल इतक्यात. मोजे काढुन ठेवलेत, बूट घालून तयार रहा.
नायिका (ओसरीत बुटाला पॉलिश लाण्यात मग्न.) : ह्म्म्म.
मावशी बाहेर येते. नायीका दिवाणखान्यातून दिसत नाहीये.
मावशी : हे काय? मोजे अजुन ईथेच पडलेत? अनोखी बस चुकेल.
नायिका (वस्स्क्न खेकसुन): बुटांना पॉलिश करतेय ना?"
मावशी : बरं बरं आटाप लवकर.
प्रवेश दुसरा.
वेळ : सायंकाळ ७:३०
आई : अनोखी, आपण एक नाटक बसवायचय.
नायिका (अभिनयाचं नाव काढताच कळी खुललेली): कसलं? कसलं?
आई : असच घरगुती नाटक आहे. हीरोईन तुझ्या येवढीच शाळेत जाणारी मुलगी.
नायिका : ओक्के.
आई : तर सीन असा आहे की हीरोईन शाळेची तयारी करतेय.
नायिका : बरं. (दप्तर भरायचा अभिनय सुरु.)
आई : नंतर ती बुटांना पॉलिश करतेय.
नायिका : बरं. (इक भुवई नकळत वर जाते.)
मावशी : अनोखी, लवकर लवकर आटप बस येईल इतक्यात. मोजे, बुट घाल.
.
.
.
मावशी : हे काय? मोजे अजुन ईथेच पडलेत?
नायिका (मंजुळ आवाजात): आधी बुटांना पॉलिश करते मग घालते.
यानंतर नायिका स्वतःच खदखदुन हसायला लागते.
आई : काय झाल गं?
नायिका (गालातल्या गालात हसत) : समजलं. कळलं मला. :)
आणि पडदा पडतो. ;)
वाचने
8609
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
हुश्शार आई!
होप तुम्ही कन्या माझ्यावर गेलीय अस क्रेडीट घेत नसाल.
=))
:)
छान
:)
"Learning by Doing" चं चपखल उदाहरण :-)
हे हे हे. नाटक परिणामकारक झाले म्हणायचे. ;)
नाटक लिहिण्याची कल्पना छान! पण 'नायिका' तुमच्या डोक्यावर मिरे वाटणार बघा मोठेपणी!
हिहिहि .. अनोखी हुश्शार आहे .. आई नै कै :P :D
आई आणि लेक दोघीही गणपाहून हुशार आहेत! ;)
:) चेपुवर वाचलं होतंच.
फार म्हंजे फार पेशन्स ठेवावा लागतो, नाही?
बऱ्याच दिवसांनी आली तुमची बालकथा :-)
गं पा ति बाप्पा...मोरया!!!!!!!!!!!!!!!! :-)
हुशार आहे मुलगी तुमची आणि नाव ही अनोख आहे.
मस्त...
गणपाकन्या अगदी 'कलाकार' हाय.
सुरेख...
असेच पॅरेन्टींगचे किस्से टाकत जा...!
नव, होऊ घातलेले, विंगेतले, तिकीटबारीवरचे, घरातून मेकप करुन निघालेले ;) अशा सगळ्या पालकांसाठी उपयुक्त धागे आहेत.
हुश्शार आई!