राशीमेलन
या विषयावर पूर्वी कोणी लिहिले आहे की याची मला कल्पना नाही. हा विषय थोड्या खेळकर अंगाने मांडण्याची इच्छा आहे.
एकूण राशी १२ - मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ, मीन
एकूण ग्रह १२ - चंद्र, रवि, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून, प्लूटो (राहू व केतू हे ग्रह नसून छेदबिंदू आहेत किंवा प्लूटोला ग्रह मानले जात नाही या वादात मला पडायचे नाही)
स्वतःच्या पत्रिकेत चंद्र ज्या राशीत असतो ती आपली जन्मरास समजली जाते व पत्रिकेतल्या पहिल्या स्थानात जी रास असते ती आपली लग्नरास असते. प्रत्येक माणसाच्या स्वभावावर बहुतेक जन्मराशीचा व काही प्रमाणात लग्नराशीचा प्रभाव असतो. राशीचा प्रभाव म्हणजे त्या राशीचा जो राशीस्वामी आहे त्या ग्रहाचा प्रभाव.
प्रत्येक ग्रहाचे शत्रू व मित्र ठरलेले असतात. प्रत्येक ग्रहाच्या आवडत्या व नावडत्या राशी, उच्च व नीच राशी, मित्र राशी, स्वगृह राशी इ. ठरलेल्या असतात. त्यानुसार प्रत्येकाच्या स्वभावात त्या त्या ग्रहांची वैशिष्ट्ये दिसून येतात.
चंद्र - चंद्र हा आल्हाददायक, शीतल असतो. परंतु त्याचा आकार रोज बदलताना दिसतो. चंद्र राशीस्वामी असलेली कर्क राशीची माणसे चंद्राप्रमाणेच शांत, देवभोळी व थोडीशी चंचल्/द्विधा मनस्थिती असलेली असतात. ही माणसे बुद्धीपेक्षा भावनेने निर्णय घेतात. 'गलिबल' किंवा सहज फसविता येईल अशी ही माणसे असतात.
रवि - रवि राशीस्वामी असलेली सिंह राशीची माणसे काहीशी रागीट, स्पष्टवक्ती, सत्याची चाड असलेली असतात.
मंगळ - हा ग्रह आक्रमक, बेधडक, काहीसा अविचारी समजला जातो. मेष व वृश्चिक राशींचा स्वामी मंगळ आहे. साहजिकच या राशी मंगळाप्रमाणेच असतात. पण वॄश्चिक रास ही आक्रमकतेपेक्षा डूख धरून सूड उगविणे, धारदार बोलणे यासाठी जास्त ओळखली जाते.
बुध - बुध राशीस्वामी असलेल्या राशी २, मिथुन व कन्या. माणसाची वाणीवर बुधाची सत्ता आहे. मिथुन राशीची माणसे बुधाप्रमाणेच वादविवाद व चर्चेत अत्यंत पटाईत असतात. यांचा मुख्य दोष म्हणजे यांचे धारदार बोलणे. हे अतिशय जिव्हारी लागेल असे बोलून जातात. कन्या राशीची माणसे बोलण्यात शार्प असतात, पण मनातून भित्री असतात.
गुरू - गुरू म्हणजे विद्वत्ता, ज्ञान व अध्यात्म. धनू व मीन राशींचा राशीस्वामी गुरू असतो. गुरूची आध्यात्मिकता मीन राशीत प्रकर्षाने दिसते. मीन राशीची माणसे अतिशय देवभोळी व आध्यात्मिक असतात. मनापासून देवपूजा करणे, जपजाप्य, पोथ्या वाचणे इ. गोष्टी या व्यक्ती मनापासून करतात. या व्यक्ती सरळमार्गी पण घाबरट असतात. धनू राशीची माणसे सत्यप्रिय असतात, पण मीन राशीइतकी देवभोळी नसतात. त्यांच्यात काहीशी आक्रमकता असते.
शुक्र - हा रसिकतेचा ग्रह आहे. वृषभ व तूळ राशींचा हा स्वामी आहे. या दोन्ही राशींच्या व्यक्ती अतिशय रसिक व जीवनाचा आस्वाद घेणार्या असतात. अनेक कलाकारांची तूळ रास आढळते. भगवान श्रीकृष्णाची वृषभ रास होती.
शनी - शनी म्हणजे कर्तव्यकठोरता, कष्ट, भावनांचा अभाव किंवा हृदयापेक्षा बुद्धीने निर्णय घेणे. मकर व कुंभ राशींच्या व्यक्ती शनीच्या अंमलाखाली येतात. कुंभ ही बुद्धीप्रामाण्यवादी, शास्त्रज्ञ, गणिती अशांची रास आहे. मकर ही अत्यंत कष्टाळू लोकांची रास आहे. या राशींची माणसे कधीही भावनेच्या भरात वाहवत जात नाहीत. मकर राशीची माणसे अतिशय ठाम निर्णय घेणारी असतात, पण कुंभ राशीच्या व्यक्ती काहीशा द्विधा मनस्थितीत असतात.
याची अजून एक वर्गवारी करता येईल.
मीन, कर्क, कन्या - निर्णयक्षमतेचा व नेतृत्वाचा अभाव
वृषभ, तूळ, कुंभ, सिंह, धनू - संतुलित निर्णय घेण्याची क्षमता
मेष, मिथुन, वृश्चिक, मकर - नेतृत्वगुण व बेधडक निर्णय घेण्याची क्षमता
या पार्श्वभूमीवर कोणत्या दोन राशींच्या व्यक्तींनी एकमेकांशी लग्न करावे किंवा करू नये याचा अंदाज घेता येतो.
आक्रमक किंवा बेधडक राशींच्या व्यक्तींनी कधीही समान गुण असलेल्या राशींच्या व्यक्तींशी लग्न करू नये. नाहीतर त्या दोघात कायमच संघर्ष सुरू असतो. तसेच सौम्य राशींनी आपापसात लग्न करू नये कारण कठीण प्रसंगी दोघेही गडबडून जातात. दोघातला एकजण बिनधास्त, धाडसी व दुसरा सौम्य असल्यास दोघांचे चांगले जमते.
मेष राशीच्या व्यक्तींनी मेष, मिथुन, सिंह, वृश्चिक, मकर व कुंभ राशींच्या व्यक्तीशी लग्न करणे टाळावे. नाहीतर घरात बर्याचवेळा तलवारींचा खणखणाट व ठिणग्या उडताना दिसतील. मेष राशींच्या आक्रमक व्यक्तींनी विशेषत: कर्क, तूळ, मीन इ. सौम्य व आध्यात्मिक राशींचा जोडीदार निवडावा कारण या राशींचे पुरूष बरेचसे शांत असल्याने त्यांना मेष राशीची खमकी बायको मिळाल्यास त्यांच्या प्रपंचाची नौका भरकटत नाही कारण सुकाणू मेष जोडीदाराच्या हातात असते.
वृषभ रास ही काहीशी बेधडक पण स्वभावाने अतिशय रसिक असते. जीवनातल्या अनेक गोष्टींचा आनंद घ्यायला यांना आवडते. नवीन ठिकाणे पाहणे, प्रवास, कला, शृंगार इ. यांच्या जिव्हाळ्याचे विषय असतात. यांना सर्वोत्कृष्ट जोडीदार असतो तो तूळ राशीचा. दोन्ही राशी शुक्राच्या आधिपत्याखाली असल्याने जीवनाचा मनमुराद आनंद लुटतात. यांनी मकर, सिंह या त्यांच्या तुलनेत काही प्रमाणात अरसिक असलेल्या राशींशी विवाह टाळावा.
मिथुन - ही अतिशय धारदार बोलणारी रास असल्याने यांच्या अरे ला कारे ने उत्तर देणारा जोडीदार असेल तर रोज भांडणे होतील. हे टाळण्यासाठी यांनी सौम्य स्वभावाचा म्हणजे कर्क, तूळ, मीन इ. राशींचा जोडीदार निवडावा.
कर्क - हे अतिशय भोळे, गलिबल, सरळमार्गी या प्रकारचे असतात. यांना मेष, धनू, सिंह, वृश्चिक अशा खमक्या राशीचा जोडीदार हवा. यांनी तूळ, मीन अशा सरळमार्गी व आध्यात्मिक राशीच्या जोडीदाराशी लग्न करू नये. कारण दोघेही जोडीदार शांत व भोळे असल्याने संकटात डगमगून जातात.
सिंह - हे सरळमार्गी, संतापी, सत्यप्रिय, स्पष्टवक्ते असतात. लबाड्या, छक्केपंजे, फसवणूक यांना जमत नाही. यांनी मेष, वृश्चिक, मकर व कुंभ राशींशी विवाह टाळावा.
कन्या - ही गरीब स्वभावाची रास आहे. कायम संशयी स्वभाव हे यांचे वैशिष्ट्य. यांनी कर्क, मीन, तूळ इ. राशींचा जोडीदार निवडू नये.
तूळ - ही रास बरीचशी वृषभेप्रमाणेच असते. पण वृषभ ही जास्त बेधडक व कमी आध्यात्मिक असते. यांचे कोणत्याही राशीशी उत्तम जमते.
वृश्चिक - आक्रमक व डूख धरून सूड उगविणारी रास. हे अतिशय दीर्घोद्योगीही असतात. यांनी मेष, सिंह, मकर व मेष या आक्रमक राशींच्या व्यक्तींशी विवाह टाळावा.
धनू - सत्वगुणी पण काहीशी आक्रमक व समतोल माणसे या राशीत आढळतात. यांनी कोणत्याही राशीही लग्न केले तरी चालेल, पण मेष, वृश्चिक, मकर व कुंभ राशींशी यांचे खटके उडतील.
मकर - दीर्घोद्योगी व कष्टाळू लोकांची रास. यांच्यात भावनेला फारसे महत्त्व नसते. काहीशी अरसिक, कर्तव्यकठोर माणसे या राशीत आढळतात. यांनी मेष, वृश्चिक, सिंह व कुंभ राशीशी विवाह टाळावा.
कुंभ - बरीचशी मकरेप्रमाणे पण बुद्धिमान लोकांची रास. हे भावनाप्रधान असतात पण नेहमी निर्णय बुद्धीनेच घेतात. या राशीची माणसे अतिशय अहंकारी व तुसडी असतात. स्वतःला जरा जास्त शहाणे समजणार्या माणसांची ही रास आणि हा अहंकार बुद्धिमत्तेतून आलेला असतो. यांनी कोणाशीही लग्न केले तरी कायम स्वत:चाच वरचष्मा गाजवायचा प्रयत्न करतात. यांनी सुद्धा यांनी मेष, वृश्चिक, सिंह व कुंभ राशीशी विवाह टाळावा. नाहीतर घरात रोज भांडणे होतील.
मीन - अतिशय सौम्य, देवभोळ्या व आध्यात्मिक लोकांची रास. यांच्यात अजिबात आक्रमतता नसते. हे जगाला घाबरूनच असतात. यांना एखाद्या आक्रमक राशीचा खमका जोडीदार पाहिजे. यांनी मीन व कर्क राशींचा जोडीदार कधीही निवडू नये. इतर कोणत्याही राशीचा चालेल. हे अतिशय आनंदाने आपल्या जोडीदाराचा वरचष्मा सहन करतात व स्वखुषीने आपल्या जोडीदाराच्या मुठीत राहतात.
वाचने
59953
वाचनखूण
प्रतिक्रिया
83
बोंबला !
छान आणी योग्य लिहिले आहे
अरेरे आम्ही कर्क
भारत देशाची रास मकर आहे
वरील लेखात खालील परिच्छेदात
In reply to वरील लेखात खालील परिच्छेदात by श्रीगुरुजी
हेच टाइप करायचे होते.
In reply to हेच टाइप करायचे होते. by राही
कुंभ राशीचा उत्तम अनुभव.
In reply to वरील लेखात खालील परिच्छेदात by श्रीगुरुजी
बदल
श्रीगुरुजी
कॉलिंग शुची मामी
अजून एक लघु शंका
In reply to अजून एक लघु शंका by स्पा
आरे बाबा राशीच नाव बघ की.
In reply to अजून एक लघु शंका by स्पा
संशयी नव्हे...
ज्यांची 'टाळण्या'च्या
In reply to ज्यांची 'टाळण्या'च्या by प्यारे१
+१
In reply to +१ by शिद
नारायण नागबली,कालसर्पयोग
In reply to नारायण नागबली,कालसर्पयोग by श्री गावसेना प्रमुख
नारायण नागबली,कालसर्पयोग..... सर्व काही ठिक होइल
In reply to +१ by शिद
आहो हा लै जबरड्स्ट योग आहे
In reply to आहो हा लै जबरड्स्ट योग आहे by jaypal
तुम्च्या घरात कायम म्हणजे १२ महीने महाकुंभ मेळा असेल आहात कुठे?
In reply to ज्यांची 'टाळण्या'च्या by प्यारे१
बसा बोंबलत आता म्हणून
मी तुळ राशीची आहे गुर्जी माझ
घ्या
श्रीगुरुजी
मीन राशीची माणसे अतिशय
सगळ्यांनीच मेष, सिंह आणि
In reply to सगळ्यांनीच मेष, सिंह आणि by कवितानागेश
त्यांनी आपापसात करावेत ना ,
In reply to सगळ्यांनीच मेष, सिंह आणि by कवितानागेश
मेष राशीशी कर्क, कन्या, तूळ,
In reply to मेष राशीशी कर्क, कन्या, तूळ, by श्रीगुरुजी
ओक्के !!
In reply to ओक्के !! by सूड
>>> म्हणजे सिंह वाल्याला
In reply to >>> म्हणजे सिंह वाल्याला by श्रीगुरुजी
अजुन एक वादाची ठिणगी, -
In reply to अजुन एक वादाची ठिणगी, - by ५० फक्त
कारण "कन्यीण" असं म्हटलं की
शरद उपाध्याय यांचं एक पुस्तक
In reply to शरद उपाध्याय यांचं एक पुस्तक by प्रियाकूल
उपाध्याय ??
का हो उगा राशीला लागताय
In reply to का हो उगा राशीला लागताय by बॅटमॅन
या ज्योतिषाच काय करायच हे
बरं ठीक आहे..
भविष्य
अरे वा... मस्तच...
मनोरंजक
असं करुयात...
गंमतीशीर धागा.
In reply to गंमतीशीर धागा. by नाना चेंगट
आयला नानाला सिग्नेचर दिसली,
मेष राशीने आधीच धनुवाला गटवलाय..
चंद्र - चंद्र हा आल्हाददायक,
In reply to चंद्र - चंद्र हा आल्हाददायक, by प्रसाद गोडबोले
लोकांनी आलरेडी केलंय हो मॉडेल
In reply to लोकांनी आलरेडी केलंय हो मॉडेल by बॅटमॅन
ह्म्म
मी मिथुन आणी भाग्याने लाभलेला
मी कर्क अन नवरा तूळ. पण
In reply to मी कर्क अन नवरा तूळ. पण by शुचि
मत्सराऐवजी हेवा जास्त योग्य
In reply to मत्सराऐवजी हेवा जास्त योग्य by बॅटमॅन
+१
मेषयोनी, सर्पयोनी वगैरे
In reply to मेषयोनी, सर्पयोनी वगैरे by शुचि
सहमत
In reply to मेषयोनी, सर्पयोनी वगैरे by शुचि
ओ शुचि ताय,
मनोरंजक धागा.
क्रिकेट संघातले काही खेळाडू व
In reply to क्रिकेट संघातले काही खेळाडू व by श्रीगुरुजी
नाही.
In reply to नाही. by दादा कोंडके
एखादा कर्कवाला ब्वाक्सर ठोसा मारून, 'फार लागलं नै ना?'
In reply to एखादा कर्कवाला ब्वाक्सर ठोसा मारून, 'फार लागलं नै ना?' by संजय क्षीरसागर
हा हा...
In reply to एखादा कर्कवाला ब्वाक्सर ठोसा मारून, 'फार लागलं नै ना?' by संजय क्षीरसागर
प्रचंड सहमत.
इतकं मोघम !!
In reply to इतकं मोघम !! by सूड
मी पुष्य आहे. हे खरं आहे
डोक्याला शॉट..
In reply to डोक्याला शॉट.. by उपास
हे स्वभावगुणधर्म चंद्र
मीन - अतिशय सौम्य, देवभोळ्या
In reply to मीन - अतिशय सौम्य, देवभोळ्या by अत्रुप्त आत्मा
हे जगाला घाबरूनच असतात. -
In reply to हे जगाला घाबरूनच असतात. - by ५० फक्त
@म्हणुन गाडीवर मांडी घालुन
In reply to @म्हणुन गाडीवर मांडी घालुन by अत्रुप्त आत्मा
कुनावर बी बसू शकता तं मग
In reply to कुनावर बी बसू शकता तं मग by बॅटमॅन
(No subject)
In reply to कुनावर बी बसू शकता तं मग by बॅटमॅन
@बॅटवाक्य--कुनावर बी बसू शकता
In reply to @म्हणुन गाडीवर मांडी घालुन by अत्रुप्त आत्मा
काय सांगता काय !!
हे जल राशीचे (कर्क, वृश्चिक,
In reply to हे जल राशीचे (कर्क, वृश्चिक, by शुचि
धन्यवाद
In reply to धन्यवाद by अभ्या..
अभ्या तू पण तूळ काय..?
In reply to हे जल राशीचे (कर्क, वृश्चिक, by शुचि
आपल्याला वायु रास फार आवडते.>
In reply to आपल्याला वायु रास फार आवडते.> by अत्रुप्त आत्मा
शी!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
In reply to हे जल राशीचे (कर्क, वृश्चिक, by शुचि
नक्की ??
In reply to हे जल राशीचे (कर्क, वृश्चिक, by शुचि
कर्क व मीन राशीतला फरक
आम्ही वृश्चिक, तेंव्हा जपुनच
हम्म्म्म
हे लोक वर्तमान पत्रात
In reply to हे लोक वर्तमान पत्रात by श्री गावसेना प्रमुख
मी काही काळ वर्तमानपत्रात काम
मिथून
In reply to मिथून by नन्दादीप
कोटी करुन राशीचा "कोटीबहाद्दर