चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग १)
१) Name Box - या ठिकाणी; सद्यस्थितीला कर्सर कोणत्या Cell मध्ये आहे ते समजते.
२) Formula Bar - फॉर्म्यूला बारमध्ये Cell मध्ये असलेला नंबर किंवा माहिती किंवा जे असेल ते दिसते. वरील स्क्रीनशॉटमध्ये Cell L9 मध्ये असलेला स्टँडर्ड डेव्हीएशन चा फॉर्म्यूला दिसत आहे.
३) Quick Access Toolbar - या टूलबार मध्ये आपल्याला हवे असणारे महत्वाचे शॉर्टकट्स साठवून ठेवता येतात व हवे त्या वेळी लगेचच वापरता येतात.
४) Column Name - एक्सेल शीटवर दिसणारे A, B, C पासून XFD पर्यंत दिसणारे उभे चौकोन म्हणजे Columns आहेत.
५) Ribbon Menu and Tabs - रिबन मेन्यू २००७ व्हर्जन पासून अस्तित्वात आला. २००७ च्या आधिच्या एक्सेलमध्ये एखाद्या फंक्शनपर्यंत पोहोचण्यासाठी बराच क्लिकक्लिकाट करायला लागायचा. तो टाळण्यासाठी २००७ पासून या प्रकारचा मेन्यू डिझाईन केला गेला.
६) Workbook Name - सध्या वापरात असलेले वर्कबूक कोणते आहे ते इथून ओळखता येते.
७) Row Number - एक्सेल शीटवर दिसणारे १, २, ३ पासून १०,४८,५७६ पर्यंत दिसणारे आडवे चौकोन म्हणजे Rows आहेत.
८) Cell - सद्यस्थितीला कर्सर कोणत्या चौकोनात आहे तो चौकोन म्हणजे Cell.
Column चे नाव आणि Row चा नंबर मिळून Cell Reference तयार होतो. (या उदाहरणार L9)
९) Vertical Scrollbar - एक्सेलशीटमध्ये उभे; वरखाली स्क्रोल करण्यासाठी हा स्क्रोलबार वापरतात.
१०) Range - ज्यावेळी आपण एकावेळी दोन किंवा त्यापेक्षा जास्ती Cells सिलेक्ट करतो त्यावेळी तो Cell समुह म्हनजेच रेंज.
११) Worksheet Name - Excel Workbook मध्ये असलेल्या वेगवेगळ्या Excel Sheet चे नाव इथे वाचता येते.
१२) Range Stats - आपण माऊसच्या सहाय्याने सर्वच्या सर्व नंबर्स सिलेक्ट केले असतील तर सिलेक्ट केलेल्या आकड्यांच्या संबंधीत पुढील गोष्टी विनासायास या ठिकाणी समजतात.
अॅव्हरेज, आकड्यांची संख्या, लहान आकडा (Minimum within Range), मोठा आकडा (Maximum within Range), आकड्यांची बेरीज.
१३) Horizontal Scrollbar - एक्सेलशीटमध्ये आडवे; डावीकडून उजवीकडे स्क्रोल करण्यासाठी हा स्क्रोलबार वापरतात.
१४) Page View - सध्या एक्सेल शीट कोणत्या फॉरमॅटमध्ये दिसत आहेत ती इथे कळते. तसेच एक्सेल शीट 'पेज लेआऊट' आणि 'पेजब्रेक' फॉरमॅटमधून बघता येते.
१५) Zoom - एक्सेल शीट ची झूम लेव्हल किती आहे ते इथे कळते.
क्रमशः
**********************************************
हा धागा मुद्दाम लहान ठेवला आहे, सुरूवातीचे दोन तीन धागे अशाच माहितीवर आधारित असतील.
सूचनांचे स्वागत आहे, पुढील धाग्यांमध्ये त्याप्रमाणे बदल करता येतील.
Vlookup, Pivot Table वगैरे गोष्टी आपण शिकणार आहोत परंतु सध्या सर्वांना एका पातळीवर आणूया नंतर एकत्र शिकायला जास्ती मजा येईल असे वाटते.
महत्त्वाचे - धाग्यामधल्या कोणत्याही गोष्टीसंदर्भात काही कळाले नाही तर शंकासमाधान होईपर्यंत प्रश्न विचारले तरी हरकत नाही. मात्र एखादा भाग आत्ता कळाला नाही तर नंतर त्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या इतर बाबी न कळण्याची दाट शक्यता आहे!
अतीमहत्वाचे - 'Microsoft Certified Excel Specialist' असूनही मला एक्सेल संपूर्णपणे येते हे म्हणणे थोडे धाडसाचे ठरेल, तस्मात्; माझ्याकडून एखादी चूक झाल्यास अवश्य नजरेस आणून द्यावी. आनंदाने सुधारणा करून घेण्यात येईल.
**********************************************Microsoft Certified Excel Specialist__/\__
In reply to मस्तरे मोदका! by दादा कोंडके
In reply to +१ by नन्दादीप
In reply to एक सुधारणा.. by मोदक
या ६५५३६ पण एक मजा होती, २५६ (Row Count) चा वर्ग म्हणजे ६५५३६.
इथे Row Count ऐवजी Column Count असे वाचावे. ;-)In reply to एक सुधारणा.. by मोदक
In reply to मस्तरे मोदका! by दादा कोंडके
In reply to चांगले रिझल्ट by लॉरी टांगटूंगकर
In reply to हा हा.. by दादा कोंडके
ऑफीसमधला एक एक्सेल चांपिअन म्याथक्याड वगैरे टूलले डेमो द्यायला आलेल्यांच्या तोंडाला फेस आणत असे
खर्र खर्र सांगतो दादानू.. अशी एखाद्याची टोपी उडवायला लै लै मजा येते. :-D
आणि व्हिक्टीम जर क्लायंट साईडचा असेल तर आपले जीएम / AVP लोकंसुद्धा गालातल्या गालात हसत मजा बघत बसतात!In reply to अरे वा!, शिकवणीला आम्ही आलं by रेवती
In reply to HLOOK UP , VLOOKUP या बद्दल by नन्दादीप
In reply to प्रत्येकाला आलेच पाहिजे by चौकटराजा
In reply to प्रत्येकाला आलेच पाहिजे by चौकटराजा
In reply to छान! by संजय क्षीरसागर
संकेतस्थळाचा एक सुयोग्य वापर!
प्रचंड सहमत!!!!!!!! :)
In reply to धन्यवाद मोदक मास्तर ! by सस्नेह
In reply to गूड क्वेश्चन.. by मोदक
In reply to यातून रेंजचे नाव दिसते पण by सस्नेह
In reply to Vlookup फॉर्म्यूला इथे पेस्ट by मोदक
In reply to संपूर्ण वर्कशीटच तुला मेल by सस्नेह
In reply to ओके... by मोदक
एक काळजीपूर्वक सल्ला - मला एक्सेलशीट्स / डेटा व्यनी करताना आपापल्या कंपनीची डेटा शेअरींग आणि सिक्यूरीटी पॉलिसी तपासून मगच शक्य असेल तर फाईल्स पाठवा. अन्यथा डमी डेटा तयार करून पाठवावा, आपण Real Life Scenarios 'Replicate' करून पाहू. अनऑथोराईज्ड डेटा शेअरींग ही खूप जोखमीची बाब आहे!ऑफीसचं किंवा क्लायंटचं ईमेल अकाऊंट वापरुन या भानगडी करुच नयेत. अगदी अनावधानाने झालेली छोटीशी चूक नोकरी घालवू शकते.
In reply to अगदी अगदी by धन्या
In reply to ओके... by मोदक
ही रेंज नेम फंक्शनमधूनच बदलता येते.
existing name function edit करायचे की नवीन name function बनवायचे ? कृपया सोदाहरण स्पष्ट करावे.
काळजीपूर्वक सल्ल्याबद्दल अधिक धन्यवाद.
आपल्या व सर्वांच्या माहितीसाठी : आपणास पाठवलेले वर्कशीट सँपल डेटा वापरून बनवलेले होते ज्या माहितीचा प्रत्यक्ष आकडेवारीशी काहीही संबंध नाही ! मूळ मुद्दल सुरक्षित आहे ..!
In reply to मला एक्सेलमध्ये काही अडलं की by आदूबाळ
In reply to धन्यवाद! by पैसा
तसंच त्यातले किती प्रयोग ओपन ऑफिसच्या कॅल्क मधे करता येतात हे तपासायचे आहे.पैसातै, करीयरच्या सुरुवातीला बँकेत न जाता आयटीत गेली असतीस तर आज एखादया बडया आयटीची कंपनीची रीटायर्ड सीईओ असतीस. तुला सांगतो, आज आयटीमधल्या बहूतांशी पोरापोरींमध्ये याच्या दहा टक्केही नविन काही जाणून घेण्याची उत्सुकता नसते. :(
In reply to तसंच त्यातले किती प्रयोग ओपन by धन्या
In reply to खरे आहे रे. पैसाताई आता थोडे by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to खरे आहे रे. पैसाताई आता थोडे by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to माहितीपुर्ण लेख. by धन्या
In reply to माहितीपुर्ण लेख. by धन्या
When I started my carrier I aimed to excel in my work. Now I work in excel.अशी आहे.
In reply to पुढील भाग...? by आयुष्य
In reply to हे घ्या दुवे by श्रीरंग_जोशी
In reply to धन्यवाद! by संदीप डांगे
अणुमोदण
अणुमोदण
अणुमोदण
In reply to धन्यवाद! by संदीप डांगे
In reply to धन्यवाद! by संदीप डांगे
In reply to त्यांचं 'बिंग' असं फोडू नका.. by आदूबाळ
In reply to हे घ्या दुवे by श्रीरंग_जोशी

क्या बात, मोदकसाहेब, क्या बात